कपिल देव यांचा जन्म ६ जानेवारी १९५९ रोजी झाला.
रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य.
रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला. नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी खेळला आणि सहा बळी मिळवले. त्या हंगामात ३ सामन्यांमधून १२ बळी त्याने मिळवले. १९७६-७७ च्या हंगामात जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात त्याने एकूण ३६ धावा देत ८ बळी घेतले. हा सामना हरयाणाने जिंकला.
नंतरच्या साखळी सामन्यांमधून कपिलची कामगिरी यथातथाच राहिली असली तरी उप-उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात बंगालविरुद्ध त्याने दुसऱ्याह डावात केवळ नऊ षटके गोलंदाजी करताना २० धावा देत तब्बल ७ गडी बाद केले. उप-उपांत्य सामन्यात हरयाणाची गाठ मुंबईशी पडली आणि हरयाणाने लढत गमावली असली तरी कपिलदेवने साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. १९७८-७९ च्या हंगामात इराणी चषकाच्या सामन्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन कपिलने ६२ धावा काढल्या.
दुलीप चषकाच्या अंतिम सामन्यातील सात बळीनी त्याला उत्तर विभागाच्या संघात प्रवेश मिळवून दिला आणि याच हंगामात कपिल पहिली कसोटी खेळला – पाकिस्तानविरुद्ध. १९७९-८० च्या हंगामात दिल्लीविरुद्ध १९३ धावांची खेळी हे त्याचे पहिले प्रथमश्रेणी शतक. या हंगामात तो हरयाणाचा कर्णधार होता आणि त्याच्या संघाने अतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
१९९०-९१ च्या रणजी करंडकाचा अंतिम सामना कपिलने गाजवला. संजय मांजरेकर, विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, चंद्रकांत पंडित, सलील अंकोला, ॲकबी कुरुविला अशा दिग्गजांचा समावेश असलेल्या मुंबई संघाला हरयाणाने पराभूत केले. हरयाणाच्या संघातील काही खेळाडू होते : दीपक शर्मा, अजय जडेजा, चेतन शर्मा, विजय यादव. मिळालेल्या शिकारींकडे पाहिल्यास कपिल त्याच्या पहिल्यावहिल्या कसोटी मालिकेत फारसा यशस्वी ठरला असा निष्कर्ष काढता येणार नाही पण त्याच्या बाऊन्सर्सची दहशत पाक फलंदाजांनी घेतली होती आणि त्याचा फायदा इतर गोलंदाजांना नक्कीच मिळाला होता. सादिक मोहम्मदला त्याने एका बहिर्डुल्यावर टिपले होते. मालिकेतील तिसऱ्यां सामन्यात कराचीच्या नॅशनल स्टेडिअमवर त्याने अवघ्या ३३ चेंडूंमध्ये अर्धशतक केले होते. भारतीयाचे कसोट्यांमधील हे पहिले अर्धशतक. मग कपिलने एक पंचांकडे फलंदाज बाद असल्याचा आग्रह धरण्यासाठीचा अपवाद वगळता, कारकिर्दीत केव्हाही मागे वळून पाहिले नाही.
दिल्लीच्या फिरोजशहा कोटलावर त्याचे पहिले कसोटी शतक आले, अवघ्या १३० चेंडूंमध्ये. १९८२-८३ च्या हंगामात गावसकरला विश्रांती देण्यात आल्याने कपिलवर कर्णधारपदाची जबाबदारी टाकण्यात आली. वेस्ट इंडीज दौऱ्यापासून तो नियमित कर्णधार बनला आणि त्या दौऱ्याावर त्याच्या संघाची सर्वात मोठी कामगिरी म्हणजे वेस्ट इंडीजला एका एकदिवसीय सामन्यात हरविणे! गावसकरने या सामन्यात ९० तर कपिलने ७२ धावा केल्या होत्या आणि ४७ षटकांमध्ये २८२ धावा करून भारतीयांनी त्या राखल्या होत्या.
१९८३ कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने इंग्लंड मध्ये १९८३ साली आपला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. यावर नुकताच 83 नावाने चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
January 6, 2022
आनंद शिंदे यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी, पंजाबी, उर्दू, तामिळ आणि इतर अशा एकूण आठ भाषांमध्येही गायन केले आहे. होऊ दे जरासा उशीर हे टायटल गाणे असलेल्या चित्रपटाला ऑस्कर नॉमिनेशनही मिळाले होते.
April 21, 2022
उदय टिकेकर यांनी ‘शमिताभ’, ‘बर्फी’, ‘रईस’, ‘लाल सलाम’ या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं आहे. ‘तुझा माझा ब्रेक अप’, ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘कोई अपना सा’, ‘कसौटी जिंदगी की’ या मराठी-हिंदी मालिकेत उदय टिकेकर यांनी काम केले आहे.
December 4, 2021
आज पर्यंत हौशी रंगभूमीवर २३ नाटके, वेगवेगळ्या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये २१ एकांकिका आणि व्यवसायिक नाटक केले आहे. यामध्ये महाराष्ट्र सांस्कृतिक कृती कार्य संचालनालय आयोजित मराठी आणि हिंदी राज्य नाट्य स्पर्धेत सहा रौप्य पदक आणि वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धेत सात वेळा वाचिक अभिनयातील पारितोषिक प्राप्त करणारा खान्देशातील एकमेव कलाकार म्हणजे हेमंत पाटील होय. महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रा या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात आपल्या खान्देशातील लेवा पाटील बोली भाषेचा वापर करून स्क्रिट सध्या हेमंत करीत आहे. या आधी हेमंत पाटील यांनी झी टीव्हीवरील चला हवा येऊ द्या.. होऊ दे .. व्हायरल यामध्ये महाराष्ट्रातून निवड होऊन लेवा बोली भाषेतून विडंबन साजरीकरण केले आहे.
March 1, 2024
अभिनेता ओमी वैद्य यांचा जन्म १० जानेवारी १९८२ रोजी युका व्हॅली, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे झाला.
ओमी वैद्य यांनी लॉस एंजेलिस काउंटी हायस्कूल फॉर आर्ट्समधून पदवी प्राप्त केली आणि नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांताक्रूझ येथे शिक्षण केले. ओम वैद्य यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनेता, दिग्दर्शक, संपादक, लेखक, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता म्हणून काम केले आहे.
3 इडियट्स या चित्रपटासाठी त्यांना स्टार डेब्यू मेल ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. त्याला 3 इडियट्ससाठी 2010 चा लायन्स गोल्ड अवॉर्डही मिळाला होता. २०१० मध्ये त्यांना 3 इडियट्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. 3 इडियट्स या चित्रपटा नंतर ओमी यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. चतुर रामलिंगम हे पात्र रसिकांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरले होते.
अरेस्टेड डेव्हलपमेंट, द ऑफिस, दिल तो बच्चा है जी, देसी बॉईज यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये ओमीने उत्कृष्ट भूमिका साकारल्या.
सिनेमाच नाही तर ओमी वैद्य जाहिरातींमधूनही झळकत असतो. जाहीरातक्षेत्रातही ओमी फार लोकप्रियत बनला आहे.
ओमी वैद्य यांनी ऑगस्ट २००९ मध्ये मीनल पटेल सोबत लग्न केले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
January 10, 2022
गुलशन बावरा यांचे मूळ नाव गुलशन कुमार मेहता. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९३७ रोजी झाला. त्यांचे वडील बांधकाम संबंधित व्यवसाय करीत होते. गुलशनदांचे आयुष्यच मुळी लहानपणापासून संकटांनी घेरलेले होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्यावेळी त्यांच्या डोळ्यासमोरच आई वडिलांची हत्या झाली. त्यानंतर भेदरलेल्या गुलशन बावरा यांनी त्यांच्या लहान भावासकट एका छावणीत आश्रय घेतला आणि त्यानंतर माघारी परतणाऱ्या जमावाबरोबर ते भारतात आले. तेथून ते जयपूरमधल्या आपल्या बहिणीच्या घरी आले. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास जयपूरमधूनच सुरू झाला.
नंतर गुलशन बावरा यांनी दिल्लीस येऊन मॅट्रिक आणि दिल्ली विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. आपल्या महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी कविता लिहिण्यास सुरुवात केली होती.
पदवी मिळाल्यानंतर त्यांनी रेल्वेत नोकरीसाठी अर्ज केला. रेल्वे भरती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना कोटा येथे नियुक्ती देण्यात आली, पण जेव्हा ते कामावर हजार होण्यास कोट्याला पोहचले तर ती जागा अगोदरच भरलेली होती. मग त्यांना मुंबईस पुनर्नियुक्ती देण्यात आली आणि अशा तऱ्हेने ते माया नगरीत दाखल झाले.
१९५९ मध्ये प्रदर्शित झालेल्या चंद्रसेना या चित्रपटाद्वारे त्यांना ब्रेक मिळाला. या चित्रपटातील त्यांनी लिहिलेले मैं क्या जानूँ कहाँ लागे ये सावन मतवाला रे हे गीत लता मंगेशकरांनी गायले. या चित्रपटाला कल्याणजी-आनंदजी या द्वयींचे संगीतदिग्दर्शन लाभले. त्यांनी १९६१ साली नोकरी सोडून दिली.चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले असले तरी गुलशनदांना गीतकार म्हणून खरी मान्यता मिळाली ती सट्टा बाजार या चित्रपटाद्वारे. चित्रपटसृष्टीत अगदी नवखे असल्याने त्यांची वेषभूषा ही गबाळ्यासारखी होती. त्यामुळे या चित्रपटाचे वितरक असणाऱ्या शांतिभाई पटेल यांनी त्यांचे नामकरण बावरा असे केले. तेव्हापासून ते गुलशन बावरा या नावाने ओळखले जाऊ लागले.
चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी गुलशनदा केवळ वीस वर्षांचे होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ २४० गाणी लिहिली आहेत. पैकी कल्याणजी-आनंदजी ह्या संगीतकारांसाठी गुलशन बावरा यांनी एकूण ६९ गाणी लिहिली तर आर. डी. बर्मन यांच्यासाठी १५० गाणी लिहिली.त्यांना मेरे देश की धरती आणि यारी है इमान मेरा या गाण्यांसाठी दोन वेळा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. मेरे देश की धरती (उपकार), यारी है इमान मेरा (जंजीर), अगर तुम ना होते (अगर तुम ना होते), वाद कर ले साजना ( हाथ की सफाई), कस्मे वादे निभायेंगे हम (कस्मे वादे) ही काही त्यांची गाजलेली गीते. गुलशन बावरा यांचे ७ ऑगस्ट २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 7, 2017
आनंद बक्षी, हे अभ्यासू, परिश्रम घेणारे गीतकार ओळखले जात होते. गीतकारासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांनी पाच वेळा पटकावला तर याच पुरस्कारासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल ४० नामांकने त्यांना लाभली.
July 21, 2017
जोगवा ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी मुक्ताचे कौतुक झाले व तिला ह्यासाठी काही पुरस्कार देखील मिळाले. आपल्या वैविध्यपूर्ण आणि सहज अभिनयाने मुक्ताने रसिकांच्या मनात प्रेमाचे स्थान मिळवले आहे. टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक अश्या तिन्ही माध्यमांवर जबरदस्त पकड असणार्या अत्यंत मोजक्या अभिनेत्यांमध्ये मुक्ताचे स्थान अग्रक्रमावर आहे.
July 16, 2021
अनुराग कश्यप दिग्दर्शित हिंदी चित्रपट शैतान मध्ये पिंट्याची हंडी फुटली हे गाणे,संजय लीला भंसाली दिग्दर्शित बाजीराव मस्तानी चित्रपटातील गाणे त्यांनी गायले आहे .
July 5, 2022
जॉनीभाई म्हणतात विनोदी नटासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे उत्तम स्क्रिप्ट लेखक दुसरे म्हणजे टायमिंग आणि तिसरे म्हणजे कलाकार कसा स्वतःच्या बुद्धिमतेनुसारं इम्पप्रूव्ह होतो हे आवश्यक असते आणि त्यासाठी भाषा अत्यंत महत्वाची असते, तिच्यावर ताबा असणे आवश्यक असते. त्यांच्या दृष्टीने त्यांना अब्रार अल्वी यांच्याकडे काम करताना मजा येत असे.
June 22, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti