(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण

    दीपिका पदुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन येथे झाला. तिचे लूक्स हे आजच्या पिढीतील मुलींना भावणारे आहेत. लाखो मुलींसाठी ती स्टाईल दीवा तर आहेच पण अनेकजणी तिची ही स्टाईल फॉलोदेखील करतात. दीपिकाने बॉलिवूडमध्ये 'ओम शांती ओम' सिनेमामधून पदार्पण केले. हा सिनेमा २००७ मध्ये रिलीज झाला होता. तिला पहिल्याच सिनेमात बॉलिवूड किंग खानसोबत काम करायची संधी मिळाली. हा सिनेमा हिट झाला आणि त्यानंतर दीपिकाच्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धूम घातली. दीपिकाने अनुपम खेर यांच्या अॅयक्टिंग इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आणि शामक डावर यांच्याकडून डान्स शिकली. दीपिकाचा 'ऐश्वर्या' हा कन्नड भाषेतील पहिला सिनेमा होता. आज ती आज बॉलिवूडमधील एक प्रसिध्द अभिनेत्री असून २००६ मध्ये 'फिमेल मॉडल ऑफ द इयर' आणि 'फ्रेश फेस ऑफ द इयर'चा मान पटकावला. 'ये जवानी है दिवानी', 'चेन्नई एक्सप्रेस', आणि 'गोलियों की रासलीला-रामलीला', हॅपी न्यू 'इयर', ये जवानी है दिवानी, पिकू, रामलीला, बाजीराव मस्तानी हे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी दीपिका. हे तिचे हिट ठरलेले सिनेमे. दीपिका प्रसिध्द बॅटमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे आणि तिची आई उज्वला एक ट्रॅवल एजंट आहेत. दीपिकासुध्दा एक बॅटमिंटन खेळाडू आहे. ती राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर बॅटमिंटन आणि बेसबॉस खेळली आहे. बंगळूरु येथून शालेय शिक्षण आणि माउंट कॅरमल महाविद्यालयातून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. जेव्हा ती पदवीचे शिक्षण घेत होती तेव्हा तिला मॉडलिंगची ऑफर आली होती. तिने मॉडलिंग एक छंद म्हणून केली, परंतु नंतर तिने या छंदाला गांभीर्याने घेतले आणि अनेक जाहीरातीत ती झळकली. म्हटले जाते, की दीपिकाला अभिनेत्री होण्याची इच्छा नव्हती. तिच्या म्हणण्यानुसार फिल्म इंटस्ट्रीमध्ये येण्याचा तिने कधीच विचार केला नव्हता. परंतु आज ती यशस्वी अभिनेत्रींमध्ये सामील आहे. सांगायचे झाले तर, तिचे नाव अनेक लोकांसोबत जोडण्यात आले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 5, 2018


  • किशोरी आमोणकर यांचा जीवनपट

    किशोरी आमोणकर यांच्या जीवनपटावर एक नजर...

    जन्म - एप्रिल १०, इ.स. १९३१ (मुंबई)

    मृत्यू - 3 एप्रिल 2017 (मुंबई)

    पारिवारिक माहिती

    आई मोगूबाई कुर्डीकर
    वडील माधवदास भाटिया
    जोडीदार रवी आमोणकर

    संगीत साधना
    प्रशिक्षण संस्था एलफिन्स्टन कॉलेज
    गुरू मोगूबाई कुर्डीकर

    गायन प्रकार :- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत
    घराणे जयपूर घराणे

    गौरव
    गौरव संगीत नाटक अकादमी फेलोशिप, इ.स. २००९
    पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इ.स. १९८५, पद्मभूषण पुरस्कार, इ.स. १९८७, संगीत सम्राज्ञी पुरस्कार, इ.स. १९९७, पद्मविभूषण पुरस्कार, इ.स. २००२, संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, इ.स. २००२
    किशोरी आमोणकर या (एप्रिल १०, इ.स. १९३१ - हयात) ह्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका असून जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करीत होत्या. त्या एक श्रेष्ठ गायिका आहेत व आदराने त्यांना 'गानसरस्वती' असे संबोधले जाते.


    किशोरीताईंचा जन्म मुंबई येथे इ.स. १९३१ मध्ये झाला. त्यांच्या आई म्हणजे प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर व वडील माधवदास भाटिया. किशोरीताईंनी आपल्या आईकडून संगीताचे ज्ञान तर घेतलेच, शिवाय विविध संगीत घराण्यांच्या गुरूंकडूनही मार्गदर्शन घेतले. त्या मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकल्या. त्यांचे पती रवी आमोणकर हे अध्यापन क्षेत्रात होते. इ.स. १९९२ मध्ये त्यांचे निधन झाले. किशोरीताईंना दोन मुले आहेत. त्या श्री राघवेंद्र स्वामींच्या भक्त होत्या.

    सांगीतिक कारकीर्द

    किशोरीताईंनी इ.स. १९५० चे दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस प्रारंभ केला. हिंदी चित्रपट 'गीत गाया पत्थरोंने' (इ.स. १९६४) साठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. इ.स. १९९१ मध्ये प्रसारित झालेल्या 'दृष्टी' ह्या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. किशोरीताई त्यांच्या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायनासाठी प्रसिद्ध आहेत. ख्याल गायकी बरोबरच त्या ठुमरी, भजन इत्यादी गायन प्रकारांना प्रभावीपणे सादर करत. कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव आणि अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीताईंचे गाणे कसदार होते व रसिकांच्या हृदयाचा ठाव घेते. त्यांनी आजवर देशोदेशी आपले संगीत कार्यक्रम केले असून भारतातील प्रमुख संगीत महोत्सवांत त्यांना आपली कला सादर करण्यासाठी सन्मानपूर्वक बोलावले जात होते. त्यांनी 'स्वरार्थरमणी - रागरससिद्धान्त' हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असे मानले जाते.

    शिष्य

    माणिक भिडे, पद्मा तळवलकर, अरुण द्रविड, सुहासिनी मुळगांवकर, रघुनंदन पणशीकर, मीरा पणशीकर, मीना जोशी, नंदिनी बेडेकर, विद्या भागवत, माया उपाध्याय, किशोरीताईंची नात तेजश्री आमोणकर, व्हायोलिन वादक मिलिंद रायकर यांसह अनेक कलावंत किशोरीताईंच्या शिष्यवर्गांत मोडतात.

    पुरस्कार

    संगीत नाटक अकादमी पुरस्कार, इ.स. १९८५
    पद्मभूषण पुरस्कार, इ.स. १९८७
    संगीत सम्राज्ञी पुरस्कार, इ.स. १९९७
    पद्मविभूषण पुरस्कार, इ.स. २००२
    संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, इ.स. २००२
    संगीत नाटक अकादमी फेलोशिप, इ.स. २००९

      April 3, 2017


  • ज्येष्ठ अभिनेते अरविंद देशपांडे

    सुलभा देशपांडे व अरविंद देशपांडे या खरं तर दोघांचं नाटय़वेड कमालीचं, टोकाचं होतं. त्यामुळे तर ओळख झाली. त्या काळात म्हणजे १९६०च्या दशकात. त्यांचा जन्म ३१ मे १९३२ रोजी झाला. मुख्य मुंबई शहरातल्या प्रेमिकांना मलबार हिलची बाग एकांतात गप्पात रंगून जाण्यासाठी आवडत असे. हे प्रेमीयुगुल मलबार हिल चढून गेलं, पण ओढ वाटत असली तरी अजून ते कळीचं वाक्य दोघांमध्ये उच्चारलं गेलं नव्हतं. त्यामुळे मौनात दोघं ती टेकडी चढले आणि उतरले. खिशात पैसे बेताचे असले तरी मग आइस्क्रीम खायचं ठरलं. नंतर टॅक्सीने तिला घरी सोडायचं, असाही बेत ठरला. दोघांनाही उगाच हसू येत होतं आतल्या आत, एकमेकांकडे पाहताना मात्र चेहरा गंभीर, पण डोळे ‘देई वचन तुला’ असं सांगत होते. शेवटी त्याने तिला लग्नाचं विचारलं.. तेव्हा काही सेकंदांसाठी तिच्या घशात आइस्क्रीम अडकलं तरी ‘मला आवडेल’ एवढंच वाक्य बाहेर पडलं; पण पुढचं वाक्य कसं उच्चारायचं हे त्या २०/२१ वर्षांच्या मुलीला कळत नव्हतं. त्यानेच त्या पणला पुस्ती जोडली.. ‘लग्न केल्यावर नाटक सोडायचं नाहीस तू.’ बस्स, हेच तर हवं होतं. आता सुटकेच्या भावनेने तिला हसू फुटलं. कसाटा आइस्क्रीम महाग असल्याने पैसे संपले. मग टॅक्सी कुठली, बसच्या रांगेत उभं राहावं लागलं.. पुढची दोन वर्ष ते असे छान प्रियकर-प्रेयसीची भूमिका जगत होते. १९६० मध्ये सुलभा कामेरकर या सुलभा देशपांडे झाल्या आणि पुढे हे दाम्पत्य विलक्षण पद्धतीने शेवट पर्यत नाटक जगले..

    अरविंद देशपांडे यांच्या बरोबरचा सुलभा देशपांडे याचा संसार हा दोघंही नाटकात असल्याने कधी गंभीर, तर कधी गमतीदार असायचा. कारण अरविंद कधी दिलेली वचनं पाळत नसत. मग दर वाढदिवसाला एक चिठ्ठी सुलभाताईंना मिळे. ‘मी तुझं देणं लागतो. एक सिल्कची साडी.’ शेवटी अशा चार-पाच चिठ्ठय़ा जमा झाल्यावर सुलभाताईं त्यांना म्हणाल्या, ‘‘या चिठ्ठय़ा घ्या आणि गोदरेजचं कपाट आणा.’’ त्या वेळी पहिलं कपाट घरी आलं..

    त्यांचा मुलगा निनाद ३/४ वर्षांचा होईपर्यंत सुलभाताई नाटक सोडून घरीच रमल्या. भुलाभाई देसाई इन्स्टिटय़ूटमध्ये, ‘रंगायन’मध्ये मात्र जात राहिल्या, कारण नाटकाचं वातावरण. त्याच इमारतीत अल्काझींची थिएटर युनिट ही हिंदी नाटकवाल्याची संस्था. सत्यदेव दुबे ती सांभाळत. ते अरविंदचे मित्र. एकदा ते अडचणीत होते. त्यांनी अरविंदला गळ घातली आणि अरविंदनी सुलभाताईंना. ‘कलकत्ता फेस्टिव्हल’मध्ये थिएटर युनिटचं नाटक सादर होणार होतं- ‘अंधायुग’. त्यातली मूळ गांधारी आजारी पडली होती. फेस्टिव्हल चार दिवसांवर आला होता. ती गांधारी (हिंदीत) सुलभाताईंनी उभी करावी म्हणून अरविंद सुलभाताईंना सांगत बसले, ‘‘रंगभूमीची तुझ्याकडून कलावंत म्हणून अपेक्षा आहे, तू हे चॅलेंज स्वीकार. आपला विश्वास आपल्यावर बसणं आवश्यक आहे. आर्टिस्ट जितका टेन्शनमध्ये तितकंच त्याचं काम चांगलं होतं. वगैरे वगैरे.’’ सुलभाताई सांगतात, ‘‘असं जगावेगळं अभिनयाचं तंत्र अरविंद मला सांगत होता आणि शेवटी मी गांधारीची भूमिका करायला तयार झाले. चार दिवस हिंदी उच्चारांसह कसून तालीम केली.’’

    आणि नेमका निनाद आजारी पडला; पण अरविंदनी ताईंना गळ घातलीच, ‘‘कलकत्त्याची तयारी कर. प्रेस्टिज शो आहे. रंगभूमीची प्रतिष्ठा राखली पाहिजे.’’ सत्यदेव दुबे न्यायलाही आले, त्यांनी सुलभाताईंची बॅग घेतली. डोळ्यांत अश्रू घेऊन त्या घराबाहेर पडल्या. डोळ्यांत अश्रू घेऊन त्या घराबाहेर पडल्या. सुलभाताई एका मुलाखतीत म्हणतात, ‘‘तापानं फणफणलेल्या निनादने हे पाहिलं. नंतर दोन वर्ष तो दुबेंशी बोलत नव्हता.’’ ‘अंधायुग’मध्ये तेव्हा अमरीश पुरी, राजेश खन्ना हे हिंदी थिएटरचे कलावंत होते. कोलकात्याला पोचताच सुलभाताईंना तार मिळाली- ‘निनादचा ताप उतरला.’ त्या म्हणतात, ‘‘त्या दिवशी माझी गांधारीची भूमिका इतकी छान झाली की शेवटचा, कृष्णाला गांधारी शाप देते तो सीन आठवला की, अजूनही अंगावर शहारे उभे राहतात.’’

    विजय तेंडुलकरांची नाटकं अरविंद देशपांडे त्या काळात दिग्दर्शित करीत होते. तेव्हा सुलभाताई दिग्दर्शनाच्या प्रक्रियेतही सहभागी झाल्या. ‘‘आपल्याला काय हवं आहे हे फक्त आपल्याला कळून चालत नाही तर करणाऱ्या कलाकाराला ते सांगता आलं पाहिजे. या दिग्दर्शनाच्या मुख्य सूत्राचे धडे गिरवायला मी सुरुवात केली. अजूनही माझा तो धडा पूर्ण झालेला नाही,’’ असं सुलभाताई नमूद केलं आहे. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ हे सुलभाताईंच्या आयुष्यातलं महत्त्वाचं नाटक. त्या आधी सुलभाताई बऱ्याच नाटकांत कामं करीत होत्याच; पण अरविंद यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘शांतता..’मधल्या बेणारेला सुलभाताईंनी अजरामर केलं. एक दिवस रंगायन’ ही संस्था फुटली आणि अरविंद-सुलभा देशपांडे, अरुण काकडे इत्यादींनी ‘आविष्कार’ संस्था जन्माला घातली. ‘शांतता..’चे प्रयोग या संस्थेतर्फे चालू राहिले. ज्या छबिलदास शाळेत सुलभाताई शिकल्या त्याच शाळेत त्या शिक्षिका होत्या. तिथेच ‘आविष्कार’च्या प्रायोगिक नाटकांना हक्काचा रंगमंच मिळाला. तीच छबिलदास चळवळ. रंगायननंतर ‘शांतता..’चे प्रयोग ‘आविष्कार’च्या वतीने चालू ठेवायचं ठरलं. सुलभाताई म्हणतात, ‘‘गृहिणी सचिव’ अशीही भूमिका (प्रयोग चालू ठेवायचा) माझ्यावर येऊन पडली.’’

    अरविंद यांनी या नाटकाबद्दल एका ठिकाणी लिहिलं आहे, ‘‘शांतता कोर्ट चालू आहे’ ही लीला बेणारेची शोकांतिका नाटकभर विनोदी स्वरूपात मांडलेली असली तरी या शोकांतिकेचा अंत:प्रवाह वेगळा आहे, अतिशय तरल व गंभीर आहे. वरवर खेळकर दिसणारी बेणारे कुठे तरी खोल दुखावली गेली आहे. सहकाऱ्यांनी सुरू केलेला अभिरूप न्यायालयाचा खेळ. बेणारेवर भ्रूणहत्येचा ठेवलेला आरोप. (ती अविवाहित आहे) ती त्यात अडकत जाते. तो खेळ राहत नाही. ती शिकार होते. निर्घृण हिडिस किळसवाणी शिकार. प्रत्येक जण तिच्यावर तुटून पडतो. शेवटचं तिचं स्वगत, तिला शिक्षा फर्मावली जाते. मग टाइम अप म्हणून नाटक पुन्हा रिअ‍ॅलिस्टिक पातळीवर येतं. बेणारे आरोपीच्या पिंजऱ्यात सुन्न आहे. नाटकातला एक कलावंत सामंत पुतण्यासाठी आणलेला खेळातला पोपट तिच्याजवळ ठेवतो. ‘चिमणीला मग पोपट बोले, का ग तुझे डोळे ओले’ बालकवींच्या या कवितेवर पडदा पडतो. पहिल्या भागात हीच कविता बेणारे गुणगुणत असते.’’

    अरविंद देशपांडे यांच्या जीवनावर व कारकिर्दीवर ‘रंगनायक : अरविंद देशपांडे स्मृतिग्रंथ’ नावाचा ‘आविष्कार पब्लिकेशन’ने संपादित करून प्रसिद्ध केलेला ग्रंथ आहे.

    अरविंद देशपांडे यांचे ३ जानेवारी १९८५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/मधुवंती सप्रे

      January 3, 2018


  • गायिका मुबारक बेगम

    .तिला सुरय्या , नूरजहाँची गाणी आवडायची आणि ती गाणी ती चांगली म्हण्याची.

      August 14, 2021


  • मराठी अभिनेते राम नगरकर

    कला पथकातील झालेल्या मैत्रीमुळे दादा कोंडके आणि राम नगरकर यांनी ‘विच्छा माझी पुरी करा’ हे लोकनाट्य सुरू केलं. त्यांनी त्याचे हजारो प्रयोग केले. त्यामुळे या लोकनाट्यला संपूर्ण महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलं होते. यात राम नगरकर केलेली हल्याची भूमिका आणि त्यांच्या तोंडी असलेलं ‘हल्ल्या थिर्र’ हे डायलॉग प्रेक्षक आजही विसरलेले नाहीत. या लोकनाट्यमुळं दादा कोंडके आणि राम नगरकर हे नाव घराघरात पोचलं.

      June 8, 2021


  • बाटा कंपनीचे संस्थापक थॉमस जे बाटा

    फक्त किंमतच नाही तर बाटा म्हणजे विश्वास, बाटा म्हणजे दर्जा हा प्रभावही महत्त्वाचा आहे.

      September 1, 2021


  • श्री के क्षीरसागर

    श्री के क्षी. या नावाने प्रसिद्ध समीक्षक मराठी लेखक, विचारवंत श्री के क्षीरसागर यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९०१ रोजी सातारा जिल्ह्यातील पाली येथे झाला. सातारा जिल्ह्यातल्या टेंभुर्णी गावी शालेय शिक्षण पुरे करून त्यांनी पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात उच्चशिक्षण घेतले. पुढे त्यांनी पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली. इ.स. १९४५ सालापासून त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापकी केली. ते उर्दू शायरीचे अभ्यासक होते प्रा. श्री. के. क्षीरसागर हे टीकाकार म्हणून परिचित होते, तसेच ते ‘ज्ञानकोश’कार केतकरांचे समविचारी म्हणूनही प्रसिद्ध होते.
    त्यांनी अनेक सामाजिक व साहित्यिक विषयात अभ्यासपूर्वक लेखन केले. श्री के क्षीरसागर यांचे निधन २९ एप्रिल १९८० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 6, 2017


  • माझी माणसं – कोण होती ‘ती’?

    तसा ‘तिचा ‘ आणि माझा सहवास उणे -पुरे पंचेवीस -तीस वर्षांचा . आमच्या सहवासातून आणि तिच्या सांगण्यातून ‘ती ‘ थोडी फार समजली . जगण्याची चिकाटी आणि दुःख यांचं मिश्रण होती .

      January 6, 2018


  • जेष्ठ बॉलिवूड, व बंगाली अभिनेत्री मुनमुन सेन

    मुनमुन सेन यांचे खरे नाव श्रीमती देव वर्मा आहे. त्यांचा जन्म २८ मार्च १९४८ रोजी कोलकाता येथे झाला.शिलाँग येथील लॉरेंटो स्कूलमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मुनमुन यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली, तामिळ, तेलगू, मल्याळम, मराठी आणि कन्नड सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन यांची कन्या. तर मुनमुन यांच्या मुली रिया सेन आणि रायमा सेन या देखील बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकल्या आहेत. मा. मुनमुन सेन यांनी आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९८४ मध्ये रिलीज झालेला 'अंदर बाहर' हा त्यांचा पहिला सिनेमा. त्यानंतर त्यांनी 'मुसाफिर', 'मुहब्बत की कसम', 'जाल', 'शीशा', 'प्यार की जीत', 'माशुका', 'वो फिर आएगी', '100 डेज', 'वक्त के बादशाह', 'जख्मी रूह', 'कुछ तो है', 'अपना देश पराए लोग', 'पत्थर के इंसान', 'बेलगाम' यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले. मा.मुनमुन सेन आपल्या काळातील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात असत. काही सिनेमांमध्ये त्या बिकिनीत झळकल्या आहेत. काही सिनेमांमध्ये त्यांनी बोल्ड सीन्सही दिले आहेत. मुनमुन यांनी आता सिनेसृष्टीला रामराम ठोकला असून त्या सध्या राजकारणात सक्रिय आहेत. मा.मुनमुन सेन या पश्चिम बंगालमधील बांकुरा मतदार संघातल्या २०१४ सालच्या लोकसभा निवडणुक लढवली होती.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 28, 2017


  • भारताची पहिली सुप्रिम कोर्ट न्यायाधीश महिला – फातिमा बिबी

    ५ ऑक्टोबर १९८९ …… भारतीय इतिहासातील महत्वाची घटना घडल्याचा दिवस. या दिवशी भारत देशाच्या मुकुटात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला. भारतातील पहिली महिला, सुप्रिम कोर्टची न्यायाधीश बनली. त्या महिलेचं नाव आहे, एम. फातिमा बिबी.

      October 5, 2020