(प्रा.) अभय करंदीकर

करंदीकर, (प्रा.) अभय
संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पदवी, पदव्युत्तर पदवी शिवाय पीएच.डी. मिळालेली व्यक्ती सर्वसाधारणपणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एखाद्या नामांकित कंपनीमध्ये अतिवरिष्ठ पदावर गडगंज पगारनिशी रूजू होते. मग काही वर्षांतच सीइओपदापर्यंत पोहोचते किंवा स्वतची कंपनी सुरू करते. या सर्व गोष्टी प्रा. अभय करंदीकर यांनी सहज शक्य होत्या. मात्र त्या मार्गाने न जाण्याचा निर्णय त्यांनी जाणीवपूर्वक घेतला. मूळ शिक्षणामध्येच त्यांना अधिक रस होता.

कालच घोषित झालेल्या भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रदान केल्या जाणाऱ्या मानाच्या डॉ. विक्रम साराभाई पुरस्कारातील पाच मान्यवरांमध्ये प्रा. अभय करंदीकर यांचा समावेश आहे. स्वत:ची शैक्षणिक आवड जोपासतानाच ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. शालेय शिक्षण ग्वाल्हेरला झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते बाहेर पडले. कानपूर आयआयटीमधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (१९८६) पूर्ण केले. नंतर एम.टेक (१९८८) व पीएच.डी.ही (१९९५) पूर्ण केली. मध्यंतरीचा काही काळ त्यांनी पुण्याला सी-डॅकमध्येही काम केले. सी-डॅकमध्ये असताना हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग ग्रुपचे मुख्य समन्वयक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सध्या ते आयआयटी पवईमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअिरग विभागात प्राध्यापक असून टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसच्या निधीतून साकारलेल्या सेंटर फॉर एक्सलन्स इन टेलिकॉमचे समन्वयक आहेत. त्यापूर्वी एम. टेक पूर्ण केल्यानंतर ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) रूजू झाले होते. इस्रोच्या अहमदाबाद येथील पीआरएलमध्ये त्यांनी काम पाहिले. माहिती तंत्रज्ञान विषयातील या पीएच.डी.नंतर मात्र त्यांच्या कामाला अधिक आयाम मिळाले. सध्या ते एकाच वेळेस सहा महत्त्वाच्या विषयांवर प्रगत संशोधन करीत आहेत. वायरलेस नेटवर्कमधील कंट्रोल आणि परफॉर्मन्स मॉडेिलग, वायर्ड आणि वायरलेस नेटवर्क मधील रिसोर्स अ‍ॅलोकेशन आणि सेवेतील दर्जा, नेक्स्ट जनरेशन वायरलेस नेटवर्क, को-ऑपरेटिव्ह रीले आणि सेल्फ ऑर्गनायझिंग नेटवर्क, करियर इथरनेट आणि मोबाईल बॅकहॉल, ग्रामीण भागातील वायरलेस नेटवर्क असे हे संशोधनाचे प्रमुख सहा विषय आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा एक चमू या विषयांवर काम करतो आहे. ग्रामीण भागातील वायरलेस नेटवर्क हा विषय सर्वाधिक महत्त्वाचा आहे. कारण भारतासारख्या देशांत दूरसंवाद क्रांती खऱ्या अर्थाने तळागाळात पोहोचवायची असेल तर त्यासाठी आपल्याला वायरलेस नेटवर्कवर भर द्यावा लागणार आहे. सध्या त्यांचे डिजिटल कम्युनिकेशन थिअरीवरही प्रगत संशोधन सुरू आहे. करंदीकर व त्यांच्या चमूने केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली. इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स ही महत्त्वाची संस्था डिजिटल नेटवर्किंग आणि इतर संबंधित बाबींमधील प्रमाणके ठरविण्याचे काम करते. करंदीकर यांच्या नेतृत्त्वाखालील चमूने यातील एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय प्रमाणक निश्चित करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रा. करंदीकर प्रमुख असलेल्या सेंटरमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधन सुरू आहे. संशोधनाचेही दोन प्रमुख प्रकार असतात. एक पूर्णपणे शक्षणिक स्वरूपाचे आणि दुसरे प्रयोगात्मक प्रत्यक्षात येणारे. प्रा. करंदीकर यांचा विशेष म्हणजे त्यांना शक्षणिक संशोधनाबरोबरच प्रत्यक्षातील त्याच्या उपाययोजनांमधील संशोधनामध्येही तेवढाच रस आहे. आयआयटीतील प्राध्यापकांचा विशेष म्हणजे अनेक महत्त्वाच्या स्टार्ट-अप कंपन्यांच्या स्थापकांमध्ये त्यांचा समावेश असतो. ही बाब प्रा. करंदीकर यांनाही लागू आहे. इसोडस नेटवर्क्‍सच्या उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग आहे. ही कंपनी आपल्या देशात तसेच एशिया- पॅसिफिक परिक्षेत्रात मेट्रो इथरनेटच्या क्षेत्रात कार्यरत आहे. आता जाहीर झालेला डॉ. साराभाई संशोधन पुरस्कार म्हणजे त्यांच्या आजवरच्या संशोधनावर उमटलेली राष्ट्रीय मोहोरच आहे.

Author