ठाण्याचे आघाडीचे क्रिकेटपटु व क्रीडाविश्वाला लाभलेले अप्रतिम रत्नजडित कोंदण असे खंडेराव रांगणेकर यांच्या कारकिर्दीचे वर्णन करावे लागेल.
January 3, 2015
“हुसेन टू विजय कुलकर्णी” या चित्र मालिकेच्या माध्यमातून औरंगाबादचे चित्रकार विजय कुलकर्णी यांच्या चित्रांची मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, गोवा, चेननई, कोचीन शहरांत प्रदर्शने भरली. अमूर्त चित्रशैलीने सुरुवात करणारे कुलकर्णी यांनी वळणावर मात्र अजिंठा चित्रशैलीचा अभ्यास सुरु केला व पुढील ३५ वर्षे याच चित्रशैलीने त्यांची ओळख बनविली.
अजिंठा स्कूल
July 24, 2015
महेश कोठारे हे मराठी नाट्यअभिनेते अंबर कोठारे यांचे पुत्र आहेत. त्यांनी छोटा जवान या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमधून त्यांनी बाल कलाकाराच्या भूमिका केल्या. त्यातील राजा और रंक या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका उल्लेखनीय मानली गेली. त्यांच्यावर चित्रित झालेले "तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है" हे गाणे विशेष लोकप्रिय ठरले.
महेश कोठारे यांनी आपले एल.एल बी. ही कायद्यातील पदवी मिळवली व काही वर्षे वकिलीदेखील केली. कोठारे यांनी त्यांची बालकलाकार अशी ओळख असतानादेखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण करण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी ठरले. मुख्य नायकाच्या भूमिकेबरोबरच खलनायकी पात्र वठवण्याचे साहसही त्यांनी स्वीकारले. त्यांचे घरचा भेदी, लेक चालली सासरला अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकप्रिय ठरले. गुपचुप गुपचुप, थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकाही साकारल्या.
कारकीर्द भरात असताना कोठार्यांनी दिग्दर्शनात उतरण्याचा धाडसी निर्णयही घेतला. धूमधडाका हा त्यांनी अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती केलेला पहिला चित्रपट होता. या चित्रपटामधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनाही मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली. त्यानंतरच्या त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले आहे. स्वतः चित्रपटात असूनदेखील महेश कोठार्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका दिली.
महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांत नवनवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयोग केले. धडाकेबाज चित्रपटात बाटलीतील माणूस दाखविण्यासाठी त्यांनी अमेरिकावारी केली, तसेच झपाटलेला चित्रपटात बाहुली जिवंत दाखविण्यासाठी आधुनिक तंत्र वापरले. मराठी चित्रपटांमध्ये डॉल्बी डिजिटल ध्वनी पहिल्यांदा वापरण्याचे श्रेय कोठार्यांनाच जाते. त्यांना इ.स. २००९ साली महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.
महेश कोठारे यांनी दूरचित्रवाणी माध्यमातही दमदार पाऊल टाकले आहे. स्टार प्रवाह या मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवरील त्यांची मन उधाण वार्याचे ही मालिका लोकप्रिय ठरली.
अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही अव्वल कामगिरी करुन मराठी रसिकांना खिळवून ठेवणारे चित्रपट निर्माण करणारे महेश कोठारे हे एक प्रमुख मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अभिनितदिग्दर्शीत केलेले धूमधडाका, दे दणादण, धडाकेबाज इ. चित्रपट अजूनही रसिकांच्या मनात रुंची घालतात.
March 11, 2015
जपानने अंतराळात पाठवलेली हयाबुसा ही अंतराळ कुपी ऑस्ट्रेलियातील वूमेरा तळावर उतरली, त्यावेळेस जपान आणि अमेरिकेबरोबरच मुंबईतही जल्लोष साजरा झाला. कारण या अंतराळ कुपीच्या परतण्यामध्ये एका भारतीय वैज्ञानिकाचे यश सामावलेले होते. या वैज्ञानिकाचे नाव डॉ. श्याम भास्करन. ४६ वर्षांचे असलेल्या डॉ. भास्करन यांचा जन्म मुंबईत माटुंगा येथे झाला. बालपण मुंबईतच गेले. हा लहान मुलगा त्याहीवेळेस रात्री आकाशाकडे डोळे लावून बसलेला असायचा, अशी आठवण श्यामचे वडील गोिवदन सांगतात.
हा मुलगा आता जगभरातील अनेक महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांचा दिशादर्शक ठरला आहे. काही वर्षांपूर्वी नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मितीबद्दल एक महत्त्वाची शोधमोहीम हाती घेतली होती. पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी महत्त्वाचा ठरणारा पाण्याचा अंश आणि प्रत्यक्ष जीवदेखील पृथ्वीच्या बाहेरच्या वातावरणातून आले असावेत, असे संशोधकांना वाटते आहे. या दोन्ही महत्त्वाच्या बाबी अशनी - धूमकेतूच्या शेपटा- तून आल्या असाव्यात असा संशोधकांचा प्राथमिक अंदाज आहे. त्याची नेमकी माहिती घेण्यासाठीच डीप इम्पॅक्ट ही मोहीम नासातर्फे हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत यान थेट टेम्पल- वन या धूमकेतूवर ३६ हजार ८०० प्रति तास या वेगाने हे यान आदळवण्यात आले.
धूमकेतूचा वेग आणि यानाचा वेग याचे गणित करून ही मोहीम पार पाडण्यात आली. ही सारी योजना फत्ते करण्यात डॉ. भास्करन यांचा सिंहाचा वाटा होता. मात्र त्यावेळेस त्यांच्या नावाची फारशी चर्चा झाली नाही. आताची ही मोहीमदेखील डीप इम्पॅक्टपेक्षा अधिक नेमकेपणाची गरज असलेली होती. म्हणूनच जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेने त्यासाठी नासाची मदत मागितली. या मोहिमेमध्ये अंतराळ कुपी प्रत्यक्ष एका अशनीवर उतरणार होती आणि त्यावरील अनेक नमुने गोळा करून कुपीच्या माध्यमातूनच ते पृथ्वीवर आणले जाणार होते. अशनीवरून गोळा केलेल्या या नमुन्यांवरून भविष्यात संशोधन केले जाणार असून त्यामुळे पृथ्वीची निर्मिती आणि भूतलावरील जीवाचे अस्तित्व या सर्व बाबींची उकल होणे अपेक्षित आहे.
अशनीवर उतरण्यासाठी नेमकेपणा खूप गरजेचा होता. म्हणूनच नासाने जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेला डॉ. भास्करन यांच्या नेतृत्त्वाखालील चमू मदतीसाठी दिला. डॉ. भास्करन सध्या नासाच्या आऊटर प्लॅनेटस् नेविगेशन ग्रुपमधील महत्त्वपूर्ण वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी नासाने हाती घेतलेल्या अनेक मोहिमांमधील नेविगेशन टीमचे नेतृत्व त्यांनी यशस्वीरीत्या केले आहे. जपानने हाती घेतलेल्या या मोहिमेला सुमारे सात वर्षांपूर्वीच सुरुवात झाली होती. ही अंतराळ कुपी हयाबुसा गेली सात वर्षे फिरतेच आहे. २५ नोव्हेंबर २००५ रोजी ही अंतराळ कुपी इटोकोवा या अशनीवर यशस्वीरीत्या उतरली. सुमारे ३० मिनिटे ती त्यावरच होती. त्या काळात गोळा केलेले नमुने घेऊन ही कुपी आता परत आली आहे. या कुपीने आणलेले नमुने भविष्यातील संशोधनासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. या मोहिमेचे सर्व यश हे कुपी यशस्वीरीत्या परत येण्यामध्ये आहे. त्याची प्रमुख जबाबदारी नेविगेशन करणाऱ्या डॉ. भास्करन यांची होती.
कुपी वळविण्यासाठी हायड्रेझाईन इंधन वापरले जाते. मात्र तेच संपुष्टात आल्याने या मोहिमेच्या यशस्वितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या शिवाय त्याचा समतोल साधणाऱ्या यंत्रणेमध्येही तीन बिघाड निर्माण झाले होते. त्यामुळे अशनीपर्यंत मजल मारून यशस्वी ठरलेली ही कुपी परत येणार का, असा प्रश्न होता. मात्र डॉ. भास्करन यांनी कसब पणाला लावले आणि मोहीम यशस्वी करून दाखवली. गेली ११ वर्षे डॉ. भास्करन नासाच्या जेट प्रोप्लशन लॅबोरेटरीमध्ये कार्यरत आहेत. याच ठिकाणी त्यांचा नेविगेशन ग्रुप काम करतो. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवातच गॅलिलोओ मिशनपासून केली. मंगळाच्या ओडिसी मिशनमध्येही त्यांचा मोलाचा सहभाग होता. डीप स्पेससाठी त्यांनी नवीन नेविगेशन यंत्रणाच विकसित केली होती.
टेक्सास विद्यापीठातून त्यांनी बी. एस. व एम. एस. केले तर पी. एचडी कोलोरॅडो विद्यापीठातून पूर्ण केली. भारताचे चांद्रयान-एक अंतराळात झेपावले त्याहीवेळेस ते नासाच्या चमूचे सदस्य या नात्याने बंगळुरूला उपस्थित होते. सध्या ते अमेरिकेत असले तरी आयुष्यातील अनेक चांगल्या आठवणी या मुंबईमध्ये पेडर रोडवरील बीएआरसीच्या केनिलवर्थ या निवासी संकुलाशीच संबंधित असल्याचे ते अभिमानाने सांगतात. मुंबईकरांनाही त्यांचा अभिमान आहेच!
August 5, 2017
लेखन आणि बुद्धीबळ ह्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविणारे ठाण्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे श्री. शिरीष वामन हिंगणे. “काय पाहिलस माझ्यात?”, “गंगुबाई नॉनमॅट्रीक” ह्या व अशा अनेक मालीकांत एपिसोड लेखन त्यांनी केले.
May 23, 2014
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील अस्थिरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश कोतवाल हे हातावरील शस्त्रक्रियेतील देशातले आघाडीचे शल्यचिकित्सक. त्यांनी हे नैपुण्य अमेरिकेतील केंटकी लुईव्हिलमधील हॅंडसर्जरीची संस्था आणि न्यूयॉर्कमधील हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी येथे मिळवले. आठ वर्षांपूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या दोन्ही मनगटांवर शस्त्रक्रिया करुन त्यांना हाताच्या बोटांवरील गमावलेले नियंत्रण डॉ. कोतवाल यांनी परत मिळवून दिले.
डॉ. प्रकाश कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला या हातांनी हात दिले मज हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. प्रकाश कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला या हातांनी हात दिले मज हा लेख वाचा.

MM-022
<!--डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हा लेख वाचा. या हातांनी हात दिले मज -->
August 26, 2015
पु.ना.ओक यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए आणि कायद्याची पदवी घेतली. काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी शिकवले आणि त्यानंतर ब्रिटीश आर्मी जॉईन केली. दुसऱ्या महायुद्धात सिंगापूर मध्ये त्यांची पोस्टिंग होती.
July 6, 2022
(25 जुलै 1922 ते 27 सप्टेंबर 2002)
प्रा. वसंत बापट यांचा जन्म 1922 रोजी सातारा जिल्हयातील कह्राड येथे झाला. तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले. त्यानंतर `नॅशनल कॉलेज आणि `रामनारायण रूईया कॉलेज` हया महाविद्यायलयातुन मराठी व संस्कृत हया विषयाचे प्राध्यापक होते. 1974 पासून मुंबई विद्यापिठातील गुरूदेव रविंद्र टागोर अध्यासनाचे प्राध्यापक होते. साहित्य अकादमीचे सदस्य होते. प्रा. वसंत बापट हे स्वांतत्र्य चळवळीतही सहभागी झाले होते. 1942 च्या चलेजाव चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भुमिका बजावली होती. ऑगस्ट 1943 ते जानेवारी 1945 पर्यंत ते तुरूगांत होते. 1947 ते 1982 ते पर्यंत ते मुंबई विद्यापिठात ते प्राध्यापक होते. 1983 ते 1988 ते साधनाचे संपादक होते. राष्ट्रसेवा दलाशी ते सलंग्न होते. 1972 साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि सानेगुरूजींच्या सहवासाचे संस्कार झाले. `बिजली` हया पहिल्या काव्यसंग्रहावर हया संस्काराचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. `अकरावी दिशा` , `सकीना` आणि `मानसी` हे त्यांचे बिजली नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहील्या.
प्रा. वसंत बापट यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
मराठी कवी वसंत बापट (29-Jul-2017)
मराठीतील कवी वसंत बापट (17-Sep-2017)
ज्येष्ठ कवी वसंत बापट (17-Sep-2021)
June 8, 2015
सीकेपी समाजातील अनेक महिला आज जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये अग्रणी राहून आपल्या समाजाला गौरवीत करत आहेत. खासगी संस्था ते मल्टिनॅशनल कोर्पोरेट्स, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पाककला, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रांत सुद्धा आपल्या महिलांचा वावर वाखाणण्याजोगा आहे. तलवार आणि लेखणीचा वारसा सांगणाऱ्या आपल्या या समाजात लेखणीचा उत्तम वापर करत साहित्य निर्मिती करणाऱ्या अनेक महिला आजही विविध माध्यमांतून आपले साहित्यिक योगदान देत असतात. योगायोगाने या वर्षी २२ मे रोजी पुणे येथे दुसरे सीकेपी साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सीकेपी समाजातील शंभराहून अधिक लेखिका कवयित्रींना आणि अगदी पाकशास्त्रावरील पुस्तके लिहिणाऱ्या सुगरणींना तुमच्यासमोर आणायचा हा एक छोटासा प्रयत्न.
March 22, 2022
December 15, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti