नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून ‘बाबांची शाळा’ हा मराठी चित्रपट निघाला होता. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते. नीला सत्यनारायण यांच्या ‘ऋण’कादंबरीवर आधारित समीर सुर्वेला यांनी ‘जजमेंट’हा मराठी सिनेमा बनवला.
February 5, 2022
जुन्या काळातील चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांना आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक म्हणून ओळखले जायचे.
October 1, 2019
रेनकोटचा शोध लावणाऱ्या चार्ल्स मॅकिन्टॉश यांचा जन्म २९ डिसेंबर १७६६ रोजी स्कॉटलंडमधल्या ग्लासगोव्हमध्ये झाला. स्कॉटलंडमधील ग्लासगोव्हमध्ये राहणारे चार्ल्स मॅकिन्टॉश हे केमिस्ट होते. चार्ल्स यांना रसायनशास्त्रात फारच रुची होती. कामावरून घरी आल्यानंतर ते रसायनशास्त्राचा अभ्यास करायचे. एका कार्यक्रमात चार्ल्स यांना कोळसा आणि नाफ्तापासून रबरचा वापर करता येईल, अशा तंत्रासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी रेनकोटचा शोध लावण्यास सुरुवात केली. वेगवेगळे प्रयोग करण्यात ते नेहमीच व्यस्त असायचे.
नाफ्ता हा रबरमध्ये सहजासहजी विरघळतो. यापासून एक पदार्थ तयार होतो जो जलरोधक असतो हे चार्ल्स यांना एका प्रयोगादरम्यान कळले. त्यांनी दोन कपड्यांच्यामध्ये हे मिश्रण लावले हा कपडा पाण्यात भिजला तरी त्यातून पाणी आत झिरपणार नाही हे चार्ल्स यांना कळले. लोकरीच्या दोन अस्तरांना वितळवलेल्या रबरने जोडले आणि अस्तर शिवून कोट बनवला. जलरोधक कापड बनवण्याचे पेटंट त्यांना १८२३ मध्ये मिळाले. पण त्याकाळात त्यांच्यावर आरोपही झाले हा शोध खरं तर त्यांचा नसून सर्जन जेम्स सिम यांच्याकडून त्याने ही कल्पना घेतली असेही आरोप झाले.
चार्ल्स यांचा हा शोध खूपच महत्त्वाचा मानला जातो. कारण पावसात स्कॉट नागरिकांचे बाहेर फिरताना हाल व्हायचे. छत्री होती पण ती असून नसल्यासारखीच. तसे जलरोधक कपडे होते पण त्यांचे वजनच खूप असायचे आणि त्याला कुबट वासही यायचा त्यामुळे अर्थात चार्ल्सने शोधलेल्या या नवीन रेनकोटला प्रसिद्धी लाभली नाही तर नवलच म्हणावे लागेल. चार्ल्स मॅकिन्टॉशचा हा पहिलावहिला रेनकोट जगभरात प्रचंड प्रसिद्ध झाला. त्यानंतर मूळ रेनकोटमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. चार्ल्स मॅकिन्टॉश यांचं २५ जुलै १८४३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 29, 2018
१९४८ साली आलेल्या ‘आग’मध्ये राज कपूर यांच्यासाठी मा.मुकेश यांनी पार्श्वगायन केले. येथूनच मग राज कपूर-मा.मुकेश हे समीकरण जुळले आणि उदयास आली अवीट गोडीची श्रवणीय गाणी! आग, आवारा, श्री ४२०, बरसात, परवरिश, अनाडी, संगम ते मेरा नाम जोकर असे मा.मुकेश यांच्या सदाबहार गाण्यांनील नटलेले ‘आरके’ कॅम्पमधले चित्रपट म्हणजे कानसेनांना मेजवानीच ठरली.
July 22, 2017
मनोहर पर्रीकर २००० ते २००५ व २०१२ ते २०१४ ह्या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर होते. पर्रिकर यांच्याकडे गोव्याचे राजकारण आमुलाग्र बदलणारे नेते म्हणून गोव्यात पाहिले जाते. संघाच्या विचारधारेत वाढलेले पर्रिकर मोदींप्रमाणेच डिक्टेटर सारखे काम करतात. त्यांचाही त्यांच्या मंत्र्यांवर कमी विश्वास आहे. आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे चोवीस तास कामात घालविणारे पर्रिकर मोदींप्रमाणेच अतिशय शिस्तीचे, वेळेचे कोटेखोर नियोजन करणारे, स्वच्छ कारभार, साधी राहणी आणि मिडीयापासून दूर राहणारे नेते आहेत.
March 17, 2022
मराठी भाषेतील ज्येष्ठ विनोदी साहित्यिक विनायक आदिनाथ बुवा ऊर्फ वि. आ. बुवा यांचा जन्म ४ जुलै १९२६ रोजी झाला.
वि. आ. बुवा यांनी आपल्या लेखनाचा प्रारंभ १९५० मध्ये केला. मुंबई येथील व्ही. जे. टी. आय. तंत्र महाविद्यालयात बुवा यांनी रसायनशास्त्र विभागात १९८६ मध्ये निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. बुवा यांवे वक्तृत्व उत्तम असल्याने व्याख्याने व कथा-कथनासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्येही त्यांनी दौरे केले होते. संस्कृत भाषेचा त्यांचा अभ्यास होता. सुंदर हस्ताक्षराच्या जोरावर त्यांनी १९५० मध्ये इंदुकला नावाचा एक हस्तलिखित साहित्याचा अंक प्रकाशित केला होता. हे हस्तलिखित दर्जेदार स्वरूपात असल्याने साहित्यिकांचा चांगला पाठिंबा यास मिळाला. अनंत काणेकर, महादेवशास्त्री जोशी, चिं. वि. जोशी, दुर्गा भागवत, माधव मनोहर, गो. नी. दांडेकर, शांता शेळके, वसंत बापट, विजय तेंडुलकर आणि द. मा. मिरासदार असे गाजलेले साहित्यिक या अंकासाठी लिखाण करत असत.
पुढे नवशक्ती या वृत्तपत्राचे संपादक प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना वृत्तपत्रातून लिखाणासाठी उद्युक्त केले आणि त्यांनी वृत्तपत्रातून विनोदी लेखनास प्रारंभ केला. त्यांची विनोदी शैलीतील एकूण १५० पुस्तके प्रसिद्ध झाली होती. त्यांनी विनोदी लेखनाबरोबरच आकाशवाणीवरील श्रुतिका, विनोदी निबंध, पटकथा, तमाशाच्या संहिता, विडंबने, एकांकिका असे विविध स्वरूपाचे लेखन केले आहे. सूक्ष्म निरीक्षणशक्ती, कल्पकता आणि उत्स्फूर्त विनोद ही वि. आ.बुवा यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये मानली जात. हंस दिवाळी अंक, मोहिनी दिवाळी अंक, नवयुग दिवाळी अंक, आवाज दिवाळी अंक अशा कितीतरी मासिके व दिवाळी अंकांतून मा.बुवा यांनी लेखन केले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ आणि नाट्य पुरस्कार समित्यांवर अनेक वर्षे त्यांनी परीक्षक म्हणून काम पहिले होते. आकाशवाणीवर त्यांचे ६०० हून अधिक कार्यक्रम प्रसारित झाले.
त्या काळच्या "पुन्हा प्रपंच" या लोकप्रिय मालिकेसाठी ४०० हून अधिक भागांचे लेखन त्यांनी केले.
वि. आ. बुवा यांचे १७ एप्रिल २०११ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 17, 2017
उत्तर हिंदुस्थानी गायकी ज्यांनी सर्वप्रथम दख्खनमध्ये किंवा महाराष्ट्रात आणली ते पं बाळकृष्णबुवा इचलकरजीकर. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १८७२ रोजी झाला. विष्णू दिगंबर पलुसकर हे त्यांचेच शिष्य होते.
विष्णू दिगंबर पलुसकरांचे ग्वाल्हेर गायकीवर प्रभूत्व होते. त्यांचा शिष्यवर्गही बराच होता. पं यशवंतबुवा मिराशी, पं विनायकबुवा पटवर्धन ही काही त्यांच्या शिष्यांची नावे. हिंदुस्थानी संगीताच्या प्रचाराकरता आणि प्रसाराकरता पलुसकरांचे खूपच मोठे योगदान केले आहे. त्यांनी संगीतविषयक अनेक क्रमिक पुस्तके लिहिली. स्वरलिपी तयार केली जी 'पलुसकर-पद्धती' म्हणून ओळखली जाते..
"गंधर्व महाविद्यालयाची" १९०१ साली "लाहोर" येथे झालेली स्थापना त्यांच्या तपश्चर्याचे फळ होय.हिन्दुस्तनि रागसंगीताचा प्रसार-प्रचार व्हावा, ते शिकण्याची सोय व्हावी या हेतूने त्यांनी संपूर्ण भारतात ठिकठिकाणी आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली. विष्णु दिगंबर पलुसकर हे निःसीम राम भक्त होते."गंधर्व महाविद्यालयाची" स्थापना करून त्यानी रामाच्या चरणी,थेट नाशिक येथे आपली कर्मभूमी निवडली.
१९२१ साली त्यांनी काळा राम मंदिरासमोर पंचवटी "श्री रामनाम आधारश्रम" म्हणून स्थापन केलेली वस्तू आजही अस्तीतवात आहे. ग्वाल्हेर परंपरेचेच लोकप्रिय गायक पं दत्तात्रेय विष्णू तथा बापूराव पलुसकर हे त्यांचे सुपुत्र होत. पंडित विष्णु दिगंबर पलुसकर यांचे निधन २१ ऑगस्ट १९३१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
August 18, 2017
नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात गेली दोन दशकं लेखक, अभिनेता व दिग्दर्शक म्हणून वावरणाऱ्या अभिराम भडकमकर यांचा जन्म ७ जानेवारी १९६५ रोजी झाला. नाटक, सिनेमा, कथा, कादंबरी या सर्वच क्षेत्रात सहजपणे वावरणारा हा कलावंत.. रुढार्थानेसुद्धा कलावंतच... कारण तो अभिनयसुद्धा करतो... आजच्या घडीला उत्तम आणि दर्जेदार लिहिणा-या लेखकांपैकी एक महत्वाचे नाव म्हणजे अभिराम भडकमकर... चुड़ैल हा कथासंग्रह असो किंवा बालगंधर्व'सारखी एका अवलिया कलावंताचा विशाल जीवनपट असलेली कादंबरी असो किंवा आजच्या मालिका विश्वाच्या पडद्यामागल्या वास्तवाचं भीषण दर्शन घडवणारी 'एट एनी कॉस्ट' ही कादंबरी.... भडकमकर यानी लेखक म्हणून एक विशिष्ट स्थान निर्माण केलेले आहे.
राष्ट्रीय नाट्य विद्यालायाचे स्नातक असलेले भडकमकर सतत कुठल्या ना कुठल्या 'लेखन' प्रयोगात व्यस्त असतात. पछाडलेला या चित्रपटा मध्ये "समीर" ची भूमिका अभिराम ने साकारलेली आहे. आई, ए रेनी डे, खबरदार, देवकी, पाऊलवाट, बालगंधर्व या चित्रपटाना अभिराम भडकमकरची पटकथा आहे. अभिराम भडकमकर यांनी आम्ही असू लाडके हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केलेले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
http://www.abhirambhadkamkar.com/
January 7, 2018
दैदिप्यमान यशाची नोंद सरकारने घेऊन त्यांची लगेच सन १८८४ मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर थेट नेमणुक केली.येथेही त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा स्वयंचलित गेटची निर्मिति केली. यामुळे विशिष्ठ पातळी वरील अतिरिक्त पाणीच वाहुन जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या डिझाईनचे नावच पुढे विश्वैश्वरय्या गेट झाले.
April 14, 2022
माई मंगेशकर या मूळच्या धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावच्या होत. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची अपत्ये होय.
June 16, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti