(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रशियन टेनिस स्टार अ‍ॅना कुर्निकोव्हा

    अ‍ॅना कुर्निकोव्हाची गणना सर्वाधिक ग्लॅमरस खेळाडूंमध्ये होते. वयाच्या १५ व्या वर्षीपासूनच तिचे लाखो चाहते आहेत. एकही सिंगल्स किताब जिंकू न शकलेली अ‍ॅना तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत होती. अर्थात डबल्सची दोन ग्रँडस्लॅम तिच्या नावावर आहेत.

      June 7, 2021


  • कवयित्री शिरीष पै

    दैनिक ‘मराठा’ च्या माजी संपादक , मराठीतील ख्यातनाम लेखिका ‘प्रेम कहाणी’, ‘ऊन-सावली’, ‘ओशो’, ‘प्रियजन’,‘पप्पा’ अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका आणि ‘हायकू ’ हा काव्यप्रकार मराठीत पहिल्यांदा आणणा-या कवयित्री शिरीष पै यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.

    कथा, कविता, ललित लेखन, बालवाङ्मय, नाटक इत्यादी साहित्याच्या सर्व क्षेत्रात मुक्तपणे संचार करणाऱ्या लेखिका शिरीष पै. आचार्य अत्रे यांच्या शिरीष पै या कन्या. त्यांच्या घरातच साहित्य विविध अंगानी मुक्तपणे संचार करीत होतं. हे बाळकडू त्यांना बालपणापासून मिळत होतं. साहित्य विचाराचे संस्कार त्यांच्यावर आजूबाजूच्या वातावरणामुळे सतत होत असले तरी शिरीष पै यांची स्वतःची अशी एक शैली आहे. त्यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रसन्न शैलीतील ललित लेखिकेने वाचकांना आनंद दिला. त्यांनी लिहिलेल्या कवितांनी काव्यप्रकाराला न्याय दिला. एक तारी, एका पावसाळ्यात, गायवाट, कस्तुरी, ऋतुचक्र इत्यादी त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. मराठी कवितेत जपानी हायकूं हा प्रकार रूजविण्याचा मान शिरीष पै यांच्याकडे जातो.

    लालन बैरागीण, हे ही दिवस जातील ह्या कादंबर्या त्यांन लिहिल्या. छोट्या मुलांसाठी आईची गाणी, बागेतल्या जमती या बाल साहित्याची निर्मिती केली तर चैत्रपालवी खडकचाफा, सुखस्वप्न, कांचनबहार हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. शिवाय हा खेळ सावल्यांचा, झपाटलेली, कळी एकदा फुलली होती ही त्यांनी लिहिलेली नाटकं. ललित साहित्याची त्यांची आजचा दिवस, आतला आवाज, प्रियजन, अनुभवांती, सय मी माझे मला, अशी पुस्तके गाजली. आपल्या अफाट कर्तृत्वाच्या वडिलांचे चित्रण पप्पा आणि वडिलांचे सेवेशी या दोन पुस्तकातून त्यांनी रंगवले आहे. शिरीष पै यांचे दोन सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. विकी पिडीया

    मराठीतील ‘हायकू’ला प्रतिष्ठा मिळवून देणा-या शिरीष पै यांच्या गाजलेल्या काही हायकू…
    पाहिला नाही असा उन्हाळा
    उगवतानाच
    सूर्य भडकलेला
    दुरून पाऊस पाडेन
    काळा ढग येतो आहे
    लांबूनी जोर दिसतोय
    आठवून सारे हसू येते
    याचसाठी का मी
    रडले होते
    केव्हापासून करत आहे
    काव काव कावळा
    एवढा का भरून
    येतो त्याचा गळा
    केळीचे पान वा-यावर डुलतय
    पण त्याला माहीत नाही
    टराटरा फाटतंय
    बागेमध्ये आनंदात फुलपाखरू
    गेलं बागडून
    पाऊस थांबला म्हणून
    प्राचीन किल्ल्यात पाय ठेवताच
    आपल्याला कळले
    भूतकाळात काय घडले

      November 27, 2017


  • जेष्ठ रंगकर्मी गोपीनाथ सावकार

    अशोक सराफ यांचे गोपीनाथ सावकार हे मामा. अशोक सराफ यांनी गोपीनाथ सावकार यांच्यावर लोकसत्ता मध्ये लिहिलेला लेख.
    कलेशिवाय ज्यांनी आयुष्यात कशालाच महत्त्व दिले नाही, असे गोपीनाथ सावकार माझे मामा होते आणि मामापेक्षा म्हणाल तर त्यांचं आणि माझं कलेच्या क्षेत्रातलं नातं द्रोणाचार्य-एकलव्यासारखं होतं.

    सबंध आयुष्यात त्यांनी नाटक व सिनेसृष्टीतील माणसं, तिथली अवस्था प्रत्यक्ष पाहिली होती, अनुभवली होती. त्यामुळेच ‘तू या धंद्यात यायचं नाहीस’, असं त्यांनी मला स्पष्ट बजावलं होतं. मात्र, त्यांच्या नाटकांच्या तालमींना मी न चुकता जायचो. त्यांचं काम पाहायचो. त्यांची डायलॉग बोलण्याची पद्धत, त्यांच्या भूमिका सगळ्याचं निरीक्षण करायचो.

    अर्थानुकूल डायलॉग कसे बोलायचे? वाक्यातला ऱ्हिदम कसा असावा? हे सगळं त्यांचा अभिनय पाहत शिकत गेलो. नट शब्दापेक्षा डोळ्यांनी कसं वाक्य कमीट करू शकतो, हे ते उत्तमरीत्या दाखवायचे. त्यांच्यासारखा डोळ्यांचा उत्कृष्ट वापर करणारा माणूस आजतागायत तरी मी या इंडस्ट्रीत पाहिला नाही. म्हणूनच अभिनयाच्या बाबतीत ते काळाच्याही पुढे होते. ते जो काही अभिनय करत, त्यातल्या काही अंशी मी अभिनय करू शकलो तरी मी स्वत:ला धन्य समजेन. ‘भावबंधन’ मधला धुंडिराज ते सादर करायचे. त्यातल्या आशीर्वादाच्या प्रत्येक प्रवेशाला मी ढसढसा रडलो आहे. माहीत असायचे की, हे नाटक आहे, पण त्यांचा अभिनय पाहून भावना आवरता यायच्या नाहीत. जितक्या सहजतेने ते विनोदी (भादव्या) भूमिका करायचे, तितक्याच सहजतेने सामाजिक नाटकंही करायचे.

    दिग्दर्शक म्हणून सांगायचं झालं तर त्यांची एक सवय होती. इकडे स्टेजवर नाटक चालू झाले की, हे विंगेत डोळ्यांवर हात ठेवून बसायचे आणि तोंडाने नाटकातले संवाद बोलणं चालूच असायचं. त्यांच्या बंद डोळ्यापुढे नाटक चालू असायचं. स्टेजवरचा नट जरा कुठे चुकला, की त्यांना बरोबर समजायचं, मग ते अस्वस्थ व्हायचे. नाटक जराही इकडे तिकडे झालेलं त्यांना चालायचं नाही. इतका गुणवान माणूस, पण त्यांच्या गुणांची योग्य ती कदर झाली नाही. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांच्या वाऱ्यालाही कोणी फिरकायचे नाही.

    मला आठवतं, तो काळ मराठी संगीत नाटकांचा पडता काळ होता. एकूण नाटय़सृष्टीच मोडकळीला आली होती. त्यावेळी चारच नाटय़संस्था होत्या. पेंढारकरांची ललितकलादर्श, रांगणेकरांची नाटय़निकेतन, संयुक्त महाराष्ट्र कलावंत आणि माझ्या मामांची कलामंदिर. त्यातल्या ललितकलादर्श आणि नाटय़निकेतन यांचा उल्लेख आताही होतो. याचं कारण त्यांनी यशस्वी नाटकं दिली. माझे मामा यशस्वी नाटक देऊ शकले नाहीत. नाटकाच्या इतिहासातही त्यांचं नाव येत नाही. कारण जग इतकं गतिमान आहे, की तुम्ही काय केलं, यापेक्षा तुमचा गवगवा किती झाला, यावर तुमचं यश इथं मोजलं जातं. जसं यशासारखं दुसरं यश नाही, त्याप्रमाणे अपयशासारखं दुसरं अपयश नाही! हा माणूस तर आयुष्यभर अपयशीच ठरला. ही ट्रॅजिडी आहे. त्यांनी कोणाची स्तुती केली नाही. कोणाची हाजी हाजी केली नाही. जो चांगला असेल, गुणी असेल, त्याला त्याच्या योग्यतेच्या भूमिका दिल्या. जे काही तुम्ही आहात ते करा, करून दाखवा आणि यशस्वी व्हा. याशिवाय तरणोपाय नाही, हा धडा मी त्यांच्याकडून अनुभवाने घेतला.

    बाळ कोल्हटकरांचं ‘दुरितांचं तिमिर जावो’, हे नाटक त्यांच्याकडे प्रथम आलं होतं. तेव्हा मामा दुसरं नाटक बसवत होते. त्यांनी कोल्हटकरांना सांगितलं की, ‘तुझं नाटक करतो,पण माझ्या हातात दुसरं नाटक आहे. ते स्टेजवर आलं की तुझं नाटक करतो. मला तुझं नाटक आवडलंय.’ पण नंतर काय झालं कुणास ठाऊक! ते नाटक दुसरीकडे गेलं. नाही तर त्यांच्या पुढच्या आयुष्याचं चित्र बदललं असतं.

    ह. रा. महाजनींचं ‘शकुंतला’सारखं नाटक त्यांनी बसवलं. अगदी दृष्ट लागण्यासारखं नाटक होतं, पण चांगलं नाटक असूनही पहिले तीन प्रयोग नायगाव ओपन एअर थिएटरला लावलं आणि भर ऑक्टोबर महिन्यात धो-धो पाऊस कोसळला आणि नाटक पुन्हा उठलंच नाही. याला नशीब म्हणायचं, दुसरं काय!

    मामांचा पाय कापल्यावर कलामंदिरची मॅनेजमेंट, नाटकाची व्यवस्था वडीलच सांभाळत. पण पाय कापला तरी मामा गप्प बसले नव्हते. लाकडाचा पाय लावून चालताना वेदना व्हायच्या तरी ते तीन मजले चढून धापा टाकत यायचे.. तालमींना जायचे. हे सगळे पाहून मी विचार करायचो, ‘काय त्यांच्या मनाचं सामथ्र्य असावं. जे त्यांना सतत नाटक करायला लावत होतं!’

    अशा परिस्थितीतही त्यांना संस्थेसाठी नवीन नाटक करावंसं वाटत होतं. त्यामुळे ते सारखे अस्वस्थ असायचे. त्यांनी शिरवाडकरांकडे नाटक मागितलं. त्यांनी त्यांचं नवीन नाटक ‘सं. ययाती-देवयानी’ मामांना दिलं. नाटय़सृष्टीतील प्रथेप्रमाणे यातही मोडता घालण्याचे चिक्कार प्रयत्न झाले. परंतु शिरवाडकर हे शब्दांचे पक्के! सच्चा माणूस आणि स्पष्टवक्ते! त्यामुळे त्यांनी इतरांना सांगितले, ‘मी तुम्हाला नाटक देऊ शकत नाही. सावकार नाही म्हणाले तर ते तुम्हाला देईन.’ शेवटी ते नाटक मामांनाच मिळालं. सगळ्या बाजूंनी प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी हे नाटक बसवलं. शरीर साथ देत नव्हतं. सांपत्तिक स्थिती साथ देत नव्हती. काही ना काही अडचणी येत होत्या. पण नाटक करण्याच्या दुर्दम्य इच्छेपोटी हे नाटक त्यांनी बसवलं. ‘ययाती आणि देवयानी’चं दिमाखदार प्रॉडक्शन यशस्वीपणे उभं केलं! परंतु दुर्दैवाचा फेरा हा की नाटक चांगलं होतं, प्रयोग भरपूर झाले, परंतु नाटक चाललं असं म्हणता येणार नाही.

    ययाती आणि देवयानी नाटकाचा १९६७ मधील बेळगावचा प्रयोग मी आयुष्यात विसरणार नाही. हे नाटक मला अख्खं तोंडपाठ होतं. ‘तू या धंद्यात अजिबात जायचं नाही,’ असं सांगणाऱ्या मामांनीच छोटू सावंत आजारी पडल्यामुळे या प्रयोगासाठी मला बोलावलं. त्यावेळी झालेला आनंद मी शब्दांत सांगू शकणार नाही. अगोदरचा वास्कोचा प्रयोग मामांनी लाकडाचा पाय लावून केला. पण लाकडाच्या पायामुळे त्यांच्या अभिनयात कुठेही कमतरतात आली नव्हती. परंतु जास्त त्रास झाल्यावर त्यांनी मला बोलावून घेतलं. त्या बेळगावच्या प्रयोगात, विदूषकाच्या कॅरेक्टरला मला तुफान रिस्पॉन्स मिळाला. ती माझ्या आयुष्यातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची भूमिका मी माझ्या गावात केली. शिरवाडकरांचा विदूषक उच्च प्रतीचा होता. मराठीत आतापर्यंत असा विदूषक झालेला नाही.

    नाटक झाल्यावर मामांकडे मी पाहिलं. काहीतरी शाबासकी मिळेल, वाहवा मिळेल. पण त्यांनी काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही. ज्या अर्थी ते वाईट करतोस’ असं म्हणाले नाहीत, त्या अर्थी मी बरं काम केलं असावं, असा मी माझा समज करून घेतला, म्हटलं, छोटू सावंत परत आला की तो हे काम करेल. पण एक दिवस मामा मला म्हणाले, यापुढे हा रोल तूच कर.’ माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं प्रशस्तिपत्र मला त्या दिवशी मिळालं. हा मी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा गौरव समजतो. मला घेऊन त्यांचे पैसे वाचणार होते असं नव्हतं. माझी नाईट मला व्यवस्थित मिळणार होती. नात्यापेक्षा कलावंतांना महत्त्व देणारा, व्यवहाराला एकदम चोख माणूस!

    झालं! माझा रोल ठरल्यावर त्यांनी मला एक दिवस तालमीला बोलावलं. विदूषकाचं पहिलं वाक्य असतं. होय देवी, मी विदूषक.’ मी म्हटलं, ‘होय देवी, मी विदूषक,’ हे ऐकल्याबरोबर ते म्हणाले, ‘थांब, थांब’ काय बोललास, ‘विदुषकमधला दू दीर्घ आहे, तू ऱ्हस्व बोललास दू दीर्घ बोल.’ म्हटलं, माझी पहिल्या वाक्याला ही अवस्था, तर पुढे काही खरं नाही. मी हळूच स्क्रिप्ट बंद केलं. म्हटलं, मामा मला कळलं, तुम्हाला काय म्हणायचं ते! मी करतो, बरोबर करतो.’ आणि हळूच सटकलो. उच्चारांच्या बाबतीत अगदी पर्टिक्युलर. मी नकळत शिकत गेलो! अशी अॅकक्टिंग कर, तशी अॅंक्टिंग कर,’ असं शिकून कुणी नट बनत नसतो. खरं म्हणजे आपण आपल्या गुणवत्तेनुसार ग्रहण करायचं असतं. घडायचं असतं. अभिनयाचे सर्व प्राथमिक धडे मी घेत होतो. ते पुढे डेव्हलप कसे करायचे, हे बघून शिकत होतो. वाक्याला लय किती असावी? पॉज किती असावा? वाक्यात मुव्हमेंट किती असावी? यासाठी ते जीवतोड मेहनत करायचे. कलाकारांकडून स्वत:च्या मनासारखं काम होईपर्यंत काम करून घ्यायचं. त्यांच्याकडे काम करणाऱ्यांना बक्षिसं मिळाली. अजूनही मिळतात. पण मनुष्यस्वभाव असा आहे की, जर तुमचं नाव नाही, तर तुम्हाला कोणी विचारत नाही. माणसांची नावं अभिमानाने केव्हा घेतली जातात? तो यशस्वी असेल तरच! गोपीनाथ सावकार ही व्यक्ती चांगल्या कलाकृती करूनसुद्धा आयुष्यभर अपयशीच राहिली. मग त्यांचा उल्लेख त्यांच्याकडून शिकलेल्यांनी का करावा? गोपीनाथ सावकार हे नाव सांगून त्यांना जर दीडकीचा फायदा होणार नसेल, तर त्यांचं नाव का सांगावं? पण मी मात्र अभिमानानं सांगतो माझे गुरू गोपीनाथ सावकार!

    त्यांच्या परखड स्वभावामुळे त्यांच्यामागे स्तुतिपाठक नव्हते. त्यांनी कधी ग्रुपबाजी केली नाही. प्रसिद्धीसाठी वेगळे मार्ग स्वीकारले नाहीत. त्यांना या सगळ्यांची गरजही नव्हती. पण त्यांच्या अंगी करण्याची उमेद असून, पात्रता असूनही त्यांना जास्त चांगलं काही करायला मिळालं नाही.

    आयुष्यात शेवटपर्यंत लंगडय़ा पायानं ते झगडत राहिले. नाटक करत राहिले. १९७३ साली त्यांचा मृत्यू झाला आणि १९७४ मध्ये या क्षेत्रात माझा उदय झाला. पण समर्थ कलावंत असलेले माझे मामा मला मार्गदर्शन करायला, घडवायला माझ्यासोबत नव्हते, याचं मला दु:ख आहे. आज माझी नाटकं चालतात, चित्रपट चालतात. दुसरी माणसं पैसे कमावतात. पण मी माझ्या मामांना काहीच मदत करू शकलो नाही. ही माझ्या आयुष्यातील मोठी खंत आहे. माझं सगळं यश त्यांचं आहे आणि त्यांचंच राहणार आहे.

    अशोक सराफ
    (गोपीनाथ सावकार चरित्र आणि आठवणी पुस्तकातून साभार.)

    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 15, 2018


  • महान मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल

    देवलानीं एकंदर संगीत व गद्य मिळून सात नाटकें लिहिलीं आहेत. दुर्गा, मृच्छकटिक, विक्रमोर्वशीय, झुंजारराव, शापसंभ्रम, संगीत शारदा, आणि संशयकल्लोळ. पैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे.

      April 1, 2019


  • गजलनवाज भीमराव पांचाळे

    भीमराव पांचाळे यांनी ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत असे सर्व प्रकारचे शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम गायन केले आहे. भीमराव पांचाळे यांची गाण्याची पद्धत ही आशयप्रधान गायकी स्वरूपातील आहे असे मानले जाते.

      March 30, 2022


  • ट्रिक फोटोग्राफी व स्पेशल ईफेक्ट्सचे जनक बाबूभाई मिस्त्री

    बाबूभाई मिस्त्री हे भारतीय चित्रपटातील स्पेशल एफ़ेक्ट्स जनक होते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आपल्या हिंदू संस्कृतीतील ‘पौराणिक’ ग्रंथातील प्रत्येक कथेचा पाया हा चमत्कारावरच रचला गेला आहे. देवांचे अवतार, प्रकटदृश्ये, त्यांची दैवीरूपे हा सर्व भाग काल्पनिक असला तरीही त्याला मूर्तरूप दिलं ते ‘बाबूभाई मिस्त्रीं’नी.

      February 15, 2024


  • माजी केंदीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस

    त्यांनी १९७४ मध्ये रेल्वे कामगारांसाठी लढा दिला. मुंबईत कामगारांसाठी लढा देताना मुंबई बंद करून दाखवली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी सरकारविरोधात रान उठवले होते. त्यांना शोधण्यासाठी सरकारने जंग जंग पछाडले होते. मात्र जॉर्ज यांनी वेशांतरे करून लढा सुरूच ठेवला होता. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती.

      January 29, 2022


  • बॅरिस्टर नाथ पै

    लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि अंगी ज्ञानलालसा असल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत बॅरिस्टर नाथ पै हे चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाले. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२२ रोजी झाला. विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्य चळवळीत घेतलेल्या सहभागामुळे त्यांनी तुरुंगवास भोगला होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतांनाही, आर्थिक मदत मिळवून ते बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला गेले होते. बॅ. पै यांचे मराठी व इंग्रजीवर कमालीचे प्रभुत्व होतेच, शिवाय ते उत्तम जर्मनही बोलत असत.

    इंग्लंडमध्येच असताना त्यांचे समाजावादी विचारवंत नेत्यांशी संबंध जुळून आले. त्यामुळे त्यांच्या विचारांवर समाजवादी विचारांचा प्रभाव होता. पुढे त्यांनी प्रसमाजवादी पक्षाचे नेतेपण स्वीकारले. उत्कृष्ट वक्तृत्वकला आणि कोणत्याही गोष्टीचा चिकित्सक अभ्यास करण्याची वृत्ती या गुणांवर भारतीय संसदेत एक उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी नाव मिळवले. भारतीय घटनेवर त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यामुळे संसदीय कामकाज आणि त्यातील बारकावे याबद्दल त्यांचे ज्ञान वाखाणण्यासारखे होते. त्यांचे पाठांतर उल्लेखनीय होते. मराठी, हिदी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. स्वातंत्र्यपूर्व काळात भूमिगत चळवळीत काम करणार्या नाथ पै यांनी स्वातंत्र्योत्तर काळात साराबंदी आणि सीमाप्रश्नावर आंदोलन उभे केले.

    निर्भयपणा, स्पष्टवक्तेपणा आणि अभ्यासू वृत्ती असलेला सुसंस्कृत राजकारणी म्हणून बॅरिस्टर नाथ पै प्रसिद्ध होते. महाबळेश्वर येथे भरलेल्या १९७० च्या मराठी साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. संसदेतील त्यांची अनेक भाषणे गाजली. त्यांची भाषणे ऐकण्यासाठी पं नेहरू सभागृहात येऊन बसत. कोकणातील राजापूर मतदार संघातून ते १९५७, ६२ व ६७ अशा तीन निवडणुकांत प्रजा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आले. आज अस्तित्वात असलेली 'कोकण रेल्वे'ची मूळ कल्पना त्यांनीच संसदेत 'किनारपट्टी रेल्वे' म्हणून मांडली होती. बॅरिस्टर नाथ पै यांचे १८ जानेवारी १९७१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      October 3, 2017


  • गायक शैलेंद्र सिंग

    बॉबी मधील गाण्याने ज्या ‘मैं शायर तो नहीं मगर ऐ हसीं’ या गाण्याने जी धमाल उडवली. या गाण्याचे गायकानी हे गाणे आपल्या जीवनात पहिल्यांदा गायले होते व जो या फिल्मी सृष्टीत अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन आला होता. त्यांचे नाव शैलेंद्रसिंग.त्यांचा जन्म ४ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला.

    शैलेंद्र सिंग, यांचा जन्म मुंबईतलाच, कॉलेज झाल्यानंतर अभिनेता होण्याचे भूत त्यांच्या अंगात होते त्यामुळे त्यांनी पुण्याच्या FTTI मध्ये प्रवेश घेतला. राजकपूर ऋषी कपूर यांना घेऊन नवीन चित्रपट ‘बॉबी’ सुरु करणार होते. सर्व दिग्गज गायक किशोरकुमार, मो. रफी, मुकेश त्यावेळेस आपल्या चरमसीमेवर होते, पण राजकपूर ह्यांच्या मनात आणखी काही वेगळे होते. राजकपूर यांनी शैलेंद्र सिंग यांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या कडे पाठविले. ऑडिशन नंतर ठरल्या गेले कि बॉबी चे गाणे शैलेंद्रसिंगच गाणार आहेत. तेथूनच त्यांचे गायकीचे करियर सुरु झाले आणि अभिनय बाजूला पडले.

    त्यांनतर शैलेंद्रसिंग यांनी ऋषीकपूर साठी खूप चित्रपटांसाठी आवाज दिला. त्यांना ऋषीकपूर चा आवाज मानल्या जाऊ लागले. पण पुढील कालावधीत स्पर्धात्मक वातावरणात ते टिकाव धरू शकले नाही आणि हळू हळू फिल्मी सृष्टी तून मागे पडले. पण चित्रपटांविषयी असलेले प्रेम आणि मराठी नसताना पण मराठी बद्दल असलेली आपुलकी त्यामुळे ते काही मराठी सिनेमाचे निर्माते होते. मराठीतून सुद्धा त्यांनी काही गाणी गायली आहे.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.शशांक गिरडकर

      October 9, 2017


  • क्रिकेटपटू संदीप पाटील

    मला आठवतंय एक चॅनेल ला वर्ल्ड कप साठी मी होतो, माझ्या नंतर त्यांचा कार्यक्रम असे, सगळे लाइव्ह असे, एक दिवशी संदीप पाटील सर येताना एक पिशवी घेऊन आले, त्यात त्यांचे काही T Shirts, टाय, कॅप आणि ब्रायन लारा याने सही केलेली बॅट माझ्यासाठी घेऊन आले, त्या वस्तूवर मी मग त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.

      May 27, 2021