(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अनेक भाषांत लिहिणारे पंजाबी साहित्यिक कर्तारसिंग दुग्गल

    अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालं आहे. त्यांना लेखनाबद्दल साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली होती. तसंच भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

      April 27, 2024


  • गानसरस्वती किशोरी आमोणकर

    घराण्यांच्या रूढ भिंतींना फारसे महत्त्व न देणाऱ्या बुद्धिमती किशोरीताईंनी कालांतराने सर्व घराण्यांच्या गायकीचा अभ्यास केला; आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. बंदीशी असोत किंवा ठुमरी गायिकीतला कुठलाही प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता. सिनेसंगीतालाही त्यांनी त्याज्य मानले नाही. १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या “गीत गाया पत्थरों ने’ या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वुगायन केले. चित्रपटसृष्टीत आलेल्या कटू अनुभवांमुळे त्या पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळल्या. मुंबईतल्या एलफिस्टन महाविद्यालयात शिकलेल्या किशोरीताईंना मुळात डॉक्टवर व्हायचे होते. परंतु त्यात मन रमल्याने त्यांनी शास्त्रीय संगीताला वाहून घेतले. “जाईन विचारीत रानफुला’ हे मराठीतील त्यांचे गीतही स्वरशिल्पाचा नमुना ठरला. त्यांनी ‘स्वरार्थरमणी – राग रससिद्धान्त’ हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे.

      April 11, 2022


  • बॉलीवुड अभिनेत्री विद्या सिन्हा

    बॉलीवुड अभिनेत्री विद्या सिन्हा

    विद्या सिन्हा यांचे वडील राणा प्रताप सिंह हे फिल्म निर्माता होते. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९४७ रोजी मुंबई येथे झाला. विद्या सिन्हा यांना वयाच्या १८ व्या वर्षी मिस मुंबईचा किताब मिळाला होता. विद्यासिन्हा यांचे १९७४ साली आलेल्या रजनीगंधा व नंतर छोटीसी बात या दोन चित्रपट गाजले होते. विद्या सिन्हा २०११ मध्ये सलमान खानच्या 'बॉडीगार्ड' चित्रपटात काम केले होते. विद्या सिन्हा यांनी बिजली या मराठी चित्रपटात काम केले आहे. विद्या सिन्हा यांनी बहू राणी , हम दो हैं ना , भाभी आणि कवंजल सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले. विद्या सिन्हा यांनी २००१ मध्ये ऑस्ट्रेलियातील डॉक्टर भीमराव साळुंके यांच्या बरोबर लग्न केले. रजनीगंधा' मधील 'रजनीगंधा फुल तुम्हारे, मेहेके मेरे जिवन मे' हे गाणं जितकं मनभावन तितकच विद्या सिन्हा आणि दिनेश ठाकुर यांवर चित्रीत टॅक्सीतील हे गीत 'कईबार यू ही देखां है, येजो मन की सीमा रेखा है, मन तोडने लगता है, अनजानी प्यास के पीछे, अनजानी प्यास के पीछे, मन दौडने लगता है'अजुन सुध्दा आपले आवडीची गाणी आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    रजनीगंधा चित्रपट
    https://www.youtube.com/watch?v=hb2pdPDO7DM
    रजनीगंधा चित्रपटाची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=_j5dRsWevdM
    https://www.youtube.com/watch?v=CPwbi-hfenI

      November 22, 2017


  • मराठी लेखक दिगंबर बाळकृष्ण मोकाशी उर्फ दि.बा. मोकाशी

    दि.बा. मोकाशी हे विसाव्या शतकातल्या श्रेष्ठ मराठी लेखकांपैकी एक होते. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९१५ रोजी उरण येथे झाला. मराठी नवकथेत मोलाची भर घालणाऱ्या प्रारंभीच्या आघाडीच्या कथाकारांत त्यांची गणना होते. दि. बा. मोकाशी हे १९४० नंतर नवकथेत झळकणारे महत्त्वाचे नाव. तीन कादंबऱ्या, तीन ललित व प्रवासवर्णनपर लेखसंग्रह, सात कथासंग्रह आणि पाच बालवाङ्मयपर पुस्तके असा त्यांचा भरगच्च साहित्यसंभार आहे. लामणदिवा हा १९४७ साली प्रसिध्द झालेला मोकाशी यांचा हा पहिलाच कथासंग्रह. रोजच्या जीवनातल्या साध्यासुध्या प्रसंगांतून आकारणारी लेखकाची कथा सौम्य आणि संयत प्रकृतीची आहे. ह्या पुस्तकात प्रारंभी ' पहिली पावले' ह्या शीर्षकाखाली त्यांनी आपल्या लेखनाच्या सुरुवातीच्या कालखंडाविषयी लिहिले आहे. तेही कथेइतकेच रंजक आहे.

    संध्याकाळचे पुणे हे माणूस साप्ताहिकात ७९-८० च्या कालखंडात प्रसिध्द झालेले, पुण्यातील सांस्कृतिक हालचालींचे दर्शन घडवणारे लेख.पुण्यात रोज झडणाऱ्या उपक्रमांबद्दल, व्यक्तींबद्दल आणी संस्थांबद्दल अत्यंत रसिकतेने लिहिलेले हे लेख आहेत. प्रसन्नता आणि निर्व्याजता, चितनशीलता आणि ताजेपणा ही मोकाशी यांच्या साहित्यातील वैशिष्ट्ये या लेखांमध्ये आढळतील.

    आम्ही मराठी माणसं हा, १३ वैशिष्ट्यपूर्ण कथांचा हा संग्रह दि.बा.मोकाशींच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. आपल्या अवतीभवतीच्या माणसांचे नितळ विश्व सरळ साध्या पध्दतीने उभे करावे, ते नाट्यपूर्ण आणि शैलीदार पध्दतीने मांडण्यात त्यामागच्या वास्तवाची हानी होते असे त्यांना वाटे. या संग्रहातील हलक्या-फुलक्या कथा सामान्यांच्या सुप्तासुप्त भावनांचे खेळकर भूमिकेतून चित्र रेखाटणाऱ्या आहेत.

    त्यांच्या निधनानंतर साहित्य अकादमीने १९८८ मध्ये "दि. बा. मोकाशी यांची कथा " (निवडक कथांचा संग्रह) हे पुस्तक प्रसिद्ध केले. पण त्याच्या प्रस्तावनेत मोकाशींच्या इतर साहित्याचा परामर्श घेताना त्यांनी ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ या कादंबरीचा मात्र उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. सरोजिनी वैद्य यांच्या मार्गदार्शनाखाली सौ. माधुरी पणशीकर यांनी मोकाशी यांच्या साहित्यावर प्रबंध लिहून डॉक्टरेट घेतली. दि.बा. मोकाशी यांनी लामणदिवा, वणवा मिळून ११ कथासंग्रह. देव चालले, आनंद ओवरी, या कादंबऱ्या, तसेच पालखी, अठरा लक्ष पावलं अशी प्रवासवर्णने, संध्याकाळचे पुणे (ललित), रेडिओदुरुस्ती व्यवसाया-बद्दलचे पुस्तक व बालसाहित्यदेखील त्यांनी लिहिले. ‘अठरा लक्ष पावलं’मध्ये त्यांनी प्रवासवर्णनातून समाजजीवनाचा शोध घेतला. त्यांच्या ‘आनंद ओवरी’ या संत तुकारामाच्या जीवनावरील कादंबरीचे अमेरिकन अभ्यासक जेफ ब्रेकेट यांनी इंग्रजीत भाषांतर करून ते ‘ट्विटर’वर ठेवले आहे. त्यांच्या इतरही अनेक पुस्तकांची हिंदी व इंग्रजी भाषांतरे झाली आहेत. त्यांच्या पालखी या पुस्तकातून पंढरीच्या वारीवर विपुल लेखन केलंय. खरे म्हणजे "पालखी"च्या पार्श्वभूमीवर एखादी कादंबरी लिहावी अशी मोकाशींची फार इच्छा. त्यांच्या कल्पनेतल्या कादंबरीतील एका वारकर्यााच्या डॉक्टर मुलाला, वडिलांच्याऐवजी, वारीला जावं लागतं. पालखी सुरू होते तेव्हा कादंबरी सुरू होते आणि पालखीबरोबरच ती संपते. ही कादंबरी लिहिणे मोकाशींना शक्य झाले नाही. मात्र पालखीबाबतचे आकर्षण मनात मात्र कायम राहिले.

    एक महिना व्यवसाय बंद करून, महिन्याभरासाठी संसाराची रक्कम व पालखीबरोबरचा खर्च यांची तरतूद करून जावे लागेल या कारणाने काही वर्षे पालखीला जाण्याचे त्यांनी टाळले. मोकाशींच्याच भाषेत सांगायचे तर "यंदा तगमग अतिशय वाढली. काळे ढग आले. पाऊस कोसळू लागला. हवा कुंद झाली. वारकरी दिसू लागले. एके दिवशी लौकर दुकान बंद करून घरी आलो आणि जाहीर केलं - काही झालं तरी यंदा पालखीला जाणार!" ‘कामसूत्रकार वात्स्यायन’ ही त्यांची १९७८ मध्ये प्रकाशित झालेली चरित्रात्मक कादंबरी. त्यांच्या या कादंबरीची मात्र फारशी दखल घेतली गेली नाही.

    जानेवारी २०१४ मध्ये त्यांची कन्या ज्योती कानेटकर यांनी या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर अमेझॉनवर टाकले आहे. कामसूत्र हे पुस्तक कसं आहे ते अनुभवायचं असेल तर दि बा मोकाशी यांची वात्स्यायन ही कादंबरी वाचावी.
    दि. बा. मोकाशी यांचे २९ जून १९८१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 18, 2019


  • मीनाक्षी शिरोडकर

    पहिली मराठमोळी स्वीमसुट गर्ल असे सुद्धा मीनाक्षी शिरोडकर यांना म्हणता येईल. त्यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९१६ रोजी झाला. यमुना जळी खेळू खेळ कन्हैय्या का.. लाजता? असं म्हणत जलक्रीडा करणारी अभिनेत्री आठवते ना? मीनाक्षी शिरोडकर यांनी १९३८ मध्ये ब्रम्हचारी चित्रपटात दिलेल्या या बोल्डसीनची चर्चा त्याकाळी रंगली नसती तरच नवल. स्वीमसूटमधील दृश्यामुळे मीनाक्षी यांना प्रचंड टीका सहन करावी लागली. रेडिओपासून सुरुवात केलेल्या मीनाक्षी शिरोडकर यांनी कालांतराने चित्रपटात भूमिका स्वीकारल्या. आचार्य अत्रेंनी त्यांचं ‘रतन’ हे नाव बदलून ‘मीनाक्षी’ केलं. अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि शिल्पा शिरोडकर या त्यांच्या नाती आहेत. मीनाक्षी शिरोडकर यांचे ३ जून १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      June 3, 2017


  • लेकुरे उदंड जाली

    ३० ऑक्टोबर १९६६ रोजी ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मो. ग. रांगणेकर दिग्दर्शित ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईच्या रवींद्र नाटय़ मंदिरात सादर झाला.या घटनेस एक्कावन्न वर्षे पूर्ण झाली. मराठी रंगभूमीवरील या आगळ्या नाटकाला संगीत पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी खूप उत्तम प्रकारे नाटकातील सर्व गाण्यांच्या चाली बांधल्या होत्या. ताल, सूर व शब्द सगळे कसे चपखल बसवले होते. या नाटकातील मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्रा या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला होता.

    वसंत कानेटकर यांनी ‘मूल नसलेले दाम्पत्य’ हा गंभीर सामाजिक विषय अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळला होता. विषय गंभीर असला तरी त्याची मांडणी हलक्याफुलक्या पद्धतीने करण्यात आली होती. नाटक हलकेफुलके, गाणी असणारे असले तरी त्याचा मूळ विषय प्रेक्षकांपर्यंत सुंदर पणे पोहोचला. श्रीकांत मोघे व मा कल्पना देशपांडे हे मुख्य कलाकार होते.

    ‘लेकुरे उदंड जाली’ या नाटकाचा पुनरुज्जीवित प्रयोग २५ मे १९७३ रोजी झाला. मूळ नाटकातील श्रीकांत मोघे यांच्यासह अन्य काही कलाकार या प्रयोगातही होते. मूळ प्रयोगात ‘मधुराणी’ची भूमिका कल्पना देशपांडे करत होत्या. पुनरुज्जीवित झालेल्या ‘लेकुरे..’मध्ये ही भूमिका मा.दया डोंगरे यांना मिळाली. गिरगावातील साहित्य संघ मंदिरात या पुनरुज्जीवित नाटकाचा पहिला प्रयोग झाला. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’नेच हे नाटक दीर्घकालावधीनंतर पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर केले होते. भोलाराम आठवले (धटिंगण गुरुजी), बाबा महाडिक (डॉ. अष्टपुत्रे), प्रकाश इनामदार (गोरा), प्रवीण पाटील (मारोतराव), मोहनदास सुखटणकर (दासोपंत), कुमुद दामले (सोनुताई), श्रीपाद जोशी (व्यंकटराव), विजया धनेश्वर (तिलोत्तमा) आदी कलाकार नाटकात होते. सुरुवातीच्या प्रयोगात मंदाकिनी भडभडे या ‘सोनुताई’ करत होत्या, तर विठ्ठल पणदूरकर हे ‘दासोपत’ करत होते.

    दया डोंगरे या नाटकाची आठवण सांगताना म्हणतात.
    शिवाजी मंदिरच्या प्रयोगाच्या वेळची एक आठवण आहे. नाटकात –
    ‘मी बोलले तर होते वाईट,
    पण आहे का यांना त्याचे काही,
    तुम्ही माहेरचे म्हणूनच सांगते बाई
    यांना माणसांची पारखच नाही..’

    असे एक गाणे होते. शिवाजी मंदिरच्या त्या प्रयोगाला काहीतरी गडबड झाली आणि गाणे सुरू झाले आणि रेकॉर्डरमधून वायर निघाली. गाणे अचानक थांबले आणि मी क्षणभर ‘ब्लँक’ झाले. पण लगेचच पुढचे शब्द मी म्हणायला सुरुवात केली. त्याच वेळी तिकडे ध्वनिमुद्रित संगीत सुरू झाले. मी त्याचा अंदाज घेऊन पुढचे गाणे त्या ‘ट्रॅक’वर जुळवून घेऊन म्हटले. वसंत कानेटकर, सी. रामचंद्र, पं. जीतेंद्र अभिषेकी, दिलीपकुमार, वैजयंतीमाला अशा मान्यवरांनी आमचा हा ‘लेकुरे’चा प्रयोग पाहिला. नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नाटकाबाबतची एक विशेष बाब आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, फिलाडेल्फिया, शिकागो, बोस्टन, डेट्रॉईट, टोरांटो या ठिकाणी आमच्या ‘लेकुरे’चे प्रयोग झाले. सातासमुद्रापार गेलेल्या या पहिल्या मराठी नाटकात मी होते याचा मला विशेष अभिमान आणि आनंद आहे. या दौऱ्यासाठी कोणीही प्रायोजक नव्हता. आम्ही सर्व कलाकारांनी स्वत:च्या पदरचे पैसे घालून हा दौरा ठरवला होता.

    येण्या-जाण्याचा खर्च आम्हीच करणार होतो. प्रयोगाची तांत्रिक व्यवस्था आम्ही कलाकारच सांभाळणार होतो. तेथील काही मराठी मंडळींकडून आमची निवासाची आणि जेवणखाणाची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण तिकडे गेल्यावर हे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही आणि आमची भलतीच पंचाईत झाली. ठरल्याप्रमाणे आम्ही पहिला प्रयोग केला आणि पुढचे प्रयोग करायचे की नाही, यावर चर्चा झाली. पण सर्वानुमते प्रयोग करायचे ठरले. आमचा सगळा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक प्रयोगानंतर आम्ही प्रेक्षकांमध्ये ताट फिरवत होतो. त्यात जे पैसे जमा व्हायचे ती रक्कम प्रयोगातील सर्व कलाकारांमध्ये समान वाटप केली जायची. त्यामुळे कमावणे तर सोडाच; पण गमावण्याची वेळ आली होती. प्रयोगादरम्यान एका अमेरिकन महिलेने आम्हा सगळ्या कलाकारांना तिच्या घरी जेवायला बोलावले आणि चक्क श्रीखंड-पुरीचे जेवण करून घातले. हा अपवाद करता आमच्या या अमेरिकन दौऱ्याचा अनुभव विदारक होता. नंतर सुयोग’ नाटय़संस्थेतर्फे १९९५-९६ च्या सुमारास ‘लेकुरे उदंड जाली’ हे नाटक पुन्हा एकदा नव्याने रंगमंचावर सादर केले. यात मा.प्रशांत दामले आणि सुकन्या कुलकर्णी-मोने प्रमुख भूमीका केल्या होत्या.

    प्रशांत दामले यांनी एका मुलाखतीत सांगीतले आहे. त्यात जी गाणी होती ती जुन्या काळची आणि अवघड होती. त्याचबरोबर त्यातले पल्लेदार संवादही महत्त्वाचे होते. त्या नाटकाच्या एका प्रयोगाला पु. ल. देशपांडे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी आले होते. त्यांच्यासमोर प्रयोग करताना आणि त्यांनी चाल लावलेली गाणी म्हणताना मला दडपण आलं होतं, पण मी प्रयोग नेमकेपणानं केला. पुलं. आणि अभिषेकी बुवांनी प्रयोग संपल्यानंतर माझं कौतुक केलं, तो क्षण मी कधीच विसरणार नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 14, 2017


  • शोले’ तला अजरामर गब्बरसिंग – खलनायक अमजद खान

    शोले चित्रपटात अमजद खान यांनी साकारलेला गब्बर हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी खलनायकांपैकी एक आहे. त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९४० रोजी झाला.

    ‘शोले’ मधील गब्बरची भूमिका करून 'अमजद खान' यांच्या एंट्री ने सिनेप्रेक्षकांना अक्षरश: अचंबित करून सोडले. 'शोले' या सुपर डूपर हिट सिनेमातील निर्दयी, सहृदयतेचा लवलेशही नसणारा, कल्पनातित क्रूर , रांगडा डाकू त्याने पडद्यावर असा जिवंत केला कि तो पहिल्याच सिनेमानंतर खलनायकांच्या श्रेणीत अत्यंत वरच्या क्रमांकावर जाऊन बसला. प्राण जसा शम्मी कपूर च्या प्रत्येक सिनेमात खलनायक म्हणून दिसला, तसाच अमजद खान, अमिताभ चा 'प्राण' बनला.

    ‘शतरंज के खिलाडी’ या प्रेमचंद यांच्या लघुकथेवर सत्यजित राय यांनी त्याच नावाने एक चित्रपट बनवला. त्यातील कंपनी सरकारचे पत्र भिरकावून देत लखनवी अस्मिता आणि स्वतःच्या शायरीच्या बढाया मारणारा वाजिद अली (अमजद खान) आपल्याला अजूनही आठवतो.

    अमजद खान यांच्या गब्बरने लोकप्रियतेचे सगळे उच्चांक पार केले होते. ब्रिटानियाच्या ग्लुकोज बिस्किटांसाठी वापरण्यात आलेला तो व्यक्तिरेखेवर आधारलेला अमजद खान पहिला ब्रँड ठरला होता. आपल्या करिअर मध्ये त्यांनी 'शोले', 'परवरिश', 'मुकद्दर का सिकंदर', 'लावारिस', 'हीरालाल-पन्नालाल', 'सीतापुर की गीता', 'हिम्मतवाला' आणि 'कालिया'सारखे हिट सिनेमे दिले. जवळपास १३० सिनेमांत कारण करणा-या अमजद खान यांचे अनेक डायलॉग्स आजही आठवणीत आहेत. अमजद खान यांचे २७ जुलै १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      July 29, 2017


  • कूचिपूडि, भरतनाट्यम् नर्तकी मल्लिका साराभाई

    मल्लिका साराभाई या नर्तकी मृणालिनी साराभाई व वैज्ञानिक विक्रम साराभाई यांची कन्या. समांतर सिनेमा पासून आपल्या करीयरची त्यांनी सुरवात केली. त्यांचा जन्म ९ मे १९५४ रोजी झाला.

    मल्लिका साराभाई यांनी पीटर ब्रुक यांचे नाटक महाभारत मध्ये द्रोपदी ची भूमिका केली होती. याच नाटकावर नंतर चित्रपट बनवला गेला होता. मल्लिका साराभाई यांनी भारतात व परदेशात अनेक कार्यक्रमात भाग घेतला आहे. मल्लिका साराभाई यांनी हर्ष मन्दर यांच्या पुस्तकावर आधारित अनसुनी या नाटकाची पटकथा लिहिली आहे. मल्लिका साराभाई या दर्पणा अकादमी ऑफ आर्टस् (अहमदाबाद) च्या निदेशक आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      May 9, 2019


  • बॉलिवूडचा राजा…. राजकुमार

    ‘जिनका घर शिशों का होता है, वो दुसरों पर पत्थर फेंका नही करतें’ अशा दमदार डायलॉगबाजीने प्रेक्षकांच्या टाळय़ा घेणाऱ्या राजकुमार उर्फ भूषण पंडित यांची ओळख विशिष्ट शैलीतील संवादफेक गोष्टींसाठी म्हणून अधोरेखित झाली.

      July 16, 2017


  • शंकर वासुदेव किर्लोस्कर तथा ‘शं. वा. कि.’

    शंकर वासुदेव किर्लोस्कर तथा ‘शं. वा. कि.’ यांचा जन्म ८ ऑक्टोबर १८९१ रोजी झाला. शंकर वासुदेव किर्लोस्कर यांचे वडील सोलापुरातील पहिले पदवीधर डॉक्टर होते. त्यांना यंत्रकलेची अफाट आवड होती. किर्लोस्कर कंपनीने या वेळी कडबा कापण्याचे यंत्र बनविले होते. त्याची जाहिरात बनविण्याचे काम शंकररावांना देण्यात आले. दोन बैलांचे संभाषण. एक बैल या यंत्राने कापलेला कडबा किती स्वच्छ असतो हे सांगताना त्या जाहिरातीत दर्शविले होते. शंकररावांची ही पहिलीच जाहिरात. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना एक बॉक्स कॅमेरा मिळाला व येथून पुढे शंकररावांनी छायाचित्रणाचे धडेही गिरविले. पुढे शंकररावांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात प्रवेश घेतला, नंतर मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना वरच्या वर्गात प्रवेश मिळाला. तेथेही केवळ दिसते तसे चित्र न काढता, त्यामध्ये कल्पनाशक्तीची भर टाकणे आवश्यक आहे, हे त्यांच्या मनात रुजले व त्यासाठी शंकररावांनी संस्कृत, इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. वाचन वाढविले व आपल्यातील कलावंत परिपूर्ण केला. दर मंगळवारी ‘केसरी’मध्ये किर्लोस्कर नांगराची जाहिरात येत असे.

    शंकररावांनी जाहिरातीची सूत्रे हातात घेतली. हळूहळू कंपनीचा बोलबाला वाढला. उत्पादने वाढली व किर्लोस्करला चिन्हाची गरज भासू लागली आणि आज सर्व परीचित झालेले विशिष्ट वळणाचे ‘किर्लोस्कर’ हे नाव हाताने लिहून ते रजिस्टर करण्यात आले. त्या वेळी विदेशातून किर्लोस्करकडे बरेच टपाल येत असे. एकदा त्यात फोर्ड कंपनीची ‘फोर्ड टाइम्स’ ही पुस्तिका आली. ती पाहताच शंकररावांच्या मनात आले, की आपल्या कारखान्याचे असे मासिक का असू नये? त्याचे नावही त्यांनी निश्चित केले. ‘किर्लोस्कर खबर!’ उत्पादनांच्या जाहिराती, कारखान्यातील घडमोडी. गावातील लोकांच्या कथा-कविता असे स्वरूप होते या मासिकाचे व ते छापायला एक जुना हॅण्डप्रेसही विकत घेतला आणि १९२० साली पहिला ‘किर्लोस्कर खबर’चा अंक प्रकाशित झाला. अन् मराठी साहित्य जगतात लहानशी खळबळ उठली.

    १९२९ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी किर्लोस्कर कारखान्यास भेट दिली. त्यांच्या पाहण्यात ‘किर्लोस्कर खबर’ आले व त्यातील ‘खबर’ हा फारसी शब्द त्यांना खटकला, त्यानंतर केवळ ‘किर्लोस्कर’ हे वाङ्मय क्षेत्रात गाजलेले नाव मासिकाला राहिले. पुढे शंकररावांनी त्यामध्ये ललित व वैचारिक लेख समाविष्ट केले. १९३० मध्ये स्त्रियांनी सामाजिक बदलांना सामोरे जावे या हेतूने ‘स्त्री’ मासिकाची स्थापना झाली. तसेच तरुण युवकांना उत्तेजन देण्यासाठी १९३४ मध्ये ‘मनोहर’ हे मासिक सुरू करण्यात आले. हळूहळू ‘किर्लोस्कर’ मासिकाचा व छापखान्याचा विस्तार वाढला. ‘किर्लोस्कर’वाडीचे क्षेत्र त्याला अपुरे पडू लागले. तेव्हा ‘किर्लोस्कर’चे स्थलांतर पुणे येथे १९५९ च्या जून महिन्यात झाले. किर्लोस्कर नावाला केवळ उद्योग जगतापुरते मर्यादित न ठेवता त्याला जनसामान्यांमध्ये लोकप्रिय करण्याचे श्रेय ‘किर्लोस्कर', 'स्त्री' व 'मनोहर' ही मासिके व त्यांचे संपादक शंकर वासुदेव किर्लोस्कर तथा ‘शं. वा. कि.’ यांनाच द्यावे लागेल.

    किर्लोस्कर घराण्याच्या औद्योगिक कार्यास शंकररावांनी सामाजिक आणि सांस्कृतिक उत्तरदायित्वाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले. शंकर वासुदेव किर्लोस्कर यांचे १ जानेवारी १९७५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 1, 2019