मोगुबाई कुर्डीकर या किशोरी अमोणकर यांचा मातोश्री. त्यांचा जन्म १५ जुलै १९०४ रोजी झाला.अत्रौली (जयपूर) घराण्याचे अत्यंत कठीण गायकीची महाराष्ट्रातील अनेक अभ्यास केला गेला आहे, पण ही परंपरा सर्वात चागल्या गायीका म्हणुन मान गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांना जातो. विदुषी मोगुबाई कुर्डीकर त्या वेळच्या परंपरेच्या मानाने उदारमतवादी होत्या. दुसऱ्या घराण्याचे गाणे शिकवण्यासाठी त्यांनी ताईंना अन्य गुरुजनांकडे जाण्याचे उत्तेजन दिले. जरी केसरबाई यांच्या प्रति मोगुबाई कुर्डीकर ची सांगीतिक स्पर्धा होती, तरीही मोगुबाई कुर्डीकर नी किशोरीताईंना केसरबाईंकडे शिकायला पाठवले. दुर्दैवाने काही कारणामुळे हे शिक्षण झाले नाही. ताईंना अन्यहि काही गुरु होते. मोहनराव पालेकरांची ताईंना काही वर्षे तालीम होती.त्याच्या शिष्य, शिष्या पैकी पद्मा तळवलकर, कमल तांबे , वामनराव देशपांडे, सुहासिनी मुळगावकर, बबनराव हळदणकर, अरुण द्रविड, व मा.किशोरी अमोणकर हे आहेत. विदुषी मोगुबाई कुर्डीकर या रागांचे भाव प्रकट करणार्या स्वर व राग वैशिष्ट्यांचे विशेष महत्त्व लहानपणी किशोरीताईंना वारंवार समजावून सांगत असत. जयपूर घराण्याची गायकी ही आकारयुक्त असते. आकाराच्या स्वरूपात स्वरांचे अत्युच्च स्वरूप प्रकट होत असते. स्वरांच्या बिंदूचे किरण किंवा प्रकटणारी आभा किती गहन व खोल जाते, जयपूर घराण्यात शिकवताना रागांची नावे सांगितली जात नाहीत. मा.मोगुबाई कुर्डीकर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मा.मोगुबाई कुर्डीकर यांचे १० फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
राजकारणात प्रवेश करण्याआधी रेगन रेडिओ, चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेता होते.
एन. दत्ता यांचा जन्म १२ डिसेंबर १९२७ रोजी झाला. वसंत देसाईंचा सन्माननीय अपवाद वगळता बहुसंख्य संगीतकारांनी इंग्रजी आद्याक्षरांचा आसरा घेत मराठीपण लपविण्याचा प्रयत्न केला. के. दत्ता (कोरगावकर) सी. रामचंद्र (चितळकर) दत्ताराम(वाडकर), सुधीर (फडके) यांसारख्या मराठमोळ्या संगीतकारांनी आपली आडनावे खुबीने लपवीत या क्षेत्रात मुसंडी मारली. हिंदी सिनेमात एन. दत्ता हे नाव प्रथितयश संगीतकारांच्या श्रेणीत आदराने घेतलं जावं अशी नेत्रदीपक सांगीतिक कामगिरी त्यांच्या नावावर जमा आहे. एकापेक्षा एक सरस व यादगार गाणी एन. दत्तांनी या चित्रपटात दिली आहेत. एन. दत्ता यांचे खरे नाव दत्ता नाईक.
एन. दत्तांचं नाव घेताच, कर्णमधुर संगीताने नटलेल्या ‘मिलाप’, ‘मरीन ड्राइव’, ‘चंद्रकांता’, ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘ब्लॅककॅट’, ‘धरमपुत्र’, ‘ग्यारह हजार लडकियां’, ‘काला समुंदर’ व ‘चांदी की दीवार’सारख्या हिंदी, तर ‘मधुचंद्र’, ‘अपराध’ व ‘बाळा गाऊ कशी अंगाई’ सारख्या मराठी चित्रपटांची मालिकाच डोळ्यांपुढून तरळून जाते. मा.एन. दत्ता हे गोवेकर अगदी लहानपणापासूनच गोवन व पोर्तुगीज लोकसंगीत सातत्याने कानावर पडत असल्याने जात्याच संगीतात रस असणारे दत्ता नादावून गेले नसल्यासच नवल. शालान्त परीक्षेनंतर त्यांनी थेट मुंबई गाठली व देवधर संगीत विद्यालयात संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. सुरुवातीला काही काळ संगीतकार हेमंत केदार यांच्याकडे काम केल्यानंतर गुलाम हैदर यांच्याकडे मिळालेल्या समृद्ध अनुभवामुळे त्यांच्यातील प्रगल्भ संगीतकार अधिकाधिक बहरत गेला. त्या वेळी गुलाम हैदर बॉम्बे टॉकीज व व फिल्मस्तानच्या चित्रपटांचे संगीत करीत असत. स्वातंत्र्यपूर्व काळात होत असलेल्या देशभक्तिपर मेळ्यातून एन. दत्तांना आगळ्यावेगळ्या ढंगातील गाणी गाताना सचिनदेव बर्मन यांनी ऐकले होते व आपल्याकडे साहाय्यक म्हणून काम करण्याची ‘ऑफर’ही दिली होती. फाळणीनंतर गुलाम हैदर पाकिस्तानात निघून गेले व सचिनदेव फिल्मस्तानचे संगीतकार बनले. त्यानंतर एन. दत्ता त्यांचे साहाय्यक बनले. सचिनदांच्या ‘अफसर’, ‘एक नजर’, ‘नौजवान’, ‘टॅक्सी ड्रायव्हर’, ‘मुनीमजी’ ते थेट ‘देवदास’पर्यंत त्यांनी सचिनदांकडे साहाय्यक संगीतकाराची धुरा समर्थपणे सांभाळली. या काळातल्या एस.डी. बर्मन यांच्या कित्येक चालींवर एन. दत्तांच्या शैलीचा प्रभाव दिसून येतो.
एस.डी. बर्मन यांच्या ‘बुजदिल’ मधील लताबाईंचं शास्त्रीय सुरावटीतील ‘झन झन झन पायल बाजे’ हे लोकप्रिय गाणं एन. दत्ता यांचं असल्याची चर्चा त्या काळी सर्वत्र होत होती. पुण्यातील एका समारंभात पु.ल. देशपांडेंनी एन. दत्ता यांचे नाव न घेता या गाण्याचे श्रेय एका मराठी माणसाचे असल्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. लता मंगेशकरांबरोबर महेंद्र कपूरने गायलेलं ‘तेरे प्यार का आसरा चाहता हूं’ हे शायरी ढंगातलं युगुलगीत व ‘धडकने लगी दिल के तारों की दुनिया’ हे महेंद्र कपूर व आशाभोसलेच्या स्वरातलं चिरतरुण प्रेमगीत एन. दत्तांनी अप्रतिम सुरावटीत बांधलं आहे. ‘तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा’ हे अर्थपूर्ण गाणं रफीच्या, तर ‘कासे कहूं मन की बात’ हे गाणं सुधा मल्होत्राच्या अजरामर गाण्यांपैकी एक समजलं जातं. ‘झुकती घटा गाती हवा सपने जगाए.’ या कर्णमधुर गाण्याच्या मुखडय़ाची चाल गजानन वाटवेंच्या ‘फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले’ या गाण्यावर बेतलेली आहे, हे एका मुलाखतीत एन. दत्तांनी सांगितले होते. बी.आर. चोप्रांचा ‘साधना’ हा चित्रपट एन. दत्तांच्या कारकिर्दीच्या दृष्टीने ‘टर्निग पॉइंट’ होता. या चित्रपटात त्यांनी मुजरा, कव्वाली, भक्तिगीत, प्रेमगीत व सामाजिक आशयाची गाणी देऊन आपलं अष्टपैलुत्व सिद्ध केलं होतं.
लता मंगेशकर यांच्या स्वरात ‘कहोजी तुम क्या खरीदोगे’ हा साहिरच्या अभिजात काव्याने नटलेला मुजरा एन. दत्तांच्या लाजवाब प्रतिभेचा उत्तुंग आविष्कारच म्हणावा लागेल. मोहम्मद रफी आणि बलवीरने गायलेल्या ‘आज क्यों हमसे परदा है’ या कव्वालीला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. रफीने आशा भोसलेबरोबर गायलेलं ‘संभल ऐ दिल तडपने और तडपाने से क्या होगा’ या अवीट गोडीच्या गाण्याची खुमारी औरच होती. ‘औरत ने जनम दिया मर्दों को’ हे ठाय लयीतलं अजरामर गाणं एन. दत्तांच्या मुकुटात मानाचं शिरपेच खोवून गेलं. ‘साधना’मुळे एन. दत्तांचं नाव प्रथितयश संगीतकारांच्या बरोबरीने घेतलं जाऊ लागलं. १९५९ साली आलेल्या ‘ब्लॅक कॅट’ चित्रपटात ‘सितारे राह तकते है चले आओ’, ‘नशे में तुम नशेमे हम’, ‘कौन मुझे रोके कौन मुझे टोके’ यांसारखी चांगली गाणी एन. दत्ता यांनी दिलेली असली तरी हा चित्रपट आठवतो तो लता मंगेशकरांनी गायलेल्या ‘मैं तुम्हीसे पुछती हूं’ या सदाबहार गाण्यामुळेच! त्यांनी तेरा मराठी चित्रपटांना संगीत दिले होते. १९८० साली प्रदर्शित झालेला ‘चेहरे पे चेहरा’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट. महाराष्ट्र शासनाने नागरी पुरस्कार देऊन त्यांना गौरविले होते. मा.एन.दत्ता राहत असलेल्या अंधेरी भागातील त्यांच्या निवासस्थानाजवळच्या रस्त्याला मुंबई महापालिकेने ‘एन. दत्ता पथ’ असे नाव देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. एन. दत्ता यांचे ३० डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर
संदर्भ :- इंटरनेट
मा.एन. दत्ता यांनी संगीत दिलेली काही चित्रपटगीते.
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
धुंदीत गाऊ मस्तीत राहू
माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते, संसार मांडते
निळे गगन, निळी धरा
तेरे प्यार का आसरा चाहता हूं
कासे कहूं मन की बात
हिंदी चित्रपटात प्रेमनाथला एक अशा अभिनेत्याच्या नात्याने ओळखले, जाते ज्याने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक नायक म्हणून राज्य करणारा म्हणून नाही तर खलनायक म्हणून लोकांच्या हृदयात आपली छाप उमटविली. शोर , अमीर गरीब, रोटी कपडा और मकान या सारख्या चित्रपटात त्यांना अभिनयासाठी फिल्म फेयर अवॉर्डने नावजले गेले.
ह. ना. आपटेंनी अनेक पुस्तकांना प्रस्तावनाही लिहिल्या. ह. ना. आपटेंनी साहित्याच्या अनेक प्रांतांत मुशाफिरी केली असली, तरी ते गाजले त्यांच्या कादंबरी लेखनामुळेच. बारा सामाजिक व अकरा ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्या सर्वच लोकप्रियही झाल्या. पण त्यांचे नाव आजतागायत गाजत राहिले, ते त्यांच्या ‘पण लक्षात कोण घेते?’ या कादंबरीमुळे. ही कादंबरी मराठी साहित्याच्या वाटचालीतील मैलाचा दगड बनून राहिली.
दिलखुलास आणि प्रसन्न साहित्यिक शं. ना. नवरे यांनी कथा, ललित कथा, नाटक, ललित अशा सर्वच प्रांतांत संचार केला. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९२७ रोजी झाला. मध्यमवर्गीय घरांतील सुख, दु:ख, वेदना त्यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या. त्यांचे लेखन स्वप्नात रंगणार आणि सदैव जीवनावर प्रेम करणारे होते. स्वप्न संपले तर जगण्याचा अर्थच निघून जाईल, असे त्यांचे मत होते शंनांच्या लेखनानं वाचकांना कधी अंतर्मुख केलं तर प्रसंगी रिझवलेही. त्यांचे शंकर नारायण नवरे हे नाव सर्व महाराष्ट्राला परिचित होते.
तरीही त्यांना शंना म्हणून ओळखले जायचे. त्यांचे प्राथमिक शिक्षण डोंबिवलीतल्या लोकल बोर्ड शाळेत तर माध्यमिक शिक्षण डोंबिवलीच्या इंग्लिश स्कूलमध्ये आणि दादरच्या किंग जॉर्ज शाळेत झाले.
१९४५ मध्ये शालांत परीक्षा पास झाल्यावर त्यांनी मुंबईच्या सेंट झेव्हियर्स, सिद्धार्थ कॉलेज आणि पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. १९४९ साली त्यांनी बी.एस्सीची पदवी मिळवली. काही काळ त्यांनी मंत्रालयात शासकीय नोकरीही केली मात्र काही काळानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. सामान्य, मध्यमवर्गियांच्या जाणीवा, सुख-दु:खाच्या व्यथा आणि वेदना त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीतून, रंगमंचीय अविष्कारातून समाजासमोर आणल्या. कथा, ललित लेख, नाटक, चित्रपट पटकथा, वृत्तपत्रीय व नियतकालिकांतील स्तंभ अशा विविध माध्यमांतून ‘शन्नां’नी लेखन केले, पण ‘शन्ना’ खऱ्या अर्थाने खुलले आणि रमले ते कथेच्या विश्वात. १९५१ नंतर नवकथेचा बहारीच्या काळात ‘शन्नां’चीही प्रतिभा बहरली. मात्र कोणत्याही एका लेखन प्रकारात ते कधीच अडकून पडले नाहीत. वाचकांना अंतर्मुख करणारी, खुसखुशीत मध्येच हास्याची लकेर, चिमटे घेणारी ‘शन्नां’ची लेखणी तितक्याच ताकदीची रंगमंचीय पात्रे उभी करू शकली.
शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. शं.ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून ’गुंतता हृदय हे’ हे नाटक लिहिले आहे. हे नाटक अमाप गाजले. त्यांची अनेक पुस्तके आणि नाटके गाजली आहेत. यामध्ये ‘धुक्यात हरवली वाट’, ‘सुरुंग’, ‘धुम्मस’, ‘सूर राहू दे’, ‘गहिरे रंग’, ‘गुंतता हृदय’ ही नाटकं गाजलीत तर ‘वारा’, ‘झोपाळा’, ‘मेणाचे पुतळे’, ‘शहाणी सकाळ’ हे कथासंग्रह तसेच ‘निवडुग आणि इंद्रायणी’, ‘संवाद’, ‘सुरुंग’ या कादंबऱ्या गाजल्यात. डोंबिवली गावावर त्यांचे अतोनात प्रेम होते. ‘डोंबिवली भूषण’ पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होतेच पण ते खऱ्या अर्थाने या शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीतील महत्त्वाचा दुवाही होते. डोंबिवलीविषयी त्यांच्या मनातले ममत्व कायम होते त्यामुळेच नातेवाईक तसेच मित्रांनी आग्रह करूनही त्यांनी मुंबईत कायमचे वास्तव्य केले नाही. नोकरीनिमित्त मुंबई ही फक्त त्यांची कर्मभूमीच राहिली.
डोंबिवलीत झालेल्या २००३ सालच्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च करीत असत. मा.शन्ना नवरे यांचे २५ सप्टेंबर २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
१९५२ मध्ये ऑस्ट्रेलियातील सी.एस.आय.आर.ओ. येथे खगोलशास्त्र विषयक कार्य सुरू केले. सिडनी जवळील पोट्स हिल येथे सहा फूट व्यासाच्या ३२ अन्वस्त (पॅराबोलीक) ॲंटेना उभारण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. १९६१ मध्ये अमेरिकेतील स्टँनफर्ड विद्यापीठातून त्यांनी पीएचडी मिळवली.
पं.उपेंद्र भट यांनी संगीत विषयात एम.ए. केले असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय (मुंबई) तर्फे त्यांना `संगीत विशारद’ आणि `संगीत अलंकार’ पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांचा जन्म २१ एप्रिल १९५० रोजी मंगळूर येथे झाला. उपेन्द्र भट यांनी मंगलोर च्या श्री नारायण पै यांच्याकडे संगीताची तालमीला सुरुवात केली. नंतर माधव गुढी व पंडित भीमसेन जोशी यांच्याकडे शिक्षण घेतले. पं.उपेंद्र भट हे पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ पट्टशिष्य असून पंडितजींकडून त्यांना तालीम मिळाली असून, त्यांची कारकीर्द जवळून पाहाण्याची संधीही त्यांना मिळाली आहे. आपल्या गुरूप्रमाणे पं.उपेंद्र भट यांचे संगीतक्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, चित्रपट संगीत, भावगीत, राग निर्मिती, संतवाणी, हिंदी द्वंद्वंगीते असे अनेकविध पैलू त्यांच्या गाण्यात आहे. भीमसेन जोशी यांचे प्रमाणेच पं.उपेंद्र भट हे `संतवाणी’चा उत्तम कार्यक्रम करतात. राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, ग. दि. माडगुळकर लिखित `इंद्रायणी काठी लाभली समाधी’, श्रीनिकेतन, अबीर गुलाल, माझे माहेर पंढरी, कानोबा तुझी घोंगडी, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, अशा एकापेक्षा एक अभंग व भक्तीगीतांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध होतात. संत ज्ञानेश्वर यांच्या ७०० व्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून नवी दिल्ली येथे १९९६ मध्ये कार्यक्रमात तत्कालिन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते पं.उपेंद्र भट यांचा सत्कार करण्यात आला होतो. २००० मध्ये उत्तर अमेरिकेतील आंध्रप्रदेश रहिवासी संघटनेच्यावतीने त्यांना `म्युझियन ऑफ दि इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्य सांस्कृतिक पुरस्कारातील ‘कंठ संगीत’ पुरस्कार पं. उपेंद्र भट यांना मिळाला आहे. शिकागो येथील मिलेनियम कोकणी संमेलनात त्यांना मानपत्र देण्यात आले. भारतासह अमेरिका, युरोप, दुबई, बहरीन या ठिकाणीही त्यांच्या गायनांच्या मैफीली झाल्या आहेत. त्यांच्या गायकीला ते स्वतः ‘भीमसेनी’ गायकी म्हणतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
उपेन्द्र भट यांचे गायन
https://www.youtube.com/watch?v=GMMll_X9LMY
https://www.youtube.com/watch?v=NIscXNKeIf8
https://www.youtube.com/watch?v=AWiDsL5mV7M
https://www.youtube.com/watch?v=sMwkiJe4hTI
https://www.youtube.com/watch?v=esTcquCDnx4
दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री सिल्क स्मिताचा जन्म २ डिसेंबर १९६० रोजी आंध्रप्रदेशमध्ये राजमुंदरीच्या एल्लुरुमध्ये झाला.
ऐंशीच्या दशकात दाक्षिणात्य सिनेमांमध्ये सिल्क स्मिता यांची जादू अशी चालली, जी लोक आजही विसरु शकलेले नाहीत. बालपणीचे नाव विजयलक्ष्मी. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे केवळ चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. बालपणापासूनच सिने इंडस्ट्रीची ओढ असलेल्या सिल्क स्मिता यांनी सिनेमांमध्ये मेकअप असिस्टंट म्हणून कामास सुरुवात केली. शूटिंगदरम्यान सिल्क स्मिता अभिनेत्रींच्या चेह-यावर टचअपचे काम करत होती. सिनेमांमधील झगमगाट पाहून त्याही अभिनेत्री होण्याचे स्वप्न बघू लागली होत्या.
सिल्क स्मिता यांना १९७८ मध्ये 'बेदी' या कानडी सिनेमात काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. तिला मोठा ब्रेक 'वांडीचक्रम' सिनेमातून मिळाला होता. या सिनेमात त्यांनी स्मिताचे पात्र साकारले होते. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. सोबतच, त्यांनी मद्रासी चोलीची फॅशनसुध्दा ट्रेंडमध्ये आणली. या पात्राच्या प्रसिध्दीने त्यांना सिल्क स्मिता हे नाव मिळाले. १९८३ मध्ये त्यांनी 'सिल्क सिल्क सिल्क' नावाचा एक सिनेमा केला होता. करिअरमधील तीन वर्षांमध्ये त्यांनी जवळपास २०० सिनेमांमध्ये काम केले. सिल्क यांची जादू हळू-हळू इंडस्ट्रीमध्ये चालायला लागली होती.तिच्या चाहत्यांची संख्या इतकी वाढली, की प्रत्येक दिग्दर्शकाला स्मिता आपल्या सिनेमात असावी असे वाटू लागले. त्यामुळे स्मिता एका दिवशी ३ शिफ्टमध्ये काम करत होत्या. दक्षिणेचे सुपरस्टार शिवाजी गणेशन, रजनिकांत, कमल हसन, चिरंजीवी या अभिनेत्यांपर्यंत सर्वांनाच स्मिताचे एक गाणे आपल्या सिनेमात असावे अशी इच्छा असायची. एकापाठोपाठ एक सिनेमा करून त्यांनी १० वर्षांमध्ये जवळपास ५०० सिनेमांमध्ये काम केले.
सिल्क यांच्या यशाची जादू बॉलिवूड मध्ये सुध्दा चालली होती. त्यांनी 'जीत हमारी' सिनेमातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले.त्यानंतर 'ताकतवाला', 'पाताल भैरवी', 'तूफान रानी', 'कनवरलाल', 'इज्जत आबरू', 'द्रोही',विजय पथ' सारख्या सिनेमांमध्ये काम केले.
सिनेमां मधून काम केल्यानंतर स्मिता यांनी निर्मितीत हात आजमावला. मात्र पहिल्या दोन सिनेमांमध्ये त्यांना दोन कोटींचा तोटा झाला. सिनेमांमध्ये झालेल्या तोट्याने स्मिताच्या खासगी आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला.ती मानसिकरित्या खचून गेली होती. २०११ मध्ये आलेला 'द डर्टी पिक्चर' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. या सिनेमामुळे विद्या बालनचे करिअर यशोशिखरावर पोहोचले.या सिनेमाच्या यशामागे एक नाव दडलेले आहे, ते म्हणजे अभिनेत्री सिल्क स्मिता. दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिताच्या खासगी आयुष्यावर हा सिनेमा आधारित होता. सिल्क स्मिता यांचे २३ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आझमगड गावात एक तरुण हकिमीचा व्यवसाय करायचा. याला शायरीची मनापासून आवड. अडल्यानडल्या रुग्णांची सेवा करताना याची शायरी सुरूच असायची. याच्या शायरीच्या जादूने रुग्णाचा निम्मा आजार कमी व्हायचा. या शायरीच्या वेडातूनच हसरालूल हसन पुढे मजरुह सुलतानपुरी झाला. मजरुह म्हणजे जखमी किंवा घायाळ करणारा. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी सुलतानपूर उत्तर प्रदेश येथे झाला. मजरुहच्या गीतांनी रसिकांना प्रेमळ जखमा दिल्या. त्याच्या गीताच्या जादूने कर्णसेनांना घायाळ केले. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ए. आर. कारदार यांनी एका मुशायर्याात हसन यांची शायरी ऐकली. त्या वेळी ते ‘शहाजहान’ चित्रपटाच्या निर्मितीत होते. त्यांनी हसन ऊर्फ मजरुह सुलतानपुरीला गीतलेखन करण्याची ऑफर दिली. मजरुह यांनी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मजरुहने लेखणी उचलली आणि कागदावर शब्द उमटवले... ‘गम दिये मुस्तकिल, कितना नाजूक है दिल... ये न जाना... हाये हाये ये जालिम जमाना.’ ‘शहाजहान’चे संगीतकार नौशाद यांनी वाहवा केली. नौशाद यांनी त्या खुशीतच चाल बांधली. पुढे कुंदनलाल सैगल यांच्या दर्दभर्या. आवाजाने मजरुह यांच्या शब्दाला आगळे गहिरेपण दिले. मजरुह यांच्या या पहिल्या गीतरूपी रेशमी बाणाने रसिकांना घायाळ केले. हे कमी की काय, म्हणून मजरुहने पुढील गाण्यांची सुरुवात केली, ‘जब दिल ही टूट गया, हम जी कर क्या करे...’ तिच्या एका नकाराने, सर्वस्व हरपल्याची भावना मजरुह यांनी अशी व्यक्त केली. सैगलच्या आवाजातला या शब्दांतला दर्द काळीज पिळवटणारा ठरला. मजरुह यांच्या घायाळ करणार्यां कारकीर्दीचा प्रारंभच असा धडाक्यात झाला. साध्या, सोप्या परंतु काळजाला भिडणार्याय शब्दांची सुरेख गुंफण ही मजरुह यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये. पर्शियन शब्दांचा समर्पक वापर त्यांनी चपखलपणे केला. याच वैशिष्ट्यांमुळे चार पिढ्या त्यांच्या गीतांच्या चाहत्या बनल्या. मजरुह यांच्या ‘शायराना’ स्वभावामुळे जवळपास सर्वच संगीतकारांबरोबर त्यांचे सुरेल नाते जमले. ‘शहाजहान’मध्ये काळीज चिरणारे वर्णन करणारी त्यांची लेखणी ‘आरपार’च्या वेळी मात्र प्रेमळ आणि हळवी झाली. तो आणि ती यांच्या नजरेच्या भाषेला, ‘कभी आर कभी पार लागा तीर ए नजर...’ असा रेशमी बाणाचा उपमात्मक आविष्कार झाल्यानंतर ‘बाबूजी धीरे चलना...’मधून प्रेमात कशी जपून पावले टाकायची, याची एवढी मधाळ जाणीव मजरुहच देऊ जाणे. मग ओपींचे ठेकेदार संगीत आणि मजरुह यांचे शब्द यांची कानसेनांना भुरळ पाडणारी जुगलबंदी सुरू झाली. ‘सीआयडी’मध्ये याचा प्रत्यय आला. ‘लेके पहला पहला प्यार...’ अशी प्रेमाची ग्वाही असो, ‘कहीं पे निगाहे कहीं पे निशाना...’मधली सूचकता असो, ‘आँखों ही आँखों में इशारा हो गया...’मधला जीवन जगण्याचा मार्ग असो; मजरुह यांच्या गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यानंतर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या ‘दोस्ती’ला मजरुह यांच्या गीतांनी जो अर्थ प्राप्त झाला, त्याला तोडच नव्हती. ‘चाहूंगा मैं तुझे साँज सबेरे’, ‘मेरी दोस्ती मेरा प्यार...’, ‘राही मनवा दुख की चिंता...’ या गाण्यांनी इतिहास रचला. त्यानंतर मजरुहची जोडी जमली ती चतुरस्र आरडी बर्मनबरोबर. ‘ओ मेरे सोना...’, ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा...’(तीसरी मंजिल), ‘पिया तू अब तो आजा...’, ‘चढती जवानी...’, ‘कितना प्यारा वादा...’, ‘दिलबर दिल से प्यारे...’, ‘गोरिया कहां तेरा देस रे...’(कांरवा), ‘चुरा लिया है...’, ‘लेकर हम दीवाना दिल...’, ‘आपके कमरे मे...’, ‘मेरीसोनी...’(यादों की बारात), ‘क्या हुआ तेरा वादा...’, ‘बचना ए हसीनों...’, ‘चांद मेरा दिल...’, ‘ए लडका हाय अल्ला...’
(हम किसीसे कम नहीं), ‘निसुल्ताना रे...’, ‘तुम बिन जाऊं कहां...’(प्यार का मौसम),
‘होगा तुम से प्यारा कौन...’, ‘पूछो ना यार क्या हुआ...’(जमाने को दिखाना है) ही या कॉम्बिनेशनची कामगिरी.
आनंद-मिलिंद, जतीन-ललित यांच्या संगीताने नटलेली मजरुह यांची अनेक गाणी गाजली.अष्टपैलुत्व हे त्यांच्या लेखणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. चित्रपटातील सिच्युएशननुसार गीतलेखन करण्यात मजरुह यांचा हातखंडा. ‘तेरे मेरे मिलन की रैना...’(अभिमान)मधला भाव वेगळा, तर ‘जाइए आप कहां जायेंगे...’(मेरे सनम)मधला लडिवाळ गोडवा पुन:पुन्हा ऐकावासा वाटणारा. ‘रात अकेली है...’(ज्वेल थीफ)मधले आव्हान कानाला सुखावणारे, तर ‘रहे ना रहे हम...’(ममता) मधले औदासीन्य विचार करायला लावणारे. प्रत्यक्ष आयुष्यात ते नौशाद यांचे व्याही होते, पण सिनेमाच्या सुवर्णयुगात या दोघांनी एकत्र काम केलेच नाही. अंदाज (१९९४) नंतर तब्बल २० वर्षांनी साथी (१९६९) मध्ये ते एकत्र आले. कारकीर्दीच्या प्रारंभीच्या काळात कम्युनिस्ट चळवळीत भाग घेणार्याब मजरुह यांनी एकदा पंडित नेहरूंबद्दल अनुदारात्मक काव्य केले. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही झाला. मजरुह सुलतानपुरी हे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे पहिला गीतकार! मजरुह सुलतानपुरी यांचे २४ मे २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मजरुह सुलतानपुरी यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=-I30pxUvaX0
https://www.youtube.com/watch?v=due-RD_qP9o
Copyright © 2025 | Marathisrushti