महाराष्ट्र विधानसभेतील विद्यमान आमदार महाराष्ट्रातील बहुजन विकास आघाडी ह्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष असलेल्या हितेंद्र ठाकूर यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९६१ साली झाला. १९८८ साली वसई तालुका युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदावर आरूढ होऊन आपल्या राजकीय कारकिर्दाची सुरुवात केली. प्रतिकूल परिस्थितीत १९९० मध्ये कॉंग्रेसने त्यांना विधानसभेचे तिकीट दिले व ते सर्वात तरुण आमदार म्हणून बहूमतांनी निवडून आले. पुढे आपल्या कार्यकर्तुत्वाने सतत चौथ्यांदा आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आले. कालांतराने हितेंद्र ठाकूर यांनी “बहुजन विकास आघाडी”ची पक्षची स्थापना केली.सध्या तालुका पंचायत समिती, चारही नगर पालिका व बहुसंख्य ग्रामपंचायतीवर त्यांच्या वसई विकास मंडळाचे वर्चस्व आहे. ठाणे जिल्हा परिषद व ठाणे जिल्हा सहकरी बॅंकेच्या पदाधिकारी निवडीत त्यांच्ये मत निर्णायक असते विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांना विधान परिषदेवर तीनदा निवडून आणण्यात सिंहाचा वाटा आहे तसंच अभिनेते गोविंद आहुजा उर्फ गोविंदा यांना लोकसभेवर निवडून आणण्यात देखील त्यांचा खारीचा वाटा होता.
वि.वा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, या संस्थेमार्फत उत्कर्ष विद्यालय (मराठी व इंग्रजी माध्यम), कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वि. वा. ठाकूर पदवी महाविद्यालय सुरू केले. वि.वा.चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, नेत्राचिकिटसा, रक्तदान ,ज्येष्ठ नागरिकानसाठी ओळखपत्रे, अपंगांसाठी उपकरणांचे वाटप कार्यक्रमांचे आयोजन; झोपडपट्टी धारकाना स्वंयंपाक गॅसची वाटप.त्याचप्रमाणे वसई-विरार भागात अनेक सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन हितेंद्र ठाकूर यांच्याकडून होत असते यांचे विधायक व सामाजिक काम व सर्वसमावेशक बेरजेच्या राजकारणामुळे वसई तालुक्यांतील विविध पक्ष्यांचे अनेक नेते त्यांचे नेतृत्व मान्य करतात.
January 12, 2015
हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे पार्ल्यातील भाऊबीज कार्यकर्ते गजानन दत्तात्रय जोशी यांचा सुमारे ३६ वर्षांपूर्वी महर्षी कर्वे यांच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेशी त्यांचा संबंध आला.
April 9, 2011
“असावा सुंदर चॉकलेटचा बंगला”, “कोणास ठाऊक कसा”… या बालगीतांचे व ६० हून अधिक पुस्तकांचे कर्ते. साने गुरुजींचे चरित्रकार म्हणून त्यांची ओळख
August 22, 2017
प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यापाठोपाठ पद्म पुरस्करांची खिरापत होत असल्याची टीका
ही सालाबादप्रमाणे करण्यात आली. मात्र, काही व्यक्तींना पद्म किताब जाहीर केल्याबद्दल कुणाचेच दुमत नव्हते. त्या म्हणजे शोभना रानडे!
गांधीवादी विचारांच्या प्रसारक, ज्येष्ठ सामाजिक कार्यर्कत्या, दूरदृष्टी असलेल्या गांधीवादी, लहान मुलांसाठी लाडकी आजी… अशा शोभनाताई. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ महिला सबलीकरण, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि तरुण पिढीपर्यंत गांधीजींचे विचार पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शोभनाताई. महिलांना स्वातंत्र्यच नव्हे तर स्वत:ची मतं मांडण्याचे अधिकारही मिळाले नव्हते, अशा काळात नाशिकमध्ये १९३५ साली काही मुलींनी ‘यापुढे आम्ही केवळ देशासाठीच जगणार’ अशी शपथ घेतली. पुढे हीच संस्था ‘हिंद सेविका संघ’ म्हणून नावारूपास आली. या मुलींमध्ये अवघ्या तेरा वर्षांची एक मुलगी म्हणजेच शोभना रानडे यांचाही समावेश होता.
July 27, 2011
अगदी मराठी-हिंदीच्या पलीकडेही जाऊन तेलुगू चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं आहे. सैराट मधील ‘याड लागले‘, “झिंगाट‘, “सैराट झालं जी‘, “आत्ताच बया‘ या चारही गाण्यांनी सर्वांनाच “याड‘ लावलं.
June 17, 2022
उत्तम बाळू भिकले हे २००२ साली मराठा लाईट इनफंन्ट्री कोल्हापूरमधून सैन्य दलात भरती झाले होते. गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे हे उत्तम भिकले यांचं मूळ जन्मगाव .बेळगाव येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर भिकले जम्मू येथे रूजू झाले. उत्तम भिकलेंचे प्राथमिक शिक्षण हडलगे येथे गावातील शाळेत, तर माध्यमिक शिक्षण एस. एस. हायस्कूल नेसरी येथे झाले.
May 24, 2014
म्हापशाच्या ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत इयत्ता दुसरीत शिकत असताना त्यांनी पहिल्यांदाच एका छोटया नाटुकलीत काम केले. त्या नाटुकलीचे नाव होते, ‘खोडकर बंडू’.
July 19, 2022
साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून ‘कालनिर्णय’ ही नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारी दिनदर्शिका म्हणून ख्याती मिळविली. जयंत साळगावकर हे सर्वाधिक खपाच्या `कालनिर्णय` या दिनदर्शिकेचे संस्थापक आहेत. `कालनिर्णय’ आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड म्हणूनही प्रस्थापित करण्यात त्यांना यश मिळाले. एकटय़ा मराठी भाषेत कालनिर्णय दिनदर्शिकेचा खप ५० लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका १९७३ पासून प्रसिद्ध होत आहे.
June 7, 2022
महाराष्ट्रातील २० शहरांतून प्रसिद्ध होणार्या `दैनिक देशोन्नती’ या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य संपादक.
June 9, 2010
विनोदाचे बादशहा, विनोदकार, विनोदी कथाकार म्हणून ज्यांनी अनेक वर्षे अगदी आजच्या पिढीपर्यंत हसवलं, ज्यांचे विनोदी साहित्य आजही ताजेतवाने वाटते असे विनोदी साहित्याचे जनक म्हणजे चिंतामण विनायक तथा चि.वि. जोशी चि.विं. चा जन्म 19 जानेवारी 1892 सालचा.
पुण्याच्या नूतन मराठी शाळेतून ते मॅट्रिकची परिक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर फर्ग्यूसन कॉलेजमधून 1911 मध्ये बी. ए. आणि 1916 मध्ये त्यांनी एम.ए. ची पदवी मिळविली. तसेच चि.वि.जोशी हे पाली भाषेचे पंडित होते, पाली भाषेवर त्यांचे चांगलेच प्रभुत्व होते. पदवी मिळविल्यानंतर काही वर्षे त्यांनी मुंबई येथे शिक्षण खात्यात नाकरी केली. 1920 सालापासून बडोदा येथे पाली, मराठी आणि इंग्रजीचे अध्यापन करु लागले. 1928 पासून निवृत्त होईपर्यंत बडोदा संस्थानात ते रेकॉर्ड ऑफिसर म्हणून सेवेत होते. इतर भाषांप्रमाणेच बडोद्यातील वास्तव्यामुळे त्यांनी गुजराती भाषेवरसुध्दा प्रभूत्व मिळविले होते. पाली भाषेवरील प्राविण्यामुळे त्यांनी जातक कथांचा अनुवाद केला होता. शाक्यमुनी गौतम, बुध्द संप्रदाय व शिकवण हे पालीभाषेतील ग्रंथ त्यांनी मराठीत अनुवादित केले. अनुवादित साहित्याबरोबरच त्यांचे विनोदी लेखन प्रसिध्द आणि लोकप्रिय आहे. एरंडाचे गुऱहाळ, चिमणरावांचे चऱहाट, वायफळाचा मळा, आणखी चिमणराव, ओसाडवाडीचे देव , गुंडयाभाऊ, द्वादशी, गुदगुल्या, रहाटगाडगे, हास्य चिंतामणी, बोरीबाभळी, इत्यादी अनेक विनोदी कथासंग्रह प्रकाशित आहेत. अत्यंत दर्जेदार आणि कोटीबाज विनोद हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्टय होते. मानवी स्वभावांतील विसंगती सुक्ष्मपणे हेरुन त्या विसंगतीतून भावनिक आणि शाब्दिक विनोद उभा करणे ही चि.वीं.ची खासियत होती, साधी, सोपी, सरळ भाषा, सर्वसामान्यांच्या आयुष्यात घडणारे छोटे छोटे प्रसंग त्यातून निर्मित विनोद, त्यामुळे त्यांचे लेखन आणि विनोदी भाव सर्वसामान्य माणसांपर्यंत चटकन पोहोचत असत. या त्यांच्या हातोटीमुळे त्यांना लोकप्रियता लाभली. मागील पिढीतील आणि सद्य काळातील लेखकांनी स्वतची अशी काही व्यक्तिचित्रे उभी केली, त्याचप्रमाणे चि.वी. नी उभे केलेले हास्यव्यक्तिमत्व म्हणजे चिमणराव` चिमणरावांचं व्यक्तिमत्व त्यांच्या लेखणीतून इतकं जीवंत झालं होतं की चिमणराव म्हणजे चि. वि. चा मानसपुत्र असे मानले जात असे. अनेकांच्या अनेक विनोदी पात्रांमधला एकमेव असे चिमणरावांचे वर्णन केले जात असे. भोळसट, हास्यकारक वर्तन करणारा असा हा चि.वि. चा चिमणराव मराठी साहित्यात अजरामर झाला आहे. त्या काळातील साहित्यिकांच्या लेखनावर पाश्चात्य लेखकांचा बहुतेक प्रभाव असे. इंग्रजी विनोदी पाश्चात्य लेखकांच्या बाबतीतही असेच म्हणता आले असते. परंतु या बाबतीत मात्र चि.विं. नी आपल्या व्यक्तीरेखेवर पाश्चात्य छाप पडू न देता चिमणरावांचे व्यक्तीत्व हे संपूर्ण ब्राम्हणी असे रंगविलेले आहे. ही त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचीच एक प्रतिमा आहे. साहित्य लेखन हा अनेक लेखकांचा हातखंडा असला तरी विनोदी साहित्य निर्मिती हा अतिशय कठीण असा साहित्याचा प्रकार. तो सहजतेने हाताळणारे चि.विं. सारखे विनोदी साहित्यिक विरळाच.
आयुष्यभर आपल्या लेखनाने महाराष्ट्राला हसविणार्या या विनोदी लेखकाचे 21 नोव्हेंबर 1963 रोजी निधन झाले.
चि. वी. जोशी यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी (21-Nov-2018)
सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी (19-Jan-2019)
विनोदाचे बादशहा, विनोदकार, विनोदी कथाकार चिंतामण विनायक जोशी उर्फ चि.वि.जोशी (19 Jan 2018)
June 8, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti