(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अंगद काशिनाथ म्हसकर

    अनेक दर्जेदार नाटकं, मालिका व चित्रपटातून आपल्या लक्षवेधी अभिनयाची छाप पाडणारा होतकरू अभिनेता अंगद काशिनाथ म्हसकर हा देखील ठाण्याला लाभलेल्या रत्नांपैकी एक आहे.

      May 23, 2014


  • प्रशांत दामले

    प्रशांत पुरुषोत्तम दामले. मराठी चित्रपट, मराठी रंगभूमी आणि मराठी दूरचित्रवाणीवरील गाजलेले कलाकार.

      March 4, 2010


  • सुधाकर तोरणे

    सुधाकर तोरणे यांनी १९६५ पासून महाराष्ट्रात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यवतमाळ, जळगांव, रत्नागिरी, रायगड, धुळे,नाशिक, पुणे या जिल्ह्यात काम करताना तेथील लोकजीवनाशी संपूर्ण समरस.- उपसंचालक म्हणून मुंबई, पुणे, नाशिक येथे कार्य.

      December 7, 2011


  • प्रभा श्यामराव कंटक

    ललित व वैचारिक लेखन करणार्‍या गांधीवादी लेखिका प्रभा श्यामराव कंटक यांचा जन्म १ जुलै १९०६ रोजी झाला. “काम आणि कामिनी”, “अग्नियान”

    या कादंबर्‍या, “प्रांतजीवन” हा नाटिकांचा संग्रह, हिंदी स्त्रियांचे जीवन, “महाभारत-एक मुक्त चिंतन या पुस्तकांसह “सत्याग्रही महाराष्ट्र”

    या ग्रंथातून म. गांधीजींच्या चळवळींचा इतिहास त्यांनी चितारला आहे.

    ## Prabha Shamrao Kantak

      July 27, 2017


  • रामचंद्र भिकाजी जोशी (Jr.)

    प्रवासवर्णनकार, समीक्षक रामचंद्र भिकाजी जोशी यांचा जन्म जुलै १९०३ मध्ये झाला.

    मजल दरमजल, वाटचाल आदी त्यांची स्थलवर्णनात्मक पुस्तके. काचेचे कवच, झम्मत हे त्यांचे कथासंग्रह तर “वाताहत” ही कादंबरी. “सोन्याचा उंबरठा” हे व्यक्तिचित्रणपर पुस्तक तर “साठवणी” हे स्वत:च्या जीवनातील आठवणींचे पुस्तक म्हणजे त्यांचे आत्मचरित्र होय.

    #Ramchandra Bhikaji Joshi (Jr)

      December 9, 2016


  • प्रसाद वनारसे

    चित्रपट क्षेत्रातील ग्लॅमर सोडून सर्जशील नाट्यकलावंत घडवण्याचा वसा रंगकर्मी प्रसाद वनारसे यांनी घेतला आहे. देशविदेशातील नाट्यप्रशिक्षणांमुळे नाट्यगुरू अशी त्यांची ओळखही निर्माण झाली आहे.

    प्रसाद वनारसे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हाडाचा नाट्यशिक्षक हा लेख पुढील पानावर वाचा.

    प्रसाद वनारसे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हाडाचा नाट्यशिक्षक हा लेख वाचा.

    vanarase-prasad-modified

      September 7, 2015


  • प्रमोद निफाडकर

    निफाडकर, प्रमोद

    रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम करणाऱ्यांमध्ये डॉ. प्रमोद निफाडकर यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. त्यांच्या निधनामुळे अस्थमा रुग्णांचा आशेचा किरण हरपला आहे. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतातील अस्थमा रुग्णांची सेवा करण्यात घालवले. वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी कॅन्सरने झालेले त्यांचे निधन वैद्यक क्षेत्रालाही चटका लावून गेले.

    जे.जे. रुग्णालय व ग्रँट मेडिकल कॉलेजमधून ‘एमडी’ केल्यानंतर अमेरिकेतील क्लिव्हलँड क्लिनिकमधून अस्थमा व अ‍ॅलर्जीतील पदव्युत्तर शिक्षण घेतले. खरे तर अमेरिकेतच सुखासीन जीवन त्यांना जगता आले असते. मात्र भारतातील गोरगरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी ते मुंबईत परत आले. खासगी तसेच शासनाच्या सेंट जॉर्जेस रुग्णालयाच्या माध्यमातून ते हजारो अस्थमा रुग्णांवर उपचार व संशोधन करीत होते. ‘अ‍ॅलर्जी’ या विषयातही त्यांची मास्टरी होती. भारतात मधुमेह, हृदयविकाराबरोबरच अस्थमा रुग्णांची संख्याही भयावह म्हणावी एवढय़ा वेगाने वाढत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात २०२० मध्ये भारत ही अस्थमा रुग्णांची राजधानी बनेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या पाश्र्वभूमीवर डॉ. निफाडकर यांनी शहरी व ग्रामीण भागातील अस्थमा रुग्णांसाठी केलेल्या संशोधनाचे महत्त्व अनन्यसाधारण म्हणावे लागेल. प्रामुख्याने शहरी भागात लहान मुलांमध्ये अस्थमा होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. एकटय़ा मुंबईत १० लाख अस्थमा रुग्ण असून त्यामध्ये लहान मुलांची संख्या सहा लाख एवढी आहे. या रुग्णांच्या औषधावरील खर्च मोठा असून डॉ. निफाडकर यांनी केलेल्या संशोधनातून योग्य आहारविहार, घरात खेळती हवा ठेवल्यास तसेच अन्य काही उपाय केल्यास औषधाचा खर्च निम्म्याने कमी होतो हे दाखवून दिले. यामुळेच त्यांच्या संशोधनकार्यात कधीही वैद्यकीय कंपन्यांनी मदत केली नाही. ‘अस्थमा अ‍ॅण्ड ब्राँकायटीस असोसिएशन ऑफ इंडिया’चे ते २० वर्षांहून अधिक काळ सचिव होते. या संस्थेच्या माध्यमातून तीन आंतरराष्ट्रीय परिषदा, अस्थमासंदर्भात फॅमिली डॉक्टरांना प्रशिक्षण देणाऱ्या ५० हून अधिक कार्यशाळा, अस्थमा रुग्णांमध्ये आत्मविश्वास जागा करण्यासाठी ४०० हून अधिक शिबिरांचे आयोजन, शिक्षण, प्रबोधन, रुग्णांसाठी व्याख्याने, शोधनिबंध, पुस्तक लिखाण, वाचनालय असे जनजागृतीचे अनेक उपक्रम त्यांनी गेल्या तीन दशकांमध्ये केले. हा उपक्रम राबविताना त्यांनी दिल्लीच्या सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. बलराम घोष यांच्या सहकार्याने एक संशोधनही केले होते. यात शिखराच्या पायथ्याशी असताना अस्थमा रुग्णांच्या फुप्फुसाची क्षमता व शिखरावर चढल्यानंतर त्यात होणारे बदल यांचा अभ्यास करून स्टिरॉईड न घेताही फुप्फुसाची कार्यक्षमता कशी वाढवता येते हे दाखवून दिले. यावर अधिक संशोधन सुरू होते. औषध कंपन्यांच्या मुळावर येणाऱ्या या संशोधनासाठी कोणतीच औषध कंपनी पुढे येणे शक्य नव्हते. मात्र पदराला खार लावून त्यांनी आपले संशोधन व अस्थमा रुग्णांसाठीचे उपक्रम सुरूच ठेवले हेते. त्यांच्या खासगी दवाखान्यातही येणाऱ्या शेकडो गोरगरीब रुग्णांवर ते मोफत उपचार करीत असत. त्यांच्या निधनामुळे अस्थमा रुग्णांच्या जीवनातील आशेचा एक किरण हरपला आहे.

      August 5, 2017


  • अनघा मोहन पेंडसे

    शिक्षण बी.कॉम., गेली २० वर्षे संगीतात कार्यरत, पु.ल. देशपांडे ह्यांच्या हस्ते मानपत्र, ई.टी.व्ही./झी.टी.व्ही./सह्याद्री/साम/दूरदर्शन/आकाशवाणी वर गायनाचे कार्यक्रम.

      May 29, 2014


  • रामचंद्र शंकर वाळिंबे

    डॉ. रामचंद्र शंकर उर्फ रा. शं. वाळिंबे हे थोर समीक्षक म्हणून ओळखले जातात. ते व्यासंगी विद्वान आणि आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारे ख्यातनाम वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते.

      August 2, 2022


  • किरण नगरकर

    किरण नगरकर

    भारतातील हाताच्या बोटांवर मोजता येणार्‍या द्विभाषिक लेखकांमध्ये व नामांकित कादंबरीकारांमध्ये किरण नगरकर ह्यांचे नाव प्राधान्याने घेण्यात येते. मुंबई या महानगरीतील कनिष्ठ वर्गीयांचे खुमासदार आणि अंतर्मुख करणारे वर्णन वाचकांसमोर उलगडणारी, नगरकरांची १९९४ साली प्रकाशित झालेली ‘रावण अँड एडी’ ही कादंबरी बहुचर्चित ठरली.

      July 26, 2017