(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • क्रिकेटला डकवर्थ-लुईस हा नियम देणारा टोनी लुईस

    लुईस आणि डकवर्थ यांनी १९९७ मध्ये एक फॉर्म्युला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सादर केला.१९९७ साली झिमाब्वे आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यात हा नियम पहिल्यांदा वापरण्यात आला. १९९९ मध्ये याचा वापर इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये करण्यात आला.

  • बॉलिवूडची नायिका सिमी गरेवाल

    आज १६ आक्टोबर.. आज सिमी गरेवाल यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ आक्टोबर १९४७ रोजी झाला.

    मा.सिमी गरेवाल म्हटलं की आपल्याला ‘रांदेवू’ वुईथ सिमी गरेवाल’ हा त्यांचा शो आठवतोच.

    सिमी गरेवाल यांचे लहानपण इंग्लड मध्ये गेले. वयाच्या १५ व्या वर्षी फिरोज खान यांच्या चित्रपटात काम केले. त्यांनी मेहबूब खान, राज कपूर, मृणाल सेन, राज खोसला अशा मात्तबर दिगदर्शकांबरोबर काम केले. मा.सिमी गरेवाल या बोल्ड सीन साठी त्या काळी फेमस होत्या. त्यांनी ‘मेरा नाम जोकर’, ‘कर्ज’, सिद्धार्थ या काही चित्रपटात दिलेले बोल्ड सीनआठवत असतीलच. सिद्धार्थ या इंग्रजी चित्रपटातील शशी कपूर आणि त्यांचं चुंबन दृश्यही हमखास आठवतं. पण ते अत्यंत कलात्मकरीत्या चित्रित केलं गेलं होतं. तरीही त्यावरून त्या वेळी गोंधळ झाला होता. सिमी गरेवाल यांनी ६० पेक्षा जास्त चित्रपटात कामे केली आहेत. अभिनय सोबत सिमी गरेवाल एक अँकर म्हणूनपण आपल्या लक्षात आहे. ‘इंडियाज मोस्ट डिझायरेबल’ हा शो पण सिमी गरेवाल यांचा होता. दूरदर्शनवर Woman's World या नावाने त्यांनी डॉक्यूमेट्री केली होती. राजीव गांधी यांच्या जीवनावर राजीव या नावाने डॉक्यूमेट्री केली आहे. मा.सिमी गरेवाल यांना आपल्या समूहातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • सरकारी वकील उज्ज्वल निकम

    उज्वल निकम यांच्या कडे भारतातील हाय प्रोफाईल केसेस असतात. त्यामुळे त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. झेड सुरक्षा असलेले उज्वल निकम हे भारतातील एकमेव वकील आहेत. उज्वल निकम यांच्या सभोवताल ४७ शस्त्रधारी कमांडो नेहमी असतात.

  • मराठी चित्रपट-अभिनेते विष्णूपंत जोग

    चि. वि. जोशी यांच्या गुंड्याभाऊची भूमिका गाजविणारे जुन्या जमान्यातील प्रसिध्द नट विष्णूपंत जोग चिं. विं.च्या विनोद बागेतले दोन अफलातून नमुने म्हणजे ‘चिमणराव-गुंडय़ाभाऊ’. या दुकलीची लोकप्रियता आता आतापर्यंत टिकून होती.

    दामुअण्णा आणि विष्णुपंत जोग यांचा ‘सरकारी पाहुणे’ हा चित्रपट १९४२ मधला. पहिली मंगळागौर (लता मंगेशकर यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट), सरकारी पाहुणे, जय मल्हार, नवरा बायको, देव पावला, बायको पाहिजे, वरदक्षिणा, हे चित्रपट व नाटक झाले जन्माचे हे नाटक ह्या मा.विष्णूपंत जोग यांच्या गाजलेल्या कलाकृती होत.

    'मी गुंड्याभाऊ हे विष्णूपंत जोग यांचे आत्मचरित्र डॉ. मंदा खांडगे यांनी शब्दांकित केले आहे.

    विष्णूपंत जोग यांचे २२ जून १९९३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • जेष्ठ रंगकर्मी गोपीनाथ सावकार

    गोपीनाथ सावकार यांनी संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात मराठी रंगभूमीवर सातत्याने संगीत नाटकं सादर केली. 'भावबंधन', 'शाकुंतल', 'सुवर्णतुला', 'ययाती देवयानी' अशा अनेक संगीत नाटकांचे दजेर्दार प्रयोग सादर करून त्यांनी संगीत नाटकाचा प्रेक्षक टिकवून ठेवायचा जवळ जवळ एकहाती प्रयत्न केला. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९१० रोजी झाला. ‘संगीत ययाती आणि देवयानी’ हे नाटक गोपीनाथ सावकार यांनी त्यांच्या ‘कलामंदिर’ या नाटय़संस्थेतर्फे २० ऑगस्ट १९६६ रोजी रंगभूमीवर आणले.

    पहिला प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघाच्या रंगभूमीवर सादर केला गेला होता. गोपीनाथ सावकार गोव्याचे. धि गोवा हिंदु असोसिएशन या संस्थेचा सांस्कृतिक विभाग गोपीनाथ सावकार यांनीच सुरू केला. पु. भा. भाव्यांचं 'वीषकन्या' हे नाटक सावकार आपल्या संस्थे तर्फे’सादर करीत. यातली नीळकंठाची खलनायकी भूमिका त्यांनी अजरामर केली. आपल्या अभिनयाने त्यांनी रंगभूमीवर एक मानदंड निर्माण केला. आचार्य अत्रेंच्या 'उद्याचा संसार'मध्ये गोपीनाथ सावकार प्रमुख भूमिका करीत होते. शरीर मधुमेहाने पोखरलेलं होतं. पायाला इजा झालेली.

    जखम चिघळत गेली, गॅंगरिन झालं. शेवटी पाय कापावा लागला. कुठच्याही नटाने आपली रिप्लेसमेंट तयार करा, असा सल्ला दिला असता. पण गोपीनाथ सावकार स्वत:च नाटक सादर करत होते. सांगणार कुणाला? आणि शरीरात भिनलेली नाटकाची झिंग शमवणार कशी? मागची पुढची तमा न बाळगता हा अवलिया कुबड्या घेऊन रंगमंचावर भूमिकेत उभा राहिला आणि त्यांनी ती भूमिका आपल्याला आलेल्या पंगुत्वाची फिकीर न करता शेवटपर्यंत उत्कृष्टपणे निभावून नेली. ही आठवण विजय तेंडुलकरांनी त्यांच्या 'कोवळी उन्हे' या सदरातल्या लेखात नोंदवून ठेवली आहे.

    नाट्य-चित्रपट क्षेत्रातले ख्यातनाम अभिनेते अशोक सराफ हे गोपीनाथ सावकार यांचे भाचे.

    संगीत रंगभूमीवर गायक नट म्हणून प्रतिष्ठा पावलेले प्रसाद सावकार हे पुतणे. अनेक संगीत नाटकांत उत्तम स्त्री पाटीर् नट म्हणून लौकिक मिळवणारे रघुनाथ सावकार हे त्यांचे चिरंजीव आणि शिष्यगणांत रामदास कामत, आशालता आणि अशा कित्येक हुन्नरी गायक कलावंतांचा भरणा होता. अशोक सराफ आणि सुभाष सराफ या गोपीनाथांच्या भाच्यांनी आपल्या मामांची कायमस्वरुपी आठवण राहावी म्हणून त्यांच्या नावे विश्वस्त निधी स्थापन केला आहे. या विश्वस्त निधीने अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या यशवंत नाट्य मंदिराला आणि पार्ल्याच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाला गोपीनाथ सावकारांच्या तैलचित्राची प्रतिमा दिलेली आहे.

    गोपीनाथ सावकार स्मृती विश्व स्त निधीच्या वतीने गोपीनाथ सावकार स्मृती नाट्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. गोपीनाथ सावकार यांचे निधन १४ जानेवारी १९७३ साली झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • गॅलिलिओ गॅलिली

    आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न दुर्बिणीने करणारा खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली यांचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला.

    गॅलिलिओ यांनी दुर्बिणीतून असंख्य गोष्टी अभ्यासल्या. शुक्राच्या कला पाहिल्या. गुरू आणि गुरूभोवती फिरणारे चार चंद्र पाहिले. खरे तर गॅलिलिओला नेपच्यूनच्या शोधाचा मानही मिळाला असता. गुरूजवळ तेव्हा नेपच्यून होता. पण सूर्यमालिकेत असे काही अज्ञात ग्रह असतील असा विचारही तेव्हा शिवला नव्हता. इतकेच कशाला, पृथ्वी सूर्याभोवती फिरते यावरच कोणाचा विश्वास नव्हता. त्यामुळे सूर्याभोवती फिरणारा ग्रह अस्तित्वात असण्याचा प्रश्नच नव्हता. आपल्या या निरीक्षणांवर आधारित ‘स्टारी मेसेंजर’ नावाचे पुस्तक १६१० मध्ये गॅलिलिओ यांनी प्रसिद्ध केले. शुक्राला कला कशा काय असतात? गुरूभोवती छोटे गोल फिरू शकतात? मग सूर्याभोवती पृथ्वी आणि इतर ग्रह का फिरू शकणार नाहीत? असे प्रश्न त्यामध्ये उपस्थित केले होते. कोपर्निकसने मांडलेल्या सूर्यकेंद्री सिद्धांतात तथ्य असले पाहिजे, असे गॅलिलिओ यांना वाटू लागले. १६१५ च्या दरम्यान त्यांनी या सिद्धांताला उघडपणे पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि इथेच समाज आणि व्यक्ती हा संघर्ष सुरू झाला.

    समाजाची वैचारिक धारणा प्रस्थापितावर विश्वास ठेवणारी असते. नव्या कल्पना, नवे विचार जर प्रस्थापितांविरुद्ध असतील तर ते समाजाला मुळीच खपत नाही. शास्त्रीयच नव्हे तर शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातही हे घडते. नव्या विचारांना हाणून पाडण्यासाठी मग धर्म आणि धर्मग्रंथांचा आधार घेतला जातो. या गोष्टी धर्ममार्तंडांना सोयीच्या असतात. कारण याआधारे सामान्य जनतेला नवविचारांपासून दूर ठेवता येते. कॅथॉलिक चर्चने गॅलिलिओला पाखंडी ठरवले आणि त्याने सूर्यकेंद्री सिद्धांताचा प्रचार करू नये असे फर्मान काढले. 1624 नंतर आलेला पोप आपल्या विचारांना अनुकूल आहे असे वाटल्यावरून गॅलिलिओने पुन्हा एक पुस्तक लिहिले. पण पुस्तकाचा कल सूर्यकेंद्री रचनेकडे झुकतो आहे असे वाटल्यावरून पुन्हा एकदा त्याच्या पुस्तकावर बंदी आणली गेली. ६९ वर्षांच्या गॅलिलिओ यांना दम देण्यात आला. पाखंडी मताचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आणि तेसुद्धा मरेपर्यंत. पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही हे त्याच्याकडून बळजबरीने वदवून घेण्यात आले. गॅलिलिओ यांच्या वरचे आरोप ३१ ऑक्टोबर १९९२ या दिवशी चर्चने अधिकृतपणे मागे घेतले. वास्तववादी विचार मान्य करण्याची घोषणा करण्यास ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ लागला आणि तेही गॅलिलिओच्या त्यागानंतर. केवळ विचाराने आणि तर्काने या विश्वाचे नियम उलगडून दाखवता येतात या अॅओरिस्टॉटल यांच्या मतांना धक्का देणारा आणि या तत्त्वज्ञानाला विरोध करणारा माणूस म्हणून गॅलिलिओ यांनी केलेले कार्य फार महत्त्वाचे आहे. प्रयोग आणि निरीक्षण याचे महत्त्व गॅलिलिओ यांनी सिद्ध केले. केवळ विरोधासाठी विरोध केला नाही. जड वस्तू आणि हलकी वस्तू एकाच उंचीवरून खाली सोडल्या तर कोणती वस्तू अगोदर खाली पडेल? जड वस्तू खाली पडेल हे आपल्याला विचाराने सुचणारे परंतु धादांत चुकीचे उत्तर असते. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने वस्तू खाली खेचल्या जातात. त्यांचा वेग वाढत जातो, पण वेगातील ही वाढ त्या वस्तूंच्या आकारावर किंवा वस्तुमानावर अवलंबून नसते हे सिद्ध करायला फार मोठा आटापिटा करावा लागत नाही. साध्या प्रयोगाने गॅलिलिओ यांनी हे सिद्ध केले. आपल्याला सत्य वाटणा-या गोष्टींची सत्यता प्रयोगाने पडताळून पाहण्याची मानसिकता निर्माण करणे हे गॅलिलिओचे मोठे योगदान आहे. वयाच्या १९ व्या वर्षी गॅलिलिओ यांनी लंबकासंबंधीचा गैरसमज दूर करून खरा नियम जगासमोर आणला.

    त्याचा आंदोलनकाळ त्याने नाडीच्या ठोक्याच्या साहाय्याने मोजला आणि लंबकाचा आंदोलनकाळ त्याच्या आयामावर अवलंबून नसून लांबीवर अवलंबून आहे हे प्रयोगाने सिद्ध केले. गॅलिलिओ हे चांगले साहित्यिकही होते. गद्य साहित्याबरोबर त्यांच्या कविताही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांनी कवितांसाठी दाँते अॅबलेहोरीची अकरा शब्दांची एक ओळ ही शैली वापरली होती. ‘डिव्हाइन कॉमेडी’ या सुप्रसिद्ध महाकाव्यात दाँतेनी ही शैली योजिली आहे. गॅलिलिओंनी अनेक सुनीतं रचली. गॅलिलिओ यांचं सर्व वैज्ञानिक लेखन अनुवादित स्वरूपात इंग्रजीत उपलब्ध आहे. मात्र त्यांचं साहित्यिक लेखन- विशेषत: काव्य विसावं शतक संपेपर्यंत तरी इंग्रजीत उपलब्ध नव्हतं. गमतीची गोष्ट म्हणजे गॅलिलिओंचं अगदी पोपनी बंदी घातलेलं सगळे वैज्ञानिक लेखन सतरावं शतक संपण्यापूर्वीच अनुवादरूपानं इंग्रजीत उपलब्ध झालं होतं. पण त्यांच्या कवितांचे अनुवाद इंग्रजीत प्रसिद्ध व्हायला एकविसावं शतक उजाडावं लागलं. जून २००० मध्ये गिओव्हानी पी. बिग्नामी यांनी गॅलिलिओंच्या काव्याचा केलेला इंग्रजी अनुवाद ‘अगेन्स्ट टू डॉनिंग ऑफ द गाऊन’ या शीर्षकानं इंग्रजीत प्रसिद्ध झाला. गॅलिलिओ यांचे ८ जानेवारी १६४२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • सुप्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर

    गायिका, कवयित्री, नाटककार व सुप्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२५ रोजी पुणे येथे झाला.

    योगिनी जोगळेकर यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर १९४८ ते १९५३ या काळात त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली. तसेच 'राष्ट्रसेविका समिती'च्या माध्यामातून त्यांनी अनेक वर्ष सामाजिक कार्यही केले. याच काळात त्यांनी विविध कथा, कादंबरीतून स्त्रीविषयक लेखन केले. त्यांचे काही काव्यसंग्रह व नाटकेही प्रसिद्ध झाली.

    पंडित भास्करबुवा बखले यांच्या जीवनावर "" या सम हा "" आणि राम मराठे यांच्या जीवनावर राम प्रहर"" या चरित्रांचे त्यांचे लेखन वेगळे ठरले.

    वयाच्या आठव्या वर्षापासून योगिनीबाई शंकरबुवा अष्टेकर यांचेकडे संगीत शिकत होत्या. त्यानंतर योगिनी जोगळेकर यांनी राम मराठे यांचे शिष्यत्व पत्करले. आकाशवाणी व खाजगी बैठकीबरोबरच योगिनी जोगळेकर यांनी "पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले.

    आकाशवाणीवरील गीतरामायणाच्या प्रथम प्रसारणात विरूप झाली शूर्पणखा, ही दाशरथीची कृति सूड घे त्याचा लंकापति हे गाणे योगिनी जोगळेकर यांनी गायले होते.

    योगिनी जोगळेकर यांनी "राम प्रहर " हे राम मराठे यांच्या जीवनावर चरित्र लेखन केले होते.

    योगिनी जोगळेकर यांचे निधन १ नोव्हेंबर २००५ रोजी झाले.

    त्यांची गीतसंपदा

    मधुर स्वरलहरी या ------- सखे बाई सांगते मी -----हरीची ऐकताच मुरली -----हे सागरा नीलांबरा
    सखे बाई सांगते मी नवनवल गे
    गमते मना मृदु भावना
    हृदयींची शतजन्मींृची गे
    स्वप्नाीत तयाशी प्रहर प्रहर बोलते
    या मनोरथातुनी योजनभर विहरते
    गमते मना सुख साधना
    हृदयींची शतजन्मींाची गे
    नित्‌ प्रीत उमलतसे
    माला मी गुंफितसे
    भक्ति ज्योति तेवतसे
    मन हसे, तन हसे, मधुरसे"

    -- संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • सोळा हजारांत देखणी – प्रियांका शेट्टी

    प्रियांका शेट्टी… लावणीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही या लोककलेत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय… नृत्यसमशेर माया जाधव यांच्या तालमीत तयार होऊन गेली तीन दशकं याच कलेचा ध्यास घेत ही कला जीवापाड जपत, त्यावर प्रेम करत आणि ती जगावी यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणारी कलावती म्हणजे प्रियांका शेट्टी.

  • इंग्रज अधिकारी रँण्डला यमसदनी धाडणारे दामोदर चाफेकर

    थोड्याच वेळाने आणखी एक टांगा आला. त्यामागे कोणीतरी पळत होते आणि मोठ्याने ओरडत होते, ‘गोंद्या आला रे आला ! गोंद्या आला रे आला! तीच खूण ठरली होती. ते इशाऱ्याचे वाक्य होते. झाडीत लपलेले दामोदर हरी चाफेकर सरसावले. ते स्वतःशी म्हणाले, होय, हीच रँड साहेबाची गाडी आहे. मघाच्या टांग्यात दुसरा कोणीतरी साहेब असेल. बाळकृष्णाने घाई केली, पण त्यात काही बिघडले नाही. मुख्य रँडसाहेब मला सापडला म्हणजे योजना यशस्वी झाली. त्यांनी हाताने खूण करून वासुदेवाला थांबविले. चित्ता हरिणावर झेप घेतो त्याप्रमाणे त्यांनी टांग्यावर उडी मारली. छपरामुळे पडदा होता तो त्यांनी सर्रकन् बाजूला सारला. रँडच्या बरगड्यांजवळ पिस्तुल नेऊन त्यांनी सटासट गोळ्या झाडल्या. रँड गाडीतच कोसळला.

  • ख्यातनाम लेखिका सरोजिनी शारंगपाणी

    “आहुती’, “गुन्हेगारी आणि शासन’, “गुन्हेगारांचे जग’, “पुरुषप्रधान संस्कृती’, “दुर्दैवाशी दोन हात’ अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे चिरंजीव श्रीनिवास शारंगपाणी यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी…