"मालगुडी डेज'सह आपल्या इतर लेखनाने भारतासह जगभरातील वाचकांना भुरळ घालणारे भारतीय लेखक आर.के. नारायण यांचे पुर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०६ रोजी झाला.
१९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात.
या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट 'दि गाईड' यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपट निघाला. दि गाईडचे मराठी रूपांतर श्री.ज.जोशी यांनी केले आहे. आर.के.नारायण यांच्या मिस्टर संपत आणि दि फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्तकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या मालगुडी डेज वर आधारित १९८० च्या दशकात दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात ‘मालगुडी डेज्’ ही मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेसाठी नारायण यांचे बंधू प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेल्या रेखाचित्रांमुळे ती मालिका आणि ते पुस्तक यांच्या लोकप्रियतेत भरच पडली.
मालगुडी या एकाच गावातील विविध व्यक्ती, घटना, परिसर, बदलत्या जगाच्या तिथे उमटणार्याच पाऊलखुणा, त्यातून तिथे बदलत जाणारे विश्व, अगदी लहान मुलापासून ते इंग्रजी साहेबाकडे कारकुनी करणार्याल नव-बूर्ज्वा समाजाचे वेधक चित्रण त्या पुस्तकाने केले. प्रचंड लोकप्रिय झालेल्या या मालिकेचे काही वर्षांपूर्वी ‘मालगुडी डेज् रिटर्न’ या नावाने पुनप्रसारणही करण्यात आले होते. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये तयार करण्यात आलेल्या या मालिकेचे तेव्हा ३९ भाग प्रसारित झाले होते. मालिकेतील ‘स्वामी’ हा लहान मुलगा, त्याचे मित्र आणि त्यांचे भावविश्व मालिकेतून सादर करण्यात आले होते. आर. के. नारायण यांनी लिहिलेल्या काही लघुकथांवर ही मालिका आधारीत होती. साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियनलेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जात असे. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.
नारायण यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी आदी सन्मान मिळाले होते. आर.के.नारायण यांचे १३ मे २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट.
May 13, 2017
दिनयार कॉन्ट्रॅक्टर हे सशक्त अभिनेते म्हणून परिचित होते. दिनयार यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. व्यावसायिक रंगभूमीपासून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. अनेक लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या.
June 11, 2021
रामभाऊंनी त्यांच्या संगीत कारकीर्दीत अनेक विद्यार्थ्यांना विनामूल्य विद्यादानाचे कार्य केले (१९६५-८९). त्यांच्या शिष्यवर्गात उल्हास कशाळकर, विश्वनाथ बागुल, योगिनी जोगळेकर, मधुवंती दांडेकर रामप्रथम, राम नेने, सुधीर देवधर, निवृत्ती चौधरी, योगिनी जोगळेकर, शशी ओक, सुरेश डेग्वेकर, प्रदीप नाटेकर, सुधीर दातार, राजेंद्र मणेरीकर इत्यादींचा समावेश होतो.
October 23, 2021
त्यांनी 15 कसोटी सामन्यात 44.95 च्या सरासरीने 989 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी 2 शतके आणि 6 अर्धशतके केली. त्यांची कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या होती 175 धावा तसेच त्यांनी 13 झेलही घेतले. त्यांनी 307 फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात 24,692 धावा केल्या त्या 56.37 च्या सरासरीने त्यामध्ये त्यांनी 72 शतके आणि 109 अर्धशतके केली. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद 285 धावा तसेच त्यांनी 133 विकेट्सही घेतल्या. त्यांनी एका इनिंगमध्ये 53 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या. तसेच 233 झेलही पकडले. त्यांच्या नावावर एक वेगळा रेकॉर्ड आहे. तो म्हणजे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पहिल्यांदा त्यांनी एक सीझनमध्ये 3000 च्या वर धावा केल्या , त्यांनी 63.18 च्या सरासरीने 3,159 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी आठ शतके केली.
April 2, 2021
१९०३ साली पदार्थविज्ञानशास्त्रात, तर १९११ साली रसायनशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळविणारी मादाम मेरी एरी हिने आपले सारे आयुष्यच संशोधनासाठी पणाला लावले होते. पोलंडमध्ये एका निर्धन परिवारात तिचा जन्म झाला होता. मेरीचे वडील पदार्थ विज्ञानशास्त्राचेच अध्यापक होते व त्यांनी आपल्या घरीच एक प्रयोगशाळा उघडली होती. मेरीची आजारी आई तिच्या लहानपणीच गेली होती. त्यामुळे मेरी सर्व घरकाम सांभाळून वडिलांना प्रयोगशाळेत मदत करायची. प्रयोगशाळेत काम करता करताच तिला विज्ञान आणि त्यातील संशोधनाविषयी आवड निर्माण होत गेली. पोलंडमध्ये त्या वेळी असलेल्या जुलमी सत्तेविरुद्ध क्रांतिकारकांनी बंड उभारले होते. देशभक्त मेरी क्रांतिकारकांच्या सभांनाही उपस्थित राहायची. मात्र सरकारला याची कुणकुण लागली व मेरीला अटक होण्याची वेळ आली. मात्र, यामुळे आपल्या विज्ञानाच्या अभ्यासावर परिणाम होईल म्हणून मेरी पोलंड सोडून परिसला गेली. सुरुवातीला तेथे तिला अतिशय कष्टात दिवस काढावे लागले. एका प्रयोगशाळेत ती तेथील बाटल्या धुण्याचे काम करीत असतानाच ' पियरे क्युरी ' या वैज्ञानिकाशी तिचा परिचय झाला व पुढे मेरीने त्यांच्याशीच विवाह केला. विवाहानंतर मेरीने पियरे करी यांना संशोधन कार्यात खूप मदत केली. उभयतांनी १८९८ मध्ये ' पोलोनियम ' चा तर त्यानंतर ' रेडियम ' चा शोध लावला. या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दलच त्यांना १९०३ साली नोबेल पुरस्कार देण्यात आला. पुढे पियरे क्युरी यांच्या अपघाती मृत्यूनंतर मेरी खूरीने पुन्हा एकदा रेडियममधील आरोग्यदायी शक्तीचा शोध लावला व त्वाबद्दल तिला १९११ मध्ये रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. १९१४ मधील पहिल्या महायुद्धात मेरी क्युरीने आरोग्य सेविका म्हणून युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची सेवाही केली. त्यानंतर काही वर्षांनी तिचा साचू झाला. तिच्या मृत्युच्या कारणाबाबत डॉक्टरांमध्ये मतभेद होते. वास्तविक रेडियमच्या किरणोत्सर्गानी तिचे सारे शरीर पोखरले गेले होते. एका महत्त्वाच्या संशोधनासाठी तिने आपले आयुष्य पणाला लावले होते.
February 8, 2017
एस. एन. डी. टी. महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख असणार्या डॉ.मालशे यांनी फादर स्टीफन्स यांच्या ख्रिस्त पुराणावर विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मुखपत्र असलेल्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ आणि ‘मराठी संशोधन पत्रिके’चे ते संपादक होते.
June 7, 2022
सरोजिनी वैद्य या ललित लेखिका, चरित्रकार आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध होत्या. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालक म्हणून त्यांनी योगदान दिलं होतं.
June 15, 2021
थेट विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाऱ्या बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली. गायक नट म्हणून त्यांच्या कारकीदीर्ची सुरुवात 'सौभाग्यरमा' या डॉ. बी. एन. पुरंदरे लिखित नाटकापासून झाली. दाजी भाटवडेकर यांना या नाटकातील नारायणरावांचे व्यक्तिमत्त्व आवडले. संस्कृत भाषेत नाटके करणाऱ्या दाजींना आपल्या संस्कृत नाटकासाठी असाच बोलक्या चेहऱ्याचा, भारदस्त आवाजाचा व चांगला गायक असणारा नट हवा होता. त्यांनी लगेच 'सं. शारदम्' या नाटकासाठी त्यांची निवड केली. त्यानंतर दाजी भाटवडेकरांच्या अनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या.
त्यानंतर त्यांनी सं. सौभद्रम्, पती गेले ग काठेवाडी, बुद्ध तिथे हरला, सं. मृच्छकटिक, सं. महाश्वेता, सं. मानापमान, सं. स्वयंवर, सं. सौभद, सं. संशयकल्लोळ, सं. धडिला राम तिने का वनी?, सुंदर मी होणार, मंदारमाला, सुवर्णतुला, बावनखणी, संत गोरा कुंभार, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, तो एक राजहंस, सं. कृष्णार्जुनयुद्ध, अशा अनेक संगीत व बिगर संगीत नाटकात अविस्मरणीय व गाजलेल्या भूमिका केल्या. त्यांनी काही चित्रपट व टीव्ही मालिकांतूनही काम केले, पण त्यांना संगीत रंगभूमीच अधिक भावली. रंगभूमीवर वावरण्याचे व्यसन काही औरच असते व ते भलेभले सोडू शकत नाहीत.
पण नारायणरावांनी वयाची साठी पूर्ण झाल्यावर रंगभूमीची कायमची रजा घेण्याचा निर्णय घेतला आणि १९९३ मध्ये गोव्यात संगीत सौभद्र मध्ये अखेरची भूमिका करून रंगभूमीचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांनी संगीत अध्यापनाचे काम सुरू केले. १२ वर्ष त्यांनी मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संगीत शिकवले. तेथून निवृत्त झाल्यावर २००६ सालापासून ते वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ संगीतसेवेचा शासनाने बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरव केला होता. २७ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांचे निधन झाले.
पं.नारायणराव बोडस यांचे चिरंजीव केदार बोडस त्यांचा वारसा पुढे नेत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 27, 2017
कर्तारसिंग दुग्गल हे पंजाबी, उर्दू, हिंदी, इंग्लिश अशा भाषांमध्ये लिहिणारे मोठे कवी, कथाकार आणि नाटककार म्हणून ओळखले जातात. त्यांनी फाळणीच्या, तसंच आणीबाणीच्या काळातल्या पंजाब संबंधी लेखन केलं आहे. अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांचं साहित्य अनुवादित झालं आहे.
March 1, 2024
मराठी गायक, कवि, लेखक व कीर्तनकार बबनराव नावडीकर यांचा जन्म १९ ऑगस्ट १९२२ रोजी झाला.
बबनराव नावडीकर यांचे मूळ नाव श्रीधर यशवंत कुलकर्णी. त्यांचे वडीलही कीर्तन करीत. गाण्यासाठी बबनराव दहावीत शिकत असताना कऱ्हाड येथून पळून पुण्यात आले आणि वाराने राहून त्यांनी पुढचे शिक्षण घेतले. नंतर ते पुण्यातील सरस्वती मंदिर शाळेत गायन शिक्षक झाले. तेथॆ त्यांना आदर्श शिक्षकाचा पुरस्कारसुद्धा मिळाला. पुण्यात आले तेव्हा बबनराव नावडीकर यांना गजानन वाटवे यांच्या गायनाचे फार आकर्षण होते. त्यांना भेटण्याची अनावर इच्छा होती. घर सोडून आलेले नावडीकर एकदा पुण्यात हुजूरपागेवरील फुटपाथवर बसले होते. बाजूला कंपाऊंडची भिंत होती. बबनराव येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे बघत बसले होते. त्यांच्या वडिलांचे- यशवंत नावडीकर यांचे एक मित्र त्या रस्त्याने जात होते. त्यांनी बबनरावांना ओळखले व चौकशी केली. बबनराव म्हणाले, ‘मी घरातून निघून आलो आहे. मला गाणं शिकायचंय.’ त्यांनी बबनरावांना चार-पाच दिवस आपल्या घरी ठेवून घेतले. पुण्यामध्ये हिंडताना एके दिवशी टिळक रोडवरील गोखले बिल्डिंगमध्ये त्यांना गायक गजाननबुवा जोशी हे गुरू भेटले. त्यांच्याकडे नावडीकरांचे संगीताचे शिक्षण सुरू झाले. त्यांची गजाननराव वाटवे यांना भेटण्याची इच्छा मात्र अजून पूर्ण झाली नव्हती. ते गुरूंकडेच राहत होते. तिथे असताना एकदा गजाननराव वाटवे सायकलीवरून जाताना त्यांना दिसले. या भेटीनंतर त्यांचा कार्यक्रम ऐकण्याचाही योग आला. आपले गुरूस्थान हेच आहे हे नावडीकरांना तेव्हा समजून चुकले.
शंकराचार्यांनी त्यांना भावगीतरत्न ही उपाधी बहाल केली होती. बालगंधर्वांबरोबर त्यांनी काही नाटकांत भूमिकाही केल्या होत्या. बबनराव नावडीकरांनी ३०-४० वर्षे स्वतःच्या आवाजात गीतरामायणाचे कार्यक्रम केले. सुधीर फडके यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात आकाशवाणीने बबनरावांना ’उदास का तू आवर वेडे' म्हणायला सांगितले होते. एकेकाळी पुण्यातील कोणताही लग्नसमारंभ बबनराव नावडीकरांच्या मंगलाष्टकां शिवाय होत नसे. बबनराव नावडीकर म्हणत त्यांच्या या यशामागे त्यांच्या पत्नी मंगला नावडीकर यांचा सिंहाचा वाटा आहे. 'त्यांनी घर बघितले नसते तर आज मी इथपर्यंत पोचलो नसतो' असे ते म्हणत.
बबनराव नावडीकर हे बालगंधर्वांचे भक्त असल्याने त्यांनी बालगंधर्वांची गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले. गंधर्वांचे फोटो आणि माहिती यांचे एक प्रदर्शन नावडीकरांनी गावोगाव नेऊन सुमारे बाराशे ठिकाणी भरवले. 'मी पाहिलेले बालगंधर्व' हे पुस्तक स्वतः बबनराव यांनी लिहिले आहे. त्याचा मंगलाष्टक गायनाचा वारसा त्यांचे सुपुत्र विजय नावडीकर आणि नातं मुग्धा नावडीकर करत आहेत.
बबनरावांचे सुपुत्र प्रा. विजय नावडीकर व दोन नाती मेधा आणि मुग्धा यांनी त्यांच्या गाण्याचा वारसा स्वरमुग्धा या संस्थेमार्फत गाण्याचे कार्यक्रम करून चालूच ठेवला आहे. 'रानात सांग कानात' हा खास बबनराव नावडीकरांनी गायलेल्या गीतांचा कार्यक्रम त्यांच्या स्मृतीदिनी होतो. त्यात बबनराव नावडीकरांची आणि त्यांच्या समकालीन गायकांची गाणी सादर केली जातात. बबनरावांचा एक नातू आनंद अरविंद नावडीकर हा सुद्धा बबनरावांचा वसा पुढे चालवीत आहे. गेली अनेक वर्षे अमेरिकेत राहून तेथे गीत रामायणातील पदे, जुनी मराठी हिंदी गीते आणि बबनरावांची भावगीते सादर करीत आहे.
बबनराव नावडीकर यांचे २८ मार्च २००६ रोजी निधन झाले.
त्यांची निवडक गाणी:
https://www.youtube.com/watch?v=W0a1nq5DHi8&index=1&list=PL759C91FA75E7FC08
https://www.youtube.com/watch?v=QHiIWXKDSs8
https://www.youtube.com/playlist?list=PL759C91FA75E7FC08
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
August 19, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti