(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एम.एस.सुब्बुलक्ष्मी

    जगप्रसिद्ध कर्नाटक संगीत गायिका, विष्णूसहस्रनाम गायनामुळे घराघरांत पोहोचलेल्या एम.एस.सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१६ रोजी झाला. मदुराई षण्मुखावदिवू सुब्बुलक्ष्मी म्हणजेच एम. एस. सुब्बुलक्ष्मी व 'एमएस' नावाने ओळखल्या जाणार्याण सुब्बुलक्ष्मी यांचे मूळ नाव कुंजम्मा होते. आज भारतात व परदेशात अनेकांच्या घरात सकाळची सुरवात श्री. वेंकटेश स्तोत्राने होते याचे श्रेय मा.एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना जाते. एक लहान भाऊ आणि बहीण अशी भावंड असलेल्या या देवदासीच्या मुलांचे बालपण मदुराईमधील प्राचीन अशा मीनाक्षी देवी मंदिराच्या परिसरात गेले. या मंदिराचा आर्थिक व सांस्कृतिक वारसा त्यांच्या आयुष्यावर कायम गारूड करून राहिला.

    एम. एस. यांची आजी उत्तम व्हायोलिन वाजवत असे, तर आई षण्मुगावादिवू वीणा वादनात पारंगत होती. त्यांचे वडिल वीणा वादक होते. आई व आजी अनेक सांगीतिक कार्यक्रम करत असल्याने, या सांगीतिक विश्वाची एम. एस. यांना फार जवळून ओळख होती. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही त्यांचा अभ्यास होता. संस्कृत आणि तेलुगू भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिले ध्वनिमुद्रण केलं.

    १९२९ मध्ये तेरा वर्षाच्या असताना त्यांनी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या ‘मद्रास म्युझिक अकॅडमी’ मध्ये पहिला जाहीर कार्यक्रम केला. भजन व इतर उपशास्त्रीय संगीत प्रकारांत त्यांचा हातखंडा होता. ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळवणा-या सुब्बुलक्ष्मी या पहिल्या गायिका, इतकेच नव्हे तर ‘मॅगसेसे पुरस्कार’ मिळवणा-या संपूर्ण जगातल्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या. देशविदेशात अनेक उत्तम कार्यक्रम त्यांनी सादर केले होते.

    २३ ऑक्तोबर १९६६ रोजी राष्ट्रसंघाचे माजी सचिव दिवंगत यू. थॅंट यांनी सुब्बलक्ष्मी यांना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे गायन सादरीकरणाचे निमंत्रण दिले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने राष्ट्रसंघातील सदस्यांसह जगाला मोहित करून टाकले होते. पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अॅरकॅडमी अवॉर्ड यांसारखे प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. पं. नेहरूंनी मा.सुब्बुलक्ष्मी यांना‘क्वीन ऑफ म्युझिक’ म्हणून गौरवले.

    सुब्बुलक्ष्मी या महान कलाकारासोबतच त्या एक महान व्यक्तीही होत्या. एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे ११ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे श्री. वेंकटेश स्तोत्र
    https://www.youtube.com/watch?v=1-VzQZowjBE
    व्यंकटेश स्तोत्र शब्द
    कौशल्या सुप्रजा राम ! पूर्व संध्या प्रवर्तते ,उत्तिष्ठ ! नारासर्दुला ! कर्तव्यं देवं अह्निकम . उत्तिश्ठोत्तिष्ठ ! मनोहर गोविंदा ! उत्तिष्ठ गरुडध्वजा ! उत्तिष्ठ कमलकान्त! त्रैलोक्यंमंगलम कुरु.

    मतससमस्तजगतमधुकैटभअरेह्वाक्सोविहारिणी ! मनोहर-दिव्यमूर्ते ! श्रीस्वामिनी ! श्रीतजनप्रिय -दानासिले ! श्रीवेंकटे सदायिते ! त्वसुप्रभातम त्वसुप्रभातम अरविन्द लोचने ! भवतु प्रसन्नमुख -चन्द्र मंडले ! विधि शंकरेन्द्र -वनिताभीर अर्चिते ! वर्सा सिला नाथ -दायिते ! दयनिधेअत्र्यदि - सप्तऋषयासमुपास्या संध्यामअक्सासिन्धु -कमलानी मनोहरनी, आद्यपदयुगम अर्चयितुम प्रपन्ना शेशाद्री -शेखर -विभो ! तव

  • भारतातील ज्येष्ठ पर्कशनिस्ट (तालवादक) तौफिक कुरेशी

    जिम्बे या वाद्याला भारतामध्ये नावारूपाला आणणारे तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर संगीतामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले व उस्ताद अल्लाराखा यांचे सुपुत्र आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे लहान भाऊ असलेले सुप्रसिद्ध संगीतकार तौफिक कुरेशी यांनी संगीत क्षेत्रात स्वतःच्या प्रतिभेचा ठसा उमटवला. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९६२ रोजी झाला. उस्ताद अल्लाराखा आणि उस्ताद झाकीर हुसेन हे त्यांचे गुरु होत. त्यांच्या घरी मोठमोठे कलाकार यायचे.

    पं. रविशंकरजी, पं. हरिप्रसादजी, पं. शिवकुमारजी, उस्ताद अमजद अलीजी, उस्ताद अली अकबर खांसाहेब असे. त्यांना नुसते पाहणे, त्यांच्या चर्चा ऐकणे, हाही त्यांचा मोठा रियाझ होता. पर्क्युशनिस्ट म्हणून जगभरात नाव कमावलेल्या तौफिक कुरेशी यांना या वाद्याचे अनभिषिक्त सम्राट मानले जाते. एक उत्कृष्ट तबला व ताल वादक असलेल्या कुरेशी यांनी संगीतकार म्हणूनही नाव कमावले आहे.

    अभिजात भारतीय संगीतातील पारंपारिकता आणि त्यातील आधुनिकता यांची सांगड कुरेशी यांनी घातलेली आहे. त्यांनी सिनेसृष्टीत अनेक वर्षे विविध तालवाद्य्ो वाजवली आहेत. २००० मध्ये त्यांचा ‘ऱ्हिधून’हा नवा अल्बम आला. त्यात त्यांनी ‘ऱ्हिदमचे, तालाचे वेगळे प्रयोग केले आहेत. उस्ताद अल्लाराखा यांनी त्यात अनेक वर्षांनी गायन केले होते.‘ऱ्हिधून’अल्बमने तौफिक कुरेशी यांची नवी ओळख निर्माण झाली. ग्रॅमी अॅवॉर्डप्राप्त ‘ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट’या अल्बममधील त्यांच्या सहभागाची आणि त्यांनी सादर केलेल्या वादनाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. पर्क्युशन वाद्याच्या क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केलेले तौफिक या वाद्यावरील त्यांच्या पकडीमुळे आणि सादरीकरणाच्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या मनात जागा पटकावून बसले आहेत.

    जयपूर-अतरौली घराण्याच्या गायिका गीतिका वर्दे-कुरेशी या तौफिक कुरेशी यांच्या पत्नी होत. १९९३ साली उभयतांनी परस्परांचे आयुष्यभराचे जोडीदार म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात केली. नझरिया, हम अपने, मीरा, तुम बिन, ले आयिले हे त्यांचे अल्बम गाजलेले आहेत. तौफिक कुरेशी व गीतिका वर्दे यांचा मुलगा शिखरनाद हा तबला वादक आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता

    अभिजात भारतीय रंगभूमी, लोकरंगभूमी आणि समकालीन रंगभूमी यांचे अचूक भान असणा-या प्रतिभाशाली नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला.

    विजया मेहता उर्फ बाई हे नाव म्हणजे मराठी रंगभूमीवरचा एक मैलाचा दगड आहे. फक्त मराठी रंगभूमीच नव्हे, तर हिंदी इंग्रजी नाटकं, दूरदर्शन, चित्रपट याही क्षेत्रांत मा.विजया मेहता वावरलेल्या आहेत. पण त्या खऱ्या रमल्या त्या नाटकातच. विजया मेहता या पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत होत. जवळच्याच नात्यांतील नलिनी जयवंत, शोभना समर्थ व त्यांच्या कन्या नूतन, तनुजा यांच्यामुळे मोहमयी हिंदी चित्रसृष्टीशी जवळचा संबंध येऊन देखील त्यांची भावनिक जवळीक मात्र सतत मराठी रंगसृष्टीशी राहिली.

    दुर्गा खोटे यांचा मुलगा हरीन खोटे यांच्याशी विवाह झाल्यावर देखील हिंदी चित्रपटांच्या मायाजालामध्ये न गुरफटण्याचा निर्णय त्यांनी कायम ठेवला हे पहाता ‘आपल्या मराठी रंगभूमीचे नशीब बलवत्तर‘ असेच म्हणावयास हवे. साठ सत्तरच्या दशकांत तेंडुलकर, खानोलकर, एलकुंचवार व इतर समकालीन संवेदनक्षम नाटककारांची, नाट्यक्षेत्रातील तत्कालीन प्रचलित रुढींना सुरुंग लावून आणि प्रमाण मानल्या गेलेल्या प्रस्थापित संकेतांची चौकट नाकारुन वा प्रसंगी धुडकावून देऊन प्रयोगशीलतेला प्राधान्य देणारी, नवनवीन नाटकेएकांकिका ‘रंगायन‘ वा अन्य माध्यमांतून मंचावर आणण्यात बाईंचा आणि त्यांच्या जोडीने अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, माधव वाटवे, कमलाकर सारंग, श्रीराम लागू या त्यांच्या सहकाऱ्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. ‘रंगायन‘ संस्था व त्या अनुषंगाने एक चोखंदळ प्रेक्षकवर्ग सुध्दा उभारुन प्रायोगिक एकांकिकानाटकांची चळवळ त्या काळात त्यांनी दहाबारा वर्षे जोमाने चालवली.

    सतत काहीतरी नवीन करण्याचा देण्याचा ध्यास घेतलेल्या विजया मेहता प्रायोगिक समांतर रंगभूमीने त्या काळात अक्षरशः झपाटल्या गेल्या. मात्र पुढे दुर्दैवाने जेव्हा ‘रंगायन‘ अंतर्गत बेबनाव मतभेदांमुळे फुटली तेव्हा प्रायोगिकतेच्या चौकटीतच कायम रहाण्याच्या विचारांचे गाठोडे ओझे ऊराशी न बाळगता व्यावसायिक रंगभूमीवर सुध्दा तितक्याच ताकदीने व उत्साहाने त्या परत कार्यरत झाल्या व स्थिरावल्या. वैयक्तिक जीवनात सुध्दा, लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांतच पदरात दोन लहान मुलं असताना पतिनिधनाचा प्रचंड आघात सोसून व त्यामुळे आयुष्याला मिळालेली विलक्षण कलाटणी पचवून, बाई न खचता परत कंबर कसून उभ्या राहिल्या. पुढे कालौघात फरोख मेहता यांच्याशी पुनर्विवाह करुन त्या पुनश्च स्थिरस्थावर झाल्या.

    ‘पाश्चांत्य रंगमंचावरील जे भावले ते मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजे‘ या भावनेने बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या ‘कॉकेशियन चॉक सर्कल‘चे रुपांतर ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, आयनेस्को यांच्या ‘चेअर्स‘ या एकांकिकेचे अनुवादित रुप ‘खुर्च्या‘ या व अशा इतर काही विदेशी नाट्यकृती त्यांनी मराठी रंगमंचावर आणल्या. याच धर्तीवर ‘मराठी नाटकांतील काही उत्तम कृती सुध्दा पाश्चाकत्य प्रेक्षकांसमोर सादर झाल्या पाहिजेत‘ असा विचार करुन जर्मन दिग्दर्शक फ्रिट्‌झ बेनेव्हिट्‌झ व ब्रिटिश दिग्दर्शक पीटर ब्रुक यांच्या मदतीने ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, ‘मुद्राराक्षस‘, ‘शाकुंतल‘, ‘हयवदन‘, ‘नागमंडल‘ या नाटकांचे प्रयोग मूळ व/वा रुपांतरित वेषात परदेशी मंचांवर सादर केले. भाषिक सांस्कृतिक भौगोलिक मर्यादा ओलांडून त्यांनी मराठी नाटक सीमेपार नेले.

    ‘श्रीमंत‘, ‘मादी‘, ‘एक शून्य बाजीराव‘, ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, ‘पुरुष‘, ‘बॅरिस्टर‘, ‘महासागर‘, ‘हमीदाबाईची कोठी‘, ‘वाडा चिरेबंदी‘, ‘हयवदन‘, ‘सावित्री‘ अशी अनेक लक्षणीय नाटकेएकांकिका तसेच ‘पेस्तनजी‘, ‘रावसाहेब‘, ‘स्मृतिचित्रे‘ अशा अनेक लक्षवेधी चित्रकृती बाईंच्या रेखीव बांधीव दिग्दर्शनाने फुलल्या फुलवल्या. केवळ अर्थकारणाच्या म्हणजेच ‘गल्ल्याच्या गणिता‘च्या दृष्टीने पाहिल्यास यातील बरीचशी चांगलीच तरली तरारली फोफावली असली तरी क्वचित काही बुडाली फसली देखील. मात्र यातील प्रत्येक कृतीवर आपला असा एक वैशिष्ठ्यपूर्ण कलात्म ठसा उमटवून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व बाईंनी निश्चितच प्रस्थापित केले. बाईंनी स्वतःची अशी एक स्वतंत्र पठडी वा घराणं निर्माण केलं.

    मराठी नाट्यक्षेत्रातील आजचे अनेक आघाडीचे व प्रथितयश कलाकार त्या काळात बाईंच्या हाताखाली हळूहळू जडतघडत गेले. विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, नाना पाटेकर, रिमा लागू, भक्ती बर्वे, प्रदीप वेलणकर, सुकन्या कुलकर्णी, उदय म्हैसकर, नीना कुलकर्णी अशा अनेक अभिनय निपुण कलाकारांची एक अख्खी नवीकोरी फळी त्यांच्या कुशल दिग्दर्शकीय हातातून तयार झाली. ‘संध्याछाया‘ मधील परदेशस्थ पुत्राच्या विरहाने झुरणारी प्रेमळ कुटुंबवत्सल नानी असो वा ‘बॅरिस्टर‘ मधील केशवपन केलेली आलवण नेसलेली भावनेच्या कोंड माऱ्याने घुसमटणारी मावशी असो किंवा ‘हमीदाबाईची कोठी‘ मधील कोठी संस्कृतीतील गायकी परंपरेचा ऱ्हास असहाय्यपणे पहाणारी हमीदाबाई असो अथवा ‘वाडा चिरेबंदी‘ मधील पति निधनानंतर कोसळणारी नाती व वाड्याचं ढासळणारं गतवैभव पचवणारी विधवा आई असो बाईंनी मात्र समोर हाती आलेल्या भूमिकेला केवळ न्याय आणि संपूर्ण न्यायच दिला.

    गोळीबंद संवादफेक, हवा तो परिणाम नेमका साधण्यासाठी संवादांतील लयीवर आणि प्रसंगी शब्दविरामांवर देखील दिलेला भर, चेहऱ्यावर पसरलेले अस्सल हावभाव आणि अचूक देहबोली यातून व्यक्तिरेखा नेमकी पकडून प्रत्ययकारक पणे जिवंत उभी करण्याकडे त्यांचा कटाक्ष दिसून येतो. भारत सरकारने विजया मेहता यांना ‘पद्मश्री‘ देऊन गौरव केला. याचबरोबर त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार‘, ‘कालिदास सन्मान‘, ‘तन्वीर सन्मान‘, ‘विष्णुदास भावे सुर्वणपदक‘, महाराष्ट्र शासनाचा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार‘, ‘नाट्यदर्पण पुरस्कार‘, चतुरंग प्रतिष्ठानाचा ‘जीवनगौरव पुरस्कार‘, ‘रावसाहेब‘मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय फिल्म पारितोषिक, एस.एन.डी.टी विद्यापीठाची डॉक्टररेट, इचलकरंजी मराठी नाट्य संमेलनाध्यक्षपद असे अनेक सन्मान किताब मानमरातब मिळाले आहेत.

    विजया मेहता यांनी ‘एन.सी.पी.ए‘ च्या संचालकपदाची धुरा तब्बल सतरा वर्षे सांभाळली. नाटकांच्या प्रयोगांच्या कारणाने त्यांचे होत असलेले झंझावाती आंतरराष्ट्रीय दौरे विशेषतः युरोपमधील अथक भ्रमंती पहाता, मराठी साहित्य कलाजगतातील कोणालाही न सोडता आपल्या निखळनिर्विष विनोदाने कोपरखळ्या मारणाऱ्या ठणठणपाळाने त्यांचे ‘विजयोस्की मेहतोविच‘ असे नामकरण केले.

    ‘झिम्मा : आठवणींचा गोफ‘ हे मा.विजया मेहता यांचे आत्मचरित्रपर पुस्तक आहे. यात १९५१ सालापासून ते आजतागायत नाटकासाठी रंगभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या बाईंच्या आणि रंगभूमीच्याही अनेक स्थित्यंतरांतून घडलेल्या रंगयात्रेचा हा सफरनामा या पुस्तकात आहे.
    तसेच
    बाई : एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास.

    विजया मेहता यांच्या नाट्य कारकिर्दीचा आणि व्यक्तित्वाचा वेध घेणारं हे आणखी एक पुस्तक. विजयाबाईंच्या शिष्य मंडळींनी, सुहृदांनी त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. बाईंची गॅंग या नावानं ओळखले जाणार्‍या महेश एलकुंचवार, नाना पाटेकर, दिलीप कोल्हटकर, विक्रम गोखले, सुहास जोशी, रिमा, विजय केंकरे, नीना कुलकर्णी, अमृता सुभाष अशा अनेकांनी विजया मेहता यांचं व्यक्तिचित्र तयार केलं आहे. वेगवेगळ्या कलाकृती तयार होतानाची प्रक्रिया, बाईंचं कौशल्य, त्या-त्या वेळचे अनुभव अशा गोष्टी त्यामुळे उलगडतात. विजया राजाध्यक्ष, महेश एलकुंचवार यांनी घेतलेल्या एका मुलाखतीचा पुस्तकात समावेश आहे. भास्कर चंदावरकर यांनी लिहिलेल्या एका लेखाचा अनुवादही या पुस्तकात समाविष्ट आहे. याशिवाय पु. ल. देशपांडे, श्री. पु. भागवत, दामू केंकरे, डॉ. श्रीराम लागू, भक्ती बर्वे अशा दिग्गजांनी बाईंबद्दल यापूर्वी लिहिलेल्या लेखांचं संकलनही पुस्तकात आहे. अंबरीश मिश्र यांनी संपादन केलं आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • रशियन कादंबरीकार लिओ टॉलस्टॉय

    भारतीय संस्कृतीचा एवढा प्रभाव त्यांच्यावर होता, की ते स्वत: शाकाहारी झाले आणि तसे इतरांनीही व्हावे यासाठी ते लोकांना आवाहन करत. चांगला समाज घडवायचा असेल आणि समाजात परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने सकारात्मकरीत्या बदलले पाहिजे यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

  • मराठीतील कवी वसंत बापट

    वसंत बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी झाला. `माझीया जातीचे मज भेटो कोणी, ही माझी पुरवून आस, जीवीचे जिवलग असे भेटला की दोघांचा एकच श्वास' अशी कवितेवर निष्ठा असणारा कवि म्हणून वसंत बापट ओळखले जातात. राष्ट्रसेवादलाच्या मुशीत घडलेल्या वसंत बापट यांचा `बिजली' हा पहिला काव्यसंग्रह सेतु, अकरावी दिशा, सकीना, मानसी हे त्यांनंतरचे. त्यांच्या प्रतिभेची विविध रुपे रसिकांनी, वाचली, अनुभविली. लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. शेवटपर्यंत ते राष्ट्रसेवा दलाशी संलग्नर होते. 'बिजली' ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'अकरावी दिशा', 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे ’बिजली’नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट १९८३ ते १९८८ या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते. पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली. ’केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली.

    'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची ’सकीना’ उर्दूचा खास लहेजा घेऊन प्रकटली आणि, ’तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा’, सांगून गेली. पु.ल. यांनी एकदा वसंत बापट यांना, `बापट, बापट रोज गाणं थापट' म्हटलं पण वसंत बापटांनी मात्र आपलं गाणं `थापटत' असतांना कधी-कधी `थोपटलं' ही आहे असं म्हणंत. ते म्हणंत, नव्या कवितेतून गाणे हरविले आहे, तरुणाईने गाणी गुंफायला हवेच. बापट हे केशवसुतांच्या मालिकेतील कवी होते. देशात घडणार्याु घटनांची दखल घेऊन मत मांडले पाहिजे असे मानणारे ते कवि होते. कवींच्या संस्कृति समृध्दीमुळे त्यांच्या कवितेत भाववलयं उठत राहतात. माणसांबद्दलचे प्रेम आणि सामाजिक जिव्हाळ्यातून बापट यांचे मन घडले होते. त्यांच्या कवितेला अनेक घुमारे आहेत. रचनाशुध्दता, विलक्षण शब्दचापल्य हेवा वाटावा अशी शैली ही बापट यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. अंतर्गत लय सांभाळून त्यांनी अनेक रचनाप्रकार हाताळले.

    १९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले. चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह आहेत, तर बालगोविंद हे बालनाट्य त्यांनी लिहिले. त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांना अनेक मित्र मंडळी होती. तीही वेगवेगळ्या स्तरांतली, त्यांच्या मित्र मंडळीत पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, जेष्ठ नेते नाथ पै, मधु दंडवते, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे असत. महाराष्ट्र्सेवादलातल्या सर्वांना, `साधने'त त्यांच्याबरोबर काम करणार्या सहकार्यां नाही ते आपले वाटतात. त्यांचे मराठी, संस्कृत भाषेवरचे प्रभूत्व आणि प्रेम तर सर्वश्रुतच होते. पण त्यांचे इंग्रजीवरही प्रभूत्व होते. `शतकाच्या सुवर्णमुद्रा' हे त्यांचे अखेरचे पुस्तक. वसंत बापट यांचे १७ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. माय मराठी

  • कवी शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश

    कवी गिरीश यांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. कवी शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश यांचा जन्म २८ ऑक्टोबर १८९३ रोजी झाला. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत. कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते.

    कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. माधव ज्युलियन यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या ख्रिस्तायनची प्रत संपादित केली. कवी गिरीश यांचे ०४ डिसेंबर १९७३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • चार्ली चॅप्लिन

    चार्ली चॅप्लिन यांनी जगभरच्या प्रेक्षकांवर राज्य केलं. त्यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी झाला. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधना विना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू! एका निराधार बाळाचं पोटच्या मायेनं संगोपन करतो तो. पोत्याची झोळी करून त्यात त्या बाळाला ठेवतो. किटलीच्या नळीने दूध पाजतो. जुनी खुर्ची मध्यभागी फाडून बाळाची ‘पॉटी’ म्हणून वापरात आणतो. मोठय़ा पडद्यावर या सगळ्या गोष्टी घडत असताना धमाल उडत असते. पण तो हे सगळं पोटतिडकीनं करत असतो. त्याच्यातली आई आणि ते बाळ यांची नाळ अदृश्य स्वरूपात जुळलेली असते. खरं तर, तो त्या बाळाचा कुणीही नसतो, पण त्यांच्यातली माया आपणा प्रेक्षकांनाही अस्वस्थ करून जाते. त्याचा ‘द किड्’ हा चित्रपट आपल्याला भारावून सोडतो. चार्ली चॅप्लिनने त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला गडाबडा लोळायला लावून हसवलं, पण त्याचबरोबर त्यानं डोळ्यात टचकन् पाणी आणून रडवलंही. विचार करायला लावलं. जागतिक पटलावर एक महानायक म्हणून वावरला! स्वत:तल्या आत्मविश्वासामुळे अनेक वैशिष्टय़पूर्ण युक्त्या तो पडद्यावर साकारू शकला.

    पडद्यावरच्या मस्तमौला चार्लीचं आगळंवेगळं रूप होतं, ‘एक टाइट कोट, बॅगी पॅन्ट, छोटी हॅट आणि मोठे शूज, आणि हो, चेहऱ्यावरची त्याची ती छोटीशी मिशी.’ त्याने त्याचं हे रूप समजून उमजूनच ठरवलं होतं. त्याला त्याचं बाह्य़रूप संपूर्णपणे विरोधाभासी हवं होतं. ती छोटीशी मिशी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न लपवता वयातला मोठेपणा, परिपक्वता देऊ शकेल हा त्याचा अंदाज होता आणि त्याचं हे बाह्य़रूप त्याची ओळखच ठरलं. या व्यक्तिरेखेबद्दल त्याचं म्हणणं होतं, ‘‘ज्या क्षणी मी तो पोशाख केला, मेकअप केला, त्या क्षणी मी ते व्यक्तिमत्त्व अनुभवू लागायचो. मी त्याला ओळखायचो आणि रंगमंचावर असेपर्यंत तो माझ्यात भिनलेला असायचा.’’ आयुष्याचं सार त्यानं पडद्यावर अनेक तऱ्हेनं जगापुढे मांडलं. खिल्ली उडवण्यासाठी दु:ख हे कारण असतं. खिल्ली उडवणे म्हणजे प्रतिकार करणे. निसर्गाच्या शक्तीपुढे स्वत:च्या हतबलतेतही आपण हसत राहिलं पाहिजे. प्रतिकूलतेचा हसत हसत सामना केला पाहिजे, नाही तर मानसिकरीत्या खचून जाल. म्हणूनच त्याच्या आयुष्याच्या जवळचा चित्रपट ‘द किड्’ याचं ओपिनग टायटल होतं, ‘‘अ पिक्चर विथ अ स्माइल अँड परहॅप्स अ टिअर.’’ जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधनाविना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू! चार्ली चॅप्लिन यांचे २५ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • थोर देशभक्त, नामवंत नाटककार वामनराव जोशी

    त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षक अशी बहुविधता होती. म्हणूनच नाना क्षेत्रातील नाना प्रकारचे लोक त्यांच्या भोवती असायचे. त्यांचा जन्म १८ मार्च १८८१ रोजी झाला. राजकारणाच्या रणधुमाळीत ते अहर्निश उभे होते. त्यामुळे ललित लेखनासाठी फारशी फुरसत त्यांना मिळत नव्हती. तरीही वृत्तपत्रलेखन आणि नाट्यलेखन या दोन्हीमध्ये त्यांचा नावलौकिक मोठा होता. १९१२ साली त्यांनी केशवराव भोसलेंच्या ललितकलादर्शसाठी ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ हे नाटक लिहिले. त्या नाटकाने काही काळ मराठी रंगभूमी दणाणून सोडली. त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती. ‘मी नवबाल जोगीण बनले’ हे त्यातील गाणे फार लोकप्रिय झाले होते. त्यानंतर १२ वर्षांनी १९२५ साली त्यांनी ‘रणदुंदुभी’ हे नाटक लिहिले. मास्टर दीनानाथांच्या बलवंत संगीत नाटक मंडळीने ते रंगभूमीवर आणले. हे नाटक खूपच गाजले. या नाटकातील ‘परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला’ हे गाणे तर १९३०च्या चळवळीने खेड्यापाड्यांपर्यंत पोचविले होते. वीररसप्रधानता हे वामनरावांच्या नाटकाचे वैशिष्ट्य आणि दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रासादीक पदरचना. रणदुंदुभीनंतर ‘धर्मसिंहासन’, ‘शीलसंन्यास’ आणि ‘झोटिंग पातशाही’ अशी तीन नाटकेही त्यांनी लिहिली. वामनराव जोशी यांचे ३ जून १९५६ साली निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • संतूर या तंतुवाद्याची ओळख

    शिवकुमार शर्मा यांनी संतूर हे वाद्य जगासमोर आणले. सिनेमा संगीतमध्ये एक काळ असा होता की, या वाद्याशिवाय पार्श्व संगीताला पूर्णत: येऊच शकत नसे. रम्य हिमपर्वत दाखवायचा, तर तिथे संतुर हवेच! लोकसंगीतात वापरल्या जाणार्याा संतुरमध्ये पं. शिवकुमार शर्मांनी आपल्या संगीताच्या गरजेनुसार काही सुधारणा केल्या आणि फार मोठ्या अपेक्षेने हे वाद्य शास्त्रीय संगीताच्या दरबारात आणले. श्रोत्यांनी त्यांना अपेक्षेबाहेर प्रोत्साहन दिले. त्यानंतर शिवकुमारांनी याच वाद्याच्या जोरावर अनेक चित्रपटांनाही संगीत दिले. त्यात ‘सिलसिला’ हा अप्रतिमच! संतुरला एका उंचीवर नेऊन ठेवणार्यार शिवकुमारांनंतर अनेक कलाकारांनी या वाद्याची कास धरून नंतर नाव कमावले आहे. त्यातल्या पं. उल्हास बापट यांचा उल्लेख खास म्हणून करावा लागेल. त्यांनी तर प्रत्येक रागानंतर स्वर जोडणी करायला लागू नये म्हणून हार्मोनियमप्रमाणे क्रोमॅटिक स्केलचे खास संतुर बनविले आहे. म्हणजे काय सांगायचे झाले, तर सा नंतर ओळीने कोमल तीव्र सर्व स्वर जोडून तीन सप्तकांची योजना केली आहे. ही तरी खूप छान सोय झाली.
    संतूर हे जम्मू काश्मिरमधले तिथल्या 'सुफीयाना मौसिकी' या लोकसंगीतात वापरले जाणारे एक साधेसुधे वाद्य. स्वरमंडलसारखी रचना असलेले आणि जेमतेम दीड सप्तकांचा आवाका असलेले हे तंतुवाद्य काश्मिरी लोकगीते गाताना साथीला घ्यायची खरे तर तिथली परंपरा होती, स्वर तारांच्या खेचीतून निर्माण होतो हा तंतुवाद्यातला सर्वसामान्य नियम आहे. या नियमाला धरून शेकडो वाद्ये जगभरात उत्पन्न झाली. खरेतर या वाद्यांची गणती करावी लागेल. जितक्या संस्कृती तितकी वाद्ये, असा हा भाग आहे. धनुर्वीणेचे असेच अनंत प्रकार आहेत. हार्प हे आजही वापरले जाणारे याच वर्गातले वाद्य आहे. याचप्रकारच्या वाद्यामध्ये वेगळेपणा दाखविणारे स्वरमंडल हे अत्यंत लोकप्रिय वाद्य आपल्याला नेहमी पहायला मिळते. हे वाद्य विशेष करून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गाणारे गायक/गायिका आपल्या हातात धरून गाताना वाजवीत असतात. शिवाय सिनेमाच्या, मालिकांच्या अथवा नाटकांच्या पार्श्वयसंगीतासाठीही याचा उपयोग हमखास केला जातो. या वाद्यात वेगळेपणा आहे, असे म्हटले. याचे कारण हे वाद्य धनुराकृती नसून एका बंद पेटीप्रमाणे याचा आकार असतो. वरची बाजू मोकळी असते आणि दोनही बाजूंनी तारा खेचणारे खिळे ठोकलेले असतात. ही पेटी मंद्र स्वरांकडे रुंद असते, तर तार स्वरांकडील बाजू निमुळती असते. जास्त रुंदीचा भाग साधारण दीड फूट, तर कमी रुंदीचा भाग नऊ ते दहा इंच असतो. अशाचप्रकारचे कानून नावाचे एक वाद्य इराणी संगीतात वापरले जाते. काही अभ्यासकांच्या मते हे वाद्यच स्वरमंडलाचे प्रेरक वाद्य आहे. तान के कप्तान असा ज्यांचा हिंदुस्थानी संगीतात लौकिक आहे, असे तानरसखाँ यांनी याचा वापर प्रथम आपल्या गायनात केला, असे म्हटले जाते. पतियाळा घराण्याच्या सर्वच कलाकारांनी स्वरमंडल आपल्या गायनासोबतीला खास करून वापरले आहे. बडे गुलाम अलीखाँसाहेब, सलामत नझाकत, मुनव्वर अली यांनी हे वाद्य अधिक लोकप्रिय केले. कालांतराने स्वरमंडल घेऊन गायची एक स्टाईलच निर्माण झाली. अजय पोहनकर, पं. जसराज, निर्मला देवी, परवीन सुलताना आणि अलीकडे उस्ताद राशीद खाँ या सर्वांनी स्वरमंडलाचा जाणीवपूर्वक वापर केला आणि आपल्या स्वरांना एक साज चढविला. या वाद्यामध्ये रागाप्रमाणे स्वर नियुक्त करावे लागतात. शुद्ध स्वर अधिक असणार्याा रागानंतर कोमल स्वर अधिक असणारा राग गायचा असल्यास स्वरजोडणी करायला थोडा वेळही लागत असतो. तेव्हा श्रोत्यांना थोडी कळ काढावी लागत असते.
    संतुर दिसायला असेच पण तंत्रामध्ये सर्वस्वी भिन्न असे संतुर हे वाद्य खूपच लोकप्रिय असे आहे. पं. शिवकुमार शर्मा यांनी या वाद्याला काश्मीरच्या खोर्या तून हिंदुस्थानी संगीताच्या व्यासपीठावर आणले. तसे पाहता हे वाद्य प्राचीन आहे. अनेक पिढ्यांपासून हे वाद्य काश्मीरमध्ये वाजविले जाते. वैदिक ग्रंथात वनवीणा नावाच्या एका वाद्याचा उल्लेख आहे. त्यात शंभर तारा असत. छोट्या काठ्यांनी तारांवर आघात करून ते वाजविले जात असे. संतुर या वाद्यालाही शततंत्री वीणा असे नाव आहे. एक प्रकारच्या खास काठ्यांनी तारांवर आघात करून यावर स्वरनिर्मिती केली जाते. काठ्यांच्या टोकावर एक बाक असतो, ज्यामुळे स्वराघात नाजूक होतात. चतुर्भुज आकाराची एक पेटी असणारा या वाद्याचा आकार असतो. वरील भागात दोन दोन मेरूंच्या पंधरा ओळी असतात. एका मेरूवर एकाच स्वरांच्या चार तारा जोडलेल्या असतात. याशिवाय काही संतुरांमध्ये सिंपथेटिक (सहायक ध्वनी) तारांचीही सोय केलेली असते. डलसिमर या इलेक्ट्रॉनिक वाद्याशी याचे साधर्म्य असते.

    नंदन हेर्लेकर /पुढारी
    संकलन.संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस

    पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रूळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. वाई येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे.

    नाना फडणवीस यांची नऊ लग्ने झाली होती. नानांचे पहिले लग्न दहाव्या वर्षी झाले होते या स्त्रीचे नाव यशोदाबाई. नानांच्या नऊ बायकांपैकी सात त्यांच्या हयातीत वारल्या. नाना फडणवीस यांचे १३ मार्च १८०० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट