ते जसे नेहमी सांगतात की, यशाची गुरुकिल्ली दडली आहे सातत्यपूर्णतेने काहीतरी शिकत राहण्यात. त्यांचा हा मंत्र घेऊनच त्यांची वाटचाल सुरू आहे आणखी लक्षावधी डॉलर्सच्या उद्योगांना गवसणी घालण्यासाठी!
June 27, 2022
बालमजुरी आणि लहान मुलांची वाहतूक रोखण्याचे उद्दिष्ट ठेवून; तसेच सर्व मुलांना शिक्षण हे ध्येय ठेवून ‘बचपन बचाव संस्थे’ची स्थापना त्यांनी केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक बालकामगारांची सुटका करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने रग उत्पादक कंपन्यांमधील बालमजुरांचा समावेश आहे.
January 11, 2022
काळी गोल टिकली. त्यावर भांगापर्यंत रेखाटलेली काळ्या कुंकवाची उभी रेघ. नाकात लकाकणारी चमकी. डार्क ब्ल्यू किंवा मरून रंगाची सिल्क साडी. काठ ठळकपणे उठून दिसणारे, हाती तंबोरा – मैफलीपूर्वीची डोळे मिटलेली ध्यानस्थ स्तब्धता. `आकाशवाणी धारवाड’ केंद्रावरचा फोटो वाटावा अशी आरती अंकलीकर – टिकेकरची प्रतिमा.
आरती अंकलीकर-टिकेकर यांनी आग्रा-ग्वाल्हेर घराण्याच्या पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे आणि नंतर गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडे संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९६३ रोजी झाला.त्यांच्या गायनशैलीवर त्यांच्या दोन्ही गुरुंचा प्रभाव जाणवतो. चांगलं गाता येण्यासाठी नैसर्गिक देणगी, संस्कार, कष्ट (रियाज) आणि संधी या चार गोष्टींची गरज असते. आरती अंकलीकर - टिकेकर यांना आवाजाची देणगी तर मिळालीच होती, जोडीला आईवडिलांचे संस्कार, गुरूंची आणि परमेश्वकराची कृपा यांमुळे मिळालेल्या प्रत्येक संधीचं त्यांनी सोनंच केलं. आरती अंकलीकर-टिकेकर यांनी प्रथम वसंतराव कुलकर्णींकडे बारा वर्षं रीतसर आग्रा-ग्वाल्हेर घराण्याच्या गाण्याचे शिक्षण घेतले. वसंतराव कुलकर्णी यांची आठवण सांगताना त्या म्हणतात. वसंतरावांकडचा सकाळचा नऊचा क्लाुस आठवतोय. मला पोचायला २-३ मिनिटं उशीर झाला असावा. सर त्यांच्या गादीवर तक्त्यााला टेकून बसलेले. पांढरे शुभ्र धोतर, पांढरा झब्बा, कुरळे केस व्यवस्थित विंचरलेले. समोरच्या तबकात तंबाखू, सुपारी, विड्याची पानं, सरांच्या अंगठ्याच्या नखात चुना, डाव्या हातात तळहातावर तंबाखू. मला पाहताच चेहऱ्यावर नाराजी. मला म्हणाले, ""घड्याळात पाहतेस ना किती वाजले?'' मी- ""पण सर..'' ""बस.. उशिरा आली.'' सर - ""ख्यालाच्या आवर्तनामध्ये दुसऱ्या मात्रेवर समेवर येऊन चालेल का? वेळेचं भान नको का ठेवायला?'' ताल म्हणजे काय, आवर्तन म्हणजे काय, याचा मिळालेला पहिला धडा होता तो. असे शिस्तप्रिय, वक्तशीर, मितभाषी, आतून खूप प्रेम करणारे, वरवर कोरडे वाटणारे सर.
वसंतराव कुलकर्णींकडे गाण्याचे शिक्षणानंतर त्यां गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या कडे गाणं शिकल्या. किशोरी आमोणकर यांच्या बद्दलचे त्यांचे भाव व्यक्त करताना त्या म्हणतात, किशोरीताईंकडे चाललेला यमन मनात रुंजी घालतोय, समोर दिसतोय, दरवळतोय, जिभेवरदेखील यमनचीच चव रेंगाळतेय. केवळ त्या आठवणींनी मन जणू यमनच झालंय. ताईंकडे यमनची तालीम चाललेली असतानादेखील असंच वाटायचं, मीच यमन झाल्यासारखं. सगळं जग यमन झाल्यासारखं वाटे. त्यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतरदेखील यमनमध्ये तरंगल्याचा आभास होई. अंतर्मनामध्ये यमनच चालू असे. ताई म्हणत, "रागाला शरण जा, तोच तुम्हाला वाट दाखवेल.'' ताईंचा श्वा स म्हणजेच संगीत. संगीत हेच जीवन. त्यांची गुरूवर अपार भक्ती. गुरू म्हणजे त्यांचीच आई- गानतपस्विनी - "मोगूबाई.' ताईंनी शिस्तबद्ध गायकी पचवून आपली स्वयंभू, स्वतंत्र गायनशैली निर्माण केली. रागाचं विशाल रूप त्यांना दिसलं आणि आम्हालाही त्याची अनुभूती दिली. मी स्वत: यमन होते तेव्हा काय घडत असतं, याचा साक्षात्कार करवला.
आरती अंकलीकर-टिकेकर यांनी नंतर आग्रा घराण्याचे अध्वर्यू मा.पं. दिनकर कैकिणी यांच्याकडे शिक्षण घेतले. पं. दिनकर कैकिणी यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणतात. यश म्हणजे काय? पैसा, नाव, कीर्ती मिळवणं म्हणजे यश; मनातली स्वप्न पूर्ण होणं म्हणजे यश; की श्रोत्यांना भावविभोर करणं म्हणजे यश? चांगला माणूस बनणं म्हणजे यश की यशस्वी कलाकार होणं म्हणजे यश? निरंतर साधनेत रमणारं मन घडवणं म्हणजे यश, की सातासमुद्रापलीकडे कार्यक्रम करणं म्हणजे यश? या विचारांच्या भोवऱ्यात मन भरकटत असताना आठवतो तो माझ्या गुरूंबरोबर गायलेला राग भैरव. पं. दिनकर कैकिणी- आग्रा घराण्याचे अध्वर्यू- त्यांनी भैरव शिकवला. खरं तर उभाच केला डोळ्यांसमोर. राग ही केवळ एक स्वराकृती नसून, तरल भावाचं एक वलय आहे. अलगद तरंगणारं, गायकाच्या आणि श्रोत्याच्या तरल मनाला तरंगवणारं. पं. कैकिणी गुरुजींची काही वाक्यंर इथं आठवतात
"शास्त्रीय संगीत हे मनोरंजनासाठी नसून आत्मरंजनासाठी आहे.'
"भारतीय संगीत हे दोन स्वरांना जोडणाऱ्या दुव्यात दडलेलं आहे.'
त्यांनी आत्तापर्यत भारतभर तसेच भारताबाहेर अनेक प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये आपली कला सादर केली आहे. आरती अंकलीकर-टिकेकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा आणि संस्कृतीचा जगभरामध्ये आपल्या गायनाद्वारे प्रसार केला. प्रसिद्ध दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या `सरदारी बेगम’ या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायनही केले आहे. आरती अंकलीकर-टिकेकर यांना आत्तापर्यंत पं. कुमार गंधर्व पुरस्कार, पं. जसराज पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार अशा अनेक नामांकित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. 'संहिता' या मराठी चित्रपटातील 'पलके ना मूंदो' या गाण्यासाठी आरती अंकलीकर-टिकेकर यांना उत्कृष्ट पार्श्वगायिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळालेला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
मी राधिका मी प्रेमिका
https://www.youtube.com/watch?v=AqH-TkK9NSk
ग्रेट भेटमधील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांची मुलाखत
http://www.ibnlokmat.tv/archives/65281
http://www.ibnlokmat.tv/archives/65279
सरदारी बेगम चित्रपटातील गाणी
https://www.youtube.com/watch?v=twjdlrUYcYs
https://www.youtube.com/watch?v=QAWHl2BKOJY
January 27, 2017
आज ३१ ऑक्टोबर.. आज एस.डी. उर्फ सचिन देव बर्मन यांची पुण्यतिथी
सचिन देव बर्मन यांचे निधन १ ऑक्टोबर १९०६ रोजी झाले.
"महान" या एकाच शब्दात ज्यांचे वर्णन करता येईल असे संगीतकार सचिन देव बर्मन उर्फ एस.डी बर्मन सर्वार्थाने दादाच होते. खरं म्हणजे त्रिपुराच्या राजघराण्यात वाढलेल्या सचिनदाना संगीताची गोडी लागावी आणि त्या अंकुराचा .वटवृक्ष व्हावा हा एक अद्भुत चमत्कार होता पण तो घडला! आकाशात बसलेल्या गंधर्वमंडळींना कदाचित त्या राजपुत्राच्या प्रतिभेची कल्पना असावी, म्हणूनच राजघराण्याच्या विरोधात जाऊन गाणे शिकण्याचे धाडस त्यांनी दाखवले. १९३० च्या दशकात त्यांनी रेडिओ आणि बंगाली संगीतात भरपूर मुसाफ़िरी केली आणि १९४४ मध्ये अशोक कुमारांच्या काही चित्रपटांसाठी संगीत देण्यासाठी मुंबई गाठली. पुढील काही वर्षात त्यांना यश मिळालेही पण हळव्या मनाच्या बर्मन दादांना मुंबईची स्पर्धा रुचली नाही आणि ते .कलकत्त्याला परत जाण्यासाठी अगदी रेल्वेमध्ये बसलेही होते पण तसे होणे नव्हते, त्याना मनधरणी करून परत नेण्यात आले आणि पुढचा इतिहास आहे!
देव आनंदच्या नवकेतन बॅनर साठी सचिनदांनी पहिल्यांदा 'अफसर' ला संगीत दिले आणि पुढची चोवीस वर्षे नवकेतनचा चित्रपट आणि बर्मनदांचे संगीत हे समीकरण बनले. बाजी, जाल, टॅक्सी ड्रायवर, मुनिमजी, पेयिंग गेस्ट, सोलवा साल, काला बाजार, बात एक रात की, तेरे घर के सामने, गाईड, ज्वेल थीफ, प्रेम पुजारी.. पन्नास आणि साठच्या दशकामधले हे सुमधुर संगीत असलेले चित्रपट, एका पेक्षा एक सुंदर सांगीतिक अनुभव आहेत! सचिनदांचे संगीत काळाच्या चौकटीत कधीच बसणारे नव्हते. जितका त्यांची शास्त्रीय संगीतावर आणि बंगाली लोकसंगीतावर पकड होती, तितकेच त्यांचे वेस्टर्न वरती प्रेम होते, त्यांचे संगीत प्रवाही होते म्हणून आजही ते आउटडेटेड वाटत नाही. त्यांच्या संगीतामध्ये मूड्स दडलेले असतात, एकाच चित्रपटात ते विविध .जॉनर वेगवेगळ्या मूड्स मध्ये वेगवेगळ्या गायकांकडून गाउन घेत, त्यामुळे त्यांचे संगीत कधीच एकसुरी झाले नाही.
हरहुन्नरी किशोर कुमारला त्यानी देवचा आवाज बनवला. किशोर कुमारला आराधना मधून त्यांनीच शिखरावर नेऊन बसवले पण ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीनवरचा देव आणि त्याला किशोरचा आवाज - अतुलनीय! पेईंग गेस्ट मधले खट्याळ 'छोड दो आंचल' असो किंवा तीन देवीया मधले चार्मिंग 'ख्वाब हो या कोई हकिकत', देवचा नायिकेभोवती पिंगा घालणारा नायक किशोरने अचूक टीपला!
मोहम्मद रफी हा देवाने केवळ स्वतः गाता येत नसावे म्हणून आपल्यासाठी पाठवलेला देवदूत होता. सचिनदानी जर देवच्या हॅपी गो लकी इमेज साठी किशोरला वापरले असेल तर 'अपसेट' देव साठी रफी साहेबांइतका तरल आवाज स्वाभाविक होता. गाईड मधले अजरामर गायकीचा नमुना असलेले 'दिन ढल जाए' असो की आशा भोसले सोबतचे 'अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना' असो, रफी साहेबानी त्यांच्या गळ्यातली नशीली तार देव साठीच राखून ठेवली होती! हिंदी सिनेसंगीतामधली काही अजरामर डुयेट्स 'दिल पुकारे आरे आरे', 'तेरे मेरे सपने' असो किंवा बेधुन्द 'खोया खोया चांद' असो पडद्यावरचा देव आणि दैवी आवाजात गाणारे रफी - आजही 'सिनॉनिमस' आहेत. हेमंतकुमारांना हिंदीत आणण्याचे श्रेयही सचिनदांना जाते - देव साठी! सोलवा साल मधले 'हैं अपना दिल तो आवारा' आणि ती हारमॉनिका किंवा 'बात एक रात की' मधले हॉँटिंग 'ना तुम हमे जानो', हेमंतदाच्या खर्जातल्या आवाजाला बर्मदानी देवआनंद साठी अचूक वापरले. जरी रफी आणि किशोर देव आनंदसाठी ठरलेले आवाज होते तरी सचिनदानी गाण्याला भाव देणारे गायकच नेहमी वापरले. 'टॅक्सी ड्रायवर' मधले तलत मेहमूदच्या तरल गळ्यातले 'जाए तो जाए कहाँ' दुसर्या कुणी इतक्या उत्कटतेने कदाचितच गायले असते. सचिनदा आणि देव आनंद यांची गाणी म्हणजे वेगवेगळ्या इमोशन्सचा रंगीबेरंगी कॅनव्हास आहे. बाजी साठी साहिर लुधियानवि ने एक सुंदर गजल लीहली होती - सचिनदानी तिला क्लब सॉँग बनवले, पण काय बनवले .. 'तद्बीर से बिगडी हुई तक्दीर बना ले, अपने पे भरोसा है तो यह दाव लगा ले' . पदार्पणापासून अखेरपर्यंत आघाडीवर राहिलेले एस.डी.बर्मन एकमेव संगीतकार असावेत. किशोरकुमार यांना सर्वप्रथम पार्श्वीगायनाची संधी दादा बर्मन यांनीच दिली. ते किशोरदांना आपला दुसरा पुत्र मानत. किशोरदा व महमद रफी या अत्युच्च शिखरावरील पार्श्वेगायकांना जवळजवळ समान संख्येत गीते देणारेही ते एकमेव संगीतकार होत. देव आनंद हे त्याचे ठळक उदाहरण होय. ‘मिली’ चित्रपटातील ‘बडी सुनी सुनी है’ हे सचिनदा रुग्णालयात असताना ध्वनिमुद्रित झालेले गीत किशोरदांच्या काही सर्वोत्कृष्ट गीतांपैकी एक आहे. सचिनदांनी १४ हिंदी आणि १३ बंगाली चित्रपटांसाठी पार्श्वागायन केले. मा.एस.डी. बर्मन यांचे ३१ ऑक्टोबर १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / Ganesh Shelke
October 31, 2016
आज ते हयात नाहीत. ते कथालेखक, स्तंभलेखक. गुन्हे कथालेखन हा त्यांनी आयुष्यभर हाताळलेला साहित्य प्रकार. साधी, सरळ, सोपी भाषेत कथाचित्र डोळ्यांसमोर उभे करण्यात हातखंडा. अनेक कथासंग्रह प्रकाशित. उपप्राचार्य ते उपसंपादक पदावर कार्य केले. उत्तम वक्तृत्व. सूत्रसंचालक.
दिवंगत प्रा. एकनाथ आबूज.
त्यांनी बीडमध्ये कल्पना प्रकाशन सुरू केलं. आम्हा नवोदितांना हक्काचा मंच मिळाला. प्रकाशक कसा असावा याच उत्तम उदाहरण. माझी पहिली कादंबरी 'पांढरा कावळा' त्यांनीच प्रकाशित केली. राज्य शासनाचा साने गुरूजी पुरस्कार मिळाला. त्यांना इतका आनंद झाला. घरी बोलावून माझा सन्मान केला. दादासाहेब सादोळकर सोबत होते. पुढे कादंबरीस बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरचा पुरस्कार लाभला.त्यांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित केली. तीही संपली. तिसरी आवृत्तीही प्रकाशित केली. आता चौथ्या आवृत्तीसाठी सर नाहीत याची सल मनात आहे.
माझ्या लेखनाविषयी भरभरून बोलत. तो आनंद चेहर्यावर स्पष्ट दिसायचा. 'बटाटीची धार' हा माझा कथासंग्रहही त्यांनीच प्रकाशित केला. पुन्हा एका कादंबरीची चर्चा झाली. मी लिहिणार होतो. ते प्रकाशित करणार होते. त्यांच्या पश्चात ती अपूर्ण आहे.
त्यांच्या सहवासात घडलो आम्ही. माझ्यासह अनेक मित्रही. मित्रनगरातील घर आमच्यासाठी संकुलच होते. आज तिथे सर नाहीत. पुस्तकंही नाहीत. सुने-सुने वाटते.
साहित्यिक दिशांचे होकायंत्रच जणू ते! आठव दाटतो.
विठ्ठल जाधव
शिरूरकासार, बीड
पुण्यनगरी मध्ये पूर्वप्रकाशित
November 9, 2016
नाटय़, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा तिन्ही माध्यमांद्वारे रसिकांत लोकप्रिय झालेले फारुख शेख यांनी वकिलीचे शिक्षण घेत असतानाच नाटय़क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा जन्म २५ मार्च १९४८ रोजी झाला. ७०-८० च्या दशकात फारूक शेख यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. समांतर चित्रपट आणि तसेच मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये त्यांचा मुक्त संचार सुरू होता. त्यांिनी अनेक दर्जेदार चित्रपट दिले. विनोद आणि संवेदनशील विषयांवर त्यां चा हातखंडा होता. नुरी, शतरंज के खिलाडी, चष्मेतबद्दुर, गरम हवा इत्यािदी चित्रपट गाजले. `क्लब ६०′ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. `यह जवानी है दिवानी’ या चित्रपटामध्ये त्यांनी रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेला सिकंदर मिर्झा प्रेक्षकांना खूपच भावला होता.
सहजसुंदर अभिनय ही त्यांची जमेची बाजू होती. मा.फारुक शेख यांनी अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केले होते. `चमत्कार’, `जी मंत्रीजी’, `श्रीकांत’ या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने एक वेगळाच प्रभाव निर्माण झाला होता. झी टिव्हीवरील प्रसिद्ध `जीना इसी का नाम’ या शोचे त्यांनी सूत्रसंचालन केले होते. या शोमध्ये त्यांनी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची मुलाखतही घेतली होती. सत्यजित रे, मुज्जफर अली, हृषिकेश मुखर्जी आणि केतन मेहता यांसारख्या दिग्दर्शकांसोबत फारुक शेख यांनी काम केले होते. शबाना आझमी, दीप्ती नवल अशा अभिनेत्रींसोबत फारूक शेख यांची जोडी अधिक गाजली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांच्या आवाजामध्ये एक वेगळेपणा होता. त्यांची विनोदशैली आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची वृत्ती यासाठी फारुक शेख यांची ओळख होती.
फारुख शेख निव्वळ कलाकार नव्हते, तर माणुसकी जपणारे कलाकार होते. एक अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता, प्रचंड अभ्यासू कलावंत, असे फारुख शेख यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, निरागस चेहरा आणि सहजसुंदर अभिनय या गुणांमुळे समांतर चित्रपटांत काम करतानाही फारुख शेख सर्वसामान्य चित्रपट रसिकांचे ‘नायक’ बनलेले होते. फारुख शेख यांचे २७ डिसेंबर २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 28, 2017
सामाजिक कार्यामुळे लाखोंचा पोशिंदा झालेले भवरलाल जैन यांनी आपली ‘भाऊ’म्हणून ओळख निर्माण केली होती. भंवरलाल जैन यांचे दहावीपर्यंत शिक्षण आर. आर. हायस्कूलमध्ये तर बी. कॉम, एलएल.बी. मुंबई विद्यापीठातून केले. महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती जेव्हा मुंबई-पुण्यापलिकडे जात नव्हती, तेव्हा भवरलाल जैन यांनी स्वत:च्या औद्योगिक साम्राज्याचा पाया जळगावात रचला.
March 1, 2024
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याचे प्रवर्तक अब्दुल करीम खाँ यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८७२ रोजी झाला. अब्दुल करीम खाँ साहेबांनी आपले काका अब्दुल्ला खान व वडील काले खान यांचेकडे सांगीतिक शिक्षण घेतले. त्यांचे दुसरे काका नन्हे खान यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. गायनाबरोबरच त्यांनी सारंगी, सतार, वीणा व तबलावादनात नैपुण्य प्राप्त केले. अब्दुल करीम खाँ साहेबांना म्हैसूर राज दरबारात गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तिथे त्यांची गाठ कर्नाटकी संगीतातील अनेक सुप्रसिद्ध गायक प्रभृतींशी पडली. त्यांच्या गायनाचा प्रभाव अब्दुल करीम खाँ साहेबांच्या गायकीवरही पडला. त्यांनी कर्नाटकी संगीताचा कसून अभ्यास केला.
कर्नाटकी संगीतातील अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या गायकीतही दिसून येत असत. ते फक्त उत्तर भारतातच नव्हे तर दक्षिण भारतातही आपल्या गाण्यासाठी लोकप्रिय होते. दक्षिण भारतात त्यांना अनेक ठिकाणांहून गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी खास बोलाविले जाई. त्यांनी दाक्षिणात्य कवी त्यागराजयांच्या कृतीही ध्वनिमुद्रित केल्या आहेत.. अनेकदा लोक तिथे त्यांच्या गळ्यात मोठमोठे हार घालून त्यांचे स्वागत करण्याबरोबर त्यांची मिरवणूकही काढत असत. खाँ साहेब वैयक्तिक आयुष्यात मात्र अतिशय साधे होते. म्हैसूर राज दरबारी ते नित्य नियमाने हजेरी लावत असत. त्यांना तिथे 'संगीत रत्न' उपाधी देऊन गौरविण्यात आले. म्हैसूरच्या वाटेवर ते धारवाडला आपल्या भावाकडे मुक्काम करत असत. तिथेच त्यांनी आपले ख्यातनाम शिष्य सवाई गंधर्व यांना गाणे शिकविले.
१९०० मध्ये आठ महिने त्यांनी सूरश्री केसरबाई केरकर यांनाही गाणे शिकविले. पुढे केसरबाईंनी गायन क्षेत्रात खूप नाव कमावले. १९१३ मध्ये अब्दुल करीम खाँ साहेबांनी पुणे येथे आर्य संगीत विद्यालयाची स्थापना केली. येथे ते भविष्यातील गायक तयार करू लागले. अब्दुल करीम खाँ साहेबांना वाद्यांविषयीही कमालीचा जिव्हाळा होता. ते वाद्ये दुरुस्त करण्यात पटाईत होते. त्यांच्याजवळ वाद्ये दुरुस्तीसाठी लागणारी सामग्री सदैव असे. मिरज येथील नामवंत सतार व तानपुरा बनविणारे कारागीर देखील त्यांचा सल्ला शिरोधार्थ मानत व अनेकदा त्यांचे मार्गदर्शन घेत असत. आर्य संगीत विद्यालयाची दुसरी शाखा १९१७ साली मुंबई येथे सुरू झाली. परंतु ती दोन - तीन वर्षांपलीकडे जास्त टिकली नाही. नंतर ते मिरज येथे स्थायिक झाले.
अब्दुल करीम खाँ साहेबांच्या शिष्यांत सवाई गंधर्व, सुरेशबाबू माने, बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, दशरथबुवा मुळे, रोशन आरा बेगम, हिराबाई बडोदेकरइत्यादी प्रतिभावंत गायकांचा समावेश होतो. त्यांच्या 'जमुना के तीर', 'गोपाला करुणा क्यूं नही आवे', 'पिया के मिलन की आस', 'नैना रसीले', 'पिया बीन नही आवत चैन' यांसारख्या अजरामर ध्वनिमुद्रणांनी आजही ते रसिकांच्या हृदयात घर करून आहेत. दर वर्षी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ऑगस्ट महिन्यात मिरज येथे मोठा संगीत महोत्सव साजरा होतो. भारतातील नामी कलावंत तेव्हा येऊन आपली कला सादर करतात व उस्तादांच्या प्रती आपला आदर व्यक्त करतात. अब्दुल करीम खाँ यांचे २७ ऑक्टोबर १९३७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 17, 2017
अर्धवट शिक्षण सोडून ते इंग्लंडला गेले. त्यानी रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स या लंडनमधील प्रसिद्ध संस्थेतून नाट्यविषयक पदवी मिळवली.
August 12, 2021
पृथ्वीराज कपूर यांचे वडील दिवाण बसेश्वरनाथ कपूर हे पोलिस उपनिरीक्षक होते. बसेश्वर यांची बदली पेशावर येथे झाल्याने कपूर खानदान या शहरात राहायला आले. पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार (मूळ शब्द किस्सा कहानी, मग त्याचा अपभ्रंश झाला.) परिसरातील डाकी नालबंदी भागात कपूर खानदानाचे पिढीजात घर आहे. पृथ्वीराज कपूर यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९०६ रोजी पाकिस्तानातील फैसलाबाद येथे झाला. पृथ्वीराज कपूर यांचे सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण ल्यालपूर येथील खालसा कॉलेजमध्ये झाले होते. त्यानंतरचे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पेशावरमधील एडवर्ड्स महाविद्यालयात झाले. एडवर्ड्स महाविद्यालयातील प्राध्यापक जय दयाळ हे कलाप्रेमी होते. पृथ्वीराज कपूर यांच्यातील अभिनेत्याला पहिली संधी मिळाली ती याच महाविद्यालयात. एडवर्ड्स महाविद्यालयातून पृथ्वीराज कपूर बी.ए. झाले. पृथ्वीराज कपूर यांचे खरे प्रेम नाटकांवरच होते. त्यामुळे पुढे साहजिकच त्यांची पावले नाट्य व चित्रपटसृष्टीकडेच वळली. १९२८ मध्ये पृथ्वीराज कपूर मायानगरी मुंबईमध्ये आले आणि मग कायमचे इथलेच झाले. पृथ्वीराज कपूर यांचा विवाह पेशावरमध्ये रामसरनी मेहरा यांच्याशी झाला. त्या वेळी पृथ्वीराज यांचे वय होते १७ वर्षांचे, तर त्यांच्या पत्नीचे वय होते १४ वर्षांचे. पृथ्वीराज कपूर यांनी मुगल-ए-आझम या सिनेमात साकारलेली अकबरची भूमिका अविस्मरणीय आहे. पृथ्वीराज कपूर यांना तीन मुले एक मुलगी. शम्मी कपूर, राज कपूर आणि शशि कपूर व उर्मिला सियाल. आपले आजोबा पृथ्वीराज कपूर यांच्यासोबतचा ऋषी कपूर यांचा लहानपणाचा एक किस्सा एका पुस्तकातील.
‘लहानपणीच चित्रपटसृष्टीशी माझी ओळख झाल्याबद्दल मी खरोखरच खूप ऋणी आहे. हिंदी सिनेमातल्या काही ऐतिहासिक क्षणांचा मी साक्षीदारही आहे. त्यावेळी मी साधारण सहा वर्षांचा होतो. आजोबांनी (पृथ्वीराज कपूर) डब्बू (रणधीर कपूर), रितू (रितू नंदा) आणि मी.. असं आम्हा तिघांना गोळा केलं, अक्षरश: आम्हा तिघांचं गाठोडं करून त्यांच्या छोट्याशा ओपेल कारमध्ये घातलं आणि असीफसाब (के. असीफ) दिग्दर्शित करीत असलेल्या मुगल-ए-आझम या ऐतिहासिक चित्रपटाच्या भव्यदिव्य अशा सेटवर ते आम्हाला घेऊन गेले. मला मात्र खुद्द ‘अकबर बादशहा’नंच आपलं बोट धरून या चित्रपटाच्या सेटवर नेल्याच्या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होता आलं. माझ्या आयुष्यातली ती रणरणती दुपार म्हणजे एक अमूल्य असा ठेवा आहे. त्या दिवसाचा क्षण अन् क्षण आजही माझ्या मनात अगदी आज, आत्ता घडल्यासारखा ताजा, रसरशीत आणि जिवंत आहे.
भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. याशिवाय त्यांना हिंदी सिनेसृष्टीत मानाचा समजल्या जाणा-या दादासाहेब फाळके या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. पृथ्वीराज कपूर यांचा मुलगा राज कपूर यांनी कपूर घराण्याचा अभिनयाचा वारसा पुढे नेला आणि हिंदी सिनेसृष्टीला मोलाचे योगदान दिले. पृथ्वीराज कपूर यांचे निधन २९ मे १९७२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / समीर परांजपे
May 29, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti