(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ नाट्यकर्मी जयवंत नाडकर्णी

    शितू, दूरचे दिवे, वैजयंती, कौतेय, एकशून्य बाजीराव, करायला गेलो एक, मी जिकलो मी हरलो, वतुर्ळाचे दुसरे टोक, माता द्रौपदी, द्वंबद्विपचा मुकाबला, वेड्याचे घर उन्हात, पाषाण पालवी ह्या नाटकात जयवंत नाडकर्णी यांनी प्रमूख भूमिका केल्या होत्या.

      August 13, 2021


  • अभिनेते प्रभाकर मोरे

    सध्या प्रभाकर मोरे हे सोनी मराठी या वाहिनीवर ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या मराठी रियालिटी शोमध्ये आपल्याला कॉमेडी करताना दिसत आहे.

      June 20, 2022


  • नोबेल पारितोषिकाचे जनक आल्फ्रेड नोबेल

    नोबेल पुरस्कार हा जागतिक पातळीवरचा एक सर्वोच्च सन्मान आहे. हा सन्मान दरवर्षी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, शांतता अशा विविध क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. गणित विषयासाठी मात्र हा नोबेल पुरस्कार नाही.

      October 21, 2021


  • जेष्ठ मराठी नाट्य अभिनेते आणि गायक चंदू तथा चंद्रकांत हरी डेगवेकर

    डेगवेकर यांचे मूळ घराणे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. डेगवेकर यांचा जन्मही इथलाच. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९३४ रोजी झाला. इंग्रजी तिसरीपर्यंतचे त्यांचे शिक्षण श्रीवर्धन येथेच झाले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले. गिरगाव येथील विल्सन हायस्कूल येथे त्यांचे पुढील शिक्षण झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ‘मॅट्रिक’ झाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी छोटी-मोठी कामे केली. पुढे ‘सीटीओ’ (पोस्ट अॅाण्ड टेलिग्राफ)मध्ये त्यांना ‘फोनोग्राम ऑपरेटर’ म्हणून नोकरी लागली. ही नोकरी करत असतानाच के.सी. महाविद्यालयातून त्यांनी ‘इंटर’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. हरी डेगवेकर हे त्यांचे वडील. . त्यांना भजनाचे वेड होते. त्यामुळे घरात लहानपणापासूनच गाणी, भजने त्यांच्या कानावर पडत गेली आणि तोच संस्कार त्यांच्यावर झाला. लहानपणी वडिलांनी त्यांना छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांतून अभंग म्हणण्यासाठी पाठविले. त्यामुळे स्टेजवर उभे राहण्याची, वावरण्याची त्यांची भीती लहानपणीच गेली. गणेशोत्सवात वेगवेगळ्या नाटकांतून त्यांनी कामेही केली. गिरगावातील गायवाडी येथील बंडोपंत रानडे यांच्याकडे ते काही काळ गाणेही शिकले. त्या वेळी काही संगीत नाटकांतूनही त्यांनी छोट्या-मोठ्या भूमिका केल्या होत्या.

    चंडू डेगवेकर यांनी राज्य नाट्य स्पर्धेत मराठा मंदिर कला केंद्र या संस्थेने सादर केलेल्या आणि बाळ कोल्हटकर यांनी गाजविलेल्या ‘मुंबईची माणसे’ या नाटकातील ‘वसंत’ ही भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्यांना राज्य नाट्य स्पर्धेचे पारितोषिक व चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक मिळाले. त्यांची ही भूमिका ‘नाटय़संपदा’ या संस्थेच्या तीन मालकांपैकी एक असलेल्या मोहन वाघ यांनी पाहिली आणि त्याणी डेग्वेकरांचे नाव नाटककार विद्याधर गोखले यांना सुचविले आणि मला गोखले यांच्या ‘मदनाची मंजिरी’ या नाटकातील ‘चक्रदेव’ ही भूमिका मिळाली आणि येथूनच त्यांच्या व्यावसायिक रंगभूमीवरील कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. १९६७ मध्ये ‘ललितकलादर्श’चे भालचंद्र पेंढारकर यांनी त्यांच्या नाट्यसंस्थेत डेग्वेकरांना बोलाविले आणि ते ‘ललितकलादर्श’शी कायमचे जोडले गेले . 'पंडितराज जगन्नाथ' या १९६८ साली आलेल्या नाटकाद्वारे ते नट म्हणून ठळकपणे पुढे आले. या त्यांच्या पहिल्याच नाटकात त्यांनी कलंदरखाँच्या इरसाल भूमिकेत गायलेले 'इश्क के गहरे खतरे में बडे भी खा गये ठोकर' हे कव्वालीवजा पद प्रचंड दाद घेऊन जाई.पंडितराज जगन्नाेथमध्ये कलंदरखाँची भूमिका आधी शंकर घाणेकर करत असत. त्यांनी कंपनी सोडल्यानंतर 'ललितकलादर्श'च्या भालचंद्र पेंढारकरांच्या हाताला चंदू डेगवेकर नावाचा हिरा लागल्याने. डेग्वेकरांनी अगदी आयत्यावेळी पंडितराज जगन्ना'थ या नाटकातली भूमिका वठवली. पुढे 'बावनखणी' या नाटकापर्यंत चंदू डेगवेकर हे 'ललितकलादर्श'चे महत्त्वाचे नट होते. त्यांचा आवाज खणखणीत आणि पल्लेदार असून त्यांना त्यांना टायमिंगचे अत्युत्तम भान आणि संगीताची सुरेख जाण होती. त्यामुळे ते गद्य आणि पद्य दोन्ही प्रकारच्या भूमिकांत सारख्याच सफाईने फिरायचे. सुरेश खरे यांच्या 'रक्त नको मज प्रेम हवे' या गद्य नाटकात ते नायक होते.

    'दुरितांचे तिमिर जावो'मधील मा. दत्ताराम आजारी पडल्यानंतर ते करीत असलेली भूमिका चंदू डेग्वेकरांनी पूर्ण जबाबदारीने निभावली. 'मदनाची मंजिरी'मधील चक्रदेव या पागल आशिकाची त्यांची भूमिका अतोनात गाजली. 'मंदारमाला' या विद्याधर गोखले यांच्या गाजलेल्या नाटकातील राम मराठे आणि प्रसाद सावकारांच्या जुगलबंदीत (बसंत की बहार) ते सावकारांचे चेले म्हणून शेजारी बसायचे आणि एक चीज तयारीच्या गायकाप्रमाणे अशी पेश करायचे की प्रेक्षक थक्क व्हायचे. 'जय जय गौरी शंकर' नाटकात ते 'नारायणा रमारमणा' आणि 'भरे मनात सुंदरा' ही पदे बहारीने पेश करायचे. त्यांनी 'सौभद्र'पासून 'स्वरसम्राज्ञी' पर्यंत जवळपास सगळीच संगीत नाटके केली, काही दिग्दर्शितही केली. ही सर्व नाटके त्यांना तोंडपाठ होती.

    चंदू डेगवेकर हे दत्तारामांना आदर्श आणि अण्णा पेंढारकरांना आपले गुरू मानत असत.
    डेगवेकर यांनी त्या काळात नोकरी सांभाळूनच सर्व नाटके, तालमी व प्रयोग केले. चित्रपटात काम करण्याविषयी त्यांना विचारणा झाली होती. पण चित्रीकरणासाठी अनेक दिवस मुंबईबाहेर जावे लागेल आणि नोकरी करत असताना ते शक्य होणार नाही म्हणून ते चित्रपटाकडे वळलेच नाहीत.

    डेगवेकर यांनी आत्तापर्यंत सुमारे ५० संगीत, सामाजिक, ऐतिहासिक नाटके तसेच फार्समधून विविध भूमिका साकार केल्या आहेत. ‘शारदा’ (कांचनभट), ‘सौभद्र’ (बलराम), ‘मृच्छकटीक’ (शकार), ‘मानापमान’ (धैर्यधर), ‘मत्स्यगंधा’ (भीष्म), ‘स्वयंवर’ (शिशुपाल), ‘संशयकल्लोळ’ (फाल्गुनराव),‘भावबंधन’ (प्रभाकर व कामण्णा), ‘एकच प्याला’ (भगीरथ, शरद), ‘पंडितराज जगन्नाथ’ (कलंदर), ‘मंदारमाला’ (भैरव), ‘सुवर्णतुला’ (नारद), ‘जय जय गौरी शंकर’ (शृंगी), ‘स्वरसम्राज्ञी’ (भय्यासाहेब), ‘बावनखणी’ (मोरशास्त्री) ही डेगवेकर यांची गाजलेली संगीत नाटके. ‘दुरितांचे तिमीर जावो’मधील त्यांनी साकारलेला ‘बापू’ही गाजला. ‘बेबंदशाही’, ‘ययाती आणि देवयानी’, ‘उद्याचा संसार’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘देव दिनाघरी धावला’, ‘अपराध मीच केला’, ‘साष्टांग नमस्कार’ आदी ऐतिहासिक, सामाजिक नाटकांतूनतसेच ‘गीत सौभद्र’, ‘महाश्वेता’ आदी संगीतिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या. डेगवेकर यांना अखिल भारतीय मराठी नाटय़परिषदेच्या ‘जीवनगौरव’पुरस्कारासह गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे पुरस्कार, रंगशारदा संस्थेचा विद्याधर गोखले पुरस्कार, नाटय़ परिषद-पुणे यांचा केशवराव दाते पुरस्कार, गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार आदींनी सन्मानित करण्यात आले आहे. राज्य शासनाचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. नव्या पिढीकडून बसवून घेतलेली जुनी संगीत नाटके हे डेगवेकर यांचे सगळ्यात महत्त्वाचे काम आहे. विशेष म्हणजे ही नाटके बसविण्यासाठी, नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्या त्या संगीत नाटकातील विविध पात्रे, त्यांच्या भूमिका उलगडून दाखविण्यासाठी त्यांनी कोणताही आर्थिक मोबदला/मानधन आजवर कधीही घेतले नाही. त्यांच्या या निरलस व नि:स्वार्थी सेवेविषयी त्यांना विचारले असता डेगवेकर म्हणतात, संगीत रंगभूमीने मला मान-सन्मान, प्रतिष्ठा, यश, आर्थिक स्थैर्य असे सर्व काही दिले. संगीत रंगभूमीच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी कोणतेही आणि मराठी संगीत रंगभूमीचा वैभवशाली वारसा जपण्यासाठी मी हे काम केले. शिवरंजनी (पुणे), नादब्रह्म परिवार (चिंचवड), कलाद्वयी (पुणे), ऋतुरंग (डोंबिवली) आदी संस्थांसाठी मी जुनी संगीत नाटके नव्याने बसवून दिली.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 17, 2018


  • लेखक केशव मेश्राम

    १९७७ मधे ‘उत्खनन’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह आला. रेल्वेत नोकरीला असलेले मेश्राम नंतर मराठीचे प्राध्यापक झाले. मुंबई विद्यापीठातून विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले.

      November 24, 2021


  • निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य

    चित्रपट दिग्दर्शनाच्या पदार्पणातच राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांनी दिग्दर्शक म्हणून 'तिसरी कसम' मधून आपला वेगळा ठसा उमटवला. 'तिसरी कसम'ला १९६६ मध्ये उत्कृष्ट चित्रपटाचं राष्ट्रपती सुवर्णपदक मिळालं.

    पुढे १९७० आणि १९८० च्या दशकांत त्यांनी समांतर चित्रपट चळवळीत अनुभव आविष्कार आणि गृहप्रवेश असे काही चांगले चित्रपट दिले; मात्र 'तिसरी कसम'ची सर त्यांना आली नाही.बासू भट्टाचार्यांचा ’अनुभव’ हा आधुनिक भारतीय समाजव्यवस्थेमधे पारंपरिक लग्न व्यवहाराचे सांधे जुळून येताना ही लग्नव्यवस्था आपलं पारंपरिक रुप कसं बदलत गेली (किंवा अजिबात बदलत गेली नाही) याचं यथार्थ चित्रण करणारा ठरला.आश्चर्य वाटाव्या इतक्या खरेपणाने लग्नसंबंधांमधली गुंतागुंत यात बासूदांनी दाखवली. 'अनुभव' हा चित्रपट ब्लॆक ऍन्ड व्हाईट होता. कलात्मक सिनेमांची जी लाट नंतरच्या काळात आली त्यातलाच हा आर्टी सिनेमा म्हणून अनेकांनी तो हेटाळलाही. पण शहरांमधल्या बदलत्या लग्नसंबंधांचे चित्रण थेट वास्तवाने या आधी कोणीच केले नव्हते.

    बासूदांची फ़िल्म खर्‍या अर्थाने मॉडर्न आणि धीट होती. आधुनिक बदलत्या समाजशैलीतल्या लग्नांचे असे चित्रण अगदी आताच्या काळातही नंतर फ़ारसे कोणी केले नाही. बासू भट्टाचार्य यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांनी बंगाली चित्रपटांची उंची एव्हरेस्टला भिडवली. भारतीय संस्कृतीची नाळ बदलत्या जीवनशैलीशी जुळवून घेत असताना समाज ज्या स्थित्यंतरांमधून जात होता ते सिनेमाच्या पडद्यावर स्पष्टपणे दाखवू शकणारे असे फ़ार थोडे दिग्दर्शक त्या पैकी एक म्हणजे बासूदा. बासूदांनी त्यानंतर अजून दोन सिनेमांमधून, आविष्कार आणि गृहप्रवेश, हाच धागा पुढे नेला आणि भारतीय विवाहसंस्थेवर विशेषत: आधुनिक शहरांमधल्या पती-पत्नी संबंधांचे विश्लेषण करणारी एक उत्तम ट्रिलॉजी हिंदी सिनेमाच्या पडद्यावर आली.

    बासू भट्टाचार्य यांचे २० जुन १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      June 22, 2017


  • हिंदुस्तानी संगीतशैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याच्या प्रख्यात गायिका सूरश्री केसरबाई केरकर

    भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने भर घालणाऱ्या सूरश्री केसरबाई केरकर या गोव्याच्या भूमीकन्या. त्यांचा जन्म १३ जुलै १८९२ रोजी झाला. उस्ताद अब्दुल करीम खाँ, प्रसिद्ध गायक रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. १९२१ मध्ये त्यांनी जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक उस्ताद अल्लादिया खाँ यांचे शिष्यत्व पत्करले. त्या राजे - सरदार मंडळींसाठी नियमितपणे मैफिली करत असत. त्यांनी आपल्या गाण्याची काही ध्वनिमुद्रणेही केली. नोबेल पुरस्कारविजेते कवी रवींद्रनाथ टागोर हे केसरबाईंच्या गायनाचे विलक्षण चाहते होते असे सांगितले जाते.

    कोलकाता येथील संगीत प्रवीण संगीतानुरागी सज्जन सन्मान समितीने १९४८ साली केसरबाईंना 'सूरश्री अशी पदवी बहाल केली. भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार दिला. रवींद्रनाथ टागोरांनी 'सूरश्री' किताब बहाल केला. रवींद्रनाथांनी दिलेले गौरवपत्र चांदीच्या चौकटीत घालून केसरबाईंनी शेवटपर्यंत जतन करून ठेवले. संगीत नाटक अकादमीने १९५३ साली 'प्रमुख आचार्या' ही सनद त्यांना बहाल केली. दर वर्षी नोव्हेंबर महिन्यात गोव्यात सूरश्री केसरबाई केरकर स्मृती संगीत समारोह आयोजित केला जातो, तसेच मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला दरवर्षी त्यांच्या नावे संगीत शिष्यवृत्तीही दिली जाते.

    गोव्यातील कवी, नाटककार आणि आमदार विष्णू सूर्या वाघ यांनी केसरबाईंचे ’एका सूरश्रीची कथा’ नावाचे चरित्र लिहिले आहे. केसरबाई केरकर यांचे १६ सप्टेंबर १९७७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. विकीपीडीया

      September 16, 2017


  • कथा लेखक ग. ल. ठोकळ

    साताऱ्याकडील ग्रामीण पार्श्वभूमीवरची, बेचाळीसच्या क्रांतिपर्वावर आधारलेली त्यांची ‘गावगुंड’ ही कादंबरी खूप गाजली. काही विद्यापीठांनी तर तिचा आपल्या अभ्यासक्रमातही समावेश केला. या काळात र. वा. दिघे यांच्या साहित्याने आपण झपाटले गेलो होतो असे ठोकळ सांगतात. अर्धशतकापूर्वी लिहिलेल्या ‘कडू साखर’, ‘गोफणगुंडा’, ‘निळे डोळे’, ‘सुगंध’, ‘मोत्याचा चारा’सारख्या ठोकळांच्या कथा आजही तितक्याच हृद्य, वेधक वाटतात. दिघ्यांच्या कादंबऱ्यांमधले अद्‌भुतरम्य आणि रोमांचकारक वातावरण काही प्रमाणात ‘गावगुंड’ मध्ये अवतरले आहे.’

      May 26, 2022


  • क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख २

    …. या पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर वाहिनीला लिहितात कि ‘अशीच सर्व फुलें खुडावी’ आणि श्री रामाच्या चरणी (या देशासाठी ) अर्पण व्हावी. इतकी प्रचंड देशभक्ती असलेल्या सावरकरांना मात्र स्वराज्य मिळाल्यानंतर कोणता सन्मान प्राप्त झाला ? त्यांचे कोणते विचार आम्ही आमलात आणले.उलट सावरकरांना “जातीच्या ” भिंतीत चिणून आम्ही त्यांचा दररोज खून करीत आहोत ” आज स्वतःच्या पोळीवर तूप ओतून घेण्यासाठी धडपडणारे “नेते “पाहिल्यावर सावरकर स्वर्गातून म्हणत असतील… ” हेच फळ का मम तपाला “

      May 29, 2019


  • बॉलीवुड अभिनेत्री दिया मिर्झा(हेंड्रिच)

    दियाने कॉलेज शिक्षण चालू असतानाच मॉडेलिंगला सुरूवात केली. २००० सालच्या फेमिना मिस इंडिया सौंदर्यस्पर्धेत दियाने तिसरे स्थान मिळवले. भारतातर्फे २००० मिस आशिया पॅसिफिक स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या दियाने ही स्पर्धा जिंकली. तिचा जन्म ९ डिसेंबर १९८१ रोजी हैदराबाद येथे झाला.

    याच कार्यक्रमात दियाला मिस ब्युटिफूल स्माइल, द सोनी च्वॉइस अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले. त्यानंतर दियाने बॉलिवूडकडे येण्यास सुरुवात केली. दियाने ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तिच्या अपोझिट आर. माधवन बघावयास मिळाला. वास्तविक या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल दाखविली नाही, परंतु चित्रपटाच्या संगीताने आजही प्रेक्षकांवर मोहिनी घातलेली आहे. त्यानंतर दियाने ‘दिवानापन’ आणि सलमान खानसोबत ‘तुमको न भूल पाएंगे’ या चित्रपटांमध्ये काम केले.

    ‎सलमानने अनेक अभिनेता, अभिनेत्री आणि कम्पोजरला इंडस्ट्रीमध्ये संधी दिली आहे. त्यापैकीच एक नाव अभिनेत्री दिया मिर्झाचे आहे. दिया मिर्झाला इंडस्ट्रीत सलमानेच आणले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ‎९४२२३०१७३३
    ‎संदर्भ.इंटरेनट

      December 9, 2017