महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्रीपद भूषविणार्या नासिकराव तिरपुडे यांनी आदिवासी व मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला. वकिली व पत्रकारितेत यशस्वी कारकीर्द करीत महाराष्ट्राच्या राजकारणावरही आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली. विदर्भात शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारुन त्यांनी ज्ञानगंगा खेडोपाडी नेण्याचे व्रत अंगिकारले होते. जुन्या मध्य प्रदेश राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थखात्याचे उपमंत्रीपद भूषविलेल्या तिरपुडे यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वन व गृहनिर्माण, आदिवासी कल्याण व पर्यटन आदी विभाग यशस्वीपणे सांभाळले. तळागाळातल्या लोकांसाठी झगडणारा नेता अशीच त्यांची ख्याती होती.
नासिकराव तिरपुडे
महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्रीपद भूषविणार्या नासिकराव तिरपुडे यांनी आदिवासी व मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला.