नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
“गाय येली मोरी गनुबा,गाय येली मोरी;मोरीला झालाय गोऱ्हा गनुबा,मोरीला झालाय गोऱ्हा”
ही गाण्याची गावठी धून आज सायंकाळी सर्वत्र ग्रामीण भागात आणि विशेषतः शेतकऱ्याकडे नक्की ऐकायला मिळाली असेल.आज वसुबारस त्यामुळे गायी-वासराची पूजा आज सर्वत्र केली जाते.तिच्याजवळ तेलाचा दिवा लावून त्या उजेडात तिचे पूजन केले जाते तसेच विविध गाणीही म्हटली जातात.हिंदू धर्मात गायीला दैवत मानले आहे आणि वसुबारस हा दिवस तिची पूजा करण्याचा दिवस मानला जातो.अर्थात गायी-वासराच्या अंगी असणारी उदारता,शांतता व समृद्धीची भावना सामान्य माणसाच्या अंगी वृद्धिंगत व्हावी अशी त्यामागची भावना असते.शेतकऱ्याच्या घरी अशी समृद्धी गायी-वासराच्या आणि दुध-दुभत्याच्या रुपाने सतत नांदत राहावी व त्यातून शेतकऱ्याची सर्व बाजूंनी भरभराट व्हावी ही भावनाही पूजा करण्यामागे नक्कीच असते.हल्ली कोणतीही पूजा सहेतुक होत असली तरी त्यामागे श्रद्धेचा,संस्कृतीचा,परंपरेचा एक भाग म्हणून त्याकडे बघितले जाते.
पूर्वीच्या काळी शेतकऱ्याकडे खूप गायी असायच्या.त्यांची नावेही भवळी,मोरी,कपिली,खिलारी,तांबडी अशी छान असायची.प्रत्येक घरात एक तरी गाय असायचीच आणि त्यामुळे आहारात हमखास दुध व दुधाचे पदार्थ असायचेच असायचे.जर गावात एखादी गायी व्याली तर शेजाऱ्यांना कच्च्या दुधापासून बनविलेला खरवस खायला लोक आवर्जून बोलवायचे.दही-दुधाचा घरात नुसता पूर असायचा.पण पुढे ‘जिथं पिकतं तिथ विकत नाही’ या म्हणीला छेद गेला आणि शेतकरी सक्षमीकरणासाठी राबविलेल्या योजनेंतर्गत स्थापिलेल्या दुध-संघाने दुध घ्यायला सुरुवात केली.एकदा दुध विकण्याची गोडी निर्माण झाल्यावर दरात मनमानी सुरु झाली आणि एकूण व्यवसाय खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना परवडत नाही म्हणून दुधाची गुणवत्ता खालावत गेली व मनाचा कोतेपणा वाढत गेला.ज्याच्या घरात चार-पाच गायी आहेत तोही बिचारा बिगर-दुधाचा चहा पिऊ लागला.दह्या-दुधाचा माठ हा शब्दप्रयोग फक्त गाण्यातच(गवळणीत) दिसू लागला.आता त्याची जागा किटली आणि वाटीने घेतलीय.शहरात पूर्वी थोड्या-फार प्रमाणात गायी दिसायच्या पण आता त्यांची संख्या खुपच कमी आहे.शहरात प्राण्यांच्या संकल्पना स्पष्ट करताना शिक्षकांना प्रतिकृती किंवा चित्राचा आधार घ्यावा लागतो.फार फार तर शहरात एखाद्या मंदिराच्या बाहेर उभी असलेली गाय आणि चारा घेऊन असलेला गोरक्षक दिसतात.भाविक मग त्या गोरक्षकाकडील चारा विकत घेतात.गायीला चारतात आणि गोमातेचे दर्शन झाले या आनंदात घरी परततात.
शेतकरी मोसमी हंगामामुळे शेतीपासून दूर जात आहे.ग्रामीण भागातून शहरात होणाऱ्या स्थलांतरित लोकांची वाढत जाणारी संख्या आणि त्यातून वाढणारे शहरीकरण यामुळे काही सांस्कृतिक बाबी काळाच्या ओघात लुप्त होतात की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे.१९९० च्या दशकात शिक्षक,भूगोल किंवा अर्थशास्त्र शिकविताना ग्रामीण भागात ७०% व शहरी भागात ३०% लोकसंख्या राहते असे सांगायचे.आता त्यांनाच ग्रामीण भागात ५५% व शहरी भागात ४५% लोकसंख्या राहते असे अलीकडच्या सर्वेनुसार सांगावे लागते.त्यामागे विविध कारणे आहेत.बदल हा जरी सृष्टीचा नियम असला तरी तो आश्वासक असला म्हणजे पचनी पडायला सोपा जातो.
अशी ही गाय आणि तिचे मानवी जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे.गायीच्या पूजेच्या दिवशी आणि नेहमीच देशी,गावरान आणि एकूण सर्वच गायींचे मानवी जीवनातील नैसर्गिक महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे आणि तिचे गाणेही जोपासले पाहिजे-
“दिन दिन दिवाळी,गायी-म्हशी ओवाळी;गायी कुणाच्या?...........लक्षीमनाच्या”.
- भाऊसाहेब लाला टुले
tulebhausaheb1986@Gmail.com
December 7, 2016
पहाटेच्या वेळी इन्स्पेक्टर मोहिते मिरज स्टेशन वर गाडीतून उतरले . पाटील व त्यांचा मुलगा केदार त्यांच्या गाडीची वाट पाहात प्लॅटफॉर्म वर उभेच होते . खरे तर इ . मोहित्यांना सरळ सरकारी विश्राम गृहात जाण्याची ईच्छा होती . परंतु पाटीलांच्या आग्रहाखातर सकाळच्या चहासाठी त्यांनी पाटीलांकडे जाणे कबूल केले होते .
November 17, 2022

तिला काय अपेक्षित होते ते माहित नाही पण मी बोलून गेलो. मला माझीच मजा वाटली कारण हे उत्तर मी कसे दिले .
June 20, 2021
एका शहरात तीन मित्र रहात होते. एक राजपुत्र, एक मंत्रिपुत्र आणि एक वणिक पुत्र. एकदा तिघंही एकत्र आले आणि विचार करू लागले की कोण कशामुळे जिंकला आहे. राजपुत्र म्हणाला, “मी आपल्या पुण्यामुळे जिंकलो आहे.” मंत्रीपुत्र म्हणाला, “मी आपल्या बुद्धिबळावर जिंकलो आहे.” वणिक पुत्र म्हणाला, “मी आपल्या चतुराईने जिंकलो आहे.” तिघे मित्र परदेशात गेले आणि एका शहरातील बगीच्यात थांबले. वणिक पुत्रास जेवण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. वणिक पुत्र एका वाण्याच्या दुकानावर गेला. त्या दिवशी कोणतातरी सण होता आणि दुकानात इतकी गर्दी होती की तो वाणी सर्व ग्राहकांना लवकर किराणा देवू शकत नव्हता.
October 1, 2024
विद्या सकाळी उठली. श्वेताला उठवलं.श्वेता ९ वर्षांची तिची गोड मुलगी.श्वेता ब्रश करुन आंघोळीला गेली आणी विद्या किचनमधे आली तिचा डबा करायला.ओट्यावर पोळ्यांचा डबा दिसला आणी तिला आठवलं ,काल रात्री पोळ्या उरल्या आहेत.
January 20, 2024
कुमार गंधर्वांच्या आवाजातली ही अमर भूपाळी शंकर मथार्याच्या टेपरिकॉर्डरवर लागली तसं सारजाची झोप मोडली.शंकर मथार्याच्या टेपरिकॉर्डरचा भोंगा वाजनं आण गल्लीतल्या बायामाणसांचं पहाटचं उठनं हे मागील काही वर्षांपासून गल्लीतल्या बायकांसाठी नेहमीचच होतं.गावात फक्त शंकर म्हाताऱ्याच्या घरीच टेपरिकॉर्डर होता. शंकर मथरा पहाट सुखाची चांदणी निघाली की मोठ्ठया आवाजात आपला टेपरेकॉर्डर सुरू करायचा. सारजा जरा गडबडीनच उठली. कामाचा लय रोंभा पडला व्हता,त्यात पेरणीचे दिवस व्हते. पहाटचे सगळे कामं आटपुन शेतात जायचं व्हतं. तिनं उठून तोंडावर पाण्याचा सपकारा मारला,केसं नीट करून बुचडा बांधला अन चुली जवळ जाऊन चुलीतला एक भला मोठा ढेपसा हातावर घेऊन दात घासत घासत तिच्या नवऱ्याल,दौलतल आवाज दिला.पेरणी पाण्याचे दिवस असल्यानं दिवसभरच्या कष्टानं थकून दौलत आरमोडून झोपला व्हता. त्यालं तसं झोपलेलं पाहून सारजाच्या डोळ्यालं समाधान वाटत होतं. खरं म्हंजे कामाचा लय रोंभा पडला होता पण तरी बी त्याची झोप न मोडु देता तशीच ती उठली . पारोश्या अंगानं सयपाक पाणी करू नाही मंतात…! सारजीलं लहानपणापासूनच थंड पाण्यानं आंघुळ करायची सवय होती,म्हणून मग आधी तिनं आंघुळ करून घेतली. तव्हरोक दौलत बी उठला होता. त्याच्याकडं रेडीओ होतख.रेडिओवर गाणे ऐकण्याचा त्यालं लय नाद होता. झोपतून उठून त्यांनं रेडिओवर विवीध भारती लावलं.तेव्हड्यातं नहानीतून आंघुळ करून बाहिर येणारी सारजा त्यालं दिसली. सारजालं पाहून त्याचे डोळे उघडे ते उघडेच राहिले.तिचा तो लांब लांब केसांचा वलबट केशसंभार पाहून तो खुळ्यागत तिच्याकडं पाहू लागला. तेवढ्यात रेडिओवर गाणं लागलं होतं…
January 20, 2026
“मी तुमची मदत करतो. हवालदार सावंत, दोन कप चहा मागवा.” यशवंतने सावंतला इशारा केला. सावंतने आणलेला चहा शिर्के दांपत्याने घेतला.
March 11, 2018
१९५५-६० साली शाळेतल्या शिक्षकांच्या सांगण्यावरून त्यांनी क्रीडास्पर्धेत भाग घेतला .. तेव्हापासून आवड निर्माण झाली आणि त्यांचा अॅथ्लेटिक्सच्या क्षेत्रात प्रवेश झाला
September 26, 2021

गोमुच्या आणि परीच्या प्रेमप्रकरणाची सुरूवात मी तुम्हांला सांगितली.
पण माणूस योजतो तसंच सर्व तडीस गेलं तर आयुष्य किती सोपं होईल. कांहीजणांच म्हणणं असतं की आयुष्य आपणच कठीण करत असतो. आपला दृष्टीकोन सकारात्मक असला की अर्धा भरलेला ग्लास दिसतो आपल्याला. अर्धा रिकामा आहे हे जाणवत नाही वगैरे, वगैरे. पण ज्याच्यावर प्रसंग येतो, त्यालाच त्याची गंभीरता कळते. इतरांना “त्यात काय एवढं !” असंच वाटतं.
April 26, 2022
त्याचा दोनदा फोन येऊन गेला. मी जास्त एन्टरटेन त्याला केले नव्हते. पण तो डोक्यावरच बसला. ठरल्या वेळेला आलेला माणूस 65-68 वर्षाचा असेल. खूप थकलेला दिसत होता. मला म्हणाला सर माझी सही बघता का ?
July 11, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti