मराठी बालवाड्.मयात असंख्य लहान मुलांच्या चेहर्यावर हसू उमटेल अश्या असं दर्जेदार बालसाहित्य निर्माण करण्यात महत्वाचं योगदान देणार्या सुमती पायगावकर यांचा जन्म १९१० साली झाला. संस्कारपुर्ण लेखन व निखळ मनोरंजनाची खात्री असलेली त्यांची पुस्तके मराठी कुटुंबियांमध्ये व बच्चेकंपनीमध्ये लाडकी व आवडती ठरली आहेत.
बालसाहित्याची लेखिका म्हणून सुमती यांनी “पतंग“, “शेंडू“, “शिंपला“, “गीतकलिका“, “फेनाली“, “जिमी“, “दर्यासारंग सिंदबाद“, “हिमाली“, “आटपाटनगर“, “स्वप्नरेखा“ , “रानगावची आगगाडी“, “फाटफूट धूम“, “कावळोबाच्या गमती“ अशा ऐकुण ८० पुस्तकांच्या प्रकाशनाद्वारे आपल्या लेखनाची मोहोर यशस्वीपणे उमटविली आहे.
केंद्र शासनाचे १९५८, १९५९, व १९६१ या वर्षाचे बालवाड्.मयासाठीचे पुरस्कार सुमती पायगावकर यांना प्राप्त झाले. त्यांच्या “मिनीची बाहुली“, “पोपटदादाचे लग्न“ या पुस्तकांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. “हॅन अँडरसन“ या पुस्तकामधून त्यांनी १२ भागांमध्ये केलेले परीलेखनदेखील प्रचंड गाजले होते.
१९७७ साली सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या सुमती पायगावकर अध्यक्षा होत्या.
January 14, 2015
वयाच्या ११ व्या वर्षापासून प्राजक्ताने खेळायला सुरुवात केली आणि १२ व्या वर्षी पहिले राज्यस्तरीय अजिंक्यपद पटकावले, १७ व्या वर्षी राष्ट्रस्तरीय स्पर्धा जिंकली.
May 16, 2014
बा.सी. मर्ढेकर हे मराठी कवी, लेखक होते
December 15, 2010
१९८३ साली अच्युत पालव यांनी उल्का शिष्यवृत्तीसाठी मोडी लिपीचा पंधराव्या ते सतराव्या शतकांतील इतिहास, तसेच मोडी लिपीची विविध वळणे व अक्षररुपे यांवर कलात्मक दृष्ट्या संशोधन करुन प्रबंध लिहिला. मोडी व आजची देवनागरी यांच्या दृश्य समन्वयातून ‘धृतनागरी’ तयार केली. तिला ‘मुक्त लिपी’ असे नाव दिले. या लिपीचा त्यांनी सुलेखनातून कलात्मक आविष्कार घडवून ह्या प्रयोगाची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख करुन दिली.
June 17, 2022
गुरू ठाकूर हे नाव उच्चारले की त्यांनी लिहिलेली ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘मल्हार वारी’, ‘मला वेड लागले’ ते अगदी ‘माउली माउली’ अशी विविध प्रकारची, बाजाची आणि ढंगांची गाणी रसिकांच्या ओठावर येतात.
July 23, 2017
भास्करबुवा बखले हे मराठी हिंदुस्तानी संगीतपरंपरेतले गायक, संगीतकार होते..
December 15, 2010
समीक्षक, कथालेखिका, लघुनिबंधकार, कवयित्री असे साहित्यातील विविध प्रकार ज्यांनी हाताळले त्या कुसुमावती देशपांडे. १० नोव्हेंबर १९०४ साली विदर्भात त्यांचा जन्म झाला. विदर्भातील प्रसिद्ध वकील रा. ब. रामकृष्ण रावजी जयवंत ह्यांच्या त्या कन्या. त्यांचे शालेय शिक्षण अमरावती येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाले.
January 22, 2010
देशातील नामवंत इंजिनीअर्स व मॅनेजर्स घडविणार्या देहरादून च्या ग्राफिक एरा युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल अफेअर्सच्या अधिष्ठातापदाची जबाबदारी अवघ्या ४० व्या वर्षी डॉ. दुर्गाप्रसाद गांगोडकर यांच्याकडे आली आहे. बेळगावात जन्मलेले डॉ. गांगोडकर यांनी बीई. एमटेकचे शिक्षण घेतल्यानंतर आयआयटी-रुरकितून पीएचडी मिळवली, संशोधनावर हुकुमत असुनही उद्योगात फार काळ न रमता पुढे मात्र त्यांनी अध्यापनासाठी आपल्याला वाहून घेतले.
डॉ. दुर्गाप्रसाद गांगोडकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला देहरादूनची आंतरराष्ट्रीय धुरा हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. दुर्गाप्रसाद गांगोडकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला देहरादूनची आंतरराष्ट्रीय धुरा हा लेख वाचा.
September 9, 2015
वासुदेव गोविंद मायदेव यांनी अभिनयाला वाव देणारी “शिशुगीते” हा प्रकार मराठीत रुळवला. जुन्या अंकलिप्यांतील अनेक कविता त्यांनी लिहिल्या आहेत.
August 23, 2017
ठाण्यातील केबल वाहिनीसाठी एका स्थानिक जाहिरातीचे संगीत संयोजन करुन २००१ साली आपल्या संगीत क्षेत्रातील कारकीर्दीची सुरुवात करणार्या खअरकर यांनी आपल्या यशाचा चढता आलेख कायम ठेवलेला आहे.
May 29, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti