सेनेच्या स्थापनेनंतरची मुंबई महापालिकेची पहिली निवडणूक त्यांनी लढवली. ६८ साली ते नगरसेवक झाले. दोन वर्षांत मानाच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष बनले.
November 20, 2021
दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक, जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते, भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते अशी त्यांची ओळख होती.
June 30, 2022
आपल्या अफाट अष्टपैलू अभिनयाच्या गुणांनी नाट्य-चित्रसृष्टीवर कायमस्वरूपी ठसा उमटवणारे गंभीर प्रवृतीचे अभिनेते निळू फुले यांचा जन्म २५ जुलै १९३१ रोजी पुणे येथे झाला.
निलकांत कृष्णाजी फुले उर्फ निळूभाऊ सुरवातीच्या काळात वानवडीच्या लष्करी महाविद्यालयात माळीकाम करत असत. हे पिढीजात काम करताना त्यांना मनापासून आनंद मिळत होता. याच क्षेत्रात करिअर करायचा त्यांचा विचार होता. मात्र, आर्थिक अडचणीमुळं त्यांना नर्सरी उघडता आली नाही. तेव्हा मिळणाऱ्या ८० रुपये पगारातले दहा रुपये निळूभाऊ राष्ट्रसेवा दलाला देत होते.
१९५७ च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी निळूभाऊंनी सेवादलासाठी येऱ्यागबाळ्याचे काम नोहे हे नाटक लिहिलं. या नाटकामुळं निळूभाऊंचे नाव झालं. मग त्यांनी माळीकाम सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.
राम नगरकरांसोबत त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची हे वगनाट्य गाजवलं. महाराष्ट्रभरात या दोघांचे नाव झालं. अनंत मानेंच्या एक गाव बारा भानगडी या तमाशापटात निळूभाऊंना सिनेमातील पहिला ब्रेक मिळाला. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या झेले अण्णांच्या भूमिकेनं त्यांना मराठी चित्रसृष्टीची कवाडं खुली झाली.
पुढं १९७२ मध्ये निळूभाऊंनी विजय तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर या नाटकात काम केले आणि या नाटकानं इतिहास घडवला. त्यांना स्वतःलाही बाइंडर आणि दळवींच्या सूर्यास्तमधले अप्पाजी या भूमिका विशेष आवडायच्या. अप्पाजी ही भूमिका तात्त्विक दृष्ट्या त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील मूल्यांशी साधर्म्य सांगणारी होती, म्हणूनही असेल.
बाइंडर नंतर तेंडुलकरांच्याच सामनामध्ये निळूभाऊंना हिंदूराव धोंडे पाटील साकारण्याची संधी मिळाली.शांतारामबापूंच्या पिंजरामुळं डॉ. श्रीराम लागूंचं मोठं नाव झालं होतं. सामनात निळूभाऊंचा सामना त्यांच्याशीच होता. प्रेक्षकांना मात्र या दोन नटश्रेष्ठांची जुगलबंदी पाहण्याचा अपूर्व योग लाभला.
वास्तविक पिंजरात निळूभाऊ होतेच. त्यांची भूमिका छोटी होती. मात्र, मास्तरांकडं पाहून केवळ कुत्सितपणे हसणं एवढीच कामगिरी त्यांनी अशी जबरदस्त साकारली होती, की हे केवळ निळूभाऊच करू जाणे. मास्तर म्हणजे डॉ. लागू संतापून एकदा निळूभाऊंच्या जोरात मुस्कटात भडकावतात, हा प्रसंग म्हणजे त्या चित्रपटातील एक हायपॉइंट ठरला होता. निळूभाऊंच्या अभिनय सामर्थ्याची प्रचिती डॉ. लागूंना तेव्हाच आली होती. त्यामुळं सामना करताना दोघांनाही मजा आली. हिंदूरावची भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. तेव्हा महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातून ग्रामीण भागात होत असलेले बदल आणि या साखरसम्राटांकडून सुरू झालेला सत्तेचा गैरवापर हा मुद्दा प्रभावी होता. तेंडुलकरांनी हिंदूरावची भूमिका जबरदस्त लिहिली होती. या भूमिकेला निळूभाऊंनी पुन्हा एकदा समर्थपणे न्याय दिला.
सामना चित्रपटानंतर निळूभाऊंकडं अशाच पद्धतीच्या भूमिकांची रांग लागली. सगळेच चित्रपट काही एवढे दर्जेदार नसायचे. निळूभाऊंचाही पोटापाण्याचा व्यवसाय असल्यानं येतील त्या भूमिका कराव्या लागायच्या. बहुतेक वेळा टिपिकल खलनायक रंगवावा लागे. त्यात मग नायिकेच्या पदराला हात घालण्याचा प्रसंग अनेक वेळा यायचा. एरवी अत्यंत सच्छिल असलेल्या निळूभाऊंना वारंवार नायिकेवर बलात्कार करण्याचा सीन शूट करावा लागायचा. मराठी सिनेमांतल्या नायिकाही त्याच त्या असायच्या. कोल्हापुरातल्या मुक्कामात शेवटी ते वैतागून दिग्दर्शकाला म्हणाले, अरे, गेल्या तीन सिनेमांत मी तेच करतोय आणि बाईही तीच. निदान या खेपेला बाई तरी बदला...
एक किस्सा सांगतात की एका मराठी कलाकाराने निळूभाऊंना घरी जेवायला बोलावलं होतं. त्या वेळी त्या कलावंताच्या आईनं, असल्या नालायक माणसाला मी जेवायला वाढणार नाही, असं म्हणून त्यांना जेवणही नाकारलं होतं. ही त्यांच्या भूमिकेची ताकद होती.
त्यांच्या या नेहमीच्या पठडीतून बाहेर काढून, त्यांना एकदम प्रोटॅगनिस्टची भूमिका देण्यासाठी पुन्हा जब्बार पटेल धावून आले. अरुण साधूंच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कादंबऱ्यांवर आधारित सिंहासन या चित्रपटात दिगू टिपणीस या पत्रकाराची भूमिका निळूभाऊंच्या वाट्याला आली. सत्ताकेंद्राच्या अत्यंत जवळ राहून, सिंहासनाचा सर्व खेळ तटस्थपणे पाहणाऱ्या दिगूची भूमिका निळूभाऊंनी समरसून केली. या चित्रपटाचा शेवट मंत्रालयाच्या बाहेर खदाखदा हसत सुटलेल्या दिगूवर होतो. निळूभाऊंनी त्या हसण्यात त्या व्यवस्थेविषयीची सर्व प्रतिक्रिया एवढी टोकदारपणे व्यक्त केली होती, की तो चेहरा आजही डोळ्यांसमोरून हलत नाही.
जब्बार पटेलांच्या बहुतेक सिनेमांत निळू फुले असायचेच. मग तो जैत रे जैत असो, की एक होता विदूषक असो.
निळू फुले यांनी थोडे-फार हिंदी सिनेमेही केले. 'कुली'मध्ये ते अमिताभसमोर तेवढ्याच ताकदीनं उभे राहिले. महेश भटच्या 'सारांश'मध्येही त्यांना खलनायक साकारायला मिळाला. पण निळू फुले हिंदीत फार रमले नाहीत. त्यांना आपल्या गावरान मराठी सिनेमांचा ठसकाच अधिक भावत असावा.
निळू फुले यांच्या व्यक्तित्वाचा आणखी एक विशेष म्हणजे ते निव्वळ अभिनेते नव्हते. त्याहीपलीकडं जाणारी,खऱ्या आयुष्यातली माणूस नावाची एक वास्तववादी भूमिका ते अगदी समरसून जगत होते. महात्मा फुल्यांचा वारसा सांगणारे एक सामाजिक अंग निळूभाऊंना होते. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेविषयी त्यांना कळवळा होता. शबनम, झब्बा अशा साध्या वेषात एरवी ते तसेही कार्यकर्ताच वाटत. राष्ट्रसेवा दल, डॉ राममनोहर लोहिया यांच्या विचारांची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध उपक्रमांना, संघटनांना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे.
निळू फुले यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यात महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार, 'सूर्यास्त' या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार,जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश आहे.
निळू फुले यांचे १३ जुलै २००९ रोजी निधन झाले.
निळू फुले यांची कारकीर्द
गाजलेली लोकनाट्ये
कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे.
गाजलेले मराठी चित्रपट
अजब तुझे सरकार, आई (नवीन), आई उदे गं अंबाबाई, आघात, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदुषक, कडकलक्ष्मी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, जगावेगळी प्रेमकहाणी, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, धरतीची लेकरं, नणंद भावजय, नाव मोठं लक्षण खोटं, पटली रे पटली, पदराच्या सावलीत, पायगुण, पिंजरा, पुत्रवती, पैज, पैजेचा विडा, प्रतिकार, फटाकडी, बन्याबापू, बायको असावी अशी, बिन कामाचा नवरा, भन्नाट भानू, भालू, भिंगरी, भुजंग, मानसा परीस मेंढरं बरी, मालमसाला, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, राघुमैना, राणीने डाव जिंकला, रानपाखरं, रावसाहेब, रिक्षावाली, लाखात अशी देखणी, लाथ मारीन तिथं पाणी, वरात, शापित, सतीची पुण्याई, सर्वसाक्षी, सवत, सहकारसम्राट, सामना, सासुरवाशीण, सोबती, सोयरीक, सिंहासन, सेनानी साने गुरूजी, सोंगाड्या, हर्या नार्या जिंदाबाद, हळदी कुंकू, हीच खरी दौलत.
गाजलेले हिंदी चित्रपट
कूली, जरा सी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, सौ दिन सास के
गाजलेली नाटकं, जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सखाराम बाईंडर, सूर्यास्त.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
July 13, 2017
सुचेता दलाल या पहिल्या बिझिनेस स्त्री-पत्रकार. नवं जाणून घेणं, तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि घटनांचे अन्वय लावण्याची चिकित्सक वृत्ती, संदर्भ गोळा करत,‘ता’वरून ‘ताकभात’ ओळखत त्यांनी अनेक ‘बातम्या’ मिळवल्या, प्रसिद्ध केल्या. त्या मध्ये एन्रॉनसारखे ऊर्जा घोटाळे, दिनेश दालमियां सारख्यांनी आय.टी. कंपन्यांच्या शेअर्समध्ये केलेले घोटाळे, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन मधील गडबडी उघडकीस आणल्याच, परंतु त्यांनी ५०० कोटी रुपयांचं ‘बिग बुल’ प्रकरण उघडकीस आल्याने इतिहास घडवला.
January 31, 2022
फराह खानने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केले असून चार चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९६५ रोजी झाला.
२०१२ सालच्या शिरिन फरहाद की तो निकल पडी ह्या चित्रपटामध्ये तिने नायिकेची भूमिका केली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 11, 2017
त्यांनी आपल्या संतोषी थिएटर्स संस्थेच्या वतीने जय देवी संतोषी माता,बायका त्या बायकाच, नाते युगायुगाचे, मृत्युंजय, छावा,पंखांना ओढ़ पावलांची,नटसम्राट (यशवंत दत्त, सुलभा देशपांडे),राजसन्यास संगीत एकच प्याला, बेबंदशाही, लग्नाची बेडी आदी नाटकांची निर्मिती केली होती. १९८० च्या सुमारास माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये जनता दराने नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मराठी रसिकांना आपलीशी वाटणारी नाट्यगृहे कमी पडतात याचा अंदाज आल्यावर, घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या शेजारचे झवेरबेन नाट्यगृह मामांनी मराठी नाटक आणि रसिकांसाठी खुले केले.
April 9, 2022
अँटनी विल्यम टोनी ग्रेग उर्फ टोनी ग्रेग यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ रोजी झाला. सहा फूट सहा इंच उंची असलेले टोनी ग्रेग यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील क्वीन्सटाऊन येथे झाला होता. टोनी ग्रेग यांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. परंतु, वडील स्कॉटलंडचे असल्यामुळे टोनी ग्रेग इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. ग्रेग यांनी अष्टपैलू कामगिरी करताना ५८ कसोटींत ४०.४३ सरासरीने ३ हजार ५९९ धावा केल्या. तसेच मध्यमगती आणि ऑफब्रेक मारा करत १४१ विकेट्स टिपल्या. मात्र २२ वनडेच त्यांच्या वाटय़ाला आल्या. टोनी ग्रेग यांच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने १९७६-७७ मध्ये भारताचा दौरा केला. त्यावेळी पाच सामन्यांच्या मालिकेत पहिल्या तीन कसोटी मोठ्या फरकाने इंग्लंडला जिंकून देण्यात ग्रेग यांचे मोलाचे योगदान राहिले. कर्णधार म्हणून भारताचा यशस्वी दौरा रहिला.
सर्वोत्तम कामगिरी करूनही वर्ल्ड सिरिज क्रिकेटमुळे टोनी यांची इंग्लंडसाठीची कारकीर्द केवळ पाच वर्षाची राहिली.
वर्ल्ड सिरिज क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी ग्रेग यांनी अनेक आघाडीच्या आणि उत्तमोत्तम क्रिकेटपटूंनाही वळवून घेतले. यामुळे संबंधित क्रिकेट बोर्डाच्या टीकेचे ते लक्ष्य बनले. वर्ल्ड सिरिज क्रिकेटमध्ये खेळल्याने टोनी यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्दही संपुष्टात आली. वर्ल्ड सिरिज बंद झाल्यानंतर ग्रेग ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. क्रिकेट खेळाडू म्हणून त्यांनी कारकीर्द संपविल्यानंतर समालोचक म्हणून त्यांची कारकीर्द बहरली.
समालोचक म्हणून त्यांना मोठी लोकप्रियता लाभली. क्रिकेटचा चांगला अनुभव तसेच रोखठोक स्वभावामुळे ऑस्ट्रेलियाच्या ‘चॅनेल नाइन’मधून तब्बल ३३ वर्षे क्रिकेट समालोचन केले. खेळादरम्यान काही मजेशीर प्रसंग घडला की, ग्रेग यांच्या खोचक समालोचनाने क्रिकेटप्रेमी मंत्रमुग्ध व्हायचे. मैदानावरील अंपायर्सच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याच्या (डीआरएस) प्रणालीला विरोध केल्यानंतर ग्रेग यांनी बीसीसीआयवर टीका केली होती. टोनी ग्रेग यांचे निधन २९ डिसेंबर २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 29, 2018
धर्मवीर भारतीं यांचे आडनाव वर्मा. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९२६ रोजी अलाहाबाद येथे झाला. १९४७ मध्ये हिंदी साहित्याची पदवी संपादन केलेले भारती विद्यार्थीदशेपासूनच स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभागी होते. स्वातंत्र्योत्तर काळात काही काळ त्यांनी हिंदी साहित्याचे अध्यापन केले.नंतर ‘अभ्युदय’ या हिंदी साप्ताहिकेतून आपल्या पत्रकारितेची कारकीर्द सुरू केली.
अलाहाबाद विद्यापीठात काही काळ हिंदीचे अध्यापन करून १९६० मध्ये टाईम्स समूहाच्या ‘धर्मयुद्ध’ मध्ये त्यांनी प्रवेश केला. १९८७ पर्यंत ‘धर्मयुग’चे ते संपादक होते. डॉ. धर्मवीर भारतींना आधुनिक हिंदी साहित्याचे अध्वर्यू मानले जाते. त्यांनी ऑस्कर वाईल्डच्या कथांचे हिंदी अनुवादही केले. त्यांचा ‘कनुप्रिया’ हा काव्यसंग्रह हिंदी साहित्यातील एक नवा टप्पा मानला जातो.
‘सूरजको सातवाँ घोडा’, ‘गुनाहोंका देवता’ या त्यांच्या साहित्यकृतींवर चित्रपट झाले. सुमारे ५० वर्षे हिंदी साहित्य आणि पत्रकारिता ही क्षेत्रे गाजविणा-या धर्मवीर भारतींची ‘अंधा युग’ ही कलाकृती अजरामर ठरली. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना अनेक साहित्य पुरस्कार दिले. भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरव केला. धर्मवीर भारती यांचे ४ सप्टेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३.
संदर्भ.इंटरनेट
‘सूरजको सातवाँ घोडा’, ‘गुनाहोंका देवता’ चित्रपट
https://youtu.be/adP9erjnDQo
https://youtu.be/JS00ybwPZtw
September 4, 2017
‘मल्लिका ए तरन्नुम’ नूरजहाँ यांचे खरे नाव 'अल्लाह वसई होते. त्यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. नूरजहाँ यांचा जन्म पेशावर येथील संगीतकार मदद अली यांच्या परिवारात झाला. संगीतकार परिवारात जन्म झाल्याने नूरजहाँ यांना लहानपणा पासून संगीताची आवड निर्माण झाली. नूरजहाँ यांनी वयाच्या पाचव्या वर्षी गाणे शिकायला सुरवात केली होती. नूरजहाँ यांचा परिवार १९३० मध्ये कलकत्ता येथे आला. तेथे नूरजहाँ यांना नृत्य व गाणे शिकायला मिळाले. नूरजहाँ यांच्या गाण्यावर प्रभावित होऊन संगीतकार गुलाम हैदर यांनी पंजाबी चित्रपट ‘शीला’ उर्फ ‘पिंड दी कुड़ी’ मध्ये बाल कलाकाराची भूमिका दिली. हा चित्रपट पंजाब मध्ये गाजला. त्या काळी पंजाब म्हणजे लाहोर पण होते.
१९३० च्या दशकात लाहोर मध्ये अनेक स्टूडियो स्थापन झाले. गायकाची वाढती मागणी लक्षात घेऊन नूरजहाँ यांचा परिवार १९३७ मध्ये परत लाहोरला आला. तेथे डलसुख एल पंचोली यांनी बेबी नूरजहाँ यांचे गाणे बघून ‘गुल-ए-बकवाली’ या चित्रपटात भूमिका दिली. या नंतर त्यांचा यमला जट, ‘चौधरी’ चित्रपट प्रदर्शित झाला. यातील गाणी ‘कचियां वे कलियाँ ना तोड़’ व ‘बस बस वे ढोलना की तेरे नाल बोलना’ ही खूप लोकप्रिय झाली. १९४२ मध्ये नूरजहाँ यांनी आपल्या पुढील बेबी हा शब्द काढला. त्याच वर्षी ‘खानदान’ चित्रपटातून त्यांनी लोकांचे ध्यान वेधून घेतले. याच चित्रपटाचे निर्देशक शौकत हुसैन रिजवी यांच्या बरोबर लग्न केला. १९४३ मध्ये नूरजहाँ मुंबईला आल्या. आजही जुन्या पिढीतील लोक त्यांच्या ‘लाल हवेली’, ‘जीनत’, ‘बड़ी माँ’, गाँव की गोरी और मिर्जा साहिबाँ, अनमोल घडी या चित्रपटासाठी नूरजहाँ यांची आठवण काढतात. अनमोल घड़ी चे संगीत नौशाद यांनी दिले होते त्यातील ‘आवाज दे कहाँ है’, ‘जवाँ है मोहब्बत’ और ‘मेरे बचपन के साथी’ ही गाणी आजही लोक आवडीने एैकतात. नूरजहाँ फाळणी नंतर मुंबई लाहोरला आल्या. त्यांचे पती रिजवी यांनी शाहनूर स्टूडियो चालू केला.
शाहनूर प्रोडक्शन नी ‘चन्न वे’ (1950) ची निर्मिती केली ज्याचे निर्देशन नूरजहाँ यांनी केले होते. त्यातील ‘तेरे मुखड़े पे काला तिल वे’ हे गाणे लोकप्रिय झाले. नूरजहाँ यांची शेवटचा चित्रपट ‘बाजी’ होता त्यांनी पाकिस्तातात १४ चित्रपट बनवले त्यातील १० उर्दू होते. काही कारणाने त्यांना अभिनय सोडवा लागला पण त्यांनी गाणे चालू ठेवले. पाकिस्तानात पार्श्व गायिका म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘जान-ए-बहार’ होता. यातील ‘कैसा नसीब लाई’ हे गाणे लोकप्रिय झाले होते. त्यांनी आपल्या फिल्मी करियर में उर्दू, पंजाबी व सिंधी भाषात अनेक गाणी गायली. त्यांना पाकिस्तान मधील सर्वोच्च सम्मान ‘तमगा-ए-इम्तियाज’ मिळाला होता. नूरजहाँ यांचे २३ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 23, 2018
अभिनेता ओमी वैद्य यांचा जन्म १० जानेवारी १९८२ रोजी युका व्हॅली, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे झाला.
ओमी वैद्य यांनी लॉस एंजेलिस काउंटी हायस्कूल फॉर आर्ट्समधून पदवी प्राप्त केली आणि नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांताक्रूझ येथे शिक्षण केले. ओम वैद्य यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनेता, दिग्दर्शक, संपादक, लेखक, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता म्हणून काम केले आहे.
3 इडियट्स या चित्रपटासाठी त्यांना स्टार डेब्यू मेल ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. त्याला 3 इडियट्ससाठी 2010 चा लायन्स गोल्ड अवॉर्डही मिळाला होता. २०१० मध्ये त्यांना 3 इडियट्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. 3 इडियट्स या चित्रपटा नंतर ओमी यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. चतुर रामलिंगम हे पात्र रसिकांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरले होते.
अरेस्टेड डेव्हलपमेंट, द ऑफिस, दिल तो बच्चा है जी, देसी बॉईज यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये ओमीने उत्कृष्ट भूमिका साकारल्या.
सिनेमाच नाही तर ओमी वैद्य जाहिरातींमधूनही झळकत असतो. जाहीरातक्षेत्रातही ओमी फार लोकप्रियत बनला आहे.
ओमी वैद्य यांनी ऑगस्ट २००९ मध्ये मीनल पटेल सोबत लग्न केले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
January 10, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti