(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विलास वसंत खोले

    विलास वसंत खोले हे समीक्षक व “शोध” या संस्थेचे संस्थापक-संचालक आहेत.

      January 4, 2021


  • विष्णू गणेश भिडे

      December 15, 2010


  • अशोक नागपुरे

    माणूस रंगांकडे जसा ओढला जातो, तितके शक्यतो रेखाटनाचे अप्रूप नसते. परंतु याच रेखाटनामध्ये एखाद्याला जागतिक ओळख मिळवून देण्याइतके सामर्थ्य असते. नाशिकचे अशोक नागपुरे हे व्यक्तिमत्व जगभरात त्यांच्या रेखाटनासाठी प्रसिद्ध झाले. त्यांनी तयार केलेल्या २ हजार ७०० चौरस फुटांच्या पेन्सिल रेखाटनाची नोंद गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डसनेही घेतली.

    केल्याने रेखाटन

      July 14, 2017


  • पंकज झारेकर

    निसर्ग प्रेम माणसाला कुठवर घेवुन जावु शकत याच मुर्तिमंत उदाहरण म्हणजे पंकज झारेकर. फोटोग्राफीचा कुठलाही शैक्षणिक किंवा व्यावसायिक अनुभव गाठीशी नसताना या निसर्गवेड्या कलंदराने निसर्गाच्या विवीध ॠतुंनुसार बदलणार्‍या गहिर्‍या रंगांना व रूपांना ज्या सौंदर्यपुर्ण शैलीमध्ये कैद केले आहे, त्याबद्दल् त्याला साक्षात निसर्गदेवतेची दुवादेखील मिळाली असेल. पंकज हा चारचौघांसारखा दिसणारा, वागणारा परंतु चाकोरीबाहेरच्या स्वप्नांना अभिमानाने मिरवणारा, सर्व कलांचा प्रेमी असा स्वछंदी तरूण. ही स्वच्छंदीपणाची देणगी पण, त्याला बेधुंद करणार्‍या निसर्गाकडूनच मिळाली.

      August 16, 2011


  • विश्वासराव सावरकर

    स्वा. सावरकर- नेताजी सुभाषचंद भेट, स्वा. सावरकर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेट, स्वा. सावरकर- गाडगे महाराज भेट, रत्नागिरी येथील पतितपावन मंदिराची स्थापना, स्वातंत्र्यवीरांचे दलितोद्धाराचे कार्य तसेच गांधीहत्येनंतर घडलेल्या अनेक घटना यांचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या विश्वासरावांनी बर्‍याच प्रमाणात लिखाणही केले आहे. ते एका मोठ्या, प्रदिर्घ व ऐतिहासीक कालखंडाचे महत्वपुर्ण व एकमेव साक्षीदार होते.

    ‘आठवणी अंगाराच्या’ या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण टिपणारे त्यांचे हे पुस्तक चांगलेच गाजले होते.

      July 26, 2011


  • पं.जगन्नाथबुवा पुरोहित

    पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांचे उस्ताद विलायत हुसेन खान हे यांचे गुरू.  पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या शिष्यांच्या मध्ये राम मराठे, माणिक वर्मा, सुरेश हळदणकर, जितेन्द्र अभिषेकी, सी.आर्.व्यास, यशवंतबुवा जोशी, वसंतराव कुलकर्णी, लीलाताई करंबेळकर, मनोरमा वागळे, मोहनतारा अजिंक्य, जी.एन्.जोशी, मन्ना डे, आणि तबल्यातील भाई गायतोंडे, नाना मुळे! अशी अनेक दिग्गजाची नावे होती.

      July 4, 2022


  • (पं.) शरद साठे

    वयाची ऐंशी गाठलेले ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि गानगुरू पंडित शरद साठे यांच्यासाठी शनिवारी, २४ रोजी मुंबईत होणारा सोहळा केवळ सहस्रचंद्रदर्शनाचा वा त्यानिमित्त होणाऱ्या सत्काराचा नाही.. त्यांच्या तीन सीडींचे प्रकाशन आणि मग सतारनवाज्म अब्दुल हलीम ज्माफर खान आणि सारंगीसम्राट रामनारायण यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार,

    त्यानिमित्ताने साठे यांना गुरू मानण्याचा ‘टप्पा’ गाठलेल्या अनेक गायक-शिष्यांचीही उपस्थिती, असे हे स्वरमय वातावरण असेल. ग्लॅमरची मातबरी- ज्यापुढे आजचे अनेक गायक शरण जातात- तशी साठे यांना कधी वाटली नव्हती आणि याही सोहळय़ात, प्रसिद्धीपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची मानणाऱ्यांची मांदियाळी असेल. ही गुणवत्तेची बैठक साठेंना वयाच्या १७व्या वर्षी मिळाली, ती थेट पं. द. वि. ऊर्फ बापूराव पलुस्कारांकडून!

    अगदी १९५५ पर्यंत, पलुस्करांच्या अकाली निधनापर्यंत ही तालीम सुरू होती. त्यानंतर साठे मुंबईत, बी. आर. देवधरांच्या विद्यालयात शास्त्रशुद्ध बैठक पक्की करत गेले.. पण फर्गसनमध्ये असताना ऐकलेले काही काहीशा नकलेचा दोष पत्करून गळय़ात घटवलेले फय्याजखाँ, मास्टर कृष्णराव, हिराबाई बडोदेकर अशांच्या गायकीत अंगभूत असलेले मोकळेपणही त्यांना भावत होते. त्याची स्वत:शी गाठभेट करून घेण्याचा क्षण साठेंना बहुधा, पं. शरश्चंद्र आरोलकरांच्या मठीत गवसला असावा.

    ग्वाल्हेर गायकीतील ‘टप्पा’ हा गानप्रकार शिकायला आरोलकरांकडे साठे गेले आणि तिथे रमले. पुढे विद्यापीठीय स्तरावर टप्पा गायकीचे प्राध्यापक परीक्षक म्हणून काम करणारे पं. साठे यांची ‘यमनकल्याणा’सारख्या रागांवरही इतकी घरंदाज हुकमत आहे की, या गायनाचे जतन अव्वल देशी संस्थांखेरीज वॉशिंग्टन विद्यापीठानेही केले. आयटीसी- संगीत संशोधन संस्थेचा पुरस्कार (२००६), काशी संगीत समितीतर्फे ‘संगीतरत्न’ (२००७) हे सत्तरीनंतर मिळालेले सन्मान वगळता, ‘आकाशवाणीचे ए ग्रेड आर्टिस्ट’ ही साठे यांची ओळख होती, पण त्याबद्दल खंतखेद बाळगणाऱ्यांपैकी साठे नव्हेत. ‘डीव्ही पलुस्करांवरील लघुपटासाठी आवाज वापरला गेला’ या समाधानाचे मोल मात्र साठेंकडून जाणावे!

      August 5, 2017


  • नरेंद्र रघुवीर बोडके

    मराठीला मोजक्या पण खानदानी काव्यसंग्रहांची लेणी चढविणारे नरेंद्र बोडके हे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते.

      July 10, 2012


  • नासिकराव तिरपुडे

    महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्रीपद भूषविणार्‍या नासिकराव तिरपुडे यांनी आदिवासी व मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला.

      September 3, 2010


  • (डॉ.) श्री. आ. देशपांडे

    देशपांडे, (डॉ.) श्री. आ.

    विद्वानाने विद्येचा वापर व आदर कसा करावा, याचा वस्तुपाठ ठरणारे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्री. आ. देशपांडे आता आपल्यात नाहीत. विदर्भासह महाराष्ट्राच्या प्रादेशिक असमतोलाची सातत्याने अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या डॉ. देशपांडे यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजातून पदव्युत्तर शिक्षण (एम.ए.) पूर्ण केल्यावर १९५२ पासून प्रथम धनवटे मग बिंझाणी महाविद्यालयांत प्राध्यापकी केली. अर्थशास्त्र हा त्यांचा आवडता विषय होता.

    सुमारे ३५ वर्षे अध्यापन करून ३१ ऑक्टोबर १९८४ ला नागपूर विद्यापीठातून अर्थशास्त्र विभागप्रमुख म्हणून ते सेवानिवृत्त झाले. फेब्रुवारी १९७६ ते ऑक्टोबर १९७८ पर्यंत ते समाजविज्ञान शाखेचे अधिष्ठाता होते. औरंगाबादेत ऑक्टोबर १९७९ मध्ये झालेल्या मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या तिसऱ्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. भारतीय समाजविज्ञान संशोधन मंडळाच्या पश्चिम विभागाच्या सल्लागार मंडळावर सुमारे नऊ वर्षे त्यांनी काम केले. संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी), विभागीय असमतोलविषयक दांडेकर समिती, जलसिंचन आयोग, तसेच राज्यपालांनी नेमलेल्या विदर्भ वैधानिक विकास मंडळाचेही ते सदस्य होते. १९९५मध्ये अनुशेष निर्देशांक समितीतही ते होते. विदर्भ वैधानिक विकास मंडळावर सदस्य म्हणून काम करताना त्यांनी विदर्भाच्या अनुशेषासंदर्भात अनेक निर्णय घेतले. विदर्भ विकास मंडळ स्थापन व्हावे, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले, मात्र त्या वेळी विरोध झाल्यावरही यासाठी सरकारकडे त्यांनी भिन्नमत पत्रिका (नोट ऑफ डिसेंट) सादर केली. १९९६ मध्ये बॅकलॉग अ‍ॅण्ड इंडिकेटर समितीचेही ते सदस्य होते. सुबोध अर्थशास्त्र, अधिकोष आणि नाणे बाजार, भारताचे आर्थिक प्रश्न, मुद्रासिद्धान्त आणि मौद्रिक व्यवहार, अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक, समग्र अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था संक्रमण आणि विकास इत्यादी पुस्तके त्यांच्या नावावर असली तरी मुद्रासिद्धान्त आणि धोरण, भारतीय नियोजन आणि आर्थिक विकास, मुद्रासिद्धान्त आणि राजस्व नीती, ही पुस्तके विशेष लोकमान्य झाली. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या मातीचा गाढा अभ्यासक हरपला आहे.

      August 5, 2017