या विभागात आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरील पॉडकास्ट बघायला मिळतील.
ठाणे येथील एक नामांकित डॉक्टर आणि करोनामुक्त पेशंट म्हणून सुखरुप घरी परतलेले डॉ. श्रीपाद (राजू) बोडस यांची ही मुलाखत..
दिनांक : ११ मे २०२०
May 11, 2020
प्रज्ञावंत, प्रतिभावंत आणि सर्जनशील कलावंत खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या दैदीप्यमान कलाजीवनासंबंधी त्यांच्यासमवेत धनश्री प्रधान-दामले यांनी रंगवलेल्या गप्पा…
July 10, 2020
येणार्या काळात शिक्षणक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. याची झलक आपण सध्या ऑनलाईन शिक्षणाच्या विस्ताराच्या निमित्ताने बघतोच आहोत. मात्र सगळेच शिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेणे शक्य नाही. शाळेत किंवा महाविद्यालयात न जाता प्रयोगशाळेत प्रयोग कसे करणार वगैरेसारखे अनेक प्रश्न पुढे येतील.
अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रातील एक अत्यंत अनुभवसंपन्न आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व असलेले पुण्याच्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात VIT चे माजी प्राचार्य आणि व्हाईस प्रेसिडेंट डॉ. हेमंत अभ्यंकर यांनी या विषयावर संवाद साधलाय आपल्या संवादिका धनश्री यांच्याशी.
June 17, 2020
सह्याद्रीच्या उंच कड्यांवर उभे असलेले महाराष्ट्रातील गड किल्ले फक्त दगड-माती नाहीत, तर इतिहास, पराक्रम आणि वारशाच्या जिवंत कथा आहेत. श्री विद्याधर रायरीकर बरोबरच्या या पॉडकास्टमधून ऐका गडकोटांच्या साहसी गाथा आणि अभिमानाची सफर!!
April 18, 2026
श्री स्वामी समर्थांचं चित्र पाहिलं की चित्रकार म्हणून डोळ्यासमोर येतात सुप्रसिद्ध चित्रकार श्री शेखर साने. विविध भावमुद्रांमध्ये स्वामी समर्थांची सुंदर पेंटिंग त्यानी चितारली आहेत. शंभर-दोनशे नाही.. तर तब्बल ४५०० पेक्षा जास्त !
October 2, 2025
एक चित्रपट व मालिका कलाकार असूनही रंगभूमीवर खूप प्रेम करणारे आणि तितकेच नवनवे प्रयोग रंगभूमीवर करून त्यात यश मिळवणारे , प्राचीन काळाचा अभ्यासक असूनही सदोदित नवीन गोष्टींचा शोध घेण्याकडे कल असलेले नाट्य, चित्रपट, मालिका अभिनेते श्री. गिरीश परदेशी यांची मुलाखत.
December 3, 2020
यावर प्रकाश टाकण्यासाठी MarathiSrushti Talks वर येत आहेत — Dushyant Desai, Destiny Tours यांचे संस्थापक. आजचा भारत मंदिरं आणि तीर्थक्षेत्रांकडे केवळ श्रद्धेने नाही, तर इतिहास, स्थापत्य, तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक अनुभव यांच्या एकत्रित दृष्टीकोनातून पाहू लागला आहे.
December 13, 2025
‘सह्याजीराव’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले आणि तब्बल ६ वेळा Limca Book of Records मध्ये नोंद झालेले विक्रमवीर सतिश चाफेकर यांच्याशी फक्त स्वाक्षरी संग्रहच नाही तर त्यांच्या एकूणच विविधांगी संग्रहांबद्दल जाणून घेऊया आपल्या या भागात…
November 6, 2025
सुप्रसिद्ध गायक डॉ. राहुल जोशी हे एक नामांकित होमिओपथिक डॉक्टरसुद्धा आहेत. म्युझिक क्लिनिक या त्यांच्या अनोख्या उपक्रमाद्वारे त्यांनी आजवर लाखो रुग्णांना बरे केले.
बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉक्टर राहुल जोशी यांचे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवणाऱ्या या मालिकेत सर्वप्रथम त्यांनी सध्या चर्चेत असलेल्या आर्सेनिक अल्बम 30 या प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथिक औषधाबद्दल फार सुंदर माहिती दिली आहे.
June 3, 2020
अक्कलकोट संस्थानाचे श्रीमंत मालोजीराजे (|||) संयुक्ताराजे भोसले अक्कलकोटचे राजसाहेब ह्यांच्यासोबत आपण पॉडकास्ट केला. अक्कलकोट संस्थान त्याकाळी का आणि कसं महत्वाचं होतं हे राजेंनी सांगितलं. स्वामी समर्थ आणि राज घराणे ह्यांचं काय connection आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि अक्कलकोट राज घराण्याचे connection ह्याबद्दल बरीच माहिती राजेंनी दिली!
श्री स्वामी समर्थ!
July 2, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti