(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गीतकार आणि शायर शकील बदायूँनी

    ‘शकील’ शब्दाचा अर्थच आहे, ‘हॅन्डसम’, रुबाबदार. शकील बदायूँनी तसेच होते आणि त्यांचे कपडेही त्या शब्दाला साजेसे असत. कधीही चकचकीत बूट व टायची गाठ बांधल्याशिवाय ते घराबाहेर पडत नसत.

    त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. वडील जमाल अहमद सोख्ता ‘काद्री’ हे शायर आणि काका जिया उल काद्री हे तर दाग-मोमीनच्या काळातले समीक्षक. नुसते समीक्षक नव्हे, तर ‘नातगो’ शायर. (‘नात’ म्हणजे हजरत महंमद यांचे प्रशंसागीत.ते लिहिणारा कवी). वडिलांनी या ‘नन्ना मुन्ना राही’ शकीलला अरबी, फार्सी, ऊदरू, हिंदी सगळ्या भाषा शिकण्यासाठी मौलवी अब्दुल गफार, मौलवी अब्दुल रहमान, बाबू रामचंद्र या त्यावेळच्या ज्ञानवंतांना पाचारण केले होते. त्यातूनच पुढे शकील ज्या अलीगढ विद्यापीठात गेले, तेथे अहसन मारहरवीसारखे प्राध्यापक शिकवायला आणि मजाजसारखे सहाध्यायी होते.

    शायरीचे काही धडे त्यांनी प्रथम काकांकडे, नंतर जिगर मुरादाबादींकडे गिरविले. काळाप्रमाणे राग बदलावा, हे शकील यांना चांगलेच समजत होते. कॉलेजमध्ये असतानाच ते कविसंमेलनात गाजत होते. रुबाबदार शकीलजींना गळाही तितकाच गोड लाभला होता. एका कविसंमेलनात दस्तूरखुद्द नौशाद उपस्थित होते. त्यांनी मुंबईचे निमंत्रण दिले आणि ‘झुले मे पवन के आई बहार’ असेच झाले.

    शकील अहमदचे नाव भारतात चित्रपटाद्वारे ‘शकील बदायूँनी’ म्हणून झगमगू लागले. ‘दर्द’ हा त्यांचा पहिला चित्रपट आणि त्यांनी लिहिलेले ‘अफसाना लिख रही हूँ’ गाणार्याा उमादेवी ऊर्फ टुणटुणचाही पहिलाच चित्रपट होता. शकील यांचा चित्रपटसृष्टीतील एक विक्रम आजही तसाच आहे. तो म्हणजे सलग तीन वर्षे (१९६१ ते ६३) फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला आहे. मा.शकील बदायूँनी यांचे २० एप्रिल १९७० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    शकील बदायूँनी यांची काही गाणी.

    https://www.youtube.com/watch?v=vAF6-xX5-MA

    https://www.youtube.com/watch?v=IQsJt6-8S7w

    https://www.youtube.com/watch?v=q3k_pI8MSbM

      April 20, 2017


  • डॉ. सुहासिनी कोरटकर

    भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गानगुरू, बंदिशकार आणि विचारवंत डॉ. सुहासिनी कोरटकर यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४४ रोजी झाला.

    डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण खरे म्हणजे अर्थशास्त्र हा स्वतंत्र विषय घेऊन झाले. मात्र पुढे त्यांनी पीएच.डी. केली ती मात्र संगीत विषयात. लहानपणापासूनच त्यांना असेही संगीताचे धडे मिळाले होतेच. त्यांच्या आई सरलाताई यादेखील शास्त्रीय गायिका होत्या आणि सुहासिनीताईंच्या संगीत शिक्षणाबाबत अत्यंत काटेकोर आणि शिस्तप्रिय असत. पं. त्र्यंबकराव जानोरीकर, श्रीमती नैना देवी हे त्यांचे गुरू होत. भेंडीबाजार घराण्याच्या गायकीबाबतचे पहिले श्रेय त्या आपल्या वडिलांना देत असत. वडिलांनी जर योग्यवेळी आपला संगीत शिक्षक बदलला नसता तर कदाचित या घराण्याच्या सुंदर गायकीला आपण कायमचे मुकलो असतो, असे त्या म्हणत.

    बंदिशींचे सुरेख सादरीकरण, लयीत गुंफलेली सरगम आणि ताना हे सुहासिनीताईंच्या गायकीचे वैशिष्टय़ होते. शास्त्रीय संगीताशिवाय ठुमरी, दादरा, नाट्यसंगीत, अभंग आदी प्रकारदेखील त्यांनी हाताळले. दिल्ली आकाशवाणी केंद्राच्या ‘केंद्र संचालिका’ तसेच ‘कार्यक्रम संचालिका’ (संगीत) या पदांवरही त्यांनी काम केले. आकाशवाणीच्या अ. भा. गंधर्व महाविद्यालयाची ‘संगीताचार्य’ या सर्वोच्च पदवीने त्यांना गौरविण्यात आले होते. त्याशिवाय सूर-सिंगार संसद या संस्थेचा सुरमणी पुरस्कार, गानवर्धन, पुणेतर्फे स्वर-लय भूषण पुरस्कार, संगीत शिरोमणी पुरस्कार, संगीत मर्मज्ञ पुरस्कार अशा अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविले गेले होते. आपले गुरू पं. जानोरीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार सुरू केला होता. ‘निगुनी’ या टोपणनावाने त्यांनी केलेली उत्तमोत्तम बंदिशींची रचना हे तर त्यांचे कार्य खरोखर अलौकिक होते आणि संगीत इतिहासात त्याची कायमची नोंद राहील. रसाळ निवेदनासह विषयाची प्रात्यक्षिकासह साकल्याने मांडणी हे त्यांच्या कार्यक्रमांचे वैशिष्टय़ होते.

    कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या हिंदूी-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’, उपशास्त्रीय संगीताची ओळख करून देणारा ‘ठुमरी ते कजरी’, स्वरचित बंदिशींवर आधारित ‘शब्द-स्वरांचे लेणे’, विविध ऋतूंमधील रागांवर आणि गीतांवर आधारित ‘ऋतुरंग’, शास्त्रीय संगीताचे सौंदर्य उलगडणारा ‘ख्याल गायनाचा रसास्वाद’ ही काही उदाहरणे. मराठी, हिंदूी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून त्यांचे अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रकाशित झाले आहेत. डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे ७ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.

    डॉ. सुहासिनी कोरटकर यांची वेबसाईट
    http://www.suhasinikoratkar.com/#!/page_Home

    डॉ. सुहासिनी कोरटकर यांचे गायन
    https://www.youtube.com/watch?v=AcgChcpfeEk
    https://www.youtube.com/watch?v=PGvytWN-eMs

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 11, 2019


  • मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब पद्मा चव्हाण

    अप्रतिम स्त्रीसौंदर्याचा एक अनोखा नमुना असलेल्या पद्मा चव्हाण इतक्या सुंदर होत्या की त्यांच्या नाटकांच्या जाहिरातीत त्यांच्या नावाआधी ‘मादक सौंदर्याचा ऍटम बॉम्ब’ असे छापलेले असे.

      July 7, 2017


  • स्विस अभिनेत्री उर्सुला एंड्रेस

    उर्सुला एंड्रेस यांनी पहील्या जेम्स बॉन्ड चित्रपट डॉ नो मध्ये काम केले होते. त्यांचे द सदर्न स्टार, फन इन अकापुल्को , शी , द 10 विक्टिम , द ब्लू मैक्स , परफेक्ट फ्राइडे , द सेंसफुल नर्स , द माउंटेन ऑफ कैनिबल गॉड , द फिफ्थ मस्कटियर, द फाइट ऑफ टाइटन, क्लैश ऑफ द टाइटन्स हे इतर चित्रपट आहेत.

      March 19, 2022


  • फिल्म इंडस्ट्रीमधील जेष्ठ कलाकार ‘कॅब्रे क्विन’ हेलन

    आपल्याला जरी त्या फक्त 'हेलन' म्हणून माहीत असल्या तरी त्यांचे पूर्ण नाव हेलन जयराग रिचर्डसन आहे व त्या जन्माने अॅग्लो बर्मीज. त्यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३९ रोजी बर्मा मध्ये झाला. ती बॉलिवुड मध्ये त्यांच्या अनेक विवीध भुमिकांमुळे व विशेष करून नृत्याविष्कारामुळे 'हेलन' या भरपूर गाजल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांच्या वडीलांचा मृत्यू झाल्याने १९४३ मध्ये हे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. मुंबईत स्थायिक झाल्यावर हेलनच्या आई नर्स म्हणून काम करत असे पण मिळणार्या पगारात कुटुंब चालवणे कठिण झाल्याने त्यांच्या व स्वत:च्या चरितार्थासाठी हेलन यांनी शाळा सोडून देऊन नृत्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरूवात केली. त्यांची एक कुटुंब स्नेही अभिनेत्री कुकू ही त्यावेळी बॉलिवूड मधली एक अग्रगण्य नर्तिका म्हणून ओळखली जायच्या, त्यांच्या ओळखीने हेलन यांना अतिशय लहान वयातच चित्रपटात कोरस डान्सर म्हणून काम मिळाले.

    हेलनचं अॅंग्लो व बर्मिस सौंदर्य हे चित्रपटातील मुख्य अभिनेत्री बनण्याच्या मार्गातला मोठा अडथळा ठरले. त्या काळी आयटम नंबरसाठी ओळखल्या जाणा-या हेलन यांनी हावडा ब्रिज या सिनेमापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यांचे सौंदर्य, शार्प लुक्स आणि चमकणारे डोळे हे मुख्यत्वे करून चित्रपटातल्या 'भारतीय नारी रोल'च्या विरूद्ध बऱ्याचदा 'हायलायटींग' म्हणून वापरले जायचे. त्यामुळे चंद्रशेखर ते अमिताभ बच्चन यांसारख्या 'लिडींग' हिरोंबरोबर मुख्य अभिनेत्री म्हणून काम करून सुद्धा हेलन यांना खरे नाव व प्रसिद्धी ही त्यांच्या अनेक 'व्हॅम्प' व 'निगेटिव्ह' रोल्सनीच दिली. हेलन या त्यांच्या काळात जबरदस्त प्रसिद्ध होत्या. रस्त्यावरून जाताना त्यांना कधीही उघड चेहऱ्याने बाहेर फिरता आले नाही. कायम काहीतरी मुखवटासदृश घालून वावरावे लागे. १९५८ च्या 'मेरा नाम चिं चिं चू' पासून ते १९७० च्या दशकातील 'ये मेरा दिल प्यार का दिवाना' पर्यंत हेलन यांनी चित्रपटसृष्टीवर 'कॅब्रे क्विन' म्हणून अधिराज्य गाजवले.

    १९७० च्या दशकात नवीन प्रवेश झालेल्या नट्यांनी शरिरप्रदर्शनाची तयारी दाखवली तेव्हा हेलन यांची प्रसिद्धी बरीच खालावली व त्या आर्थिक अडचणीतही सापडल्या. त्या वेळी त्यांना साथ लाभली ती प्रसिद्ध लेखक सलिम खान यांची. जावेद अख्तर यांच्या बरोबर लिहित असलेल्या २ चित्रपटात उदा. इमान धरम, डॉन यात त्यांनी हेलन यांना चांगली भूमिका देऊ केली. हेलनच्या गाजलेल्या सर्व गाण्यांच्या यशात गाणाऱ्या गायिकांचे ही महत्व तितकेच आहे. 'मेरा नाम चिं चिं चू' व इतर बरीच गाणी गीता दत्त यांनी, तर साठ च्या दशकात व सत्तर च्या दशकाच्या सुरवातीला आशा भोसले यांनी ही हेलनसाठी पार्श्वगायन केले. 'तिसरी मंझिल' चित्रपटातील 'ओ हसिना जुल्फोवाली जानेजहाँ...' हे गाणं 'रॉक अॅलन्ड रोल' या संगीत प्रकारावर आधारलेलं होतं आणि ते प्रचंड गाजलं. या व्यतिरिक्त 'शोले' चित्रपटातलं "मेहबूबा मेहबूबा..." 'इन्तेकाम' मधलं "आ जानेजा...पुढे त्या सलिम खान यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. सलिम खान हे आधीपासून विवाहीत होते. आजचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान हा त्यांचा मुलगा. आजच्या आघाडीच्या अभिनेत्र्या सुद्धा अजूनही तिची गाजलेली गाणी व त्यावरचे डान्स हे इंटरनॅशनल स्टेज शोज मध्ये सादर करतात. हेलन यांच्या विग पासून ते हेवा वाटावा अश्या तिच्या वॉर्डरोबपर्यंत सर्व काही अत्यंत प्रभावी होतं आणि त्याचा प्रभाव आजही चित्रपटसृष्टीवर आणि तिच्या चाहत्यांवर आहे. भारत सरकारने मा.हेलन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 28, 2017


  • रत्नागिरीतील ज्येष्ठ उद्योजक नानासाहेब भिडे

    नाना स्वभावानं मृदू असले तरी व्यवहाराच्या बाबतीत पक्के शिस्तप्रिय होते. वस्तूंची उधळमाधळ करणं, फुकट घालवणं दिसलं की त्यांना रागावर नियंत्रण करता येत नाही. ते स्वतः कधीही गल्ल्यावर मालकाच्या थाटात आजपर्यंत बसले नाहीत. रोजची रोकड किती जमा झाली एवढेच नानांना माहीत असते. घरामध्ये एका विशिष्ट ठिकाणी रोजचे कुठूनही मिळालेले पैसे, व्यवहारातील, कौटुंबिक भेटी-पाकीटे सर्व एकत्र राहिले पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असे.

      June 3, 2022


  • संगीतकार, गायक तलत अझीझ

    ‘उमराव जान’मधली ‘जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें’ किंवा ‘बाजार’मधले ‘फिर छिडी रात, बात फुलों की’ किंवा ‘डॅडी’मधले अनुपम खेरवर चित्रित झालेले ‘आईना, मुझसे मेरी पहली सी सुरत दे दे’ ही त्यांची गाणी हीट झाली..

      November 11, 2021


  • पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु देवदत्त दाभोलकर

    शिक्षणक्षेत्रात मुलगामी विचार मांडणारे दाभोलकर हे स्वातंत्र्योत्तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात असत.

      December 17, 2021


  • अभिनेते क्लिंट ईस्टवूड

    क्लिंट ईस्टवूड यांनी ५ वेळा गोल्डन ग्लोब अवार्ड, ४ वेळा ऑस्कर अवॉर्ड व स्क्रीन एक्टर्स गिल्ड लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड जिंकले आहेत. मिलियन डॉलर बेबी, फॉर अ फ्यू डॉलर्स मोर,द गुड, द बैड एंड द अग्ली, मिस्टीक रिव्हर, ग्रॅन टोरिनो, लेटर्स फ्रॉम आयवो जिमा, चेजेंलिंग, हे क्लिंट ईस्टवूड यांचे गाजलेले चित्रपट आहेत.

      May 31, 2022


  • कर्नाटक संगीतातील सुप्रसिद्ध गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी

    मदुराई षण्मुखावदिवू सुब्बुलक्ष्मी म्हणजेच एम. एस. सुब्बुलक्ष्मी या कर्नाटक संगीतातील सुप्रसिद्ध गायिका होत्या. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१६ रोजी झाला. एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे वडिल वीणा वादक तर आजी व्हायोलीन वादक होती. ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळवणा-या सुब्बुलक्ष्मी या पहिल्या गायिका, इतकेच नव्हे तर ‘मॅगसेसे पुरस्कार’ मिळवणा-या संपूर्ण जगातल्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या.

    हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही त्यांचा अभ्यास होता. संस्कृत आणि तेलुगू भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिले ध्वनिमुद्रण केलं. १९२९ मध्ये तेरा वर्षाच्या असताना त्यांनी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या ‘मद्रास म्युझिक अकॅडमी’ मध्ये पहिला जाहीर कार्यक्रम केला. भजन व इतर उपशास्त्रीय संगीत प्रकारांत त्यांचा हातखंडा होता. आज भारतासह इतरत्र राहणर्याची सुरवात श्री. वेंकटेश स्तोत्राने होते याचे श्रेय एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना जाते.

    देशविदेशात अनेक उत्तम कार्यक्रम त्यांनी सादर केले असून पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अॅकॅडमी अवॉर्ड यांसारखे प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांच्या नावे जमा आहेत. एम.एस. सुब्बलक्ष्मी यांचे ११ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 16, 2017