(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बेभान

    जेमतेम पाच फूट उंची . स्वच्छ पॅन्टशर्ट . डोक्यावर कॅप . मधूनच ती कॅप हातात घेऊन हलवण्याची मग डोक्यावर किंचित तिरपी ठेवण्याची सवय . कॅप काढल्यावर दिसणारे पांढरे शुभ्र केस आणि मिश्किल चेहरा …

      February 4, 2026


  • कॅथेटर (कथा)

    ‘हॅलो, सुनील… कसा आहेस? काय म्हणतात अण्णा? बरंय ना सर्व…’
    नेहमीचेच प्रश्न, त्याला नेहमीचेच उत्तर देऊन सुनीलने फोन कट केला. नुकताच ऑफीसमधून आला होता. पायमोजे काढून हातपाय धुऊन अण्णांच्या खोलीत गेला. अर्धांगवायूने त्यांना कायमचे अधू बनवले होते. स्वत:ला काहीच हालचाल करता येत नव्हती. बोलताही येत नव्हते. सुनील रोज सकाळ संध्याकाळ त्यांना व्हिलचेअरवर बसवून मागच्या अंगणात चक्कर मारून आणायचा. तेवढाच त्यांना विरंगुळा. बाकी सर्व बेडवरच होते. बाबू नावाचा माणूस खास सेवेसाठी ठेवलेला होता. सकाळी सात ते संध्याकाळी सात तो सेवा द्यायचा.

      July 8, 2024


  • जीवनाचा मूलमंत्र

    गावाबाहेर नदीच्या काठावर एका झोपडीत एक सत्पुरुष राहात होते. ही झोपडी त्यांनी स्वतःच बांधली होती. नदीच्या काठावरच शंकराचे देऊळ होते. तेथे दर्शनासाठी बरेच लोक येत. सर्व लोक निघून गेल्यावर हे सत्पुरुष त्या मंदिरात जायचे व त्या मंदिराची स्वच्छता करायचे. त्यांचा हा दिनक्रमच होता. काही लोक त्यांच्या दर्शनाला यायचे मात्र ते सत्पुरुष कोणाकडे काही मागायचे नाहीत वा कोणी दिले तरी ते घ्यायचेही नाहीत. स्वतः कष्ट करून पोटासाठी लागेल तेवढीच ते कमाई करायचे. एकदा त्यांच्याकडे एक तरुण आला व त्यांना म्हणाला की, मी आतापर्यंत जे जे केले त्यात मला अपयश आले. त्यामुळे नैराश्य आले असून, मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ जाताना तुमच्यासारख्या सत्पुरुषाला भेटावे म्हणून आलो आहे. त्या सत्पुरुषाने त्याची सर्व हकीकत ऐकून घेतली व त्याला आपल्या झोपडीत नेले. ते त्याला म्हणाले की, तुझा निर्णयच झाला असेल तर तू अवश्य आत्महत्या कर. फक्त आता मला भूक लागली आहे. मी जे काही करेन ते तूही खा व नंतर तू तुझ्या मनाप्रमाणे वागू शकतोस. असे म्हणून त्या सत्पुरुषाने घरात जे काही किरकोळ सामान होते, त्याचा उपयोग करून गव्हाची छान खीर केली. ती खीर शिजताना तिचा सुवास दरवळत होता. त्यामुळे तो तरुण सुखावला होता. खीर तयार झाल्यानंतर त्या सत्पुरुषाने खिरीचे भांडे त्या तरुणाच्या हातात देत म्हटले हे बाहेर घेऊन जा व तेथे बाहेर उकीरड्यावर फेकून दे. सत्पुरुषाचे हे बोलणे ऐकून त्या तरुणाला फारच आश्चर्य वाटले. तो म्हणाला एवढी चांगली सुंदर खीर तुम्ही बनवलेली व ती न खाता बाहेर उकीरड्यावर फेकून द्यायला सांगता. त्यावर सत्पुरुष त्याला म्हणाले की, तू जे काही करतोस तेच मीही करतो आहे. तुझे जीवन या खिरीसारखेच छान व सुंदर आहे. परंतु, तू आत्महत्या करून ते नष्ट करीत आहेस. त्या तरुणाला सत्पुरुषाच्या उपदेशातील मर्म कळले व आत्महत्येचा विचार सोडून तो त्यांचे आशीर्वाद घेऊन तेथून गेला.

      December 30, 2017


  • मेघ राजा

    एक होता मेधी राजा. मोठा भरभक्कम ताजा तवाना. रंगानं काळा. पण मोठा ऐटबाज. मनात आलं की, आभाळात उंच उंच भरारी मारायचा. धावल्या ढगांना पकडायचा. त्यांची मानगूट धरायचा. धक्काबुक्की करायचा. त्यामुळं पाऊस अवचितच पडायचा. माणसं मग, आच्यारी का विच्यारी व्हायची. ते बघून हा असा हसायचा की, दोन पर्वतांची टक्करच जणू झालीय असा दणका उडायचा! त्याच्याजवळ एक छानदार लहान पिशवी असायची. देवानं ती त्याला दिलेली होती. म्हणून ती तो आपल्या केसात लपवून ठेवायचा. पण हा खुशीत आला की, ती एकदम चकाकायची.

      October 5, 2025


  • शंकेचे निरसन

    एक राजा होता. तो फारच चिकित्सक होता. त्याला थोडी जरी शंका आली तरी तो ती शंका लगेच विचारी व शंकेचे निरसन झाल्याशिवाय तो स्वस्थ बसायचा नाही. त्यामुळे त्या राजाबरोबर गप्पा वा चर्चा करायला सहसा कोणीही तयार होत नसत. त्या राजाचे जे राजगुरू होते, त्यांना मात्र राजाची या स्वभावाची पूर्ण कल्पना होती. राजाच्या शंकेचे निरसन करण्यासाठी अनेकदा तेच पुढाकार घेत असत. एकदा राजा धर्मगुरूबरोबर चर्चा करीत असताना परमेश्वराचा विषय निघाला. ईश्वर कसा सर्वत्र असतो व तो संकटकाळी आपल्या भक्ताला कसा प्रत्यक्ष येऊन वाचवितो हे धर्मगुरूंनी अनेक उदाहरणांसह राजाला पटवून सांगितले. त्यावर राजाने संकटसमयी परमेश्वर आपल्या भक्ताला कसे वाचवितो? तो नेमके काय करतो? याबद्दल निरनिराळ्या शंका व्यक्त केल्या. त्याच्या सर्वच शंकांना धर्मगुरुंना उत्तर देता आले
    नाही म्हणून ते राजगुरुकडे गेले. राजाचे शंकानिरसन करण्यासाठी राजगुरूंनी प्रत्यक्ष कृतीच करायचा निर्णय घेतला. त्या राजाला एक नातू होता. तो फारच सुंदर व हुशार होता. त्यामुळे राजाचा फार आवडता होता. दुसऱ्या दिवशी राजगुरू राजाला घेऊन उपवनात फिरायला गेले. आजूबाजूला पहाऱ्याचे सैनिक होतेच. तेथे राजाला तलावाच्या ठिकाणी पाठमोरा बसलेला आपला नातू दिसला. म्हणून राजा घाईघाईने
    तलावाकडे निघाला. तेवढ्यात त्याला त्याचा नातू तलावात पडल्याचे दिसले. नातवाला पोहता येत नाही, हे राजाला माहीत होते, त्यामुळे त्याने स्वतः पळत जाऊन तलावात उडी टाकली व आपल्या नातवाला बाहेर काढले. वास्तविक तो नातवासारखा दिसणारा मेणाचा पुतळा होता. परंतु राजाने त्याला खरा नातू समजून त्याला वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली होती. नंतर सर्व प्रकार समजल्यानंतर राजगुरू राजाला म्हणाले, परमेश्वर आपल्या भक्ताला म्हणजे आपल्या आवडत्या माणसाला संकटातून कसे वाचवितो याचे कोडे तुम्हाला पडले होते ना?

    त्याचे उत्तर देण्यासाठी आम्हाला हे सर्व नाटक करावे लागले. उपवनात आजूबाजूला एवढे शिपाई असताना तुम्ही एकाही शिपायाला आदेश न देता नातवाला वाचविण्यासाठी तलावात स्वत: उडी मारली. यावरून परमेश्वर आपल्या भक्ताचे कसे रक्षण करतो हे तुम्हाला कळलेच असेल. राजाचे समाधान झाले व पुढे त्याच्या शंकेखोर स्वभावाला आळाही बसला.

