मधुरिका पाटकर हे नाव गेल्या काही वर्षांत प्रामुख्याने समोर आलं ते तिच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे. तिला शिवछत्रपती पुरस्कारानं (२००८-२००९) सन्मानित केले असून तिचा युथ नॅशनल चॅम्पियनशिप (२००६) अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. खेळात वेगळं नाव कमावलेल्या आणि शेकडो पदकांवर यशाची मोहोर उमटवणाऱया मधुरिकाचं प्रोफाइल शूट करण्याची पहिली संधी मला २०१३ साली मिळाली. तिच्या याच पदकांसोबत तिचा एक फोटो टिपायचा मला मोह आवरला नाही.
February 25, 2019
लौकिक अर्थाने संगीतकार रवी यांची कारकीर्द कोणत्याही संगीतकाराला हेवा वाटावा अशी होती. त्यांचा जन्म ३ मार्च १९२६ रोजी झाला.त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांनी बंपर यश मिळवले आणि त्यातील गाण्यांनाही अफाट लोकप्रियता मिळाली. रवी यांनी स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून काम सुरू केले तो काळ चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाचा उत्तरार्ध म्हणता येईल. अतिशय सोप्या आणि ओठांवर सहज रूळणाऱ्या चाली हे रवी यांचे वैशिष्ट्य. त्यांच्या या गुणामुळेच त्यांची गाणी लोकप्रिय झाली. संगीतकारापेक्षा अधिक मानधन मागणाऱ्या साहिर लुधियानवीसारख्या गीतकाराशी त्यांनी जमवून घेतले. त्यामुळेच 'गुमराह', 'वक्त', 'हमराज'सारख्या चित्रपटांची गाणी जन्माला आली. 'चलो एकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो' सारखे अनवट गाणे रवी यांनी महेन्द कपूरकडून ज्या पद्धतीने गाऊन घेतले ते तिघांच्याही दृष्टीने इतिहास निर्माण करणारे ठरले. 'गरिबोंकी सुनो, वो तुम्हारी सूनेगा' या त्यांच्या गाण्याने लाखो भिकाऱ्यांच्या व्याकुळतेला स्वर दिला. तथाकथित श्रेष्ठ संगीतकार बदलत्या काळापुढे हतबल होत असताना रवी यांनी 'निकाह'सारखा यशस्वी चित्रपट देऊन चकित गेले. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, आशा भोसले, ,महेन्द कपूर यांच्या गाण्यांचा इतिहास रवी यांच्या गाण्यांशिवाय अपूर्ण आहे, हे काळानेच सिद्ध केले. 'ऐ मेरे दिले नादाँ, तू गमसे ना घबराना' म्हणत त्यांनी टीकेकडे दुर्लक्ष केले. ५० वर्षांनंतरही त्यांची गाणी टिकून आहेत, यापेक्षा त्यांच्या अभिजाततेचा पुरावा काय असू शकतो? "वक्त‘, "गुमराह‘, "एक फूल दो माली‘, "दो बदन‘, "चौदहवी का चॉंद‘ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी दिलेले श्रवणीय संगीत लोकप्रिय झाले होते. सातत्याने दर्जेदार संगीत दिल्यानंतरही प्रसिद्धीपासून ते दोन हात लांबच होते. त्यांनी काही चित्रपटांसाठी गीतलेखन केले होते. रवी यांचे ७ मार्च २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
March 9, 2017
साहित्य आणि कादंबरी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मुन्शी प्रेमचंद यांना ‘उपन्यास सम्राट’ म्हणूनही ओळखले जाते.
July 31, 2021
कविता, गाणी, शेर-शायरी, पटकथेचे ‘शब्दप्रभू’ आणि आपल्या लेखणीची रसिकांवर मोहिनी घालणारे ज्येष्ठ कवी, गीतकार जावेद अख्तर यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. जावेद अख्तर यांचं नाव लहानपणी ‘जादू’ असं होतं. शायरीचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे आणि वडिलांनी लिहिलेल्या उर्दू शेरमधील एका वाक्यातून त्यांचं नाव निवडलं गेलं होतं. गीतकार म्हणून त्यांची कारकीर्द त्यांनी आजवर जपली असली तरी ‘पटकथाकार’ म्हणून एकेकाळी हरएक चित्रपटामागे असलेलं त्यांचं नाव गेल्या कित्येक वर्षांत पडद्यावर उमटलेलंच नाही.
जुन्या लोकप्रिय गीतांच्या निवडक गीतकारांच्या यादीतील अव्वल नाव अख्तर यांचे आहे. गीते व पटकथा लेखनापलीकडे सामाजिक कार्यकर्ता व विद्रोही विचार मांडणारे लेखक अशीही त्यांची ख्याती आहे. ‘लावा’, ‘तरकश’ त्यांच्या या गाजलेल्या पुस्तकांच्या अन्य भारतीय भाषांमध्ये आवृत्त्याही निघाल्या आहेत. आजवरच्या या लिखाणातून त्यांनी भारतीय तरुण मनांना अनोखी ऊर्जा दिली आहे. धार्मिक गुंतागुंत मानवाला पुढे जाण्यापासून रोखत असल्यानेच त्यांनी निरिश्वरवादाचा वेळोवेळी पुरस्कार केला आहे. मा.जावेद अख्तर यांची अशी विशेष ओळख आहे. १९७० ते १९८० च्या दशकात सलीम खान-जावेद अख्तर या जोडीने अनेक दर्जेदार चित्रपट रसिकांना दिले. ‘अंदाज’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘डॉन’ या त्यांच्या चित्रपटांना सिनेरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले, एका वादानंतर हा इतिहास घडवणारे दोन्ही पटकथाकार बाजूला पडले ते आजतागायत. १९९३ साली जावेद अख्तर यांनी ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे शेवटची पटकथा लिहिली होती. ‘सिलसिला’ चित्रपटापासून अलीकडच्या ‘दिल चाहता है’ चित्रपटामधील गीतांनी युवापिढीचे भावविश्व भारून टाकले. आज चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीला पन्नास पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्या हिंदी चित्रपटक्षेत्रात अख्तरांचे गीतकार म्हणून मोठे नाव आहे.
एक प्रभावशाली गीतकार म्हणून त्यांना स्वत:ला हिंदी चित्रपटांमधील कुठली गाणी आवडतात, असे विचारल्यावर साठ आणि सत्तरचे दशक हे चित्रपट संगीताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते असे ते सांगतात. सत्तरच्या दशकांमधली चित्रपटांसाठी लिहिलेली गाणी, त्यांचे बोल, त्यांचं संगीत, त्यांचं दिग्दर्शन आणि ज्या कलाकारांवर ती चित्रित केली गेली ते कलाकार अशा अनेक गोष्टी अनमोल होत्या. मा.जावेद अख्तर यांना ‘पद्मभूषण’, उर्दूतील उत्तम काव्य लेखनासाठी ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अनेक गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.अभिनेत्री मा.शबाना आझमी जावेद यांच्या दुसरी पत्नी आहेत.जावेद विवाहित असून दोन मुलांचे(फरहान आणि जोया)वडील होते.तरीदेखील शबाना यांचा जावेद यांचा जीव जडला होता.शबाना यांचे कुटुंबीय यांच्या लग्नाच्या विरोधात होते.परंतु त्यांनी ठाम निश्चय केला होता आणि जावेद यांच्याशी लग्न केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 18, 2018
गुजरातच्या जुनागढमधील एका मध्यम वर्गीय मुस्लिम कुटूंबात परवीन जन्माला आली होती. त्यांचा जन्म ४ एप्रिल, १९४९ रोजी झाला. तिच्या आईवडिलांची ती एकुलती एक मुलगी होती. परवीन यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अहमदाबादेत झाले. इंग्लिश साहित्यात तिने मास्टर्स पदवी प्रथम श्रेणीतून मिळवली होती. तिचे इंग्लिश अगदी अस्खलित होते, परवीन वली मोहम्मद खान बाबी उर्फ परवीन बाबी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. तिच्या आरसपानी सौंदर्याने तिला बॉलीवूडने खुणावले. ती आली, तिने पाहिले अन तिने जिंकले अशी तिची अवस्था झाली. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले अन अनेक फ्लॉपही झाले. पण ती ग्लॅमरची आयडॉल बनून राहिली. ८० च्या दशकात झीनत अमानच्या बरोबरीने परवीन बाबीसुध्दा बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून नावारुपास आली होती. या दोघींमध्ये काही फरक होते.
झीनतचे विचार पूर्णत: व्यवसायिक होते. तिने आपल्या प्रत्येक यशाला आणि अपयाशाला समजून-उमजून संभाळले. परंतु परवीनने असे कधीच केले नाही. कदाचित छोट्या शहरातून आलेली परवीन ग्लॅमरस आणि श्रीमंत आयुष्य संभाळू शकली नाही. तिच्या वाट्याला आलेले बेसुमार ग्लॅमरस आयुष्य आणि यश हेच तिचे शत्रू बनले. त्यामुळे बॉलिवूडध्ये तिला प्रत्येकजण आपला शत्रुच्या रुपात दिसत होता. तिच्या या वागण्यानेच सर्वांनी तिच्या व्यवसायिक आणि खासगी आयुष्याचा फायदा घेतला. ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी परवीन १९७६ मध्ये टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली होती. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणारी परवीन पहिली भारतीय अभिनेत्री होती. खासगी आयुष्यात ती बोल्ड आणि बिनधास्त होती. यश चोप्रांच्या 'दीवार' या सिनेमात तिने बोल्ड सीन्स दिले होते. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि परवीन बाबीच्या जोडीला त्याकाळात बरेच पसंत केले गेले होते. 'अमर अकबर एंथोनी', 'दीवार', 'शान', 'ख़ुद्दार', 'काला पत्थर', 'सुहाग', 'नमक हलाल' या सिनेमांमध्ये ही जोडी झळकली. १९७३ मध्ये 'चरित्र' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणा-या परवीनने आपल्या करिअरमध्ये ५० सिनेमांमध्ये अभिनय केला. १९८८ मध्ये आलेला 'आकर्षण' हा तिचा शेवटचा सिनेमा होता.
१९७४ मध्येय प्रदर्शित झालेला मजबूर आणि १९७७ मध्ये अमर अकबर एंथोनी ही त्यांची करिअरमधील सर्वात हिट राहिलेली चित्रपट राहिलेली आहेत. त्या पडद्यावर जितक्या धाडसी आणि बिनधास्त होत्या, तेवढ्या खासगी जीवनात खूप एकाकी होत्या. बॉलीवूडमध्ये एकेकाळी टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळविणाऱ्या अभिनेत्री परवीन बाबी हिच्या आयुष्याचा अखेरचा काळ खूपच बिकट गेला. डॅनी, महेश भट्ट, कबीर बेदी सारख्या प्रसिध्द' कलाकरांबरोबर त्या लिव्ह इन रिलेशनशीपमध्येव राहिल्या. परवीन बाबी यांचे निधन २० जानेवारी, २००५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
January 24, 2018
कोलकाता विश्वविद्यालयाने ‘ डॉक्टर ऑफ सायन्स ‘ ही पदवी त्यांना १९५७ मध्ये दिली. १९५९ साली रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला १९७५ साली सी. डी. देशमुख आणि दुर्गाबाई देशमुख या दोघा पती-पत्नींना एकाच वेळी , ” पद्म-विभूषण ” किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला.
October 2, 2021
बोचऱ्या पण विखारी नसलेल्या, सहजसाध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या प्रसन्न विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे विनोदाला देशव्यापी लोकमान्यता मिळवून देणारे जसपाल भट्टी हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते. त्यांचा जन्म ३ मार्च १९५५ रोजी झाला.
महाविद्यालयीन काळापासूनच त्यांच्यातील तल्लख विनोदबुद्धीचा प्रत्यय परिचितांना येत होता. त्या काळात समाजातील भ्रष्टाचारावर विनोदाच्या माध्यमातून कोरडे ओढणारी त्यांची पथनाटय़े लोकांना हसवता हसवता अंतर्मुख करून गेली. नंतर चंदीगढच्या ‘द ट्रिब्युन’ या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार म्हणून ते रुजू झाले आणि राजकीय व सामाजिक विसंगतींवर बोट ठेवणारी त्यांची अर्कचित्रे व व्यंगचित्रे अत्यंत लोकप्रिय झाली.
त्याच काळात ‘दूरदर्शन’ने त्यांचे लक्ष वेधून घेतले. व्यापक लोकसंपर्काची या माध्यमाची ताकद त्यांना खुणावत होती आणि या माध्यमातला ‘फ्लॉप शो’ हा त्यांचा पहिलावहिला कार्यक्रम आजही ‘हिट शो’ म्हणूनच गणला जातो. प्रमुख भूमिकेत भट्टींबरोबर त्यांची पत्नी सविता आणि दुसरे विनोदवीर विवेक शक अशी तीनच पात्रे असलेला हा अत्यंत कमी बजेटचा कार्यक्रम अवघ्या दहा भागांचा होता पण या कार्यक्रमाने समाजातील भ्रष्टाचार व वैगुण्यांवर हसवता हसवता असे मार्मिक भाष्य केले की आजही तो लोकांच्या लक्षात आहे.
त्यानंतर ‘उल्टापुल्टा’ हा छोटय़ा तुकडय़ांचा कार्यक्रमही लोकप्रिय झाला होता. आयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. कधी तो सकारात्मक असतो, कधी नुसताच आशावादी असतो तर कधी निराशावादी असतो. विनोदाचा बादशाह ज्यांना म्हणता येईल अशा जसपाल भट्टी यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच मुळी विनोदी होता, असे म्हणावे लागेल. दररोजच्या घटनांवर मार्मिक टिप्पणी करणारा त्यांचा विनोद सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यातून, परिस्थितीतून आलेला होता. त्यामुळेच त्यांच्या ‘उल्टा पुल्टा’, ‘फ्लॉप शो’ या दूरदर्शनवरच्या दोन मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.
कुठेतरी नोकरी करायची, पैसा मिळवायचा. यात त्यांची भट्टी जमली नसावी बहुधा. टेलिव्हिजन या त्यामानाने नवीन माध्यमात प्रवेश करण्याआधी भट्टी दैनिक ‘ट्रिब्यून’मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते. कमीत कमी शब्दांत जास्त कोरडे ओढण्याची त्यांची शैली इथपासूनची. ‘फ्लॉप शो’नंतर सुरू केलेली ‘उल्टा पुल्टा’ ही मिनी कॅप्सूल होती. म्हणजे १५ मिनिटांचा विनोदाचा डोस. जो दोन कार्यक्रमांच्या मध्ये दाखवला जायचा. पण, त्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. विनोदाला कारुण्याची झालर असते, असे म्हणतात.
सामान्यांच्या असहाय परिस्थितीची उपहासात्मक मांडणी करण्यावर त्यांचा भर होता. ‘जोक फॅक्टरी’ या स्टुडिओ सोबत ‘मॅड आर्ट’ही प्रशिक्षण संस्था ही स्थापन केली.
जसपाल भट्टी यांचे २५ ऑक्टोबर २०१२ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 5, 2018
स्नेहल भाटकरांचे नाव उच्चारले की जुन्या मंडळींना चटकन कभी तनहाईयों मे युँ, हमारी याद आयेगी हे मुबारक बेगम च्या आवाजातील सदाबहार गीत आठवते. खरे तर हे गीत भाटकरजींना लतादीदींच्या आवाजात ध्वनीमुद्रित करायचे होते; पण ठरलेले असूनही लागोपाठ तीन दिवस लतादीदी तिथे फिरकल्याच नाहीत हे पाहून कोणतीही तक्रार न करता त्यांनी हे गाणे मुबारक बेगमच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले आणि मग पुढचा त्या गाण्याने जो इतिहास घडवला तो सर्वश्रुतच आहे. संगीतकार आणि गायक म्हणून कधी स्नेहल तर कधी वासुदेव भाटकर हे नाव घेऊन वावरले. स्नेहल भाटकर, भाटकर बुवा, व्ही.जी.भाटकर, वासुदेव भाटकर,बी वासुदेव! एकाच माणसाची ही अनेक.त्यांचे पूर्ण नाव वासुदेव गंगाराम भाटकर. त्यांचा जन्म १७ जुलै १९१९ रोजी झाला. आकाशवाणीच्या नोकरीत राहून देखिल संगीत दिग्दर्शनाचा व्यवसाय करता यावा म्हणून शोधलेला, नियमाला बगल देणारा हा मार्ग होता. स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव. त्यातील स्नेहल घेऊन केदार शर्मा ह्यांनी सुहागरात ह्या चित्रपटाच्या वेळी त्यांचे स्नेहल भाटकर असे नव्याने बारसे केले. नोकरीत म्हणजे आकाशवाणी मध्ये ते व्ही.जी भाटकर म्हणून वावरले तर भजनी मंडळात भाटकरबुवा म्हणून वावरले. गोड गळ्याची देणगी त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाली होती. त्या नंतर श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तसेच आजुबाजुच्या त्या परिसरात नियमितपणे भजनं चालत, त्यातही ते उत्साहाने भाग घेत आणि “ह्यातूनही आपण बरेच शिकलो” असे ते प्रांजळपणे नमूद करतात. ह्या भजनांचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसतो की ज्यामुळे त्यांचा स्वभाव अतिशय निगर्वी आणि समाधानी झाला.कलेच्या ह्या क्षेत्रात ते अजातशत्रू राहिले ते ह्याच स्वभावामुळे. म्हणूनच आयुष्यभर त्यांनी ह्या भजनांची साथ कधीच सोडली नाही. भजनी मंडळात ते भाटकरबुवा म्हणूनच प्रसिद्ध होते. १९३९ साली त्यांनी एचएमव्हीत पेटीवादक म्हणून नोकरी पत्करली पण पुढे आपल्या स्वत:च्या कुवतीवर ते संगीतकार म्हणून नावारुपाला आले. १९४४ च्या सुमारास बाबुराव पेंटर ह्यांच्या रुक्मिणी स्वयंवर ह्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी त्यांची सुधीर फडके ह्यांच्याबरोबरीने निवड झाली आणि मग वसुदेव-सुधीर ह्या नावाने त्या चित्रपटाला त्या दोघांनी संगीत दिले.गंमत म्हणजे ह्यांतील भाटकरांनी संगीत दिलेली काही गाणी बाबुजींच्या पत्नी ललिता फडके ह्यांनी गायलेली होती.
केदार शर्मा ही व्यक्ती भाटकरबुवांच्या आयुष्यातील एक अती महत्वाची व्यक्ती होती. सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात केदार शर्मांनी बुवांना जो हात दिला त्याचा विसर कधीही पडू न देता केदार शर्मांच्या पडत्या काळातही पैसे न घेता बुवांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिलंय.बुवांचे वैषिष्ठ्य हे की त्यांनी राज कपूरने पहिल्यांदाच नायक म्हणून काम केलेल्या नीलकमल ह्या चित्रपटातील त्याच्या तोंडच्या गाण्यासाठी आपला आवाज उसना म्हणून दिलेला आहे.ह्या चित्रपटाचे संगीतकार देखिल ते स्वत:च होते. इथे त्यांनी बी वासुदेव हे नाव धारण केलेले होते.तसेच मधुबाला,तनुजा,गीताबाली,नूतन इत्यादिंच्या चित्रपट पदार्पणातील पहिल्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय.आधी नायिका म्हणून गाजलेल्या आणि नंतर निर्मात्या बनलेल्या कमळाबाई मंगरुळकर,कमला कोटणीस,शोभना समर्थ वगैरे स्त्री निर्मात्यांच्या पहिल्या चित्रपटांनाही बुवांनीच संगीत दिलंय.
नीलकमल,सुहागरात,हमारी बेटी,गुनाह,हमारी याद आयेगी,प्यासे नैन,भोला शंकर,आजकी बात,दिवाली की रात,पहला कदम इत्यादि हिंदी चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत खूपच गाजलंय. तसेच मराठीतील रुक्मिणी स्वयंवर,चिमुकला पाहुणा,नंदकिशोर,मानला तर देव,बहकलेला ब्रह्मचारी इत्यादि चित्रपटांचे संगीतही विलक्षण गाजलंय.नंदनवन,राधामाई,भूमिकन्या सीता,बुवा तेथे बाया इत्यादि नाटकांचे संगीतही चांगलेच गाजलेय. मा. स्नेहल भाटकर यांचे २९ मे २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- प्रमोद देव
July 17, 2017
२९ मे १९५३ साली श्री. शेर्पा तेनझिंग नोर्गे व श्री. एडमंड हिलरी यांनी सर्वप्रथम एव्हरेस्ट सर केले. या मोहिमेनंतर श्री. शेर्पा तेनझिंग नोर्गे यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा फायदा सर्वांना मिळावा व गिर्यारोहण क्षेत्राचा भारतवर्षामध्ये प्रसार व विकास व्हावा या विचारातून श्री. पंडित नेहरू यांनी रक्षा मंत्रालयाच्या अख्यारीत हि संस्था दार्जिलिंग येथे स्थापन केली. शेर्पा तेनझिंग हे तिबेटी कि नेपाळी ह्यावर वाद होते. पण हा भला माणूस होता. शेर्पा तेनझिंग आणि हिलरी ह्यात ‘आधी’ शिखरावर कोण गेले असे फालतू वाद कित्येक पत्रकारांनी उपस्थित केले. आम्ही दोघे एकदमच पोचलो असे दोघेही सांगत.
May 31, 2022
त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणाऱ्या मराठी कुटुंबात जन्मलेली चित्रपट-अभिनेत्री सारिका ठाकूर माहेरचे नाव सारिका ठाकूर. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९६० रोजी झाला. १९६० च्या दशकातल्या त्रिमूर्ती या चित्रपटातील बालकलाकाराच्या भूमिकेतून बेबी सारिका या नावाने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. अभिनेत्री सारिका ने गीत गाता चल, खुशबू, जानी दुश्मन, क्रांति , सत्ते पे सत्ता, रजिया सुलतान , राजतिलक, परजानिया अश्या अनेक चित्रपटात काम केले. सचिन-सारिका या जोडीच्या ‘गीत गाता चल’ या चित्रपटाला रवींद्र जैन यांच्या गीत-संगीताने चार चाँद लावले.
यातील गीत गाता चल ओ साथी, शाम तेरी बन्सी पुकारे राधा नाम आदी गाण्यांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले. सारिका यांना दोन वेळा नॅशनल अवार्ड पण मिळाले आहेत. लग्नाशिवाय एकत्र राहून कमल हसन व सारिका यांनी १९८० च्या दशकात सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. त्यांना श्रुती व अक्षरा या दोन मुली असून अक्षराच्या जन्मानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र २००४ साली ते दोघेही वेगळे झाले.
35 वर्षां पुर्वी फ़िल्मफ़ेअर मासिकात एक आर्टिकल आले होते" Those who speaks with their eyes" या आर्टिकल मधे तिच्या डोळ्यांचे वर्णन " एका छोट्या मांजरी सारखे दिसतात असे केले होते आणि बिंदुचे डोळे एखाद्या बोक्या सारखे दिसतात असे केले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti