(१७ सप्टेबर १८८५ ः २० नोव्हबर १९७३)
प्रबोधनकार ठाकरे या नावाने महाराष्ट्राला परिचीत असलेले मराठी पत्रकार समाजसूधारक वक्ते व इतिहासकार जन्म कुलाबा जिल्हातील पनवेलचा. शिक्षण पनवेल व देवास येथे मॅट्रिकपर्यंत झाले तथापि ज्ञानेच्या वृत्तीने इंग्रजी-मराठी भाषावर प्रभुत्व संपादन करून त्यांतील उत्तमोत्तम ग्रंथांचे स्वतंत्रपणे अध्ययन त्यानी केले होते. पनवेल येथे असतांना केरळ कोकिळकार कृ.ना. आठल्ये हयाचा प्रेरक सहवास त्यांना लाभला आठल्यांना ते आपले लेखनगुरू मानीत ठाकराचे स्वभाव महत्त्वकांक्षी आणि हरहुन्नरी होता त्यांनी काही काळ सरकारी नोकरी केली टंकलेखन छायाचित्रकार तैलचित्रकार जाहिरातपटू विमा कंपनीचे प्रचारक नाटक कंपनीचे चालक असे अनेक उद्योगही केले तथापि समाजसूधारणेच्या आणि समतेच्या तळमळीतून केलेली अस्पृश्यता निवारण हुंडा विरोध हयांसारख्या सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी आपली वाणी व लेखणी राबवली ग.भा.वैद्याच्या हिंदू मिशनरी सोसायटीच्या कार्याला हातभर लावला सारथी, लोकहितवादी आणि प्रबोधकार हया त्यांनी चालविलेल्या नियतकालिकांची नावेही बोलकी आहेत. त्यापैकि खर्या राष्ट्रोद्धायर्थ सामाजिक आणि धार्मिक गूलामगिचा नायानाट करण्यासाठी काढलेल्या प्रबोधनाशी त्याचे नाव कायमचे निगडित राहिले बीजन समाजोद्धाराच्या आंदोलनाप्रमाणे संयूक्त महाराष्ट्राच्या लढयातही त्यांनी भाग घेतला, त्यासाठी तूरूंगवास भोगला अभिनिवेश युक्त पण अत्यंत सडेतोड, ठाशीच आणि प्रखर विदारक भाषा हे त्याच्या वाणी लेखणीचे वैशिष्टय होते.
March 11, 2015
गोखले, (प्रा.) ल. ना.
लक्ष्मण नारायण गोखले हे नाव पत्रकार ही त्यांची ओळख दिली जाईल. ते पत्रकार होते, पण पत्रकारांचे ते उत्तम शिक्षक आणि मार्गदर्शक मित्र होते. पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातले ते दीपस्तंभ होते. पुणे विद्यापीठाच्या पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातले ते पहिले उत्तम संयोजक होते. ‘ल.ना.’ अशी आद्याक्षरे उच्चारली तर त्यापुढे केवळ गोखले हेच नाव येते ते यामुळेच. ही आद्याक्षरे त्यांच्या त्या आडनावाशी एकरूप झाली होती आणि ती त्यांचा व्यासंग सांगायला पुरेशी होती. ल.ना. सेवानिवृत्त होऊन बरीच वर्षे झाली, पण तरीही त्यांना सर्व घडामोडी इत्यंभूत माहित असायच्या. पत्रकारितेतही रोजच काही ना काही घडत असते.
कुणी त्याकडे लक्ष देते, कुणी देत नाही. ‘लनां’ना आपल्याकडून ती सांगितली जाईपर्यंत ती त्यांना मिळालेली असे. ल.ना. हे त्याही अर्थाने ज्ञानकोशच होते. कोणत्या वृत्तपत्रात काय आले आहे आणि काय हवे होते ते ल.ना. अचूकपणे सांगू शकायचे! वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणारी मराठी भाषा बिघडत चालली आहे, अशी तक्रार अनेकजण करतात, पण कोणी त्यावर उपाय सांगत नाही. ल.ना. म्हणायचे, ‘तुम्हाला वाटले तर मला सांगा, मी एखादा तास घेऊन काय चुकते ते सांगू शकेन.’ अर्थात, यामागे चुका दाखवून देण्यापेक्षा त्या पुन्हा केल्या जाऊ नयेत, हा दृष्टिकोन होता. ‘पत्रकारांसाठी मराठी’ या पुस्तकाचा जन्मही त्यांच्या अशाच आग्रहातून झाला. या पुस्तकातही लिहिताना त्यांनी संपूर्ण वर्षभराचे अंक समोर ठेवून कोणत्या वृत्तपत्राने कोणता शब्दप्रयोग केला आहे, तेही तपासून पाहिले होते. काही वेळा तर अनर्थ होईल, असेही शब्दप्रयोग केले गेल्याचे त्यांना आढळले. या चुका दाखवताना एखाद्या मराठीच्या प्राध्यापकाप्रमाणे त्यांनी सोपी मांडणी केली आहे. पत्रकारांना भाषा शिकवायचा उद्देश त्यामागे नक्कीच नव्हता, तर पत्रकारांनी सुबोध मराठीचा वापर करून वाचकांना चुकीच्या मराठीपासून वाचवावे, ही त्यामागे असणारी दृष्टी होती. त्यांचा त्यासाठी आग्रह होता, पण तो अनाठायी नक्कीच नव्हता. इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये कोठे काय आले आहे आणि त्यामागे काय भूमिका असू शकते, याचे नेमके ज्ञान त्यांना होते. इंग्रजी किंवा हिंदी वृत्तपत्रे मराठीचा वापर करतात का, तर नाही. मग आपण त्यांच्या त्या शब्दांची उसनेगिरी का करायची, असा त्यांचा साधा सवाल असे. फलटणच्या मुधोजी प्रशालेत त्यांनी शिक्षकाची नोकरी केली तरी पत्रकारितेची उपजत वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. ते पुण्यात आले आणि ‘काळ’, ‘त्रिकाळ’ या वृत्तपत्रांनंतर ‘केसरी’मध्ये दाखल झाले. ‘केसरी’त त्यांनी काही काळ ‘वाट्टेल ते’ या नावाचे सदर लेखनही केले, ज्याचे पुढे पुस्तकही झाले. त्या काळात पत्रकारांचे आर्थिक जीवनमान फार चांगले नसले तरी जे होते त्यात समाधान मानणारे ते होते. पुणे विद्यापीठाने वृत्तपत्रविद्येचा अभ्यासक्रम सुरू करायचे ठरवल्यानंतर ते त्या विभागाचे प्रमुख बनले. अतिशय विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणूनही ते ओळखले गेले. वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमासाठी पुणे विद्यापीठात ‘संदेश’कार कोल्हटकर शिष्यवृत्ती ठेवण्यात आली होती, पण पैसे मिळण्यात होणारी दिरंगाई पाहून त्यांनी साऱ्या विद्यापीठाला हलवून सोडले होते. श्रमिक पत्रकार संघाच्या बैठकींमध्ये कधी वादावादी झालीच तर तिथे एकच व्यक्ती अशी असे, की जी त्या सर्व वादावर पडदा टाकून पुढे जाणे श्रेयस्कर मानत असे. ते अर्थातच ल.ना. होते. जयंतराव टिळक, भा. गो. बापट, प्र. ल. गावडे, द. मा. मिरासदार, दा. सी. देसाई, मा. वि. साने आदींबरोबर त्यांनी काम केले. बाहेरच्या अनेक लेखकांना त्यांनी लिहिते केले. पत्रकारितेबाहेर शिक्षण क्षेत्रात काम करतानाही त्यांनी पत्रकारांबरोबरचा संवाद तोडला नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थिवर्गाचे पत्ते आणि त्यांचे काम करण्याचे ठिकाण यांचीही हमखास माहिती त्यांच्याकडेच मिळत असे. संगणकयुग अवतरायचे होते, त्या काळात त्यांच्याकडे जमा होणारी ही माहितीही थक्क करून सोडणारी असे. त्याचा अनाठायी अभिमान बाळगणे हेही त्यांच्या गावी नव्हते. अलीकडे ते एका पुस्तकाच्या लेखनात गुंतले होते, त्याचे काम चालू होते, तोपर्यंत त्यांच्या तब्येतीने उमेद बाळगली होती. पुस्तकाचे काम संपत आले तेव्हा त्यांनी पडद्याआड जायचे ठरवले होते की काय, हे न कळे, पण झाले तरी तसेच! त्यांच्या निधनाने मात्र एका अतिशय चिकित्सक वृत्तीच्या सुसंस्कृत पत्रकारास आपण मुकलो आहोत.
August 5, 2017
चतुरस्त्र लेखिका सरिता मंगेश पदकी यांचा जन्म १३ डिसेंबर १९२८ रोजी झाला.
चैत्रपुष्प (काव्यसंग्रह) बारा रामाचे देऊळ, घुम्मट (कथासंग्रह) बाधा, खून पाहावा करुन, सीता (नाटके) व ब्राझीलच्या झोपडपट्टीत राहणार्या करोलिना मारिया डि जीझस यांच्या आत्मनिवेदनाच्या काळोखाची लेख या अनुवादासह चार अनुवादित पुस्तके व भरपूर बालसाहित्य त्यांच्या नावावर आहे.
## Sarita Mangesh Padaki
mss
August 22, 2017
वयाची ऐंशी गाठलेले ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि गानगुरू पंडित शरद साठे यांच्यासाठी शनिवारी, २४ रोजी मुंबईत होणारा सोहळा केवळ सहस्रचंद्रदर्शनाचा वा त्यानिमित्त होणाऱ्या सत्काराचा नाही.. त्यांच्या तीन सीडींचे प्रकाशन आणि मग सतारनवाज्म अब्दुल हलीम ज्माफर खान आणि सारंगीसम्राट रामनारायण यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार,
त्यानिमित्ताने साठे यांना गुरू मानण्याचा ‘टप्पा’ गाठलेल्या अनेक गायक-शिष्यांचीही उपस्थिती, असे हे स्वरमय वातावरण असेल. ग्लॅमरची मातबरी- ज्यापुढे आजचे अनेक गायक शरण जातात- तशी साठे यांना कधी वाटली नव्हती आणि याही सोहळय़ात, प्रसिद्धीपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची मानणाऱ्यांची मांदियाळी असेल. ही गुणवत्तेची बैठक साठेंना वयाच्या १७व्या वर्षी मिळाली, ती थेट पं. द. वि. ऊर्फ बापूराव पलुस्कारांकडून!
अगदी १९५५ पर्यंत, पलुस्करांच्या अकाली निधनापर्यंत ही तालीम सुरू होती. त्यानंतर साठे मुंबईत, बी. आर. देवधरांच्या विद्यालयात शास्त्रशुद्ध बैठक पक्की करत गेले.. पण फर्गसनमध्ये असताना ऐकलेले काही काहीशा नकलेचा दोष पत्करून गळय़ात घटवलेले फय्याजखाँ, मास्टर कृष्णराव, हिराबाई बडोदेकर अशांच्या गायकीत अंगभूत असलेले मोकळेपणही त्यांना भावत होते. त्याची स्वत:शी गाठभेट करून घेण्याचा क्षण साठेंना बहुधा, पं. शरश्चंद्र आरोलकरांच्या मठीत गवसला असावा.
ग्वाल्हेर गायकीतील ‘टप्पा’ हा गानप्रकार शिकायला आरोलकरांकडे साठे गेले आणि तिथे रमले. पुढे विद्यापीठीय स्तरावर टप्पा गायकीचे प्राध्यापक परीक्षक म्हणून काम करणारे पं. साठे यांची ‘यमनकल्याणा’सारख्या रागांवरही इतकी घरंदाज हुकमत आहे की, या गायनाचे जतन अव्वल देशी संस्थांखेरीज वॉशिंग्टन विद्यापीठानेही केले. आयटीसी- संगीत संशोधन संस्थेचा पुरस्कार (२००६), काशी संगीत समितीतर्फे ‘संगीतरत्न’ (२००७) हे सत्तरीनंतर मिळालेले सन्मान वगळता, ‘आकाशवाणीचे ए ग्रेड आर्टिस्ट’ ही साठे यांची ओळख होती, पण त्याबद्दल खंतखेद बाळगणाऱ्यांपैकी साठे नव्हेत. ‘डीव्ही पलुस्करांवरील लघुपटासाठी आवाज वापरला गेला’ या समाधानाचे मोल मात्र साठेंकडून जाणावे!
August 5, 2017
गरिबांच्या मुळावर उठलेला चर्मोद्योग घोटाळा उघड करणे असेल, गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल, कापूस विक्रीतून सरकारला नफा मिळवून देणे असेल..अशी विविध सरकारी कामं कर्तबगारीने पार पाडणारे अधिकारी ही सुधीर ठाकरे यांची ओळख.
नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून एम.एससी. (इलेक्ट्रॉनिक्स) केल्यानंतर त्यांनी प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. यानंतर त्यांनी प्रशासनात एम.ए. पदवी मिळवली. एलएलबीही पूर्ण केले. अभ्यास सुरू असतानाच त्यांनी भरती परीक्षा देऊन १९७५मध्ये विक्रीकर अधिकारी म्हणून पहिले प्रशासकीय पद स्वीकारले.
१९७८ मध्ये त्यांची सहकार खात्यात नियुक्ती झाली. याच खात्यात ते जॉईंट रजिस्टार झाले. यावेळी त्यांनी चमोर्द्योग घोटाळा उघड केला. राज्यातील अनेक बड्या घोटाळ्यांपैकी हा एक घोटाळा मानला जातो. यामध्ये मुंबईचे तत्कालीन नगरपालांपासून ते अनेक राजकीय नेत्यांना कोर्टाच्या पायर्या चढाव्या लागल्या. त्यांच्या या कामात तत्कालीन आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी त्यांना खूप मदत केली.
यानंतर ते कापूस महामंडळात जॉईंट एम.डी. म्हणून रूजू झाले. त्यावेळेस सरकार शेतकर्यांचा कापूस विकत घ्यायचे आणि तो चढ्या भावाने विकायचे. मात्र यामध्ये म्हणावी तितकी सुसूत्रता नव्हती. सरकारला नफा मिळवणंही अवघड होत होतं. पण त्यांनी विभागीय कामात सुसूत्रता आणून सरकारला नफा मिळवून दिला. ठाकरे यांनी त्यांच्या कारकीदीर्त एका वर्षी सरकारला ७०, तर दुसर्या वर्षी ५० कोटींचा नफा मिळवून दिला. त्यांच्यानंतर हा नफा मिळवणे अद्याप कोणाला शक्य झाले नाही. यानंतर ते ग्राहक हित विभागात जॉईंट एम.डी. झाले.
१९९१ मध्ये ते आयएएस झाले. यानंतर त्यांनी सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सीईओपदाची सूत्रे स्वीकारली. लगेच त्यांना जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेथेही त्यांनी विविध प्रयोग केले.
यानंतर मंत्रालयात विविध विभागांत काम करताना त्यांनी गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान अशा योजनांना चालना दिली. ग्राम विकास विभागात सचिव असताना त्यांनी राज्यातील सर्व गावे कम्प्युटरने जोडण्याचा 'संग्राम' हा अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविला.
त्यांची ग्रामविकास खात्याच्या सचिवपदावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. दोन वर्षांच्या या काळात एमपीएससीचा दर्जा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या दर्जापर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे. आता नव्या विभागातील आव्हानांना सामोरे जाताना या विभागाचा कायापालट करण्याचे त्यांचे ध्येय आहे. आम्ही समाजाचे सेवक आहोत राजे नाही, अशी भावना जपणारा हा अधिकारी याही कामात यशस्वी होईल, यात शंका नाही.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
महाराष्ट्रात ‘पंचांग म्हणजे दाते पंचांग’ हे समीकरण झाले आहे. याचा परिणाम म्हणून भारत सरकारने कॅलेंडर रिफॉर्म कमिटीवर अण्णा दाते यांना सदस्य करून घेतले.
July 4, 2022
खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या होत्या.
July 1, 2022
आपल्या दैनंदिन जीवनात ज्या घटना घडतात त्या टीपकागदासारख्या टिपून घेत त्यावर भाष्य करणारे अस्सल शाहीर म्हणजे आत्माराम पाटील. ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा, खुशाल कोंबडं झाकून धरा’ शाहीर आत्माराम पाटलांचा हा पोवाडा शाहीर अमरशेख यांनी शिवाजी पार्कातल्या जाहीर सभेत खडय़ा आवाजात गायला आणि क्षणार्धात अवघ्या वातावरणात एक चैतन्य सळसळलं.
सगळ्या घटनांवर वास्तववादी पोवाडे रचणाऱ्या शाहीर आत्माराम पाटील यांचे मुंबईत प्रभादेवी येथे एका खाजगी इस्पितळात हृदयविकाराच्या झटक्याने बुधवारी निधन झाले. ते केवळ गाणारे शाहीर नव्हते तर लिहिणारे शाहीर म्हणून त्यांची ख्याती होती. ते उत्तम भाष्यकार होते. रोज सर्व वर्तमानपत्रे वाचून त्यावर कवने करण्यात त्यांचा हातखंडा होता.
गोवा मुक्ती संग्रामाचा लढा असो किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ, शाहीर आत्माराम पाटील यांचे योगदान फारच मोठे होते. शाहिरांच्या पोवाडय़ांमध्ये, कवनांमध्ये अतिशय वास्तववादी आणि व्यक्तींना योग्य न्याय देणाऱ्या रचना असत. पोवाडे, लावण्या, समरगीते, समूहगीते, स्मरणगीते अशा स्वरूपाचे विपुल लिखाण त्यांनी केले. अभंगापासून ते लावण्यांपर्यंत वेगवेगळे प्रकार त्यांनी पोवाडय़ांमध्ये हाताळले. शाहीर हे पुरोगामी विचारसरणीचे होते.
फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीच्या मुशीत ते तयार झाले होते. दैववाद, सांप्रदायिकता त्यांना मान्य नव्हती. त्यांची शाहिरी ही सर्वसामान्यांची शाहिरी होती. ‘एका धरतीच्या पोटी नाना प्राणी जन्म घेती. तेथे माणसावानी जात पुन्हा मिळायची नाय’ हा आणि ‘मिसळ झाली मुंबई रे बाबा मिसळ झाली मुंबई’ हे त्यांचे मुंबईवरचे कवन प्रचंड गाजले होते. जाती विसर्जनाबद्दलच्या लावणीमध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या ११८ जातींचे वर्णन करून आपले सुक्ष्म निरीक्षण नोंदविले होते. उतारवयात त्यांनी नव्या पिढीसाठी शाहिरीच्या जतन-संवर्धनाचे काम हाती घेतले होते.
महाराष्ट्रातल्या अनेक शाहिरांचे संघटन करून त्यांनी सबंध महाराष्ट्रभर प्रचार फेऱ्या काढल्या. त्यांच्या ‘शाहिरी फुलोरा’ या कार्यक्रमाचे शेकडो प्रयोग झाले. नवोदित शाहिरांना त्यांनी आपली कवने देऊन टाकली आणि त्यासाठी कधीही पैशांची अपेक्षा केली नाही. अशा स्वभावामुळेच शाहीर आयुष्यभर उपेक्षित जीवन जगले. इतर लोककलावंतांप्रमाणे त्यांनी शासनदरबारी कधीच हुजरेगिरी केली नाही आणि म्हणून अनेक सन्मानांपासून त्यांना वंचित रहावे लागले.
शाहीर अमरशेख पुरस्काराने आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. साहित्य संस्कृती मंडळाची गौरववृत्ती त्यांना मिळाली होती. ठाणे जिल्ह्यातील कपासे खेडेगावातील शेतकरी कुटुंबात ९ नोव्हेंबर १९२४ रोजी आत्माराम पाटलांचा जन्म झाला. लोअर परळ रेल्वे वर्कशॉपजवळील कवळी कंपाऊंडमधल्या एका चाळीत शाहीर राहात होते. निधनाच्या २४ तास अगोदर त्यांनी निवडक मित्रांसोबत ८६ वा वाढदिवस साजरा केला होता.
भायखळा येथील मंडईत भाजी विकता विकता त्यांनी एकापेक्षा एक अशी सरस गाणी लिहिली. ‘भाजीत कमावलं आणि जीजीत गमावलं’ असे त्यांची मित्रमंडळी नेहमी चेष्टेने म्हणायचे. आपली लेखणी त्यांनी नेहमी भांडवलदारांविरुद्ध वापरली. मंडईत भाजीचा व्यवसाय करताना उगीचच व्यापाऱ्यांचा रोष नको म्हणून ते कधीकधी ‘धरतीनंदन’ या टोपणनावानेदेखील लिहायचे.
आणीबाणीच्या काळात वसंतदादा पाटील यांनी शाहिरांना २० कलमी कार्यक्रमावर आधारीत गाणी लिहायला सांगितली होती. दादा शाहिरांच्या घरी गेले, तेव्हा तिथे वीजही नव्हती. दादांनी ते चित्र पाहून तुम्हाला सरकारी कोटय़ातून घर देतो असे आश्वासन दिले. मात्रशाहिरांनी सरकारी घर स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. ‘मुंबईचा भाजीबाजार’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर असून प्रभाकर ओहोळ लिखित ‘एका शाहिराची कथा’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्यांच्या आयुष्याची चित्तरकथा रेखाटण्यात आली आहे.
August 5, 2017
कै.जनार्दन खंडेराव गुप्ते यांचा जन्म १९१३ साली बडोदा येथे झाला. मॅट्रीक झाल्यावर १९३९ साली ब्रिटीश सैन्यामध्ये भरती झाले.
June 1, 2010
वेगवेगळे आवाज काढण्याची हौस असल्याने अजित भुरे हे पार्श्वभाषक (डबिंग आणि व्हॉइसिंग आर्टिस्ट) म्हणूनही गाजले आहेत.
June 17, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti