(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • ज्येष्ठ संगीतकार रोशन

    हिंदी चित्रपट सृष्टीचा सन १९५० ते १९७०  हा चित्रपट संगीताच्या दृष्टीने सुवर्ण काळ मानला जातो. या काळात अनेक प्रथितयश संगीतकारांनी अनमोल अशा गाण्यांची रसिकांवर अगदी बरसात केली. नुसते गाण्यांवर चित्रपट चालण्याचे ते दिवस होते. ज्येष्ठ संगीतकार रोशन यांनी याच काळात आपल्या सुमधुर गीतांची देणगी चित्रपट सृष्टीला  दिली.

  • प्रभावी वक्ते व उत्तम लेखक शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर

    सुमारे ४०० वर्षांपूर्वी गोव्यातील सक्तीने ख्रिश्चन केलेल्या हजारो गावकऱ्यांचे शुद्धीकरण केले. या शुद्धीकरण आंदोलनात मामांचा सिंहाचा सहभाग होता. या घटनेचे सांगोपांग विवेचन करणारा ‘गोमंतक शुद्धीचा इतिहास’ हा ४०० पानांचा स्वतंत्र विस्तृत ग्रंथ मामांनी लिहिला. विशेष म्हणजे या ग्रंथाला, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सुंदर प्रस्तावना लाभली.

  • दिग्दर्शक आणि निर्माते ताहिर हुसेन व अमीर खान

    जिद्दीच्या बळावर हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:च्या कर्तृत्वाचा खोल ठसा उमटवलेल्या दिग्दर्शक आणि निर्माते ताहिर हुसेन यांचे घराणे मुळचे अफगाणिस्तानातले, पश्तुन वंशाचे. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याशी हुसेन यांच्या घराण्याचे संबंध होते. महाविद्यालयात शिक्षण घेतानाच, त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करायचा निर्णय घेतला होता. प्रारंभी मुंबईतल्या स्टुडिओत संवाद लेखक, सहदिग्दर्शक आणि अन्य कामे करीत करीत हुसेन यांनी चित्रपट निर्मितीचे तंत्र समजून घेतले.

    जब प्यार किसी से होता है, हा त्यांनी १९६१ मध्ये दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट प्रचंड गाजला. त्याला अमाप लोकप्रियता मिळाली. धंदेवाईक तडजोडीला नकार देणारे हुसेन यांनी पन्नास वर्षात मोजकेच चित्रपट काढले पण ते सर्व उत्कृष्ट होते. तिसरी मंझिल, या चित्रपटात शम्मी कपूर आणि आशा पारेख यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटातली गाणी बरीच वर्षे गाजत आहेत. अनामिका, जखमी, प्यार का मौसम, जब प्यार किसी से होता है, जन्म जन्म का साथ, मदहोश, कारवॉं, तुम मेरे हो, दुल्हा बिकता है, लॉकेट, खून की पुकार, हे त्यांनी दिग्दर्शित आणि निर्मिती केलेले चित्रपट देशभरातल्या चित्रपटगृहात रौप्यमहोत्सवी ठरले होते.

    चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन करताना प्रवाही कथेबरोबरच चित्रपटांची तंत्र शुध्दताही त्यांनी सांभाळली. अनेक नव्या कलाकारांना संधी देतानाच, तंत्रज्ञही घडवले. ही त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीला देणगी होय! साध्या, सोप्या प्रेमकथेवरचा प्यार का मौसम हा चित्रपट तेव्हाच्या युवकांत अत्यंत लोकप्रिय झाला होता. अनामिका हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही प्रदर्शित झाला होता. चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक आमिर खान हा मा.ताहिर हुसेन यांचा मुलगा. त्यांच्या तालमीतच आमिर खान तयार झाला. ताहिर हुसेन हे लेखक आणि पटकथा लेखक होते. पटकथा लिहिताना ते भारतीय प्रेक्षकांची नाडी ओळखूनच संवाद लेखन करीत. तशीच गीतेही चित्रपटासाठी गीतकारांकडून लिहून घेत. सर्वांना माणुसकीने वागवणारा निर्माता आणि दिग्दर्शक असा त्यांचा चित्रपटसृष्टीत लौकिक होता. मा.ताहिर हुसेन यांचे २ फेब्रुवारी २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

    ताहिर हुसेन यांचे चित्रपट
    निर्माता- कारवाँ (1971), अनामिका (1973), मदहोश (1974), जख्मी (1975), फिर जनम लेंगे हम (1977), खून की पुकार (1978), दूल्हा बिकता है (1982), लॉकेट (1986), हमारा खानदान (1988), तुम मेरे हो (1990), हम हैं राही प्यार के (1993),
    दिग्दर्शक - तुम मेरे हो (1990)

  • पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर

    डॉ. नारळीकर एक जगद्विख्यात शास्त्रज्ञ तर आहेतच पण ते उत्तम साहित्यिकही आहेत.

  • आजचा तानसेन, फरिश्ता, शापित गंधर्व….

    अमृतसरच्या एका गावातून रोज एक फकीर गाणी म्हणत जायचा आणि त्याच्या मागे मागे एक चिमुरडा फकीरच्या पाठोपाठ तीच गाणी म्हणत त्याचा पाठलाग करायचा. फकीर कुठे आराम करण्यासाठी थांबला तर त्या वेळात त्या गाण्यांचा सराव हा चिमुरडा करायचा, हे अगदी रोज घडायचं. एक दिवस या छोट्या मुलाला ती गाणी म्हणताना त्या फकिराने ऐकलं, त्याला कडेवर उचलून घेत त्याला म्हणाला, बाळा... तू एक दिवस खूप मोठा गायक होशील..

    हा चिमुरडा म्हणजेच हिंदी चित्रपट संगीताचा सर्वोत्कृष्ट आणि जगातल्या उत्तम गायकांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं, असे मोहम्मद रफी... आजचा तानसेन, फरिश्ता, शापित गंधर्व अशा कितीतरी नावांनी जग रफींना ओळखतं. आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी त्या काळच्या प्रत्येक मोठ्या संगीतकाराबरोबर काम केलं. शास्त्रीय असूदेत नाहीतर देशप्रेमाची गाणी नाहीतर कव्वाली, भजन असूदेत नाहीतर गझल, त्यांनी प्रत्येक मूडची गाणी म्हटली पण रफी जर सर्वात लोकप्रिय असतील तर ती प्रेम गीतं आणि युगलगीतांसाठी. त्यांनी त्या त्या काळच्या प्रत्येक मोठ्या कलाकारासाठी गाणी म्हटली आणि जॉनी वॉकरसाठी तर रफी वेगळा आवाज काढायचे. किती आणि काय लिहिणार रफींबद्दल ! जेवढं लिहू तेवढं कमीच...

    त्यांच्या उदारतेचे अनेक किस्से सांगितले जातात. या रुपेरी सृष्टीत त्यांनी अनेकांना मदत केली, एवढंच नाही तर कोणीही असूदेत अगदी कोणीही त्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने आलेला कधीच रिकाम्या हाताने परत जात नसे. रस्त्यावरच्या भिकाऱ्यांच्या हातावरही काही ठेवल्याशिवाय ते पुढे जात नसत. अशा अतिशय दानी, मृदू स्वभावी, गोड गळ्याचा शापित गंधर्व, माझा देव १९८० साली आजच्याच दिवशी या इहलोकला सोडून पैगंबरवासी झाला. अनेक अनेक लोकांसाठी हा मोठा धक्का होता आणि तो ही अनपेक्षितपणे बसलेला. शेवटी त्यांना जेव्हा रुग्णालयात नेलं तेव्हा त्यांना अत्यवस्थ अवस्थेत बघून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही हातपाय गळाले. त्यांना जेव्हा मृत घोषित करण्यासाठी डॉक्टर त्यांच्या घरच्या लोकांजवळ आले तेव्हा म्हणाले, माझे प्राण देऊनही मी रफींना वाचवू शकलो असतो तर मी ते ही केलं असतं. वैद्यकीय शास्त्र एवढंही पुढारलेलं नाही, नाहीतर मी रफीसाहेबांचा गळा जतन करून ठेवला असता. डॉक्टर रफींचे मोठे चाहते होते.

    या चित्रपटसृष्टीत प्रत्येकाचा एक काळ असतो. जेव्हा एक तारा उगवतो, तेव्हा हळूहळू जुने तारे अस्ताला जात असतात. असंच थोडंफार घडलं जेव्हा किशोर कुमार या चित्रपटसृष्टीत आला. चित्रपट संगीत हळूहळू बदलत होतं. मेलडीचा काळ सरत होता, बदलत्या चित्रपटसंगीताबरोबर हळूहळू रफींबरोबर किशोर युग यायला लागलं. रफींचं एक साम्राज्य होतं आणि त्याला टक्कर देण्यासाठी किशोर सज्ज होता पण ही स्पर्धा फक्त व्यावसायिक स्तरावर होती, व्यक्तिगत जीवनात हे दोघे अतिशय चांगले मित्र होते. आपली जागा कोणीतरी घेऊ पहात आहे म्हणत रफींनी कधीही किशोरचा दुस्वास केला नाही, उलट किशोरला आपला लहान भाऊ मानलं आणि किशोरनेही आपल्याला मिळणाऱ्या यशाचा माज रफींसमोर कधीही दाखवला नाही, किशोरच्या मनातही या भावना कधीच नव्हत्या. या दोघांच्या घट्ट मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जातात. रफी गेल्याची बातमी जेव्हा पसरली आणि ती किशोरच्या कानावर आली तेव्हा तडक किशोरने रफींचं घर गाठलं. त्या वेळी रफींच्या घरी येणारं पहिलं जर कोणी असेल तर तो होता किशोर कुमार. रफींच्या पार्थिवाजवळ बसून किशोर कित्येक तास रडत होता, अगदी जनाजा उठेपर्यंत... ही माणसंच वेगळी होती. हे असं प्रतिस्पर्ध्यांमधलं प्रेम हल्ली बघायला नाही मिळत.

    रफींच्या घराजवळ एक विधवा बाई रहायची. तिला दर महिन्याला ठराविक दिवशी एका निनावी व्यक्तीकडून मनी ऑर्डर मिळायची. दर महिन्याला अगदी न चुकता हे घडायचं. एकदा सलग दोन तीन महिने तिला ही मनी ऑर्डर मिळाली नाही. तिने डाकघरात जाऊन चौकशी केली. तेव्हा तिला कळलं की आपल्या शेजारी राहणारे मोहम्मद रफी तिला दर महिन्याला पैसे पाठवायचे. ती बाई हे कळल्या कळल्या तिथे पोस्टातच ढसाढसा रडायला लागली.

    ही अशी लोकं सारखी सारखी जन्माला येत नाहीत, फार क्वचित. कुठे एखाद्या गंधर्वाला शाप मिळतो आणि तो शाप भोगायला त्याला मृत्युलोकात यावं लागतं.

  • विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ओम प्रकाश सैनी

    राजधानी दिल्लीतील न्यायालयीन वर्तुळात ओ पी सैनी यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. मजबूत शरीरयष्टीचे सैनी हे मूळचे हरयाणाचे. न्यायपालिकेत येण्यापूर्वी ते दिल्ली पोलीस दलात उपनिरीक्षक होते. १९८७ मध्ये न्यायदंडाधिकारी पदासाठी झालेल्या स्पर्धा परीक्षेत तेव्हा अनेक उमेदवार बसले होते. पोलीस दलातून फक्त एकच जण ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला. ते होते अर्थात ओ पी सैनी!

  • अभिनेता दिलीप जोशी

    तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतीलच एक महत्त्वाचं पात्र म्हणजे जेठालाल गडा. ‘जेठालाल गडा’, ‘दया’ आणि त्यांच्या कुटुंबाभोवतीच या मालिकेचं कथानक फिरतं. १९९७ मध्ये क्या बात है या टी.व्ही. मालिकेतून दिलीप जोशी यांनी करिअरला सुरुवात केली.

  • मराठी अभिनेत्री रंजना देशमुख 

    सुप्रसिध्द अभिनेत्री वत्सला देशमुख यांची कन्या असलेल्या रंजना देशमुख यांनी लहानपणीच कलाक्षेत्रात पदार्पण केले.

    १९७०-८०च्या दशकांत अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांमधून रंजना देशमुखांनी विविधांगी भुमिका साकारल्या. व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून १९७५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या झुंज या चित्रपटातून प्रमुख नायिकेची भूमिका साकारली. ‘अरे संसार संसार’ आणि ‘गुपचुप गुपचुप’ या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजना देशमुखला राज्यसरकारचा ‘उत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

    रंजना देशमुख यांचे इतर प्रमुख चित्रपट म्हणजे ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘जखमी वाघीण’, ‘भुजंग’, ‘एक डाव भुताचा’, आणि ‘चानी’. रंजना देशमुख यांनी ‘फक्त एकदाच’ या नाटकातून मराठी रंगभूमीवर पदार्पण केले.

    मराठी १९८७ मध्ये ‘झुंजार’च्या चित्रीकरणासाठी तेव्हाच्या बंगलोरला जाताना मोटार अपघातात त्या कायमच्या अपंग झाल्या. पायच निकामी झाल्याने त्यांची चित्रपट कारकीर्दच अकस्मात संपुष्टात आली.

    रंजना यांचे ३ मार्च २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ : इंटरनेट

  • भारतीय बुद्धिबळ खेळाडू कोनेरू हंपी

    २००५ मध्ये १० बुद्धिमान महिला खेळाडूंविरुद्धच्या नॉर्थ उरलस कप स्पर्धेतही तिने बाजी मारली. २००६ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक तर जिंकलेच, शिवाय आणखी एक सुवर्णपदक तिने मिश्र सांघिक गटातही जिंकले. त्यानंतर २०१५ ला चीनमधली चेंगडू इथे भरलेल्या महिला सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवले. २०१९ मध्ये ती जागतिक रॅपिड चॅम्पियन ठरली.

  • पहिली स्त्री दिग्दर्शिका फातमा बेगम

    फ्रान्सचा जॉर्ज मेलिएस हा फन्टासी चित्रपटाचा जनक मानला जातो. याच धर्तीवर फातिमा बेगम यांना भारतीय फन्टासी चित्रपटाचे श्रेय देण्यात यायला काहीच हरकत नाही. निर्माती, अभिनेत्री व दिग्दर्शक म्हणून “बुलबुल-ए-परीस्तान” “हिर रांझा”, “नसीब की देवी”, “चंद्रावली”, “कनकतारा”, “शंकुतला” “मिलन” आणि “गॉडेस ऑफ लक” हे सर्वच मूकपट त्याकाळी खूप गाजले. खरे तर १९२० चे दशक स्त्रियाच नाही तर पुरुषांनीही चित्रपटात काम करणे यानां मान्यता देणारे नव्हते त्यामुळे अशा पार्श्वभूमिवर फातमा बेगम सारखी सनातनी मुस्लिम कुटूंबातील स्त्री येथे येऊन निर्माती, लेखक, दिग्दर्शक व अभिनेत्री म्हणून आपले स्थान निर्माण करते ही खरोखरच कौतुकांची व विचार करण्यासारखी बाब आहे. आज चित्रपटसृष्टीतील स्त्रियांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्याच्या मागे जे प्रेरणास्त्रोत असतात ते फातमा बेगम सारख्या जिद्दी स्त्रीचे. १९३८ चा “दुनिया क्या कहेगी” हा त्यांचा शेवटचा चित्रपट.