(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बॉलिवूड मधील ‘बाबूजी’ आलोकनाथ

    आलोकनाथ हे नाव ऐकलं तरी आपल्यासमोर उभी राहते ती सोज्वळ अन्‌ शांत माणसाची प्रतिमा. ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ-साथ है’ आणि ‘विवाह’ यांसारख्या हिट सिनेमांमध्ये वडिलांची भूमिका साकारणारे आलोकनाथ प्रत्येक मालिका आणि सिनेमांमध्ये वडिलांची भूमिका चोख पार पाडतात.

      July 10, 2017


  • देवगडचे कवी प्रमोद जोशी

    एकविसाव्या शतकात मराठी कविपरंपरेत अग्रक्रमाने उल्लेख करावा असे कवी म्हणजे देवगड येथील कविराज प्रमोद जोशी. संघर्षमय परिस्थितीतही कवितेवरील अढळ निष्ठा प्रमोद जोशी सरांनी ढळू दिली नाही.

      March 1, 2024


  • ज्येष्ठ साहित्यिका प्रा. मृणालिनी जोगळेकर

    उत्कृष्ट वक्त्या व कथाकथनकार असणाऱ्या जोगळेकरांचा विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी रुची निर्माण करण्यात हातखंडा होता. संध्याकाळचा चेहरा व रंग अमेरिकेचे प्रवासिनी आदी त्यांची माहित्यकृती मराठी रसिकांच्या मनांत घर करून राहिली. ‘संध्याकाळचा चेहरा’ या कादंबरीला राज्य शासनाचे कथासंग्रहासाठीचे प्रथम पारितोषिक मिळाले. ‘लोकसत्ता’ मध्ये त्यांनी प्रवासवर्णनावर आधारीत ‘प्रवासिनी’ या लेखमालिकेचे लेखन केले होते. तुकारामांचे फ्रेंचमधील अभ्यासक फादर दलरी यांचे चरित्रही लिहीले.

      March 31, 2022


  • ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी

    ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे झाला. असरानी यांनी जवळपास पाच दशकापासून ते आजपर्यंत सिनेरसिकांना आपल्या विनोदी अभिनयाने खळखळून हासायला भाग पाडले आहे. असरानी हे सिंधी परिवारातील आहेत. त्यांचे वडील फाळणीनंतर जयपूर येथे स्थलांतरीत झाले. असरानी यांना चार बहिणी आणि तीन भाऊ होत. त्यांचे शिक्षण सेंट झेव्हिअर्स स्कूल आणि राजस्थान कॉलेज, जयपूर येथे झाले. आपल्या शिक्षणाचा खर्च त्यांनी जयपूर आकाशवाणी येथे कार्यक्रम करीत पूर्ण केला.

    लहानपणापासूनच असरानी यांना अभिनयाचे वेड होते. १९६३ मध्ये अभिनेता होण्याची इच्छा मनात घेऊन असरानी मुंबईला आले. यावेळी त्यांची भेट किशोर साहू आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्यासोबत झाली. त्यांनी असरानी यांना पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनायचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी १९६६ मध्ये आपले अभिनयाचे शिक्षण पूर्ण करून असरानी पुन्हा मुंबईत आले. त्यावेळी त्यांनी 'हरे कांच' या पहिल्या सिनेमात काम केले.

    १९७१ मध्ये 'मेरे अपने' या सिनेमातून त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. परंतु १९७३ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या 'अभिमान' या सिनेमाने असरानी यांना आपली आपली ओळख करून दिली. या सिनेमात त्यांनी अमिताभ यांच्या मित्राची भूमिका केली होती ज्यासाठी त्यांना फिल्म फेअरचा उत्कृष्ठ सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. दरम्यान, त्यांच्या अभिनयाला १९७५ हे साल एक वेगळे वळण देणारे ठरले. कारण याच वर्षी रमेश सिप्पी यांचा 'शोले' सिनेमा प्रदर्शित झाला आणि यातील असरानी यांची जेलरची भूमिका ही त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड" ठरली. शोले चित्रपटातील ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ ही भूमिका आणि चुपके चुपके मधील प्रशांत किशोर श्रीवास्तव ही भूमिका खूप गाजली. यानंतर त्यांनी अनेक सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच उडान, सलाम मेम साब, चला मुरारी हिरो बनने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.

    कोशिश आणि तेरी मेहरबानी या चित्रपटात त्यांनी गाणेही म्हटले आहे. असरानी यांना दोन वेळा सर्वश्रेष्ठ विनोदी अभिनेत्याचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत २५ सिनेमे केले तर महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत सर्वात जास्त सिनेमात काम केले आहे. आपल्या करिअरमध्ये असरानी यांनी तब्बल ४०० सिनेमात काम केले आहे. ते आजही तेवढ्याच जोशाने आजच्या पिढीसोबत अभिनय करताना दिसतात. ‘फॅमिली ४२०’ या मराठी चित्रपटात सुद्धा असरानी यांनी काम केले आहे. २००४ साली लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसकडून उभे राहिले होते. मात्र ते राजकारणात अधिक काळ राहिले नाहीत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 1, 2019


  • जेष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर

    टोकदार रेषांचे धनी आणि परखड भाष्य करणारे मा.मंगेश तेंडुलकर हे राजकीय व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्रांसोबतच ते लेखणही करत होते. अनेक नियतकालिकात त्यांचे लेखही प्रसिद्ध झाले आहेत. पुण्यातील अप्पा बळवंत चौकात मंगेश तेंडुलकरांच्या वडिलांनी राका बुक एजन्सीचे दुकान १९४२ मध्ये चालवायला घेतले होते. येथेच त्यांची पुस्तकांशी गट्टी झाली. मा.मंगेश तेंडुलकरांचे वाचनही अफाट होते. मा.मंगेश तेंडुलकरांनी स्वतःची शैली निर्माण केली होती. काही ठिकाणी त्यांनी रंग-रेषातून परखड भाष्य केलेले होते. त्यांचे स्ट्रोक्स हे अतिशय दमदार होते.त्यांच्या प्रत्येक स्ट्रोक्सने अनेकांना घायाळही केले होते. वयाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी कॅरिकेचर्सही शिकले. त्यामुळे शेवटपर्यंत नवे काही शिकण्याची उर्मी त्यांच्यात दिसली होती.त्यांचे 'संडे मुड' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. पुण्यातील सामाजिक-सांस्कृतिक अशा अनेक सार्वजनिक कार्यक्रमात मा.तेंडुलकरांची उपस्थिती कायम राहात होती. पुण्यातील ट्रॅफिक समस्येवर रस्त्यावर उतरून त्याबद्दल जागृती करण्याचे काम तेंडुलकर गेली १७ वर्षे करत होते. मुलांसाठी सांता बनुन त्यांना भेट वस्तू देण्यासाठीही ते एका शाळेत गेले होते. व्यंगचित्र काढण्यासाठी आचार्य अत्रेंची वाचलेली पुस्तके फार उपयोगी पडली असे व पु.ल.देशपांडेंच्या पुस्तकांमुळे वृत्तपत्रांसाठी कशी व्यंगचित्रे पाहिजे हे कळाल्याचे तेंडुलकरांनी एका मुलाखतीत सांगितले होते. बा.भ.बोरकरांच्या कवितांमुळे वाचनाची आवड निर्माण झाल्याचे तेंडुलकर नेहमी म्हणत. भाऊ विजय तेंडुलकरांमुळे इंग्रजी पुस्तके त्यांना वाचायला मिळाल्याचे एका मुलाखतीत तेंडुलकरांनी सांगितले होते.

    आपल्या आवडत्या व्यक्तीला व्यंगचित्रातून श्रद्धांजली वाहण्याचे धाडसही तेंडुलकरांनी दाखवले होते. मंगेश तेंडुलकर हे अखेरपर्यंत कार्यरत असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. मंगेश तेंडुलकर यांनी ९० हून अधिक व्यंगचित्र प्रदर्शन आयोजीत केली होती. स्वतःचा मृत्यू या विषयावरही त्यांनी व्यंगचित्रांची मालिका बनवली होती.

    मंगेश तेंडुलकरांचे लेखन
    संडे मूड, भुईचक्र, अतिक्रमण, कुणी पंपतो अजून काळोख, 'बित्तेशां?'‘दांकेशां!’
    मा.मंगेश तेंडुलकरांचे व्यंगचित्रांबद्दलचे लेख
    बिचाऱ्या अफझलचे महाराजांस पत्र (जत्रा, १९८९), आमच्या पुण्यातील नाट्यगृहे (जत्रा, १९९८) गुप्ताजींचे सोपे तंत्र (लोकप्रभा, १९९८), चौकटीतल्या आत्म्याला (आवाज, दिवाळी अंक २००३), व्यंगचित्रांतून संवाद साधताना (छात्र प्रबोधन, दिवळी अंक २००३), मोबाईल फ्री (श्री दीपलक्ष्मी, दिवळी अंक २००३), माझ्या गोव्याच्या भूमीत! (गोमांतक, दिवळी अंक २००३), व्यंगचित्र हेच पहिलं प्रेम (ग्राहकहीत, दिवळी अंक २००३), व्यंगचित्रांची भाषा (कुटुंब...च कौटुंबिक, दिवळी अंक २००३), व्यंगचित्रे ही कला नाहीच (किस्त्रिम, दिवळी अंक २००३)

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      July 17, 2017


  • जोसेफ सिरिल बमफोर्ड (जेसीबी)

    ‘जेसीबी’ हे जगातलं पहिलं यंत्र जे कुठल्याही नावाशिवाय बाजारात लाॅंच झालं..साल होतं १९४५. ज्यांनी हे धूड बनवलं ते अनेक दिवस चिंतित होते की याचं नाव काय ठेवायचं? शेवटी याचं वेगळं नाव न ठेवता त्याच्या इंजिनचंच नाव वापरूया यावर शिक्कामोर्तब झालं..

      March 1, 2024


  • मराठीतील प्रख्यात अभिनेते दामूअण्णा मालवणकर

    नाटक आणि चित्रपट या दोन्ही माध्यमात विनोदी अभिनेते दामूअण्णा यांनी विशिष्ट प्रकारे हसण्याची लकब, तिरळा डोळा आणि प्रभावी शब्द फेक याद्वारे आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते. त्यांचा जन्म ८ मार्च १८९३ रोजी निपाणी येथे झाला.

    दामूअण्णा मालवणकर यांचे पूर्ण नाव दामूअण्णा बापूशेठ मालवणकर. त्यांच्या वडिलांचा सोनारकामाचा पिढीजात व्यवसाय होता. त्यामुळे दामूअण्णांनी त्यातच लक्ष घालावे अशी त्यांचे वडील बापूशेठ यांची अपेक्षा होती. पण त्यांना लहानपणापासूनच नाटकांचे वेड होते. घरातून या नाटकवेडाला विरोधच होता. त्यामुळे दामूअण्णा चोरून नाटके पाहत असत. तारुण्यात नाटकांच्या ध्यासामुळे त्यांनी घरातून पळून जाऊन महाराष्ट्र कंपनीत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वडिलांनी त्यांना परत आणून सोनारकामात लक्ष घालण्यास भाग पाडले. मात्र १९१३ साली ते पुन्हा एकदा घरातून बाहेर पडले आणि सांगलीला चित्ताकर्षक मंडळीत गेले. तिथे त्यांना बिनपगारी नोकरी मिळाली.

    चित्ताकर्षक कंपनीत दामूअण्णांना नाटकांच्या जाहिरातींचे फलक ढकलगाडीवर घालून रस्त्यावरून ङ्गिरवून आणण्याचे काम दिले गेले. पडतील ती कामे करण्यात त्यांचा वेळ जात असे. काही काळानंतर चित्ताकर्षक मंडळीच्या ‘त्राटिका’ या नाटकात दामूअण्णांना शिंप्याची भूमिका दिली गेली. ती भूमिका अगदी छोटी होती, मात्र त्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. हे साल होते १९१५. पुढे १९१६ साली चित्ताकर्षक कंपनी बंद पडली आणि दामूअण्णा लोकमान्य नाटक मंडळीत गेले. तिथे त्यांनी मामा वरेरकर लिखित ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकात डॉ. पशूची भूमिका अगदी तडङ्गेने केली. त्यामुळे त्यांचा नावलौकिक होण्यास सुरुवात झाली. १९१८ साली दामूअण्णा मालवणकर केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श मंडळीत गेले. तेथे त्यांना काम मिळाले नाही, तेव्हा ते दीनानाथ मंगेशकरांच्या बलवंत नाटक मंडळीत गेले. त्या कंपनीत त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘मृच्छकटिक’, ‘भावबंधन’, ‘विद्याहरण’, ‘उग्रमंगल’, ‘सन्यस्त खड़्ग’, ‘वेड्यांचा बाजार’ वगैरे नाटकात भूमिका करून चांगलीच प्रसिद्धी मिळवली. पुढे १९३३-३४ साली बलवंत नाटक कंपनी बंद पडली आणि त्याचेच चित्रसंस्थेत रूपांतर झाले. त्यामुळे दामूअण्णा दीनानाथ मंगेशकरांकडेच राहिले.

    १९३४ साली आलेल्या ‘कृष्णार्जुन युद्ध’ या चित्रपटात त्यांना छोटीशी भूमिका देण्यात आली. चित्रपटातल्या त्यांच्या कामांची हीच सुरुवात होती. पुढे ३-४ वर्षात ‘लक्ष्मीचे खेळ’, ‘सत्याचे प्रयोग’, ‘ठकीचे लग्न’ वगैरे चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या.

    त्यानंतर १९३८ साली ते कोल्हापूरला आले आणि त्यांनी मा. विनायक यांच्या ‘ब्रह्मचारी’ चित्रपटात आश्रम चालकाची भूमिका केली. या भूमिकेमुळे त्यांना चांगले नाव मिळाले. मा. विनायक यांच्या चित्रपटातच त्यांच्या अभिनयाला चांगला वाव मिळाला. विनोदी चित्रपटांचे नवे दालनच उभे करण्यात मा. विनायक यांना दामूअण्णा मालवणकरांनी मदत केली. १९३९ साली प्रदर्शित झालेल्या ‘ब्रँडीची बाटली’ या चित्रपटात त्यांनी नायकाची भूमिका साकारली. ‘बगाराम’च्या भूमिकेत त्यांना आपल्या विनोदी अभिनयाला पूर्ण वाव देता आला आणि ही भूमिका लोकप्रिय झाली. त्यानंतर ‘लग्न पहावं करून’, ‘सावकारी पाहुणे’, ‘गजाभाऊ’ या चित्रपटांतूनही त्यांनी नायकाच्या भूमिका साकारल्या आणि आपल्या विनोदी अभिनयाचा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला.

    त्यानंतर विनायक यांच्याकडे ‘माझं बाळ’, ‘चिमुकला संसार’, ‘अर्धांगी’, ‘अमृत’, ‘सुखाचा शोध’, ‘संगम’, ‘पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटांत, तसेच ‘सुभद्रा’, ‘बडी मॉं’ या हिंदी चित्रपटात विविध भूमिका केल्या. मा.विनायक यांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांच्यासाठी खास विनोदी भूमिका असायचीच. १९४७ साली मा. विनायक यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी ‘चूल आणि मूल’ या चित्रपटातून भूमिका केली. पुढे ‘मोरूची मावशी’ (१९४८), ‘ब्रह्मघोटाळा’ (१९४९), ‘गळ्याची शपथ’ (१९४९), ‘बायको पाहिजे’ (१९५०), ‘देव पावला’ (१९५०) या चित्रपटांत त्यांनी नायक म्हणून भूमिका केल्या आणि खर्याी अर्थाने विनोदी अभिनेता म्हणून स्वत:चे आगळेवेगळे स्थान निर्माण केले. त्याशिवायही अनेक मराठी, हिंदी चित्रपटांतून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या. सुरुवातीच्या काळात बिनपगारी, त्यानंतर दोन आणे रोजगारावर काम करत दामूअण्णा दोन हजार रुपये घेऊन भूमिका करीत असत. चित्रपटातील लोकप्रियता शिगेला पोहोचली, तरीसुद्धा दामूअण्णांना नाटकाची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. राजाराम नाटक मंडळीत गंगाधरपंत लोंढे दामूअण्णांना ‘भावबंधन’मधल्या ‘गोकुळ’च्या भूमिकेसाठी खास बोलावून घेत.

    त्या वेळी ते ३५० रुपये नाईटवर काम करत. १९४४ साली लोंढे यांचे निधन झाल्यावर दामूअण्णांनी ‘प्रभाकर नाटक मंडळी’ ही स्वत:ची संस्था सुरू केली आणि वीर माधव जोशी यांचे ‘उधार-उसनवार’ हे नाटक रंगमंचावर आणले. चित्रपटसृष्टीतले काम सांभाळून त्यांनी आठ वर्षे सार्या महाराष्ट्रभर नाटकांचे प्रयोग केले. १९५२ साली ही नाटक कंपनी बंद पडल्यावर दामूअण्णांनी चित्रपट याच आपल्या कार्यक्षेत्रावर पुन्हा भर दिला. राम गणेश गडकरी यांचा ‘तिंबूनाना’, चिं.वि. जोशींचा ‘चिमणराव’ आणि ना.धों. ताम्हणकर यांचा ‘दाजी धडपडे’ हे तिन्ही मानसपुत्र साकार करत दामूअण्णांनी त्या व्यक्तिरेखांना अजरामर केले. त्यांनी जवळपास ७५ हिंदी-मराठी चित्रपटांतून व अंदाजे ५० नाटकांतून विनोदी भूमिका केल्या.

    भारती मंगेशकर म्हणजेच ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर यांच्या पत्नी ह्या दामुअण्णा मालवणकर यांची कन्या. पु.ल नी एकदा भारती मंगेशकर यांना बघितले तेव्हा म्हणाले होते " ही मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!" दामूअण्णा मालवणकर यांचे निधन १४ मे १९७५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/शशिकांत किणीकर

      May 14, 2019


  • गायक सुरेश वाडकर

    सुरेश वाडकर यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून त्याने जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली, तसेच ‘पतियाळा’ घराण्याची तालीम घेतली. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९५४ रोजी झाला. त्यांनी पाश्र्वनाथ डिग्रजकर यांच्याकडून ही प्राथमिक गायनाचे शिक्षण व सदाशिव पवार यांच्याकडून तबल्याचे प्राथमिक शिक्षण घेतले.

    १९७६ साली सूर-सिंगार नावाच्या संगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्या मधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार जयदेव इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. १९७६ नंतर सुरेश वाडकर यांनी चित्रपटांमध्ये गायला सुरुवात केली होती. त्यानंतर जयदेवांनी चाली बांधलेल्या गमन या हिंदी चित्रपटातील सीनेमें जलन हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले.

    ‘मेघा रे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे. प्रेमरोग, सदमा या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली. मा. सुरेश वाडकर यांनी प्रामुख्याने मराठी व अनेक हिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत.

    हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी आजीवासन गुरुकुलम नावाची संस्था सुरू केली. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात. सुरेश वाडकर यांना त्यांच्या संगीतसेवेसाठी सुमारे ११ पुरस्कार किळाले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    सुरेश वाडकर यांनी गायलेली काही गाणी
    https://www.youtube.com/watch?v=2JXDLvxIF0Q
    https://www.youtube.com/watch?v=_hfck-AakUg
    मा.सुरेश वाडकर यांनी गायलेली काही मराठी गाणी
    https://www.youtube.com/watch?v=7H4CU8vHuys
    https://www.youtube.com/watch?v=1V2pB9KCidE

      August 7, 2017


  • नाटककार वामन तावडे

    रायाची रापी या एकांकिकेला दूरदर्शनचा पुरस्कार मिळाला. वामन तावडे यांनी आक्रन्दन , इमला, यमुना , अआई , चौकोन , माऊली , कॅम्पस (तुम्ही आम्ही) , जिप्सी , नादखुळ्या , वंदे मातरम या एकांकिका लिहिल्या.

      August 7, 2021


  • मराठीतील ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक

    मूळचे अकोल्याचे असणाऱ्या आनंद मोडक यांनी आपल्या गावातील शाळेत शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १३ मे १९५१ रोजी झाला. तेथेच त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे घेतले. संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याची वाट धरली. बा. सी. मर्ढेकरांच्या बदकांचे गुपित या काव्याला मा.मोडक यांनी संगीत दिले आणि तेथून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. हे काव्य रसिकांच्या पसंतीस उतरल्यानंतर मोडक यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. पीडीएच्या `घाशिराम कोतवाल’मधूनही त्यांनी आपली चुणूक दाखवली होती. सतिश आळेकरांच्या `महानिर्वाण’ या नाटकाने त्यांना संगीतकार बनवले. नाटक, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि नंतर पुढे चित्रपट असा त्यांचा संगीतप्रवास बहरत गेला. हे सर्व करत असताना त्यांनी महाराष्ट्र बँकेत नोकरीही केली.

    सतत विविध प्रयोग करत राहणे हे आनंद मोडक यांच्या संगीताचे वैशिष्टय़ होते. तालवाद्याची साथ न घेता केलेली खानोलकरांची गाणी हा त्यातीलच एक प्रयोग. आनंद मोडक यांच्यावर कुमार गंधर्वांच्या गायकीचा प्रभाव होता, व ते मान्यही करत अस. मोडक हे अखेरच्या श्वासापर्यंत संगीत क्षेत्राशी संलग्न होते. आनंद मोडक यांनी रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांत आपल्या संगीताने ठसा उमटविला होता. मोडक यांचे साजणवेळा, अमृतगाथा, शेवंतीच बन, प्रीतरंग, अख्यान तुकोबाचे हे संगीत कार्यक्रमही लोकप्रिय झाले होते. ‘महानिर्वाण’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘बेगम बर्वे’, ‘महापूर’, ‘पडघम’, ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकांच्या आशयाला त्यांच्या संगीताने वेगळ्याच उंचीवर नेले होते. ‘२२ जून १८९७’, ‘कळत नकळत’, ‘सूर्योदय’, ‘चाकोरी’, ‘चौकट राजा’, ‘एक होता विदूषक’, ‘मुक्ता’, ‘दोघी’, ‘सरकारनामा’, ‘पाश’, ‘फकिरा’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘आरंभ’, ‘धूसर’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटातील संगीतही रसिकांकडून तसेच समीक्षकांकडून अतिशय वाखाणले गेले. ‘एक झोका, चुके काळजाचा ठोका’, ‘जाई जुईचा गंध मातीला’, ‘युगा युगांचे नाते आपुले’, ‘श्रावणाच ऊन मला झेपेना’, ‘हे जीवन सुंदर आहे’, ‘तू तलम अग्नीची पात’, ‘वळणवाटातल्या मातीत हिरवे गंध’, ‘मना तुझे मनोगत मला कधी कळेल का’, ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ ही त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात दरवळत आहेत. आपल्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी १० नाटके, ३६ चित्रपट, तसेच ७ हिंदी, व ८ मराठी मालिकांना संगीत दिले होते. त्यांच्या नावावर चित्रपट संगीतासाठीचे सर्वाधिक राज्य पुरस्कारांची नोंद आहे. `यशवंतराव चव्हाण’ हा त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. आनंद मोडक यांचे २३ मे २०१४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 23, 2017