      December 29, 2017


  • एक परीस स्पर्श – भाग २

    त्या पूजेच्या होमातील अंगारा दिला होता गुरुजींनी तीन महिने नित्य नियमाने लावायला. विजयनेही तो नित्य नियमाने लावला. पण विजयच्या मनात काही लग्नाचा विचार येत नव्हता कारण विजय कोणाच्यातरी प्रेमात पडलेला होता !

      January 21, 2022


  • क्रोधः पापस्य कारणम् (कथा)

    काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षड्रिपू आहेत. त्यांच्या पासून सावध असावे असे नीती तत्त्व सांगते. पण प्रत्येक गुन्ह्यामागे ते दडलेले असतात. चांगल्या भल्या माणसांनाही ते कधी आणि कसे गाठतील सांगता येत नाही. म्हणूनच म्हटले आहे, ‘क्रोधः पापस्य कारणम्।’

      July 1, 2021


  • राधाकाकीचा वाडा

    बाभनाची राधा काकी मंजे गावातील एक गुढ व्यक्तीमत्वाची बाई ! गावाच्या मंधोमंध बुरुजाखाली तिचा जुन्या काळातला ढवळ्या मातीनं बांधलेला टोलेजंग वाडा व्हता !!!

      February 3, 2026


  • प्रेमाची परीक्षा

    अंतरा आणि अभिनय दोघे मुंबईतील वरळीच्या किनाऱ्यावर फिरत होते. दोघांनी आपले हात मागून दुसऱ्याच्या कमरेभोवती लपेटलेले होते. अंतरा आणि अभिनय दोघे मनाने एकमेकांच्या प्रेमांत आकंठ बुडालेले होते. दोघांचेही शिक्षण आता पूर्ण झालं होतं. या वर्षी ते दोघेही आपापल्या गांवी परतणार होते. अंतराला तर उद्याच गांवी जायचे होते.

      February 2, 2026


  • फार उशीर झालाय गं मम्मी !

    -- मी कुठं आहे तेच कळत नाही .

    शरीराची तडफड होते आहे .
    शरीराला झालेल्या जखमांची आग सहन होत नाहीय .
    डोळ्यावर झापड आहे , पण तरीही अंधुक असं काही दिसतंय.
    गाड्यांचे , हॉर्न चे आवाज असह्य होतायत .
    पब्लिकची गर्दी जाणवतेय .
    आणि अँब्युलन्सचा सायरन ऐकू येतोय .

    काहीतरी घडलंय .

    पब मधून येताना लाँग ड्राईव्ह करावं लागणार होतं .
    सॅम ला म्हटलं सुध्दा .
    " इतक्या लांब कशाला जायचं ."
    तो म्हणाला ,
    " जायला तर हवंच . अगोदर हुक्का पार्लर . मग आपल्या फार्महाऊस वर जाऊ . तिथं तुझ्यासाठी सरप्राइज आहे .तिथून बहावा पब . आणि लाँग ड्राईव्ह करीत सुसाट येऊ परत . नाहीतरी बहात्तर लाखाच्या निंजा बाइकचा उपभोग केव्हा घ्यायचा ?"

    सॅम नं सगळं ठरवून टाकलं होतं .
    नाही नाही म्हणताना होकार केव्हा गेला तोंडातून , ते कळलंच नाही . कळलं नाही की हुक्का पार्लरचा मोह पडला ? की निंजा बाईकवरची सुसाट लाँग ड्राईव्ह मोहात पाडून गेली ?
    काहीच कळलं नाही .

    मम्मीला एक मेसेज टाकला .

    " मीटिंग लांबत चाललीय , उशीर होईल यायला , तू आणि पपा जेवून घ्या ."

    मला तेव्हा कळलं नव्हतं गं मम्मी , माझेच शब्द असे माझ्यावर कोसळतील ...

    मम्मी , फार फार उशीर झालाय गं !

    सगळंच बिघडलंय .
    तू किती सांगत होतीस , किती शिकवत होतीस .
    मुलीनं कसं वागायला हवं ...
    स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही...
    चारित्र्य महत्त्वाचं ...
    अंगभर कपडे ही आपली सुरक्षा आहे ...
    शरीर उघडं टाकण्यात सौंदर्य नसतं ...
    घर , घराच्या भिंती , दार, दाराची चौकट. त्यातलं आपलेपण ...
    माया , प्रेम , जिव्हाळा...
    नातेसंबंध जपणं, नवीन नाती सांभाळणं ...
    एक ना दोन .
    अनेक गोष्टी सांगायचीस तू .
    आणि मी आय टी त मिळणाऱ्या अठरा लाखाच्या पॅकेजच्या गुर्मीत तुला , तुझ्या विचारांना हसत होते .
    पप्पानी , मला समजावणं सोडून दिलं होतं .
    त्यांच्या दृष्टीनं मी हाताबाहेर गेलेलं प्रकरण होते .
    त्यांचा उदास चेहरा मला कधी जाणवलाच नाही .
    आणि तुझ्या शब्दातील तळमळ , काळजी माझ्या मनापर्यंत कधी पोहोचलीच नाही .

    त्याला कारण होतं अठरा लाखाचं पॅकेज .
    त्याला कारण होता सॅम .

    चांदणी चौकातल्या हॉरीबल ट्रॅफिकमध्ये प्रचंड बेफिकिरीने निंजा घुसवत तो माझ्या बाजूला केव्हा आला ते कळलच नाही .
    ना हेल्मेट . ना ट्रॅफिक जॅमचं टेन्शन .
    ना ट्रॅफिक हवालदाराची भीती . चेहऱ्यावर जस्ट बेफिकिरी ...
    मी पहात राहिले .
    तो माझ्या जुन्या गाडीकडे भयंकर नजरेनं पहात होता .
    " या नंबरवर मेसेज टाक , उद्या तुला सोडायला येतो आयटी पार्क मध्ये ."
    त्यानं त्याचा नंबर त्याच्याच रुमालावर लिहून माझ्या अंगावर फेकला .आणि न बघता स्पिडमध्ये निघून सुध्दा गेला .
    मी रुमाल हाती घेतला आणि नकळत तो हुंगला .
    कुठल्या तरी उंची सिगारचा वास येत होता .
    ट्रॅफिक सरकेल तशी मी हळूहळू पुढं होत होते .
    मात्र डोक्यात ' तो ' होता .

    दुसऱ्या दिवशी तो आला .
    --आणि मग त्याचं येणं सवयीचं केव्हा झालं ते कळलंच नाही . माझी साधी टू व्हीलर पार्किंग मध्ये ठेवून मी त्याच्या निंजावर बसायची .
    जाता येता दोन्ही वेळेला .
    तो सॅम होता .
    सॅम .

    त्यानं त्याच्या फिफ्टीन प्लस ग्रुपवर घेतलं .
    तो केवळ पन्नास जणांचा ग्रुप होता .
    एकाच महिन्यात त्याने बकार्डी ब्लास्ट ग्रुपवर घेतलं .
    तो तर केवळ वीस जणांचा ग्रुप होता .

    "कशासाठी आहे हा ग्रुप ? "
    एकदा मी विचारलं सुध्दा .
    तो बेफिकिरी दाखवत हसला .
    "कळेल . जास्त चौकशा न करता लाईफ एंजॉय करणाऱ्यांचा हा ग्रुप आहे . धमाल , मस्ती , खाना पीना , देन गिव्ह अँड टेक ."

    त्याचं बाकी सगळं बोलणं कळलं , पण गिव्ह अँड टेक मात्र कळलं नाही .
    ते कळलं , तेव्हा उशीर झाला होता .
    त्याच्या फार्म हाऊसवर फिफ्टिन प्लस चे काही मेंबर त्या रात्री जमले होते . बकार्डी ब्लास्ट चे पण काही जण आले होते . धुमाकूळ चालला होता . बिअर, शॅम्पेन , हुक्का आणि काय काय चालू होतं .इतक्यात लाईट गेले . अंधार झाला .आणि काय होतंय ते कळायच्या आत कुणीतरी तरुणींच्या अंगावरचे कपडे फेडण्याचा , किंचाळण्याचा आवाज ऐकू येऊ लागला . माझ्याही अंगाशी कुणीतरी ...
    अचानक लाईट आले .
    आणि जमलेले सगळे पिसाटल्या सारखे तरुणींच्या अंगावर ...

    कुणीतरी ओरडत होतं .
    "गिव्ह अँड टेक ! "
    सावरण्यासाठी , लज्जा रक्षणासाठी जवळ कपडे नव्हतेच . अंधारात कुणीतरी लपवले होते .
    मला शॉक बसला .
    तुटून पडणाऱ्या लांडग्यांनी मग मोबाईल वर शूट करायला सुरुवात केली ...

    आणि मम्मी तुझी आठवण झाली .
    अंगभर कपडे ही सुरक्षा असते हे तुझं वाक्य आठवलं .
    आणि फिफ्टीन प्लस चा सगळं शरीर दाखवणारा ड्रेसकोड आठवला .

    लांडग्यांनी लचके तोडलेच होते पण निर्लज्जपणे ग्रुपवर क्लिप्स टाकल्या होत्या .
    सॅमच्या बाईक वरून येताना घरी तोंड कसं दाखवायचं याचीच चिंता वाटत होती .

    पण तेही सवयीचं झालं .
    कारण क्लिप्स दाखवून ब्लॅक मेलिंग सुरू झालं होतं .

    मम्मी , पप्पा , मला वाटलं होतं तुम्हाला काही कळलं नसेल .
    आणि नव्हतंच कळलं .
    मम्मी तू लग्नाचा सतत विषय काढत होतीस .
    या सगळ्या दुष्ट चक्रातून सुटण्या साठी , मी येईल त्या स्थळाला होकार द्यायचा ठरवलं होतं .

    एका रविवारी बघण्याचा कार्यक्रम होता .
    पण आलेल्या तरुणाने मला बघताक्षणी नकार दिला .
    तू कारण विचारलं , तेव्हा त्यानं चक्क मोबाईल मधली क्लिप दाखवली .
    त्यांनी नाकारलं .
    खूप बोललात तुम्ही मला .
    आणि अचानक तुम्हा दोघांनी बोलणं सोडून दिलं .
    तुम्हाला शॉक बसला होता . हे मला दिसत होतं .
    पण भयंकर दुष्ट चक्रात अडकल्याने काही बोलू शकत नव्हते .

    सगळं सवयीचं झालं होतं .
    कुणाचाही केव्हाही फोन यायचा .
    कोणीही कुठेही बोलवायचा .
    नोकरी तर सुटलीच होती .
    पण पैशासाठी ड्रग पेडलर म्हणून सुध्दा काम करायला सुरुवात केली होती .
    सगळ्या आयुष्याचा विचका झाला होता .
    बकार्डी लाईम , बकार्डी रम , बकार्डी पाईनापल...
    आणि कुठचे कुठचे ब्रँड घशाखाली ओतण्यासाठी ...
    नशेसाठी कुणाकुणाला काय हवंय ते देण्यासाठी ...

    सगळं संपवून बसलेय गं मम्मी .

    फार फार उशीर झालाय मम्मी !

    -- आज तर कहर झाला मम्मी .
    बहावा पब मध्ये राडा झाला .
    आणि एकमेकांना खुन्नस देत सगळे बाहेर पडले .
    सॅमला सगळ्या गोष्टींचा जाब विचारायला सुरुवात केली .
    त्याचा त्याला राग आला आणि त्यानं स्पीड वाढवायला सुरुवात केली .
    एकशे वीसच्या पुढे काटा जाताना दिसत होता .
    मी त्याला शिव्या घालायला सुरुवात केली . तेवढंच माझ्या हाती होतं .

    आणि कुठल्यातरी क्षणी निंजा पुढच्या गाडीवर आदळली .
    काय होतंय हे कळायच्या आत मी गाडीवरून उंच उडाले .
    खाली पडताना भयंकर दृश्य दिसलं .
    सॅम ची मान तुटून पडली होती .
    आणि मी अर्धवट शुध्दीत खाली पडले होते .

    पडल्यावर जाणवलं ते इतकंच की मी तुझं काहीही ऐकलं नव्हतं .
    पप्पांचा विचार केला नव्हता .
    पण आता हे सगळं आठवणं व्यर्थ होतं . मम्मी , पप्पा मी मरतेय . तुम्ही आठवताय मला .
    पण आता फार फार उशीर झालाय मम्मी , फारच उशीर ...झालाय ... फार... उशीर ...!
    ----------
    -- तिची तडफड शांत झाली .
    गर्दीला तिची डेड बॉडी दिसत होती .
    सगळे चुकचुकत होते .

    ---आणि फिफ्टीन प्लस चा ग्रुप , बकार्डी ब्लास्ट चा ग्रुप नव्या सावजाच्या शोधात मेट्रो सिटीत हिंडू लागला होता .
    -- ड्रग पेडलर साठी शोध सुरू झाला होता .
    --- हवाला सिस्टीम नव्याने कार्यरत झाली होती .

    ( पूर्णतः काल्पनिक )

    -- श्रीकृष्ण जोशी

      June 4, 2024