(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दत्तप्रसन्न नारायण कारखानीस

    कुणा आवडतो मोर पिसार्‍याचा' या कवितेचे कवी दत्तप्रसन्न नारायण कारखानीस यांचा जन्म १७ ऑगस्ट १९०८ साली झाला.

    त्यांच्या कवितांचे 'क्षितिजावर' व 'काव्यविलास' असे दोन संग्रह निघाले. त्यांच्या अनेक कविता मराठी क्रमिक पुस्तकांमध्ये समाविष्ट झाल्या.

    ## Dattaprasanna Narayan Karkhanis

      July 31, 2017


  • मल्हारराव होळकर

    छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याकामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदी पर्यंत वाढविल्या. आयुष्यामध्ये जी काही प्रगती झाली ती जेजुरीच्या खंडेराया मुळेच अशी त्यांची धारणा असल्याने त्यांनी कधीही या दैवताचा विसर पडू दिला नाही.

      January 22, 2010


  • वसंत कानेटकर

    वसंत कानेटकर

    महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं नाट्यक्षेत्रातील एक नाव म्हणजे दर्जेदार नाटकांचे लेखक वसंतराव कानेटकर. फक्त नाटककार नाही तर कथा, कादंबरी आणि वैचारिक लेखन करणारे वसंतराव कानेटकर हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व.

      February 4, 2010


  • कुसुम अभ्यंकर

    कुसुम अभ्यंकरांची दुसरी ओळख म्हणजे त्या रत्नागिरीच्या मतदारसंघातून १९७८ साली आमदार म्हणून निवडून आल्या. त्या काळात खेडोपाडी फिरून त्यांनी आपल्या मतदारांच्या अडीअडचणींकडे जातीने लक्ष पुरवले. उत्तम वक्तृत्वाची कला त्यांच्याजवळ होती. त्यामुळे माणसांशी संवाद साधून माणसे जोडण्याचे कसब त्यांनी साध्य केले होते.

      June 24, 2022


  • नर्गिसबानू चिखलीकर

    नर्गिसबानू यांचा जन्म निपाणीजवळच्या चिखली या छोट्या गावामध्ये झाला. कलावंतांचं कुटुंब असल्यामुळे कलेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी चिमुकल्या नर्गिसने कथ्थक शिकायला सुरुवात केली होती. इतरांना थक्क करून टाकणारी तिची ही नृत्य कला बाबासाहेब मिरजकर या तिच्या रत्नपारखी गुरूंनीही त्यावेळी चांगलीच ओळखली होती. त्याकाळी कोल्हापुरात लावणी-लोकनाट्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठल्याने अशा नतिर्कांना नेहमीच मागणी असे. उत्तम बांधा, आकर्षक व्यक्तिमत्त्व व नृत्यकौशल्यात पारंगत असणार्‍या नगिर्स यांच्यात अभिनयगुणांचीसुध्दा बिलकुल कमतरता नव्हती. त्यांनी प्रथम लोकनाट्यातून रंगमंचावर पाऊल ठेवलं.

      July 26, 2011


  • संपदा सिताराम वागळे

    नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून सामाजिक कार्यात झोकून देणारं ठाण्यातील एक व्यक्तीमत्व म्हणजे श्रीमती संपदा वागळे.

    बी.एस्.सी. पर्यंत शिक्षण घेतलेल्या संपदाजींनी स्टेट बॅंकेत २६ वर्षे नेटाने काम केले व त्याकरिता त्या अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. एव्हढेच नव्हे तर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यातही त्यांन अनेक पुरस्कार प्राप्त झाले. ग्राहक सेवा व डिपॉझिटस् आणल्याबद्दल ढाल, पर्यावरण मंचाकडून वसुंधरा पुरस्कार तसेच २०११ च्या म.टा. सन्मान पुरस्कारासाठी जज म्हणून निवडही झाली.

    व्ही.आर.एस. नंतर लेखनास सुरवात करणार्‍या संपदाजींनी आपली मैत्रिण विठ्ठला ठुसे हिच्यासमवेत आचार्य अत्रे कट्ट्याची स्थापना केली. आज कट्ट्याचे ५२५ च्या वर कार्यक्रम झाले आहे.

    एव्हढेच नव्हे तर त्यांनी एकपात्री कार्यक्रम सादर केले.

    महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता आणि सकाळ यांसारख्या दैनिकातून त्यांचे सुमारे २४० लेख प्रसिद्ध झाले.

    याबरोबरच त्यांनी सर्वसामान्यांसाठी ठाण्यात मुक्त व्यासपीठ निर्माण केले. या व्यासपीठाने अनेकांना आयुष्यात पुन्हा उभं राहण्यासाठी हात दिला, तसेच सर्वसामान्यातून अनेक वक्ते घडले. आज या व्यासपीठावर कार्यक्रम करण्याची संधी मिळणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. त्याचप्रमाणे त्यांनी राजीव तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांसाठी गंमत शाळा चालवली.

    ## Sampada Wagle

      July 27, 2017


  • द्वारकानाथ माधव पितळे (नाथमाधव)

    जन्म-एप्रिल ३, १८८२
    मृत्यू- जून २१, १९२८

    नाथमाधव हे मराठी लेखक होते. केवळ ४६ वर्षाच्या आयुष्यातील मोठा काळ त्यांनी शिवरायांवरील संशोधनात घालवला. ऐतिहासीक साहित्या बरोबरच आपल्या लिखाणातून त्यांनी नेहेमीच बालविवाहातून निर्माण होणार्‍या समस्या वाचकांपुढे मांडल्या. ते स्त्री शिक्षणाचे व पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते.

      December 15, 2010


  • अरविंद दातार

    ठाणे जिल्ह्यातील प्रसिध्द वृत्तपत्र वितरक व्यावसायिक अशी ख्याती असलेल्या अरविंद दातार यांचं वितरण कार्य मुंबई ते बदलापूर, चर्चगेट ते विरार, कल्याण ते कसारा, भिवंडी, नवी मुंबई अश्या परिक्षेत्रांत आहे. आदित्य असोसिएट्सचे व अश्विनी पब्लिसिटीचे ते संचालक असून अनेक सामाजिक संस्थांचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले आहे

    अरविंद दातार ह्यांचे वडिल अच्युत दातार हे वयाच्या १३व्या वर्षी आपले मुळगाव पनवेल तालुक्यातील वावंजेपाला येथून ठाणे शहरात उदरनिर्वाहासाठी आले. ते त.र.पुरोहित यांच्याकडे वृत्तपत्र वाटण्यासाठी नोकरीला लागले. त्यांची इनामदारी व कामकाज पाहून पुरोहित यांनी त्यांचा व्यवसाय अच्युत दातार यांच्याकडे सोपविला आणि वडिलांचा हा व्यवसाय आता त्यांचे दोन सुपुत्र अरविंद दातार आणि अरूण दातार समर्थपणे सांभाळत त्याला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली आहे.

    अरविंद दातार यांची ही सामाजिक तळमळ पाहून मिलिंद बल्लाळ यांनी त्याना ठाण्यामध्ये सुरू झालेल्या चौथ्या रोटरी क्लबच्या सदस्य पदासाठी निमंत्रण दिले. रोटरीमध्ये अनेक महत्त्वाची पदे भुषवित ते २०११-२०१२ या वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनचे अध्यक्ष झाले.

    अरविंद दातार यांनी रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनच्या माध्यमातून वाडा, मोखाडा, जव्हार या परिसरात चेकडॅमद्वारे पाणी साठवून अनेक शेतकर्‍यांना लाभ मिळवून दिला. वाडा येथे तत्कालीन अध्यक्ष संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दातार यांनी शाळा दत्तक घेतली. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनचा अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारताच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय जालन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात झाडे लावण्याचा विक्रम केला होता.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

      January 3, 2015


  • विश्राम चिंतामण बेडेकर

    जन्म- ऑगस्ट १३ १९०६

    मृत्यू- १९९८

    विश्राम बेडेकर हे मराठीतले लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होते. एक झाड आणि दोन पक्षी याला १९८५ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी १९८८ साली मुंबई येथे झालेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.

    अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.

    मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर (2-Nov-2016)

    मराठी लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक विश्राम बेडेकर (14-Nov-2017)

      December 15, 2010


  • अजित पवार

    अजित पवार

    अजित पवार हे एक प्रसिद्ध राजकीय नेते आहेत. ते सध्या महाराष्ट्राचे विद्यमान उप मुख्यमंत्री व अर्थमंत्री असून , ते बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.

      October 31, 2020