विख्यात नट, वृत्तपत्रलेखक, आत्मचरित्रलेखक आणि म्हणून प्रसिद्ध असलेले मागील पिढीतले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व चितामणराव कोल्हटकर. यांचे मूळ घराणे नेवरे या रत्नागिरी जिल्ह्यातील गावचे. १२ मार्च १८९१ रोजी त्यांचा जन्म झाला.
February 4, 2010
निसर्ग प्रेम माणसाला कुठवर घेवुन जावु शकत याच मुर्तिमंत उदाहरण म्हणजे पंकज झारेकर. फोटोग्राफीचा कुठलाही शैक्षणिक किंवा व्यावसायिक अनुभव गाठीशी नसताना या निसर्गवेड्या कलंदराने निसर्गाच्या विवीध ॠतुंनुसार बदलणार्या गहिर्या रंगांना व रूपांना ज्या सौंदर्यपुर्ण शैलीमध्ये कैद केले आहे, त्याबद्दल् त्याला साक्षात निसर्गदेवतेची दुवादेखील मिळाली असेल. पंकज हा चारचौघांसारखा दिसणारा, वागणारा परंतु चाकोरीबाहेरच्या स्वप्नांना अभिमानाने मिरवणारा, सर्व कलांचा प्रेमी असा स्वछंदी तरूण. ही स्वच्छंदीपणाची देणगी पण, त्याला बेधुंद करणार्या निसर्गाकडूनच मिळाली.
August 16, 2011
नाशिक येथे जन्मलेल्या मधुसूदन पांडुरंग भावे हे बेस्टमध्ये रूजू होऊन त्यांनी अनेक वर्षे प्रवाशांची निरपेक्ष सेवा केली. साहित्याची निस्सीम ओढ त्यांना, केवळ नोकरी व कुटुंबाच्या चक्रामध्ये फसू देत नसल्यामुळे त्यांनी ही लिखाणाची आंतरिक उर्मी कागदावर नियमितपणे उतरविण्यास सुरूवात केली. पुढे प्रकृती स्वास्थ्य बिघडल्यामुळे त्यांनी बेस्टची नोकरी सोडली, व प्राणापणाने जोपासलेली, वाङ्मय प्रतिज्ञा ह्याच क्षणाला उफाळून वर आल्यामुळे या क्षेत्रात येण्यासाठी आपली बौध्दीक क्षमतापणाला लावली. मितभाषी, मृदु स्वभाव, तरीही आतून मिश्कील असलेले भावे आकाशवाणीची मान्यता मिळविण्यास सफल झाले, आणि तेथूनच गीतकार म्हणून त्यांच्या प्रवास सुरु झाला. ठाणे म्हटले, की काही नामांकित व्यक्तींचा आवर्जून उल्लेख होतो. त्या नावांचा यादित मधुसूदन भावेंच्या नावाचा सामावेश झाला आहे.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
कथाकार सखा कलाल यांचा जन्म १० डिसेंबर १९३८ रोजी झाला.
त्यांचे ढग, सांज, पार्टी आदी कथासंग्रह प्रसिद्ध.
## Sakha Kalal
July 27, 2017
मालती बेडेकर ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका होत्या.
March 3, 2018
पाटील, (डॉ.) जगन्नाथ
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तिटवे या लहानशा गावातून डॉ. जगन्नाथ पाटील यांचा शैक्षणिक क्षेत्रातील जो प्रवास सुरू झाला, तो आता ‘एशिया पॅसिफिक क्वॉलिटी नेटवर्क’ (एपीक्यूएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष या महत्त्वाच्या मुक्कामावर पोहोचला आहे. उच्चशिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेचे मापन आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न, अशा दुहेरी उद्देशाने किमान ४२ देशांत कार्यरत असलेल्या या संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे ऑस्ट्रेलियाच्या डॉ. अँटनी स्टेला यांच्याकडून गेल्याच आठवडय़ात डॉ. पाटील यांनी स्वीकारली आणि
‘युनेस्को अथवा जागतिक बँकेकडून वाढीव निधी मिळाला म्हणजे आपण वाढलो, असे होत नाही.. वाढीसाठी निराळा विचार करावाच लागेल’, अशा अर्थाचा संदेशही प्रमुखपदावरून दिला. इथवर मजल मारण्याइतका अनुभव गेल्या दहा-बारा वर्षांत त्यांनी कमावला आहे, हेही विशेष. शिवाजी विद्यापीठातून १९९४ साली बी.एस्सी. झालेल्या जगन्नाथ यांनी पुढे याच विद्यापीठात पत्रकारिता व संज्ञापनाचे (कम्युनिकेशन) शिक्षण घेतले. १९९६ मध्ये याच विद्यापीठातून पत्रकारितेतील मास्टर्स मिळवून त्यांनी पुढली पाच वर्षे शिक्षण-संज्ञापनातील पीएच.डी.साठी अभ्यास केला. यानंतरच्या काळात, शिवाजी विद्यापीठात सहायक कुलसचिव पदावर कार्यरत असताना देशभरच्या उच्चशिक्षण संस्थांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅक’मध्ये त्यांची नियुक्ती झाली. ‘नॅक’मध्ये आधी सहायक सल्लागार, मग उपसल्लागार आणि पुढे प्रादेशिक समन्वयक या नात्याने ते कार्यरत राहिले. या कार्यकाळात ५०० वर महाविद्यालयांच्या मूल्यांकनाचे समन्वयन त्यांनी केले. नॅकमधूनच ‘एपीक्यूएन’साठी काम करण्याची संधी त्यांना सात वर्षांपूर्वी पहिल्यांदा मिळाली. तेथे त्यांनी २००७ मध्ये मेलबर्न (ऑस्ट्रेलिया), क्वालालंपूर (मलेशिया) आणि हाँगकाँग येथे, शिक्षण संस्थेच्या गुणवत्ता मूल्यांकनात विद्यार्थी-सहभाग कसा असू शकेल याच्या कार्यशाळा घेतल्या. जागतिक बँक, युनेस्को यांनी निधी दिलेल्या या प्रकल्पांवर काम करताना, कामाची प्रक्रिया अधिकाधिक प्रगत करण्यावर जगन्नाथ यांचा मोठा भर असे. महाराष्ट्रातील गावांतसुद्धा दर्जेदार उच्चशिक्षण मिळावे, अशी कळकळही डॉ. पाटील यांना आहे.
August 5, 2017
मराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक म्हणून राम गणेश गडकरी अजरामर ठरले. आपल्या अल्पशा कारकीर्दीत त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व मराठी रसिकांच्या मनात कायमचं कोरलं गेलं. विशेषत त्यांच्या एकच प्याला` या नाटकाचे प्रयोग त्यांच्या मृत्यूनंतरही होत आहेत.
November 27, 2015
‘प्राचीन मराठी साहित्यातील स्त्रीचे दर्शन’ या त्यांच्या पुस्तकाला राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार मिळाला होता. परभणीला २००५ साली झालेल्या अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
June 11, 2021
बाबूरावांना चित्रपटांपेक्षा चित्रकलेत अधिक स्वारस्य होते, तसेच त्यांच्या चित्रपटनिर्मितीत व्यावसायिक बाबींचा अभाव होता. परिणामत: त्यांचे सहकाऱ्यांशी मतभेद झाले व त्यांपैकी काहीजण कंपनीतून बाहेर पडले. पुढे बाबूरावांनी “लंका” या चित्रपटानंतर आणखी तीन चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर मात्र महाराष्ट्र फिल्म कंपनी कायमचीच बंद झाली.
March 14, 2014
संगीतातील लय ही एक अत्यंत प्रतिभावान संकल्पना आहे. स्वरांना लयीच्या आकृतीमध्ये बांधून ठेवण्याची ही कल्पना ज्या कुणाला सुचली, त्याचे या पृथ्वीवरील समस्त मानवजातीवर अनंत उपकार आहेत. संगीताला या लयीमुळे एक प्रकारचा चुस्तपणा, बंदिस्तपणा आला. या बांधीव मांडणीमुळे संगीताच्या सौंदर्याच्या कल्पनेतही बदल झाले. मैफलीत कोणत्याही गायक वा वादकाबरोबर तबल्याची संगत करणाऱ्या वादकाला मुळात गाणे कळणे अत्यंत आवश्यक असते.
गाणे कळणे आणि त्यावर नितांत प्रेम करणे हे गुणधर्म असलेला तबलावादकच कलावंताला अप्रतिम साथ करू शकतो. आयुष्यभर अनेक दिग्गजांबरोबर अशी लयीची संगत करणारे पंडित चंद्रकांत कामत यांचे निधन म्हणजे एका लयदार व्यक्तिमत्त्वाची अखेर आहे. अतिशय शांत आणि कमी बोलणारे कामत जेव्हा तबला आणि डग्ग्यासमोर बसायचे, तेव्हा त्यांना ब्रह्मांडाचाच साक्षात्कार होत असला पाहिजे. तबला आणि डग्गा या दोन वाद्यांमधून येणाऱ्या वेगवेगळय़ा ध्वनींचा एकरूपतेने आविष्कार करणाऱ्या तबलानवाजांची एक परंपराच भारतीय संगीतात आहे.
चंद्रकांत कामत हे स्वत: उत्तम तबलावादक असले तरीही त्यांनी आपले सारे कलाआयुष्य तबल्यावर साथसंगत करण्यात घालवले. कलावंताबरोबर साथ करणे ही काही केवळ तांत्रिक आणि यांत्रिक गोष्ट नसते. प्रत्येक कलावंताची प्रतिभा वेगळी, त्याची मांडणी वेगळी, स्वभावाचे कंगोरे वेगळे आणि प्रत्यक्ष मैफलीत त्याला फुटणारे निर्मितीचे धुमारेही वेगळे! या सगळय़ाची जाणीव ठेवून साथ करणारा कलाकार हा तेवढय़ाच उंचीचा असतो. पंडित चंद्रकांत कामत यांनी ती उंची गाठली होती. पंडित भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गजाबरोबर अनेक वर्षे साथ करण्याचे भाग्य त्यांना लाभले. गायक आणि संगतकार यांच्यात अद्वैत निर्माण झाल्याशिवाय गाणे खुलत नाही.भीमसेनजींच्या अनेक अजरामर मैफलींमध्ये हे अद्वैत हजारो रसिकांनी अनुभवले आहे.
भारतातील अनेक मोठय़ा कलावंतांबरोबर तबल्यावर साथ करण्याची संधी कामतांना मिळाली आणि त्यांनी त्याचे सोने केले. तबल्यावर लय धरताना कलावंताचा मूड समजून घेणे आवश्यक असते. कलावंताला नवे काही सुचण्यासाठी साथीदार तयारीचा असावा लागतो. केवळ लय पकडून ठेवली म्हणजे गाणे रंगते असे होत नाही. कलावंताला त्या स्वरांमध्ये चिंबवण्यासाठी लयीचे कोंदण मिळवून देणे तेवढेच महत्त्वाचे असते. कामतांच्या तबलावादनात या सगळय़ा गोष्टी होत्या. आजकाल मैफलीत साथ करणारे वादक काहीवेळा आगाऊपणा करतात. कलावंतापेक्षा आपणच काकणभर सरस कसे आहोत, ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. तसा सोस कामत यांनी कधी केला नाही. त्यामुळेच भावगीतापासून ते अभिजात शास्त्रीय संगीतापर्यंत सगळय़ा संगीत प्रकारात त्यांनी आपली मुद्रा उमटवली.
लहानपणी वडील आणि गायकनट मास्टर शांताराम कामत यांच्याबरोबर त्यांनी बालनट म्हणून काम करायला सुरुवात केली तरी त्याच वयात तबला शिकण्याचे त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली. नाटक कंपनी बंद पडल्यामुळे कामत पुण्यात आले आणि त्यांनी कथक कलाकार रोहिणी भाटे यांना तबल्याची साथसंगत करण्यास सुरुवात केली. भाटे यांना तब्बल पंधरा वर्षे त्यांनी तबलासंगत केली. याच काळात आकाशवाणीमध्ये तबलावादक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि सुमारे पस्तीस वर्षे आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक श्रेष्ठ कलाकारांबरोबरच नव्या कलाकारांनाही संगत करण्याचे काम त्यांनी केले. या काळात जी. एल. सामंत यांच्यासारख्या कसलेल्या गुरूकडून आणि सामताप्रसाद यांच्यासारख्या दिग्गजाकडून तबलावादनातील अनेक नवे धडे घेण्यात कामत यांना जराही कमीपणा वाटला नाही. सवाई गंधर्व संगीत महोत्सवामधील त्यांची हजेरी कलावंत आणि रसिक या दोघांसाठीही आश्वासक असे. त्यांच्या कलाजीवनात त्यांना ‘संगतकार पुरस्कार’, ‘स्व. वसुंधरा पंडित पुरस्कार’ तर मिळालेच, पण पुणे महापालिकेकडून गौरव करण्यात आला. भरत आणि सुभाष या त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांचा हा कलेचा वारसा सुरू ठेवला आहे, हे कलावंतासाठी भाग्याचेच म्हटले पाहिजे.
चंद्रकांत कामत यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत (11-Jul-2017)
ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत (26-Nov-2018)
VV
August 4, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti