दि.बा. मोकाशी हे विसाव्या शतकातल्या श्रेष्ठ मराठी लेखकांपैकी एक होते. मराठी नवकथेत मोलाची भर घालणाऱ्या प्रारंभीच्या आघाडीच्या कथाकारांत त्यांची गणना होते. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९१५ रोजी उरण येथे झाला. दि. बा. मोकाशी हे १९४० नंतर नवकथेत झळकणारे महत्त्वाचे नाव. तीन कादंबऱ्या, तीन ललित व प्रवासवर्णनपर लेखसंग्रह, सात कथासंग्रह आणि पाच बालवाङ्मयपर पुस्तके असा त्यांचा भरगच्च साहित्यसंभार आहे. लामणदिवा हा १९४७ साली प्रसिध्द झालेला मोकाशी यांचा हा पहिलाच कथासंग्रह. रोजच्या जीवनातल्या साध्यासुध्या प्रसंगांतून आकारणारी लेखकाची कथा सौम्य आणि संयत प्रकृतीची आहे. ह्या पुस्तकात प्रारंभी ' पहिली पावले' ह्या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी लिहिले आहे. तेही कथेइतकेच रंजक आहे.
संध्याकाळचे पुणे हे माणूस साप्ताहिकात ७९-८० च्या कालखंडात प्रसिध्द झालेले, पुण्यातील सांस्कृतिक हालचालींचे दर्शन घडवणारे लेख.पुण्यात रोज झडणाऱ्या उपक्रमांबद्दल, व्यक्तींबद्दल आणी संस्थांबद्दल अत्यंत रसिकतेने लिहिलेले हे लेख आहेत. प्रसन्नता आणि निर्व्याजता, चितनशीलता आणि ताजेपणा ही मोकाशी यांच्या साहित्यातील वैशिष्ट्ये या लेखांमध्ये आढळतील.
आम्ही मराठी माणसं हा, १३ वैशिष्ट्यपूर्ण कथांचा हा संग्रह दि.बा.मोकाशींच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. आपल्या अवतीभवतीच्या माणसांचे नितळ विश्व सरळ साध्या पध्दतीने उभे करावे, ते नाट्यपूर्ण आणि शैलीदार पध्दतीने मांडण्यात त्यामागच्या वास्तवाची हानी होते असे त्यांना वाटे. या संग्रहातील हलक्या-फुलक्या कथा सामान्यांच्या सुप्तासुप्त भावनांचे खेळकर भूमिकेतून चित्र रेखाटणाऱ्या आहेत.
त्यांच्या निधनानंतर साहित्य अकादमीने १९८८ मध्ये "दि. बा. मोकाशी यांची कथा " (निवडक कथांचा संग्रह) हे पुस्तक प्रसिद्ध केले. पण त्याच्या प्रस्तावनेत मोकाशींच्या इतर साहित्याचा परामर्श घेताना त्यांनी ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ या कादंबरीचा मात्र उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. सरोजिनी वैद्य यांच्या मार्गदार्शनाखाली सौ. माधुरी पणशीकर यांनी मोकाशी यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट घेतली. दि.बा. मोकाशी यांनी लामणदिवा, वणवा मिळून ११ कथासंग्रह. देव चालले, आनंद ओवरी, या कादंबऱ्या, तसेच पालखी, अठरा लक्ष पावलं अशी प्रवासवर्णने, संध्याकाळचे पुणे (ललित), रेडिओदुरुस्ती व्यवसाया-बद्दलचे पुस्तक व बालसाहित्यदेखील त्यांनी लिहिले. ‘अठरा लक्ष पावलं’मध्ये त्यांनी प्रवासवर्णनातून समाजजीवनाचा शोध घेतला. त्यांच्या ‘आनंद ओवरी’ या संत तुकारामाच्या जीवनावरील कादंबरीचे अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेट यांनी इंग्रजीत भाषांतर करून ते ‘ट्विटर’वर ठेवले आहे. त्यांच्या इतरही अनेक पुस्तकांची हिंदी व इंग्रजी भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या पालखी या पुस्तकातून पंढरीच्या वारीवर विपुल लेखन केलंय. खरे म्हणजे "पालखी"च्या पार्श्वभूमीवर एखादी कादंबरी लिहावी अशी मोकाशींची फार इच्छा. त्यांच्या कल्पनेतल्या कादंबरीतील एका वारकर्यााच्या डॉक्टर मुलाला, वडिलांच्याऐवजी, वारीला जावं लागतं. पालखी सुरू होते तेव्हा कादंबरी सुरू होते आणि पालखीबरोबरच ती संपते. ही कादंबरी लिहिणे मोकाशींना शक्य झाले नाही. मात्र पालखीबाबतचे आकर्षण मनात मात्र कायम राहिले.
एक महिना व्यवसाय बंद करून, महिन्याभरासाठी संसाराची रक्कम व पालखीबरोबरचा खर्च यांची तरतूद करून जावे लागेल या कारणाने काही वर्षे पालखीला जाण्याचे त्यांनी टाळले. मोकाशींच्याच भाषेत सांगायचे तर "यंदा तगमग अतिशय वाढली. काळे ढग आले. पाऊस कोसळू लागला. हवा कुंद झाली. वारकरी दिसू लागले. एके दिवशी लौकर दुकान बंद करून घरी आलो आणि जाहीर केलं - काही झालं तरी यंदा पालखीला जाणार!" ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ ही त्यांची १९७८ मध्ये प्रकाशित झालेली चरित्रात्मक कादंबरी. त्यांच्या या कादंबरीची मात्र फारशी दखल घेतली गेली नाही. जानेवारी २०१४ मध्ये त्यांची कन्या ज्योती कानेटकर यांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर अमेझॉनवर टाकले आहे. कामसूत्र हे पुस्तक कसं आहे ते अनुभवायचं असेल तर दि बा मोकाशी यांची वात्स्यायन ही कादंबरी वाचावी.
दि. बा. मोकाशी यांचे २९ जून १९८१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 27, 2018
एक उत्तम अभिनेत्री म्हणून भारतातल्या नाट्य-चित्रपट प्रेक्षकांना रिमा यांचं नाव सुपरिचित आहे. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.त्यांचं नाव घेताच डोळ्यांपुढे त्यांचा हसरा, गोल चेहरा, घारे डोळे आणि त्यांची अभिनयाची मोठी कारकीर्द तरळून जाते. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. 'हिरवा चुडा', 'हा माझा मार्ग एकला' अशा चित्रपटांतून 'बेबी नयन' नावाने बालकलाकार म्हणून मा.रीमा लागू यांनी चित्रपट सृष्टीत सुरवात केली व लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली. ७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० सालच्या ’आक्रोश, 'कलयुग' या दर्जेदार चित्रपटांपासून त्यांच्या चित्रपटप्रवासाला सुरुवात झाली. 'रिहाई'सारखी धीट, वेगळ्या वाटेवरची भूमिका असो, किंवा 'कयामत से कयामत तक', 'मैंने प्यार किया', 'हम आप के हैं कौन', 'वास्तव', 'कल हो ना हो' मधल्या आईच्या भूमिका, आपल्या सहजसुंदर अभिनयानं त्यांनी मोठा पडदा कायमच व्यापला आहे. त्यांनी केलेल्या नाटकातील पुरूष,सविता,घर तिघांचं हवं आत्ताचं छापाकाटा अशी बरीच नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली, काही नाटकं तितकी चालू नाही शकली. पण हे करत असताना त्या ब-याच व्यक्तिरेखा नाटकाच्या माध्यमातून जगत होत्या. मा.रीमा लागू यांचे लग्ना आधीचे नाव नयन भडभडे. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या रीमा लागू झाल्या. मा.रीमा लागू यांनी 'श्रावणसरी' या मालिकेच्या दोन कथांचे दिग्दर्शन केले होते. मा.रीमा लागू यांनी ’अनुमती’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका केली होती. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातली त्यांची भूमिका अनेक चित्रपटमहोत्सवांत नावाजली गेली आहे. तसेच ’तू तू मैं मैं’ ही मा.रीमा लागू यांची अतिशय गाजलेली आणि स्वच्छ, साधी सरळ टीव्ही मालिका सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. त्या मालिकेनंतर त्यांनी ’तुझं माझं जमेना’ या मालिकेमधून काम केले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 25, 2017
शिल्पकार, चित्रकार, कवी, वास्तुशिल्पी अशा अनेक भूमिकांमध्ये साऱ्या जगावर अमिट ठसा उमटविणाऱ्या ‘मायकेल अँजेलो’ या कलावंताची ही रोमहर्षक कहाणी! डॉ. माधवी मेहेंदळे यांनी लिहिलेल्या आणि अमेय प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘दैवी प्रतिभेचा कलावंत : मायकेल अँजेलो’ या पुस्तकातील हा संपादित अंश!
March 15, 2022
अनिल विश्वास यांनी ‘ धरम की देवी ‘ पासून १९६५ पर्यंतच्या छोटो छोटी बाते ‘ पर्यंत अंदाजे ७८ ते ८० चित्रपटांना संगीत दिले . विदेशी संगीताला कधीही जवळ न करणारा , त्यासाठी तडजोड न करणारा , अस्सल-भारतीय शास्त्रीय संगीताचा सतत ध्यास धरणारा संगीतकार अशी त्यांची ख्याती होती.
July 28, 2021
सिद्धार्थ जाधव हा मराठी इंडस्ट्रीतील आघाडीचा विनोदी अभिनेता. त्याचा जन्म २३ ऑक्टोबर १९८१ रोजी मुंबई येथे झाला. सिद्धार्थ जाधवने ग्रॅज्युएशन रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले. रुपारेल महाविद्यालयामध्ये असताना त्याने अनेक एकांकिकांमध्ये काम केले. तो पहिल्यांदा देवेंद्र पेम यांच्या 'तुमचा मुलगा करतो काय' या नाटकामधून प्रकाशझोतात आला. ‘हुप्प हुय्या’ मधील ‘हणम्या’, ‘दे धक्का’ मधील ‘धनाजी’, ‘लालबाग परळ’ मधला ‘स्पीडब्रेकर’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ मधला ‘उस्मान पारकर’ आणि अशा वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक दूरदर्शन मालिका आणि नाटकांतूनही काम केले आहे. मराठी चित्रपटांबरोबरच सिद्धार्थने काही हिंदी चित्रपटात सुद्धा काम केलंय. कॉमेडी सर्कस या कार्यक्रमातही काम केले आहे. रंगभूमी, मालिका, चित्रपट अशा तिनही माध्यमात सिद्धार्थने स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
October 23, 2017
भगतसिंग यांना राजगुरु आणि सुखदेवसोबत २३ मार्चला फाशी देण्यात आली. या तिन्ही तरुण देशभक्तांच्या फाशीनंतर तमाम भारतीयांचं रक्त आणखी पेटून उटलं त्यांच्या बलिदानानंतर स्वांतत्र्यांची चळवळ अधिक प्रखर झाली.
September 28, 2021
जवळ जवळ १७ वर्षे तो वेस्ट इंडिंजसाठी क्रिकेट खेळत होता आणि एक यष्टीरक्षक म्हणून हा कालखंड निश्चित मोठा आहे . डेरेक मरे याने ६२ कसोटी सामन्यामध्ये १९९३ धावा केल्या त्यामध्ये त्याची ११ अर्धशतके होती आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ९१ धावा . त्याने यष्टिरक्षण करताना १८१ झेल घेतले आणि ८ जणांना स्टंपिंग करून बाद केले म्हणजे १८९ जणांना बाद केले.
May 28, 2021
नातवंडांच्या कविता हा सामाजिक जाणीव असलेला कार्यक्रम (वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी कवितावाचन) आदित्य दवणे यांच्या संकल्पनेतून सुरू झाला असून मुंबई, पुणे, गोवा येथे या कार्यक्रमांचे प्रयोग सादर झाले आहेत.
June 22, 2022
अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, राज्यघटना, सामाजिक व राष्ट्रीय समस्या इ.चा व्यासंग असलेले विचारवंत राजकीय नेते मधु लिमये यांचा जन्म १ मे १९२२ पुणे येथे झाला. मधु लिमये यांच्या वडिलांचा शिक्षकी पेशा होता. नोकरी निमित्त अनेक गावी जावे लागत असल्याने मधू लिमये यांचे शिक्षण त्यांच्या आजोळी पुण्यातच झाले.
१९३७ साली मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळच्या वातावरणामुळे त्यांना राजकारणात रस वाटू लागला. योगायोगाने त्यांचा परिचय एस. एम. जोशी, शिरूभाऊ लिमये, नानासाहेब गोरे व पां. वा. गाडगीळ यांच्याशी झाला. एस. एम. जोशी यांच्या प्रोत्साहनाने वयाच्या १८ व्या वर्षीच ते स्वातंत्र्य चळवळीत शिक्षण सोडून सामील झाले. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात त्यांचा सहभाग असल्यामुळे त्यांना चार वर्षांचा तुरूंगवास भोगावा लागला. १९४८ साली त्यांची काँग्रेस सोशालिस्ट पक्षाच्या कार्यकारिणीवर निवड झाली.
१९४९ साली समाजवादी पक्षाचे संयुक्त चिटणीस म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यानंतर गोवामुक्ती आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. १९५८ मध्ये समाजवादीपक्षाचे ते अध्यक्ष झाले. त्यानंतर १९६४ मध्ये मुंगेर (बिहार) येथून ते लोकसभेवर निवडून गेले. १९७३ ते ८० या काळात बांका मतदार संघातून त्यांची निवड झाली. मधू लिमये यांनी विपुल लेखन केलेले आहे.
त्रिमंत्री योजना, कम्युनिस्ट जाहीरनाम्याची १०० वर्षे, स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा, पक्षांतर बंदी ? नव्हे, अनियंत्रित नेतेशाहीची नांदी इ. त्यांची मराठी भाषेतील पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी हिदीत व इंग्रजीतही पुष्कळ लेखन केलेले आहे. राजनिती का नया मोड, मार्क्सवाद और गांधीवाद, संक्रमणकालीन राजनिती इ. तर प्राईम मुव्हर्स : रोल ऑफ द इंडिव्हिज्युअल इन हिस्टरी हे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध आहे.
त्यांच्या या विविधांगी लेखनावरून त्यांच्या चौफेर व्यासंगाची कल्पना करता येते. आपल्या विविध आठवणींचे संकलन करून आत्मचरित्र लिहिण्याचा त्यांनी संकल्प केला होता. आत्मकथा या नावाने त्यातील एक खंड प्रसिद्ध झलेला आहे. अनेक व्यक्ति, अनेक घटना या खेरीज मधू लिमये यांच्या जीवनाची समृद्धता व त्यांच्यावरील संस्कार याचेही आपल्याला त्यात दर्शन घडते. मा.मधू लिमये यांचे ८ जानेवारी १९९५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 8, 2019
डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे ज्येष्ठ समीक्षक आणि ललित लेखक म्हणून ओळखले जात असत. ‘पुरुषराज अळुरपांडे’ असं काहीसं विक्षिप्त नाव घेऊन काही लेख बडोद्याच्या अभिरुची मासिकांत येत असत. गंमत म्हणजे ते नाव घेऊन लिहिणारी एक व्यक्ती नसून तीन जण होते. ते म्हणजे – पु. ल. देशपांडे, रा.वा.अलूरकर आणि मं. वि. राजाध्यक्ष!
April 19, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti