उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आँवला गावात जन्मलेल्या अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार यांच्या कुटुंबात लष्करी सेवेची परंपरा होती. त्यांचा जन्म १६ जून १९३६ रोजी झाला. त्याचे वडिल पोलीस अधिकारी होते. त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. त्यामुळे त्याच्या प्राथमिक शिक्षणाचे काही दिवस वडिलांची पोस्टिंग असलेल्या ठिकाणी झालं. त्यानंतर हरदोईमध्ये काही वर्षे घातल्यानंतर त्यांना १९४८ मध्ये अलीगढला पाठवण्यात आलं. त्यावेळी त्यांना तिथल्या सरकारी शाळेत प्रवेश मिळाला नाही. म्हणून त्यांना सिटी स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागला. आजवरचं त्याचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं होतं, मात्र सरकारी शाळेत प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांना उर्दू माध्यमातून शिकावं लागलं. त्यानंतर शालेय शिक्षण पूर्ण करून ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठात पोहचले. त्यानंतर ते अलिगड मुस्लीम विद्यापीठात उर्दूचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथेच ते उर्दूचे विभागप्रमुख म्हणून सेवा निवृत्त झाले. जेव्हा उर्दू साहित्यात नवतेची आणि आधुनिकतेची लाट आली होती, त्याच काळात शहरयार यांनी उर्दू साहित्यलेखनात प्रवेश केला. त्यांचे अनेक समकालीन काळाच्या ओघात बाजूला पडले, पण शहरयार यांनी नव्या पिढीलाही आपल्या शायरीची भुरळ घातली. १९६५ साली शहरयार यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाने त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले होते. त्यातील ‘सीने में जलन आँखों में तूफान सा क्यूँ है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूँ है’ सारख्या गझलेने अली सरदार जाफरी यांच्यासारख्या शायराकडून पोचपावती मिळाली. अर्थात ही गझल पुढे ‘गमन’ चित्रपटातून भारतभर पोचली. पुढच्या टप्प्यात त्यांचे आणखी संग्रह आले. ‘ख्वाब के द्वार बंद है’ सारख्या संग्रहाने नव्याने त्यांच्याकडे लक्ष गेले. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘उमराव जान’ चित्रपटातील गझलांनी त्यांना दर्दी चित्रपटप्रेमींच्या हृदयापर्यंत पोचवले. उमराव जान या चित्रपटासाठी त्यांनी लिहीलेल्या ‘दिल चीज क्या है आप मेरी...’, ‘यह क्या जगह है दोस्तो’, ‘इन आँखो की मस्ती में’ या गझला आजरामर ठरल्या. त्यांनी बॉलीवूडमध्ये गमन, अंजुमन यासह अनेक चित्रपटांसाठी गीतलेखन केले. त्यांच्या अभिजात दर्जामुळे चित्रपट गीतेही चिरस्मरणीय ठरली. ख्वाब का दर बंद है या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८७ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांचे इस्मे आजम, सातवाँ दर आणि हिज्र के मौसम हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. २००८ साली ख्वाब के दर बंद है या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले मा. शहरयार यांचे निधन १३ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
June 16, 2019
१९६० साली प्रदर्शित झालेल्या ‘दीदी’ या चित्रपटाने त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३९ रोजी बंगलोर येथे झाला. १९६२ साली प्रदर्शित झालेल्या ‘टारझन गोज टू इंडिया’ या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी व्यक्तिरेखा साकारली होती. १९६५ साली प्रदर्शित झालेला ‘ऊँचे लोग’ हा चित्रपट त्यांचा पहिला ‘हिट’ चित्रपट ठरला. त्यानंतर आलेल्या ‘आरजू’ या चित्रपटातील भूमिकेने त्यांचे हिंदी चित्रपटसृष्टीतील स्थान पक्के केले आणि सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेसाठी फिरोझ खान यांना पसंती देण्यात येऊ लागली.
‘आदमी और इन्सान’मधील भूमिकेसाठी त्यांना पहिला सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ‘धर्मात्मा’ या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला खूप लोकप्रियता लाभली. सत्तर-ऐंशीच्या दशकात फिरोझ खान यांचा चाहतावर्ग तयार झाला. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘कुर्बानी’, ‘जाँबाज’ आणि ‘दयावान’ हे चित्रपटही हीट ठरले. १९९२ साली दिग्दर्शित केलेल्या ‘यल्गार’नंतर फिरोझ खान चित्रपटसृष्टीपासून दूर गेले होते. मा.फिरोझ खान यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्या काळात फिरोज खान आणि मुमताज यांची जोडी खूप लोकप्रिय झाली होती. मैत्रीसोबतचे दोघे व्याहीसुध्दा होते.
२००५ मध्ये फिरोज यांचा मुलगा फरदीनने मुमताज यांची मुलगी आणि बालपणीची मैत्रीण नताशासोबत लग्न केले. पुत्र फरदीन खानला ‘लॉँच’ करण्यासाठी १९९८ साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसे यश लाभले नाही. २००३ साली त्यांनी फरदीनलाच घेऊन ‘जाँनशीन’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. याच चित्रपटाद्वारे त्यांनी मोठय़ा पडद्यावर पुनरागमन केले. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘आरडीएक्स’ची भूमिका लोकप्रिय झाली होती. मा.फिरोझ खान यांचे २७ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
October 3, 2017
ओ. पी. नय्यर यांचे पूर्ण नाव ओंकार प्रसाद नय्यर. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९२६ रोजी लाहोर प.पंजाब येथे झाला. १९४९ मधे " कनीज" या चित्रा पासून संगीतकार म्हणून कारकीर्द ओ.पी.नी सुरवात केली पण त्यांचे पहिले गीत गाजले ते चंद्रू आत्मा यांचे प्रीतम आन मिलो. ओपीना या गीतसाठी २५ रू इतके प्रचंड मानधन मिळाले. दलसुख पांचोली यांच्या "आसमान" या चित्रा द्वारा ओ.पीं.चे आगमन हिंदी फ़िल्म संगीताच्या मंचावर झाले खरे पण या चित्रपटासकट " बाज" व "छम छमा छम" हे त्यांचे चित्रपट तिकिट बारीवर आडवे झाले. मग निराश हौउन पुन्हा पंजाबला परत जावे व शाळेत मिळाली तर एकाद्या संगीत मास्तराची नोकरी करावी या निर्णयाप्रत ओपी आले. उरलेली पंधराशे रुपये गुरूद्त्त कडे मागण्यासाठी ते गेले तेंव्हा "आपल्या मोठ्या मुलाला दूध पाजायला ही पैसे नाहीत" असे त्यानी गुरूदताला सुनावले. तर त्याने काय करावे त्याने आपला आगामी चित्रपट " आरपार" ओपीना बहाल केला. ओपींकडे काही " सांगितिक मागण्या" गुरूनी केल्या. नय्यर " आरपार" मधून एक नवाच बाज फ़िल्म संगीतात घेउन आले. ओपी नय्यर हे चित्रसंगीतातील आद्य " फ़्युजनिस्ट " म्हणून उदयास आले.फ़्युजन करतानाही तालांची बेमालूम सरमिसळ करायची व पुन्हा साडेतीन मिनिटाचे गाणे अ पासून ज्ञ पर्यंत एकसंध करायचे ही त्यांची खास स्पेशालिटी ठरून गेली. ओपीं नी १९५२ ते २००७ य काळात एकूण सुमारे ८० चे वर चित्रपटाना संगीत दिले. इतर भाषेतील चित्राना संगीत दिले. तेलगू भाषेतील " निराजनम " या चित्राच्या संगीताने रेकॉर्ड विक्रीचा उच्चांक केला. मींड, तान, आंदोलन हे हरकतीचे प्रकार सढळपणे वापरणारे संगीतकार म्हणजे ओपी नय्यरच. मुख्या म्हणजे असे गीत नृत्यगीत असायला पाहिजे असे नाही. कवाली, युगलगीत अशा प्रकारच्या गीतातही हरकतींची भरपूर वापर आढळतो. खरी ओपी नय्यर खासीयत दिसते ती काश्मिरकी कली, मेरे सनम, एक मुसाफ़िर एक हसीना, फ़ि रवही दिल लाया हु, हमसाया, कही दिन कही रात ,द किलर्स ,हम सब चोर है, सी आयडी ९०९, सावनकी घटा व प्राण जाय पर वचन न जाय ई या चित्रपटातून. ओपी ना " रिदम किंग " या नावाने ओळखले जाते तसे मायस्त्रो ऑफ मेलडी असे ही म्हटले जायचे. ओ.पी हे सार् पणे स्वता" ला वेगळाच व श्रेष्ठ संगीतकार मानत. संगीतकार घडवून होत नाही तो निसर्गाने जन्मालाच घालावा लागतो असे ते वारंवार म्हणत. सिनेजगतात कॅडिलॉक ही गाडी फ़क्त मा.ओ. पी. नय्यर व मा.व्ही शांताराम यांचेकडेच होती. मा.ओ. पी. नय्यर यांचे २८ जानेवारी २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
January 16, 2017
जोगवा ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी मुक्ताचे कौतुक झाले व तिला ह्यासाठी काही पुरस्कार देखील मिळाले. आपल्या वैविध्यपूर्ण आणि सहज अभिनयाने मुक्ताने रसिकांच्या मनात प्रेमाचे स्थान मिळवले आहे. टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक अश्या तिन्ही माध्यमांवर जबरदस्त पकड असणार्या अत्यंत मोजक्या अभिनेत्यांमध्ये मुक्ताचे स्थान अग्रक्रमावर आहे.
July 16, 2021
नितीन ढेपे यांना ह्या संकल्पनेचे पेटंट देखील १४ जानेवारी २०१६ रोजी भारत सरकारकडून मिळाले असून ही वास्तू सर्वा्थाने लोकांच्या पसंतीस उतरली आहे. भारतीय पारंपरिक खेळ, खाद्यपदार्थ, पेहराव तसेच विविध कला आणि संस्कृती जोपासण्याचे काम करणाऱ्या ‘ढेपे वाडा’ या वास्तूला भारत सरकारकडून २०१९ मध्ये बौद्धिक स्वामीत्व हक्क मिळाले आहेत.
February 12, 2022
हिंदी सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेत कारकीर्द घालवूनही शशी कपूर यांचं मन घुटमळत राहिलं ते पृथ्वी थिएटरपाशी. काही वर्षांपूर्वी पं. सत्यदेव दुबे यांना मानवंदना म्हणून पृथ्वी थिएटरने महोत्सव आयोजित केला होता, तेव्हा शशी कपूर व्हीलचेअरवर बसून पृथ्वी थिएटरमध्ये आले होते एका कोपऱ्यात शांतपणे बसून नाटकवाल्यांचा चाललेला जल्लोष शांतपणे निरखत होते आणि स्मितहास्य करत होते.
December 20, 2021
गोवा-मुक्तीनंतर पोर्तुगलला भेट देणारे (४ एप्रिल १९९०) ते पहिले राष्ट्रपती होत. तसेच त्यांनी मे १९९२ मध्ये चीनला भेट दिली. भारताच्या राष्ट्रपतींची ही चीनला पहिलीच अधिकृत भेट होय.
January 27, 2022
सुदेश भोसले आणि बॉलीवूडचे ‘बीग बी’ अर्थात अमिताभ बच्चन यांचे अतूट असे नाते आहे. अमिताभ बच्चन यांची ‘मिमिक्री’करता करता सुदेश भोसले यांचा आवाज अमिताभ बच्चन यांचा आवाज झाला. सुदेश भोसले यांनी अमिताभ बच्चन यांच्यासाठी “चुम्मा चुम्मा‘, “शावा शावा‘, “सोना सोना‘, “मेरी मखना‘ ही गाणी गायली आहेत.
July 4, 2022
ओमप्रकाश यांनी आपल्या कारकिर्दीत ३५० चित्रपटात कामे केली. त्यांच्या प्रमुख चित्रपटात ‘पड़ोसन’, ‘जूली’, ‘दस लाख’, ‘चुपके-चुपके’, ‘बैराग’, ‘शराबी’, ‘नमक हलाल’, ‘प्यार किए जा’, ‘खानदान’, ‘चौकीदार’, ‘लावारिस’, ‘आंधी’, ‘लोफर’, ‘ज़ंजीर’ यांचा समावेश आहे ‘कोणीही’ वादळ ‘,’ भटक्या ‘,’ जंजीर ‘, त्यांचा ‘नौकर बीवी का’ थी हा चित्रपट होता.
July 25, 2019
खासदार कपिल पाटील यांचा विकासात्मक दृष्टिकोन ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी फायदेशीर ठरणार आहे. कपिल पाटील यांच्या व्हिजनमुळे ठाणे जिल्ह्यात अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. १२ पदरी ठाणे-भिवंडी बायपास, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग, एमएमआरडीएने ग्रामीण भागासाठी दिलेला निधी, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो आदी कार्य ही कपिल पाटील यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष आहे.
March 16, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti