भारतातील अणुसंशोधन आणि अवकाश संशोधनाचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म मुंबई येथे ३० ऑक्टोबर १९०९ रोजी झाला. केंब्रीज विद्यापीठात भाभांचे उच्च शिक्षण झाले. भोर आणि रुदर फोर्ड या दोन शास्त्रज्ञांच्या हाताखाली शिक्षण घ्यायची संधी त्यावेळेस त्यांना मिळाली.
January 22, 2010
दिलीप वेंगसरकर यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ रोजी महाराष्ट्र राज्यात राजापूर येथे झाला. भारतीय क्रिकेट खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या काळात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शैली असलेले फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते. अतिशय तडाखेदार आणि उत्तम फटके मारणारे फलंदाज म्हणून ते गौरविले गेले होते.
February 4, 2010
संपादक, कथाकार
February 4, 2010
देशोदेशी व्यापार करणार्या प्रत्येक उद्योजकाकडे कंटेनर भरुन पाठविण्याइतका माल नसतो. अशा कंटेनर पेक्षा कमी आकाराच्या मालाची दाही दिशांना निर्धोक ने-आण करण्याच्या व्यवसायात मकरंद प्रधान यांनी संधी शोधली. त्यांच्या सीपी वर्ल्ड ग्रुपने जगात १४०० कोटी तर देशांतर्गत कंपनीने ३०० कोटींच्या वार्षिक उलाढालीपर्यंत मजल मारली. युरोप, आशिया, अफ्रिका, आखात व अमेरिका अशा जगभर पसरलेल्या उद्योगाबरोबरच प्रधान यांनी भारतातही मोठा विस्तार केला...
दाही दिशा व्यापाराच्या
July 14, 2017
वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून प्रसिद्धीस आले. १९१९ साली पंजाबमध्ये झालेल्या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता काँग्रेसने जी एक समिती नेमली होती, तिचे ते सदस्य होते.
July 16, 2022
सहा दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. त्यांचा जन्म ७ मे १९२३ रोजी झाला.आपल्या सहजसुंदर अभिनयानं मराठी रंगभूमी, सिनेसृष्टी, बॉलिवूड, जाहिराती, हिंग्लिश नाटकं आणि मालिकांमधून रसिकांना निखळ आनंद देणारे, त्यांच्या मनात प्रेमाचं-आदराचं स्थान मिळवणारे आत्माराम भेंडे यांनी, 'एक सुसंस्कृत विनोदी अभिनेते' म्हणून स्वतःचा ठसा उमटवला होता.
रसिकांना हसवण्यासाठी अंगविक्षेप किंवा कुठलाही थिल्लरपणा करायची गरज नसते, तर चेहऱ्यावरचे हावभाव, शब्दफेक आणि टायमिंगमधून उत्तम विनोदनिर्मिती करता येते, हे त्यांनी दाखवून दिलं होतं. रंगभूमी, सिनेमा, जाहिराती, मालिकांमध्ये ते अगदी लिलया वावरले होते. फक्त अभिनेते म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्मात्याची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे पेलली होती.
ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://www.marathisrushti.com/articles/atmaram-bhende/
# Bhende, Atmaram
June 4, 2017
१९३४-३५ मध्ये पहिल्याप्रथम राष्ट्रीय अजिंक्यपदासाठी रणजी स्पर्धा झाली. यात महाराष्ट्र पहिल्याच सामन्यात मुंबईविरुद्ध पहिल्या डावातील पिछाडीमुळे गमावला. महाराष्ट्राचे कर्णधार देवधर यांनी ५७ तर कोल्हापूरच्या विजय हजारेंनी ६५ धावा काढल्या होत्या.
June 30, 2022
संगीतकार, थोर पेटीवादक आणि संगीतसमीक्षक गोविंदराव टेंबे यांचा जन्म ५ जून १८८१ रोजी झाला.
“माझा संगीत व्यासंग” आणि “माझा जीवनविहार” ही त्यांची आत्मपर पुस्तके, तसेच त्यांच्या स्फुट लेखांचे संग्रहदेखील प्रकाशित झाले होते.
गोविंदराव टेंबे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे (9-Oct-2016)
ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंबे (5-Jun-2017)
ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंबे (9-Oct-2017)
ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंबे (7-Jun-2021)
# Pandit Govindrao Tembe
November 10, 2016
अशा हृदयातून ऐकणार्या रसिकांसाठी ज्यांनी गेली तीन दशकं आपल्या लेखणीतून २००० हून अधिक गीतं लिहिली आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून ते साधना सरगम यांच्यापर्यंत आणि सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवन यांच्यापर्यंतच्या सर्व दिग्गज गायकांनी ती गायली, ती गीतं लिहिणारे ठाण्यातील ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक, सुसंवादक म्हणजे प्रवीण दवणे !
May 23, 2014
प्रदीप साठे हे व्यक्तिमत्त्वच तसे वेगळे होते. छोटीशी मूर्ती, लहान शरीरयष्टी, जाड तपकिरी रंगाचा चष्मा, हलक्या आवाजातले बोलणे आणि हातात सिगारेट. ‘आवाज’ दिवाळी अंकातली ‘खिडकी चित्रे’ हे त्यांचे वैशिष्टय़ होते. त्या अनोख्या चित्रांसाठीच अनेक लोक त्यांना ओळखत होते. त्यांच्या या ‘खिडकी चित्रांचा’ एक मोठा चाहता वर्ग तयार झाला होता. अशा प्रकारची विनोदी चित्रे काढणारा हा माणूस बोलताना विनोदी असेल अशी जर तुमची समजूत असेल तर ती खोटी म्हणावी लागेल.
साठे यांचे बोलणे हलक्या आवाजातले असले तरी ते ठाम असायचे आणि बहुतेक वेळा ते गंभीर विषयावरच बोलत. लोकांच्या समजुतीत ‘विनोदी’ असलेल्या या माणसाने आपला अंत मोठा दुर्दैवी करावा ही बाब मनाला चटका लावणारी होती. प्रदीप साठे यांनी आत्महत्या केल्याची बातमी आली आणि या बातमीवर कुणाचा विश्वासच बसेना. कदाचित आयुष्यात आलेल्या अनेक कठोर प्रसंगांवर मात करणे त्यांना कठीण गेले असावे. यातूनच त्यांच्यासारख्या एका कलाकार माणसाला हे जीवन संपविण्याचा विचार आला असावा. साठेंचे बालपण अतिशय चांगल्या स्थितीत गेले. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगलीच होती.
मुंबईत मोठी जागा, वडिलांच्या मालकीची कंपनी. त्यामुळे घरात लक्ष्मी पाणी भरत होती. त्यांच्या वडिलांना प्राण्यांची फार आवड होती. त्यामुळे त्यांनी घरात मासे, पोपट, कुत्रे, कासव, मांजर इतकेच नव्हे तर माकड, अजगर आणि अगदी बिबळ्याचा बछडासुध्दा त्यांनी पाळला होता. अशा या प्राणी-पक्ष्यांच्या सहवासात प्रदीप वाढले. त्यांच्याशी हसत खेळत प्रदीप रेखाटने काढू लागले. या वातावरणात ते चांगलेच रमले होते. पुढे त्यांच्या कलाकृतींमध्ये विविध प्राण्यांची अॅनाटॉमीयुक्त चित्रे दिसत. याला त्यांच्या बालपणातील प्राण्यांच्या सहवासाची पाश्र्वभूमी होती. अर्थातच त्यांनी आपल्या आवडीनुसार आर्टस्कूलला प्रवेश घेतला. परंतु वडिलांना त्यांचा हा निर्णय काही मान्य नव्हता. यातूनच त्यांच्याशी मतभेद झाले. शेवटी स्वत: पार्टटाइम नोकरी करून फीचे पैसे भरून या कलाकाराने शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर अनेक मासिकांत त्यांची चित्रे प्रसिध्द होऊ लागली. देशातील विविध भाषांतल्या कॉमिक्ससाठी त्यांनी चित्रे काढली. याद्वारे त्यांनी कॉमिकमधील चित्रकलेला एक दर्जा प्राप्त करून दिला. अशी चित्रे काढीत असताना त्यांची प्रामाणिक भूमिका होती की, आपण ‘इलस्ट्रेटर’ आहोत, पण आपण व्यंगचित्रकार नाही. ‘निवडक मराठी व्यंगचित्रे’ या पुस्तकाचे संपादन करीत असताना त्यांनी हे वास्तव आपल्या मित्रपरिवारात मान्यही केले होते. त्यांचे हे प्रामाणिक मत असले तरी त्यांना विनोदाची चांगली जाण असल्याने तसेच चित्रकलेतील त्यांचे नैपुण्य यामुळे त्यांनी बरीच व्यंगचित्रे काढली. प्रामुख्याने ‘आवाज’ या दिवाळी अंकातली त्यांची ‘खिडकी चित्रे’ लोकप्रिय झाली आणि हा तेथून कलाकार खरे तर जनतेपुढे आला. या व्यंगचित्रांच्या जोडीला त्यांनी विनोदी कथांना पूरक अशी रिअलिस्टिक शैलीतील असंख्य चित्रे काढली. त्यांच्या चित्रातील बारकावे अस्सल होते. चित्रातील रंगसंगती व पात्रांच्या चेहऱ्यावरचे हावभाव इतके प्रभावी असत की एखादा जिवंत प्रसंग साकारल्याचा भास होई. त्यांनी देशभरात काढलेल्या कॉमिक्समधील चित्रांनी त्यांना देश पातळीवर प्रसिद्धी लाभली.
कॉमिक्ससाठी चित्रे काढताना त्यांनी स्वत: काही पात्रे तयार केली. त्यांच्या गोष्टी रंगविल्या आणि केवळ मुलांमध्येच नव्हे तर सर्वच वयोगटातील वाचकांना त्या भावल्या. मुलांसाठी कॉमिक्स करताना प्राणी विज्ञान हा विषय त्यांनी मोठय़ा खुबीने, सचित्र सांगून मोठा चाहता वर्ग मिळविला. चेहऱ्यावरच्या हावभावांबरोबर प्रसन्न रंगसंगती हे त्यांचे वैशिष्टय़ होते. मध्यंतरी त्यांनी एका अर्कचित्र प्रदर्शनासाठी अभिनेत्री नंदा हिचे काढलेले अर्कचित्र विलक्षण होते. प्रत्यक्ष भेटीत विनोदी किस्से सांगताना त्यांच्या विनोदबुध्दीची झलक दिसे. चित्रकलेसारख्या एका क्रिएटिव्ह विश्वात रंगलेल्या या कलाकाराने व विनोदाची चांगली जाण असलेल्या या व्यक्तीने आयुष्याचा शेवट अशा रीतीने करावा हे दुर्दैवी, धक्कादायक आणि अनाकलनीयही!
August 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti