लॉरेन्स हा ऑक्सफर्डचा पदवीधर म्हणजे नागरी पेशाचा इसम होता. लष्करी शिक्षण त्याने कधीच घेतलेलं नव्हतं. पण, ‘ब्युरोच्या’ आदेशानुसार ब्रिटिश लष्कराने लॉरेन्सला सरळ लेफ्टनंट कर्नलचा हुद्दा दिला.
August 16, 2021
आजपर्यंत मी अनेक दाहक प्रसंगांना सामोरे गेलो आहे . पण अब्दुलच्या ओझरत्या स्पर्शाने जो’चटका’दिला त्याची दाहकता अजूनही मनात जिवंत आहे .
December 20, 2017
मनोज बाजपेयी यांनी आपल्या करिअर ची सुरवात दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या ‘स्वाभिमान’ या मालिकेपासून केली. ह्या मालिकेत मनोज बाजपेयी यांच्या बरोबर आशुतोष राणा आणि रोहित रॉय यांच्यामुळे त्यांचीही मालिका सुपरहिट ठरली. बैंडिट क्वीन या चित्रपटापासून त्यांनी बॉलीवुड मध्ये प्रवेश केला. १९९८ मधील राम गोपाल वर्मा यांच्या ‘सत्या’ चित्रपटात त्यांना प्रमुख भूमिका मिळाली आणि तेंव्हापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले.
April 23, 2022
साहित्य सागरातील कोहिनूर हिरा साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांची कन्या मीना देशपांडे.
September 8, 2023
Give me Hundred Nachiketa, I will Change the World असे अभिमानाने सांगणारे स्वामी विवेकानंद हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. राजा अजितसिंग खेत्री यांनी दि. १० मे १८९३ या दिवशी स्वामीजींना‘विवेकानंद’असे नाव दिले. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चमात्य तत्त्वज्ञान आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला.
July 4, 2021
दत्ता डावजेकर यांनी हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायिका म्हणून लता मंगेशकरांना पदार्पणाची संधी दिली. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला. हिंदी चित्रपट होता आपकी सेवामें आणि गाणे होते पा लागूं कर जोरी रे. तसेच मराठी चित्रपट होता माझं बाळ. डावजेकरांनी त्यानंतर आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सुधा मल्होत्रा ह्यांनाही पार्श्वगायिका म्हणून सर्वप्रथम संधी दिली. दत्ता डावजेकरांचे वडील बाबुराव, तमाशांत आणि उर्दू नाटकांत तबला वाजवत असत. वडिलांबरोबर सदैव असणार्या् डावजेकरांनी तबलावादन आणि पेटीवादन आत्मसात करून घेतले. तबला-पेटी वादनांबरोबरच त्यांनी गाण्यांना चाली द्यायलाही सुरुवात केली. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शांता आपटे ह्यांनी स्वतःच्या गायनाच्या मैफिलींसाठी डावजेकरांना आपल्याबरोबर साथीला घेऊन सगळा उत्तरी हिंदुस्थान हिंडवून आणले. इथे त्यांना मासिक २० रूपये पगार मिळत असे. त्यानंतर दत्त डावजेकरांनी काही वर्षे सी.रामचंद्र आणि चित्रगुप्त ह्यांचे साहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर १९४१ साली त्यांना स्वतंत्रपणे म्युनिसिपालिटी ह्या मराठी चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. लगेच १९४२ साली त्यांना सरकारी पाहुणे हा चित्रपट मिळाला. ह्यातले नाचे संगीत नटवर हे गीत खूप गाजले. त्यानंतर १९४३ साली माझं बाळ हा चित्रपट मिळाला. ह्यात लता मंगेशकरांनी पहिल्यांदाच पार्श्वगायन केले. त्यापाठोपाठ डावजेकरांचा १९४७ साली आलेला हिंदी चित्रपट म्हणजे आप की सेवामें. या चित्रपटात लताने पहिल्यांदाच हिंदीतले पार्श्वगायन केले. म्हणजेच मराठी आणि हिंदी चित्रपटातले लताजींचे पहिले पार्श्वगायन पदार्पण हे दत्ता डावजेकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली झाले.
त्यानंतर त्यांनी आपकी अदालत ह्या वसंत जोगळेकरांचा आणि कैदी गोवल कोंडाका/प्रिझनर ऑफ गोवलकोंडा हा प्रेमनाथच्या हिंदी-इंग्रजी चित्रपटाच्या संगीतरचना केल्या. ह्यात त्यांनी सुधा मल्होत्रा ह्यांना पार्श्वगायनाची प्रथम संधी दिली.
दत्ता डावजेकरांनी साधारण ६०च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. राजा परांजपे, गजानन जागीरदार, मास्टर विनायक, दिनकर पाटील, दत्ता धर्माधिकारी, राजदत्त, राजा ठाकूर इत्यादी निर्माते-दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलेले आहे. रंगल्या रात्री अशा, पाठलाग, पाहू रे किती वाट, थोरातांची कमळा, पडछाया, चिमणराव-गुंड्याभाऊ, पेडगावचे शहाणे, जुनं ते सोनं, संथ वाहते कृष्णामाई, सुखाची सावली, वैशाख वणवा, मधुचंद्र, यशोदा इत्यादी चित्रपटातील त्यांचे संगीत विलक्षण गाजले. डीडींनी १०-१२ नाटकांचेही संगीत दिग्दर्शन केलेले आहे. त्यापैकी थँक यू मिस्टर ग्लाड ह्या नाटकाला संगीत देण्यासाठी त्यांनी जर्मन संगीतही आत्मसात केले. डीडी हे जसे उत्तम संगीतकार होते तसे ते उत्तम कवीही होते. भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी हे गदिमांनी लिहिलेले पाहू रे किती वाट ह्या चित्रपटातले गीत, डीडींचे सर्वात गाजलेले गाणे म्हणता येईल. ह्या गाण्याने त्यावेळचे सगळे विक्रम मोडले होते. ह्या गाण्यामुळे मिळालेले सर्व उत्पन्न सैनिक कल्याण निधीला देण्यात आले. १९९२ साली डी.डीं नी शेवटचा चित्रपट केला. दत्ता डावजेकर यांचे १९ सप्टेंबर २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दत्ता डावजेकर यांची काही गाणी
आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी
कुणि बाई, गुणगुणले, गीत माझिया ह्रुदयी ठसले
गेला कुठे बाई कान्हा, कान्हा येईना
थांबते मी रोज येथे, जी तुझ्यासाठी
तुज स्वप्नि पहिले रे, गोपाला
अंगणी गुलमोहर फुलला
गोमू माहेरला जाते हो नाखवा
या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती
संथ वाहते कृष्णामाई- चित्रपट
बाई माझी करंगळी मोडली
September 19, 2017
कल्पना चावला या भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर होत्या. पूर्ण नाव कल्पना बनारसीलाल चावला. त्यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी कर्नाल, हरयाणा येथे झाला. त्यांचे कुटुंब हे एक मध्यमवर्गीय भारतीय कुटुंब होते. मुलींच्या तुलनेत मुलांना अधिक महत्त्व अशलेल्या समाजात लहानाची मोठी झाली तरही कल्पना यांनी आईच्या मदतीने नेहमी तिच्या स्वप्नांच्या दिशेने मार्गक्रमण केले .कल्पना यांनी शालेय शिक्षण कर्नाल येथे, तर चंदिगड येथून एअरॉनॉटिकल इंजिनिअरींग पूर्ण केले. कल्पना कधीही वर्गात पहिली आली नाही, तरीही कायम पहिल्या पाचमध्ये ती असायची. नासामध्ये काम करण्याचे ध्येय ठेवूनच कल्पना १९२ मध्ये त्या अमेरिकेत गेल्या. त्याठिकाणी त्यांनी एअरोस्पेस इंजिनिअरींगमध्ये एमएससीची पदवी मिळवली. १९८४ मध्ये टेक्सास विद्यापीठातून त्यांनी ही पदवी मिळवली. अॅस्ट्रॉनॉट बनण्यासाठी कल्पना यांना आणखी उच्चशिक्षण घेणे गरजेचे होते. त्यामुळे १९८६ मध्ये त्यांनी आणखी एक मास्टर डीग्री मिळवली. तर १९८८ मध्ये एअरोस्पेस इंजिनिअरींग विषयात पीएचडी पूर्ण केली. नासामध्ये काम करताना कल्पना यांनी येथील रिसर्च सेंटरमध्ये ओव्हरसेट मेथड्स या क्षेत्रात उपाध्यक्षपद मिळवले होते.
नासामध्ये उपाध्यक्षपद मिळवल्यानंतर कल्पना यांना Computational fluid dynamics (CFD) श्रेत्रात संशोधन करण्याची जबाबदारी देण्यात आली. शॉर्ट टेकऑफ आणि लँडींग कन्सेप्टबाबतचे हे संशोधन होते. कल्पना चावला या सर्टिफाइड कमर्शिअल पायलट होत्या. त्यांना सीप्लेन, मल्टी इंजिन एअर प्लेस आणि ग्लायडर चालवण्याचा परवाना होता. ग्लायडर आणि एअरोप्लेनसाठी त्या सर्टिफाइड फ्लाइट इन्स्ट्रक्टरही होत्या. १९९१ मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर कल्पना चावला यांनी नासामध्ये अॅस्ट्रोनॉट कॉर्प्सचे सदस्यत्व मिळवण्यासाठी अर्ज केला होता. अंतराळक्षेत्रातील योगदानासाठी कल्पना यांनाअनेक पुरस्कार मिळाले होते. स्पेस मेडल ऑफ ऑनर, नासा स्पेस फ्लाइट मेडल आणि नासा डिस्टींग्वीश्ड सर्व्हीस मेडल यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता. डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला. प्रथम अंतराळात पाऊल ठेवल्यानंतर कल्पना चावला म्हणाल्या होत्या की, जेव्हा तुम्ही ताऱ्यांकडे किंवा आकाशगंगेकडे पाहता तेव्हा तुम्ही जमिनीच्या एखाद्या तुकड्यावरून नव्हे तर सौरगंगेतून पाहत असता.
१ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्यास कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 1, 2019
संजय गांधी यांनी मॉडेल असलेल्या मनेका यांच्या बरोबर लग्न केले होते. लग्नाच्या वेळी संजय मनेका यांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठे होते. संजय यांच्याशी विवाहानंतर मनेका यांनी त्यांची बॉम्बे डाइंगची जाहिरात नष्ट केल्याचे म्हणले जाते.
June 28, 2022
मनमोहन देसाई यांचे वडिल किकुभाई देसाई हे चित्रपट निर्माते व फिल्मालय या स्टुडिओचे मालक होते व बंधू सुभाष देसाई निर्माते होते.त्यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९३६ रोजी झाला.
मनमोहन देसाई यांना बॉलीवुड मध्ये मनजी या नावाने ओळखले जायचे. मनजीनी बॉलीवूड मधील सुरवात आपले बंधू निर्माते सुभाष देसाई याच्या ‘छलिया’ या चित्रपटापासून केली. मनमोहन देसाई यांनी २० चित्रपट बनवले त्यातील १३ चित्रपट हिट झाले.
मनमोहन देसाई यांच्या अमर अकबर एंन्थनी या चित्रपटाने अमिताभ बच्चन यांना बॉलीवूड मधील वन मैन इंडस्ट्री बनवले. मनमोहन देसाई यांचे लग्न जीवनप्रभा देसाई यांच्या बरोबर झाले, पण १९७९ ला त्याच्या निधनानंतर त्यांचा अभिनेत्री नंदा यांच्या बरोबर साखरपुडा झाला पण ते लग्न होऊ शकले नाही.
मनमोहन देसाई यांचे १ मार्च १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 27, 2017
गुग्लिएल्मो मार्कोनीच्या रुपाने असा माणूस पृथ्वीवर अवतरलाच. बिनतारी संदेशवहनाच्या बाबतीत कसलीही पार्श्वभूमी नसताना मार्कोनीने या तंत्रज्ञानाला सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात नेऊन ठेवले आणि अतिशय लोकप्रिय बनवले.
April 26, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti