आपण स्वच्छ राहतो. आपले घर स्वच्छ ठेवतो आणि कचरा घराबाहेर कुठेही टाकतो. सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपली अनास्था ठळकपणे दिसते. ही अनास्था संत गाडगेबाबांनी ओळखली आणि स्वच्छतेसाठी हाती खराटा घेतला. त्यांचा औरंगाबादचे खंडुजी गायकवाड यांनी घेतला आहे. अनेक नाटकांचे लेखन, अभिनय यात लोकप्रियता मिळवूनही लोककलेच्या माध्यमातून संत गाडगेबाबा यांचे स्वच्छता अभियान महाराष्ट्रा बरोबरच राज्याबाहेरही पोहचविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
स्वच्छतेचा संदेशयात्री
July 14, 2017
साहित्यिक,लेखक,राजकारणी….१९९७ साली इंटरनेटवर मराठी भाषेतील जाळं या पहिल्या साप्ताहिकाची सुरवात करुन याचे यशस्वी संपादन,गदिमा.कॉम या मराठीतील सर्वात मोठया साहित्यिक वेबसाईटच्या रचनेत सल्लागार म्हणून मोलाची कामगिरी,मराठीसृष्टी.कॉम या साहित्यिक वेबसाईटच्या सल्लागार मंडळाचे सदस्य.
September 21, 2012
एखादा जन्मजात, अस्सल कलावंत जन्माला येतो आणि आपल्या प्रतिभेने, बुद्धिने आपण वावरत असलेले क्षेत्र समृद्ध करून उंचीवर नेऊन ठेवतो, ज्याचा आनंद त्या कलाकारालाही होतो आणि रसिकांनाही होतो. अशाच जातकुळीचा चित्रपटसृष्टीतला एक श्रेष्ठ कलावंत म्हणजे मास्टर विनायक. मास्टर विनायकांचा जन्म १९ जानेवारी १९०६ ला कोल्हापूर येथे झाला.
February 2, 2010
स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले “सहकार” मंत्री म्हणून बाळासाहेब भारदे यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाने गौरविले. ते त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते.
July 11, 2022
धनंजय कुलकर्णी यांचा जन्म ६ एप्रिल १९६२ रोजी सोलापुर येथे झाला. त्यांचे शिक्षण सुरवातीला सोलापूर, महाबळेश्वर व पुणे येथे झाले. बी. एस्सी. झाल्यावर सुरवातीला काही काळ त्यांनी बॅंकेत नोकरी केली.
June 4, 2010
तानसेन, मल्हार, सवाई गंधर्व यांसारख्या प्रख्यात संगीत महोत्सवांमधून त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजल्या. तसेच ‘अस्तित्व’, ‘कभी हां कभी ना’, ‘मान्सून वेडिंग’, ‘वॉटर’, ‘साज’ अशा हिंदी चित्रपटांसाठी केलेल्या पाश्र्वगायनातून त्यांनी वेगळा ठसा उमटवला.
June 30, 2022
लंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली, पुढे या बाईंनी कॉट बेसिस वर रहायला जागा द्यायला सुरवात केली, असे होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिध्द झाली कि लंडन ला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस मिळायचा नाही.
June 8, 2017
पूर्ण नाव लक्ष्मण ऊर्फ भाऊराव बापूजी कोल्हटकर. मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ गायक नट भाऊराव यांचा बडोदे येथे ९ मार्च १८६३ रोजी जन्म झाला. बापूबोवा कोल्हटकर हे त्यांचे पिता व सौ. भागीरथीबाई ही माता. भाऊरावांचे शिक्षण कारकुनी करण्यापुरते झाले होते. बडोदे येथील पोलीस आयुक्तांच्या कचेरीत ते साधे कारकून असले तरी एक उत्कृष्ट गायक म्हणून त्याकाळी बडोद्यात त्यांची फार प्रसिध्दी होती. सुंदर रूप आणि गोड आवाज हे त्यांचे गुणविशेष.
अण्णासाहेब किर्लोस्करांनी ३१ ऑक्टोबर १८८० रोजी संगीत शाकुंतल नाटकाचा प्रयोग करून संगीत मराठी रंगभूमीची स्थापना केली. त्या काळात नाटकातील स्त्रीभूमिका पुरूष करीत. आपल्या नाटकातील स्त्रीभूमिका करण्यासाठी अण्णासाहेबांनी भाऊरावांची निवड केली आणि २० सप्टेंबर १८८२ रोजी भाऊरावांनी वयाच्या अठराव्या वर्षी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला.
त्याकाळी किर्लोस्करांच्या शाकुंतल नाटकात ‘शकुंतला‘ (१८८२) सौभद्र नाटकात ‘सुभद्रा‘ (१८८२) व रामराजयवियोग नाटकास ‘मंथरा‘ (१८८४) या भाऊरावांच्या स्त्रीभूमिका अतिशय लोकप्रिय झाल्या.
‘सुभद्रे‘ची भूमिका तर त्यांनी १८८३ ते १८९७ या चौदा वर्षांच्या काळात अखंडपणे केली. महाराष्ट्रातील घराघरांतून त्यांच्या नावाचा उल्लेख आत्मीयतेने ‘भावडया‘ असा होऊ लागला.
ज्येष्ठ नृत्यदिग्दर्शक व चित्रकार कृष्णदेव मुळगुंद
जुन्या पिढीतील बुजुर्ग नृत्यदिग्दर्शक, चित्रकार आणि बालनाटय लेखक पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रातील कृष्णदेव मुळगुंद हे सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व होते. कृष्णदेव मुळगुंद यांचा जन्म.
२७ मे १९१३ रोजी झाला. लहानपणापासून चित्रकलेची आवड असल्याने ते जे, जे. स्कूल ऑफ आर्टमधून जी.डी. आर्ट झाले. उमेदवारीच्या काळातच ते नृत्याकडे ओढले गेले. उद्यशंकर यांनी बसविलेले प्रयोग पाहून ते प्रभावित झाले आणि पुढे आयुष्यभर त्यांनी उद्यशंकर यांना गुरुस्थानी मानून एकलव्याप्रमाणे नृत्यसाधना केली.
१३ फेब्रुवारी १९०१ रोजी त्यांचे निधन झाले.
March 11, 2015
‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात `केबीसी’चा पहिला विजेता कोण होता हे आज फार क्वचित लोकांना माहित असेल. १९ वर्षांपूर्वी केबीसीमध्ये भाग घेतलेले मराठमोळे हर्षवर्धन नवाथे हे त्यावेळी विद्यार्थी होते. या शोमध्ये करोडपती बनल्यानंतर रातोरात ते स्टार झाले.
August 25, 2019
उत्तूंग व्यक्तिमत्व, निरभ्र चारित्र्य, ज्वलंत राष्ट्रनिष्ठा आणि संघटना कौशल्य असणारे, डॉ. हेडगेवार यांच्या नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सारथ्य करणारे गोळवलकर गुरुजी हे हजारो लाखोंच्या मनात आदराचे स्थान असलेले एक विभूतीमत्व होते. गुरुजींचा जन्म नागपूर येथे १९ फेब्रुवारी १९०६ रोजी झाला. कोकणातील गोळवल हे त्यांचे मूळ गाव परंतु वडिलांच्या नोकरीमुळे ते कुटूंब नागपुरात आले. गुरुजींची आठ वडील भावंडे दगावली. नववं आणि शेवटचं अपत्य म्हणजे माधव ९ तथा गुरुजी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. नागपुरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये इंटरपर्यंत शिक्षण झाल्यावर वैद्यकीय अभ्यास करण्याच्या ईच्छेने ते लखनौला गेले. परंतु तेथे प्रवेश मिळाला नाही. मग ते वाराणसीला गेले आणि बनारस हिंदु विद्यापीठातून बी. एस्सी. व नंतर एम.एस्सी या पदविका प्राप्त केल्या. ते प्राणी शास्त्राचे विद्यार्थि होते. संशोधन करावे म्हणून ते मद्रासला गेले. परंतु हवामान न मानवल्यामुळे ते नागपूरला परत आले. त्यानंतर एका अंध व्यक्तिकडून त्यांनी संगीताची संथा घेतली.
१९३३ मध्ये प्राणीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून बनारस विद्यापीठाने त्यांची तीन वर्षासाठी नियुक्ती केली. त्यावेळी डॉ. हेडगेवार हे पंडित मदनमोहन मालवीय यांच्या भेटीसाठी येत असत. त्यावेळी हेडगेवारांनी गरुजींना पाहिले, जाणले व संघकार्यात त्यांना सहभागी करुन घ्यावे असे त्यांना वाटले परंतु १९३६ मध्ये गुरुजींचा विद्यापीठाचा सेवाकाळ संपल्यावर गुरुजी साधनेसाठी सारगाची येथिल आश्रमात गेले. १९३७ च्या मकर संक्रांतीच्या दिवशी अखंडानंदांनी गुरुजींना अनुग्रह दिला. काही दिवसांनी अखंडानंद समाधिस्थ झाले परंतु जन्म राष्ट्रकारणासाठी आहे. राष्ट्रदेवो भव‘ हा मंत्र जपत तू देशभर फिरशील. आपल्या गुरुंच्या निर्वाणानंतर गुरुजी अस्वस्थ झाले. त्यांची आणि डॉ. हेगेवार यांची भेट झाली. समाधीची जागा राष्ट्रहिताने घेतली डॉ. हेडगेवारांना आपला उत्तराधिकारी मिळाला. त्यानंतर डॉ. हेडगेवारांनी संघाच्या काही निवडक लोकांचे सिंदी येथे एका विचार शिबीर घेतले. त्यात संघाच्या प्रार्थना गीतापासून कार्यपध्दतीपर्यंत ध्येय धोरण ठरवले आणि आपल्या सर्व कार्याची धुरा गुरुजींच्या खांद्यावर ठेवली. डॉक्टरांच्या नंतर ३३ वर्षे गुरुजीनी संघाचे सारथ्य केले. त्याच काळात संघाचा प्रसार आणि प्रचार फार मोठया प्रमाणात झाला. हे होत असताना संघबंदीचा आदेशही आला. गुरुजींना कारावास घडला. त्यांना संशयित आणि देशद्रोही ठरविण्यात प्रयत्नही झाला. परंतु हा पालापाचोळा कधीच उडून गेला आणि ‘राष्ट्राय स्वाहा‘ म्हणत गुरुजींचे संघकार्य राष्ट्रकार्य म्हणून सुरुच राहिले.
नमस्ते सदावत्सले मातृभूमी हे शब्द सदा ओठावर बाळगणार्या गुरुजनांना कॅन्सर झाल्याची वार्ता आली आणि ५ जून १९७३ या दिवशी त्यांनी देहत्याग केला.
March 11, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti