नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
संगीताचा सखोल अभ्यास असलेले एक गुरु होते. संगीत हेच जीवन मानून त्यांनी संगीताची आराधना केली होती. त्यामुळे त्यांच्याकडे दूरवरून संगीत शिकायला तरुण येत असत. त्यांच्याकडून फारशी अपेक्षा न ठेवता गुरूही त्यांना संगीत शिकवित असत.
एकदा एक तरुण त्यांच्याकडे सतार शिकण्यासाठी आला. त्या तरुणाला संगीताचे उपजतच ज्ञान होते. त्यामुळे तो लवकरच सतारवादन शिकला. परंतु तो तरुण वृत्तीने फारच चंचल होता. त्याचे स्वतःचे कोणत्याच गोष्टीवर नियंत्रण नव्हते. त्यामुळे तो अनेकदा दुःखी व असमाधानी असायचा. त्याच्या गुरूच्या लक्षात ही गोष्ट केव्हाच आली होती.
जीवनात सुख आणि समाधान कसे असते व ते मानायचे असते हे त्याला संगीताच्या आधारेच पटवून सांगायचे असा गुरूंनी निश्चय केला. एकदा हा तरुण असाच एकटा विमनस्क अवस्थेत बसला असताना गुरू त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याची चौकशी केली तेव्हा तो दुःखी व असमाधानी असल्याचे त्यांना कळले. याचे कारण मात्र त्या तरुणालाच माहीत नव्हते. तेथे बाजूलाच एक सतार होती. गुरूंनी तिच्या सर्व तारा सैल केल्या व त्या तरुणाला सतार वाजविण्यास सांगितले.
त्यावर तो तरुण म्हणाला, या तारा इतक्या सैल आहेत की, कोणालाही सतार वाजविणे अशक्य आहे. त्यावर गुरूंनी पुन्हा सतार हातात घेतली व तिच्या तारा एकदम ताणून बसविल्या व त्याला पुन्हा सतार वाजविण्यास सांगितले. तो तरुण लगेच म्हणाला तुम्ही सतारीच्या तारा एवढ्या ताणल्या आहेत की, ती वाजवायचा प्रयत्न केला तर ताराच तुटू शकतील. त्यावर गुरू त्याला म्हणाले की, तुझ्या दुःखाचे कारण तूच सांगितले आहेस. जीवनात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यास दुःख निर्माण होऊ शकते, जसे सतार अगदी सैल व फार ताणली तर तिच्यातून चांगले सूर येत नाहीत. तसेच जीवनात प्रत्येक गोष्टीत समतोल साधला तरच सुखासमाधानाचे संगीत निर्माण होऊ शकतं. त्या तरुणाला गुरूंचा हा उपदेश पटला व त्याने त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय केला.
January 2, 2018

विजय टी .व्ही. वर मालिका पाहत असताना विजयच्या लक्षात आले की या मालिकातून रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीणही बहिणीला राखी बंधू शकते आणि बहीणही बहिणीचे रक्षण करू शकते हा विचार पुढे आणण्याचा प्रयत्न होताना दिसला. प्रथमदर्शनी विचार करता राक्षबांधन हा फक्त भावा- बहिणीचा सण आहे पण सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता आणि विभक्त कुटुंब पद्धती पाहता अशी परिस्थिती निर्माण होऊच शकते ज्या घरात भाऊ नसतील फक्त बहिणी असतील तर त्यांनी ओढून ताणून कोणाला भाऊ करण्यापेक्षा विजयला हे बहिणीने बहिणीला राखी बांधून तिला तिचे रक्षण करण्याचे वचन देणे हा एक उत्तम पायंडा ठरू शकतो असे वाटते. आणि तसेही आज स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कशातही मागे नाहीत. त्यामुळे त्या त्यांच्या बहिणीचे रक्षण करूच शकतात. यात पुरुषांना कमीपणा वाटण्याचेही काही कारण नाही… आज कित्येक भाऊ राक्षबंधनाला बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देत असले तरी कित्येकदा संकट समयी बहिणीही भावाचे रक्षण करतात की ! विजय आपल्या लहान बहिणीच्या बाबतीत पूर्वीपासूनच खूप हळवा होता..
September 3, 2022
मी शाळा शिकत असताना अभ्यासाबरोबर साहित्याचे लेखन सुद्धा करीत असे. बालभारती पुस्तकातील धडे किती सुंदर असतात यामुळे मला एक लिहिण्याची उर्मी येत असे. आपणही थोडेफार लेखन करावे असे माझ्या मनाला मनोमन वाटत होते. शाळा शिकत असतानाच नाटकात काम करण्याचा छंद मला लागला होता व भजनात सुद्धा माझे मन गुंतत होते. वडील जिवंत होते तोपर्यंत मी अधून मधून लेखन करीतच असे.
August 22, 2023
राजकारण म्हणजे काय? देशावर अथवा देशाच्या एका भागावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योग. ही अगदी ढोबळ व्याख्या झाली पण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. लोकशाहींत ही सत्ता मिळवायची तर निवडणुका आल्या पक्ष आले. स्पर्धा आली. पक्षांतर्गत सत्ता, शासन करण्यासाठी सत्ता ह्यांत ते सर्व गुंततात. राजकारण करणाऱ्या माणसांत अनेक पातळ्यांवर स्पर्धा असते. कधी कधी ही इतकी तीव्र होते की दोन राजकारणी एकमेकांच्या जीवावर उठतात किंवा दोघांतील एक जण तरी दुसऱ्याचा इतका द्वेष करू लागतो की तो दुसऱ्याचा जीव घ्यायचा विचार करू लागतो. अर्थात उघडपणे तो हे दाखवेल तर तो कसला राजकारणी. बाहेर तो खूप मैत्री दाखवू शकतो पण त्याच वेळी वैऱ्याच्या खूनाचा बेत मनांत रचत असतो. कधीतरी तो आपला बेत पार पाडण्यात यशस्वी होतो. राजकारणी नेत्याला इतरही विरोधक असतात, जे राजकारणांत असतातच असं नाही. त्यांच्यापैकीही एखादा असाच बेत रचून त्याला मारू शकतो. असे अनेक पदर असलेला हा गुन्हा प्रत्यक्षात घडला होता. एकेकाळी स्थानिक नगरपालिकेचा अध्यक्ष असणाऱ्या एका राजकारणी व्यक्तींचा खून झाला होता आणि दीड महिना होऊन गेला तरी पोलिसांना कांही धागा मिळत नव्हता म्हणून हे प्रकरण घेऊन इनस्पेक्टर हिरवे यशवंताकडे आले होते.
January 20, 2026

June 12, 2022
कधी कधी नात्यांमध्येही गम्मत असते. परंतु कळली तर ठीक नाही तर मात्र बोंब. बहुदा असेच होत असते. मला ती त्या दिवशी भेटली खरी पण अस्वस्थ होती. साहजिक आहे लग्नाचे वय झाले होते , निघूनच गेले होते करंट सतत करिअरच्या मागे लागल्यामुळे लग्नाचा विचार ती करूच शकत नव्हती.
January 4, 2020
बाहेर पाऊस पडून आभाळ मोकळे झाले तसेच घरातही नंणद भावजयीच्या बोलण्याने. तोपर्यंत आज्जी नातवंड रानमेवा संपवून आले. आणि आलं घालून केलेला गरम गरम वाफाळता चहा.
February 4, 2026
एक राजा होता. आपल्या राज्यातील जनतेबाबत त्याला अतिशय काळजी होती. त्यामुळे जनतेच्या हितासाठी त्याचे सदैव प्रयत्न चालू असायचे. शिवाय हा राजा शब्दाला जागणारा होता. त्याच्या तोंडून कोणाला शब्द दिला गेला तर तो आपला शब्द खरा करून दाखविल्याशिवाय मुळीच राहायचा नाही. त्याचा प्रधानही अतिशय हुशार होता. त्यामुळे राजाचा राज्य कारभार सुरळीत चालू होता. एकदा राज्यात मोठा दुष्काळ पडला. त्यावर उपाययोजना करण्यासाठी म्हणून राजाने राजधानीतील सर्व प्रमुख नागरिकांची एक बैठक बोलावली. बैठक सुरू होताच राजाने सुरुवातीलाच सांगितले की, तुम्ही सर्व माझ्या भावासारखे आहात. आपल्या राज्यावर दुष्काळाचे संकट कोसळले आहे. त्याहून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला जे उपाय सुचतील ते तुम्ही सांगू शकता. त्या बैठकीला नगरातील एक लबाड सावकारही उपस्थित होता. त्याने राजाचे भाषण लक्षपूर्वक ऐकले होते. राजा शब्दाला जागणारा आहे, हेही त्याला माहीत होते. त्याचा फायदा घेण्याचे त्याने या वेळी ठरविले. त्यामुळे त्याची पाळी येताच तो सावकार म्हणाला. राजेसाहेब तुम्ही आताच आम्हा सर्वाना भावासारखे मानले आहे. त्यामुळे मी आता तुमचा भाऊ झालो आहे. त्यामुळे तुमच्या संपत्तीत माझाही वाटा आहे. त्यामुळे तो वाटा मला आत्ता तुम्ही द्यावा. सावकाराची मागणी ऐकून बैठकीतील सारेचजण अचंबित झाले. आता राजा कोणता निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले. तेवढ्यात बैठकीला उपस्थित असलेले प्रधान म्हणाले की, आपले राजेसाहेब शब्दाला जागणारे आहेत. त्यामुळे ते आपल्या संपत्तीचा वाटा सावकाराला देतीलच, परंतु ' भाऊ' म्हणून सावकाराचेही काही कर्तव्य आहे. राज्यावर दुष्काळाचे संकट आले आहे, त्यामुळे ते निवारण्यासाठी सावकार आधी आपली सारी संपत्ती राजाला दान करतील, अशी आशा आहे. बैठकीतील लोकांनी टाळ्या वाजवून प्रधानांच्या वक्तव्याला संमती दिली. लबाड सावकार मात्र चरफडत राहिला. राजाची अर्धी संपत्ती मिळविण्याच्या हव्यासापोटी त्याला स्वतःची संपत्ती गमावण्याची पाळी आली होती बैठकीनंतर सर्व गेल्यानंतर राजाने आपल्या हुशार प्रधानाला शाबासकी दिली.
February 10, 2017
“बाळ श्रावणा", आईने हाक मारली. “कोठे आहेस तू?"
“हा काय तुझ्या जवळच आहे", श्रावण म्हणाला.
“असा जवळ ये बरं", आई म्हणाली.
“हा आलो, काय पाहिजे आई तुला?" श्रावणाने विचारले.
आई म्हणाली, “हे बघ, मी आणि तुझे वडील आता अगदी पिकली पाने झालो आहोत. केव्हा गळून पडू, ते कळायचेही नाही. तेव्हा, त्यापूर्वी....' “त्यापूर्वी काय? आई मी तुझी कोणतीही इच्छा अपुरी ठेवणार नाही.' श्रावण म्हणाला.
आई म्हणाली, “ते आम्हाला ठाउक का नाही? आम्ही उभयता म्हातारी माणसं, त्यात आंधळी. आमचं सर्व काही तू प्रेमाने करतोस. आम्हाला क्षणभरही विसरत नाहीस. सर्व प्रकारची सेवा करतोस. तुझ्यासारखा मातृभक्त आणि पितृभक्त मुलगा आम्हांस मिळाला आहे, ही देवाची कृपा. पण ..
“पण काय आई?, मी तुमचा मुलगा आहे. मुलाने मातापितरांची सेवा केलीच पाहिजे. ते त्याचे कर्तव्यच आहे. पण आई, तुला काय हवे ते संकोच न करता सांग. बघ मी तुझी इच्छा पूर्ण करतो की नाही." - श्रावण म्हणाला.
“तू करशील रे, म्हणूनच संकोच वाटतो. तुला किती त्रास द्यायचा!” “बाबा, तुम्ही तरी सांगा हो. माझं काही चुकलं आहे का? सेवेत काही कमी तर पडलो नाही?” “नाही रे बाळा, तुझ्या आईच्या मनांत काशी यात्रेला जावयाचे आहे. तुला कष्ट द्यायला तिचं मन तयार होत नाही.” श्रावणाचे बाबा म्हणाले.
“त्यात कसले कष्ट? बाबा, आई, आपण उद्याच निघायचे.
“अरे, पण आम्हांला चालणे कसे होणार? बैलगाडीचे हादरे आम्हांस सहन होणार नाहीत.' “त्याची व्यवस्था मी करतो. तुम्ही काही काळजी करू नका.” श्रावण म्हणाला. दुसऱ्या दिवशी आपल्या वृद्ध व अंध मातापितरांना घेऊन श्रावणाने काशीचा मार्ग धरला. त्याने एक कावड केली. तिच्यामध्ये त्याने त्यांना बसवले.
ती खांद्यावर घेऊन तो मार्ग आक्रमू लागला. बरेच दिवसानंतर तो एका घनदाट अरण्यात आला. माता पितरे थकल्यामुळे त्याने अरण्यातच मुक्काम करावयाचे ठरविले. त्यांना तहान लागली म्हणून तो लोटा घेऊन पाणी आणण्यासाठी नदीवर गेला.
याच वेळी आयोध्येचा राजा दशरथ त्याच अरण्यात आलेला होता. नदीवर पाणी पिण्यासाठी हिंस्त्र प्राणी आले की त्यांची शिकार करावयाची म्हणून नदीच्या तीरावरील एका झाडावर धनुष्यास बाण लावून बसला होता.
श्रावण नदीवर आला. त्याने लोटा धुतला आणि तो पाण्यात बुडविला.
लोट्यात पाणी भरताना त्याचा आवाज झाला. दशरथ राजाने तो आवाज ऐकला. त्याला वाटले, हत्तीच पाणी पिऊ लागला आहे. आवाजाच्या दिशेने त्याने बाण सोडला आणि "आई ग!" अशी आर्त किंकाळी त्याच्या कानावर पडली. घात झाला असे वाटून तो घाईघाईने नदीवर आला. श्रावणाच्या बरगडीत बाण घुसल्याचे त्याला दिसले. रक्त भळाभळा वहात होते. धावत जाऊन त्याने श्रावणाचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले.
“कोण तू? अशा रात्री या अरण्यात काय करीत होतास?” - दशरथाने विचारले.
“मी श्रावण. माझ्या वृद्ध आणि अंध मातापितरांसाठी पाणी न्यायला आलो होतो. पण आपण कोण?” श्रावणाने क्षीण आवाजात विचारले.
“मी आयोध्येचा राजा दशरथ. शब्दवेधाची विद्या मला येत नसती, तर किती बरं झालं असतं! हा प्रसंग टळला असता.”- राजा म्हणाला.
“झालं ते झालं. होणारं कधीच टळत नाही. आता असं करा महाराज, हा कुशीत घुसलेला बाण काढा. फार वेदना होताहेत हो. अन् मग हे पाणी घेऊन माझ्या आईवडिलांना द्या. मात्र काही बोलू नका. तुम्ही श्रावण नाही, हे त्यांना कळणार नाही.” राजाने सांगितले की, बाण बाहेर काढल्याबरोबर तू मरण पावशील. तुला मी आयोध्येस नेतो व राजवैद्याकडून उत्तम औषधे देऊन बरा करतो. पण श्रावणाने ते ऐकले नाही. या वेदनेपेक्षा मृत्यू बरा, असे तो म्हणाला. नाइलाजाने राजाने बाण बाहेर काढला. विव्हळत विव्हळत मातृपितृभक्त श्रावणाने "आई! बाबा!” करीत प्राण सोडला.
दशरथ पाणी घेऊन श्रावणाच्या मातापितरांकडे आला. त्याची चाहूल लागताच आई म्हणाली, "बाळा, किती रे वेळ झाला तुला! किती कष्टतोस तू आमच्यासाठी! बाळा पाणी मिळेना का? फार दूर जावे लागले का रे?” दशरथाने तोंडातून चकार शब्द न काढता लोटा आईच्या हाती दिला. पण ती माऊली पाणी न पिताच म्हणाली, “बाळ, बोल ना रे. रागावलास आमच्यावर? तुला फार त्रास देत आहोत आम्ही. पण काय करू? रागावलास म्हणून बोलत नाहीस, होय ना? तू बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाहीत."
तहानलेल्या त्या वृद्धांनी पाणी प्यावे म्हणून दशरथास बोलावे लागले.
त्याचा आवाज ऐकताच दोघेही एकदम म्हणाले, "कोण तू? आमचा बाळ कोठे आहे? सांग काय केलंस तू त्याला?” दशरथाला सर्व हकिगत सांगावीच लागली.
ती ऐकताच त्या दोघांनी एकच आकांत मांडला. “बाळ, आम्हाला सोडून कसा रे गेलास? आम्हा आंधळ्यांची काठी गेली! बाळ किती कष्ट पडले रे तुला आमच्याकरता! आणि आमच्यासाठी प्राणही दिलास रे! तुझ्याशिवाय आम्ही जिवंत तरी कसे राहू? बाळ श्रावणा, श्रावणा...' दशरथाने त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे ती दोघे त्याच्यावरच उसळली आणि संतापाने म्हणाली, “आमचा एकुलता एक मुलगा तू मारलास. आम्ही तर आता जगत नाहीच; पण लक्षात ठेव, आमच्यासारखाच तू पुत्रशोकाने मरशील. आमचा शाप आहे तुला.” आणि थोड्याच वेळात त्यांनी पुत्रशोकाने प्राण सोडला. धन्य मातृपितृभक्त श्रावण आणि धन्य ती मातापितरे!
[ 'बालसुधा', पुस्तक ३ रे, कर्नाटक सरकार, १९७७, पृ. १२०-१२४]
September 24, 2024
सकाळ झाली तशी सखू उठून लगबगीने कामाला लागली.आज सक्रातरचा सण,घरी काही तरी गोड-धोड करायचे व्हते. सणावाराला कधी तरी गोड-धोड लेकरांना मिळायचं,न्हायी तर एरी घरात आठरा विश्व दारिद्र्यच व्हते.कालच सखूने बाजारातून गुळ आणला व्हता.
February 4, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti