(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एका व्यस्त दलालाची प्रेम-कथा

    चेटकिणीचे पाव, निवडुंग, स्कायलाईट रूम, समृध्द प्रेमाची भेट आणि आता ही व्यस्त दलालाची प्रेमकथा, सर्वच प्रेमाबद्दलच्या कथा. सर्व कथांमधे वळणं आणि अनपेक्षित शेवट आहे परंतु प्रत्येक कथा दुसऱ्याहून वेगळी आहे. ओ हेन्री कथाकार म्हणून प्रसिध्द झाला, त्या कल्पनांवर अनेक, नाटके, चित्रपट, मालिका केल्या गेल्या ह्यांत नवल नाही. ह्या कथेत आनंदी शेवटही किती वेगळ्या प्रकारे सादर केलाय.

      July 8, 2022


  • भली खोड जिरली

    शाळेजवळच्या एका कोपर्‍यावर विक्रेत्यांची गर्दी असे. त्यात लहान मुलांना मधल्या सुटीत खाता येतील, अशा गोष्टी विकणारे बरेच असत. त्यात एकविक्रेता रोज चणे-फुटाणे व इतर काही पदार्थ घेऊन बसत असे. मधल्या सुटीत शाळेतील मुले आली की त्यांना तो पैसे घेऊन चणे-फुटाणे देत असे. मात्र हा विक्रेता लबाड होता. मुलांच्या निरागसतेचा फायदा घेऊन तो त्याच्याजवळच्या छोट्या मापाने चणे-फुटाणे देताना नेहमीच फसवणूक करीत असे. छोटे माप पूर्ण भरल्यासारखे तो दाखवायचा, मात्र देताना त्या मापातील बरेचसे चणे-फुटाणे आपल्या टोपलीत पुन्हा सांडायचा. त्यामुळे पैसे देऊनही कमीत कमी चणे-फुटाणे मुलांच्या वाट्याला यायचे. कोण्या मुलाने तक्रार केली की तो त्याला म्हणायचा,'अरे, तुझा हात लहान आहे. मग त्या हातात मावतील एवढेच चणे-फुटाणे घेतलेले बरे. नाही तर खाली रस्त्यावर सांडून ते वाया जाणार नाहीत का?'

    त्याच्या या युक्तिवादावर मुले फारशी बोलत नसत. छोट्या गोपाळला त्या विक्रेत्याची ही लबाडी लक्षात आली होती. त्याने एकदा त्याची खोड जिरवायची ठरविले. एक त्याने दहा-दहा पैशाची सुटी नाणी कोठून तरी गोळा केली व मधल्या सुटीत त्या विक्रेत्याकडे जाऊन दोन रुपयाचे चणे-
    फुटाणे मागितले. विक्रेत्याने नेहमीप्रमाणे त्याला कमीत कमी चणे-फुटाणे दिले. गोपाळने दोन रुपयाचे एवढेच चणे-फुटाणे कसे? असे विचारल्यावर त्याने नेहमीप्रमाणेच, ' तुझ्या छोट्या हातात जास्त मावणार नाहीत ', असे उत्तर दिले. त्यानंतर त्याला पैसे देताना गोपाळने दोन रुपयाऐवजी एका रुपयाचीच दहा पैशाची सर्व सुटी नाणी त्याच्या हातावर ठेवली. विक्रेता ते मोजेपर्यंत गोपाळ शाळेकडे निघाला होता.

    ती दहा पैशाची सुटी नाणी म्हणजे एकच रुपया आहे असे विक्रेत्याच्या लक्षात आल्यावर तो गोपाळकडे पाहून ओरडला, ' अरे तू मला पैसे कमी दिले आहेस. ' त्यावर गोपाळ ओरडूनच त्याला म्हणाला ' अरे, तुला पैसे मोजायला अधिक त्रास नको म्हणूनच तुला मी कमी पैसे दिले.

    गोपाळचे हे 'जशास तसे' उत्तर ऐकून विक्रेता गप्प बसला. त्याची खोड जिरली होती.

      July 23, 2016


  • धर्मात्म्याची ओळख

    संत एकनाथ महाराज हे खऱ्या अर्थाने धर्मात्मा होते. एकदा आषाढीच्या वारीसाठी पैठणहून दिंडी निघाली. त्या दिंडीत एकनाथ महाराज ही होते. वाटेत एका गावी दिडींचा रात्रीचा मुक्काम होता. त्या गावातील एका गावकर्‍याला संत एकनाथ महाराजांचे दर्शन घेण्याची फार इच्छा होती. मात्र दिंडीत एवढे असंख्य लोक होते, की आपल्याला त्यांचे दर्शन कसे मिळणार व आपण त्यांना ओळखणार कसे? हाच प्रश्र्न त्याच्यापुढे पडला. शेवटी त्याने एक युक्ती केली. गावात असेलल्या आंब्याच्या झाडाची दोन-तीन पाने तोडली व तो दिंडीच्या ठिकाणी गेला. तेथे लोकांची प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीत त्याने काही लोकांना ती आंब्याची पाने दाखविली व म्हणाला, '' पाहा, आमच्या गावातील चिंचेच्या झाडाची ही पाने किती मोठी आहेत.' ' त्यावर लोकांनी त्यालाही चिंचेची पाने नसून आंब्याची पाने आहेत असे सांगून त्याला वेड्यात काढले. मात्र तो गावकरी ज्याला त्याला ही चिंचेचीच पाने आहेत असे ठामपणे सांगू लागला. त्यामुळे त्याच्याभोवती प्रचंड गर्दी जमली व लोक त्याच्याशी हुज्जत घालू लागले. संत एकनाथ महाराजांनाही ही गोष्ट कळली व ते स्वतःच तेथे आले व त्या गावकर्‍याशी वाद घालणार्‍या लोकांना म्हणाले, ' 'ईश्वराने वृक्षवीची निर्मिती करताना काही त्यांना नावे दिली नव्हती. आपल्या सोयीसाठी आपण झाडांना तशी नावे दिली आहेत. त्याच्या गावात जर चिंचेला आंबा म्हणत असतील, तर म्हणून द्या. तुम्ही त्याच्याशी निरर्थक वाद घालून तुमचा वेळ निष्कारण वाया घालवू नका. तोच वेळ तुम्ही नामस्मरणात किंवा संतांचे चांगले विचार ऐकण्यात घालवा. '' त्या गावकर्‍याला त्याचक्षणी संत एकनाथ महाराजांची ओळख पटली व हाच खरा धर्मात्मा हे ओळखून त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घातले.

      March 4, 2017


  • गुरुदक्षिणा

    प्राचीन काळी ऋषिमुनी विद्यादानाचे काम करीत असत. त्यांचे आश्रम म्हणजे वेदाभ्यासाच्या शाळाच असत. अनेक शिष्य आश्रमात राहून विद्याभ्यास करीत होते. ऋषिमुनींनासुद्धा वेदविद्यापारंगत शिष्यांकडे पाहून कृतार्थ झाल्यासारखे वाटे. अध्ययन संपले की, काही ना काही गुरुदक्षिणा देण्याचा प्रघात होता. त्याशिवाय गुरुंचे ऋण फिटले असे समजत नसत.

      September 17, 2024


  • प्रेम काय काय करायला लावते

    प्रेमकथा

      June 3, 2017


  • ध्येयवादी कार्यकर्ती एमिली ग्रीन बालय

    शांती आणि सद्‌भावना जगात सर्वत्र नांदावी असे तिला लहानपणापासूनच वाटायचे कारण तिच्यावर तिच्या वडिलांचा फार प्रभाव होता आणि वडील होते याच तत्त्वांचे कट्टर पुरस्कर्ते. वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी तिने मोठेपणी समाजकार्य सुरू केले व १९४६ मध्ये शांतीसाठी तिला नोबेल पुरस्कारही मिळाला. नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या या महिलेचे नाव होते एमिली ग्रीन बालय.

    वायएमसीए के लीडर जॉन आरमांट यांच्याबरोबर तिला संयुक्तपणे हा पुरस्कार मिळाला. मात्र या पुरस्काराची रक्कम एमिलीने आपल्याच संस्थेला देऊन आपण खरीखुरी सामाजिक कार्यकर्ती असल्याचे साऱ्या जगाला दाखवून दिले. अमेरिकेतील जमैका येथे ८ जानेवारी १८६७ साली एमिलीचा जन्म झाला. तिचे वडील वकील होते व शांतता व सद्‌भावनेचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. त्यामुळे एमिलीला लहानपणापासून शांततेचे खास आकर्षण होते. खासगी शाळेत शिक्षण घेऊन एमिलीने समाजशास्त्र व अर्थशास्त्रात पदवी घेतली. पुढे अर्थशास्त्रात तिने संशोधनही केले. १८९१ मध्ये बोस्टन येथे 'चिल्ड्रन एड सोसायटी' ही संस्था स्थापन करून तिने समाजसेवेला प्रारंभ केला. कामगारांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठीही तिने आणखी दोन संस्था स्थापन केल्या. झोपडपट्टीत राहणाऱ्या तळागाळातील लोकांच्या समस्याही तिने समजून घेतल्या. अमेरिकेतील त्या वेळी अशा काही शिक्षण संस्था होत्या, की तेथे फक्त 'गोऱ्या' विद्यार्थ्यानाच प्रवेश मिळत असे. एमिलीने त्याविरुद्ध आवाज उठवून अशा शिक्षण संस्थांमध्ये 'काळ्या' विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यास भाग पाडले. प्रसिद्ध सामाजिक - कार्यकर्ती जेन एडन्स हिने स्थापन केलेल्या 'वुमेन्स इंटरनॅशनल लीग फॉर पीस अँड फ्रीडम' या संस्थेची ती महासचिव झाली व जेन एकच्या मृत्यूनंतर ती संस्थेची अध्यक्षा झाली. या संस्थेच्या शांतीच्या कार्याबद्दलच तिला शांततेचा नोबेल पुरस्कार मिलला. आपल्या आयुष्याच्या अखेरीस एमिलीला दय्याच्या विकाराने ग्रासले होते.

    त्यातच तिचा ७ जून १९६१ रोजी अंत झाला. अखेरच्या क्षणी तिच्या मुखातून दोनच शब्द बाहेर पडले ते होते 'विश्वशांती.'

      April 9, 2017


  • गुप्तहेर गोमु – भाग २ (गोमुच्या गोष्टी – भाग १४)

    रूम उघडून ती अचानक वळली आणि तिने गोमुचा हात धरला. “आंत या, ना !” असे म्हणत तिने गोमुला रूममध्ये ओढला. भांबावलेल्या गोमुने कांहीच विरोध केला नाही. “मी आवडले कां तुम्हांला ? कालपासून माझ्या मागे मागे आहांत. मी पाह्यलेय. मग आतां कां लाजतां ?” गोमुला कांहीच उत्तर सुचेना.

      March 26, 2022


  • इंग्लिश स्कूलचं फॅड

    प्राथमिक शिक्षणाची परवड

      June 25, 2017


  • मनाच्या शांतीसाठी लेखन करणारी ग्रोजिया डेलेडा

    तिचे वडील इटालीतील एका छोट्या गावाचे महापौर होते. त्यामुळे गावातील अनेक लोक आपल्या छोट्या-मोठ्या समस्या घेऊन त्यांच्याकडे यायचे. या समस्यांमधून तिच्या बालमनाला लोकांच्या व्यथा कळायच्या व या व्यथा ऐकून तिचे बालमन कळवळायचे. याच व्यथा तिने शब्दबद्ध करायचे ठरविले व आपल्या साहित्य कृतीमधून त्या सादर केल्या. जीवनाचा वेध घेणाऱ्या या साहित्यकृती एवढ्या जबरदस्त होत्या की, मोठेपणी त्या मुलीला साहित्याचा नोबल पुरस्कार मिळाला.

    ग्रोजिया डेलेडा (Grazia Deledda) हे तिचे नाव.१९२६ मध्ये साहित्यविषयक नोबल मिळविणारी ग्रेजिया ही दुसरी महिला होती. ग्रेजियाला लहानपणापासूनच लेखनाचे अतिशय वेड होते. शाळेतील मासिकांमधून तिचे विविध विषयावरचे लेख प्रसिद्ध झाले होते. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ट्रिब्यून या मान्यताप्राप्त पत्रिकेत तिचा लेख प्रसिद्ध झाला व तिला त्याचे त्यावेळी चक्क ५० लीरा एवढे मानधन मिळाले. त्यामुळे लेखनातील तिचा उत्साह वाढला व ती लिहितच गेली. ती राहत असलेल्या सार्डिनिया या इटलीतील प्रांतातील लोकजीवनाचा अभ्यास करून तिने वयाच्या १७ व्या वर्षी 'फ्लॉवर ऑफ सार्डिनिया' हे पुस्तक लिहिले व लेखिका म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिने लिहिलेली 'ऑनेस्ट सोल' ही कादंबरी अतिशय गाजली. अल्पावधितच तिच्या लाखो प्रती खपल्या व ग्रेजिया एक लोकप्रिय लेखिका म्हणून ओळखली जाऊ लागली. १८९१ ते १९३१ या काळात ग्रेजियाची ४४ पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यामध्ये आफ्टर द डायव्होर्स, 'द मदर', 'रीड्स इन द विन्ड', 'अॅशेस!, 'ट्रु मिरॅकल्स' आदी प्रमुख कादंबऱ्यांचा समावेश होता. अॅशेस कादंबरीवर निघालेला त्याच नावाचा चित्रपटही खूप गाजला होता. रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की तसेच दोस्तोवस्की यांच्या साहित्याचा ग्रेजियावर फार प्रभाव होता. मी इतर कोणासाठी नव्हे तर माझ्या मनाच्या शांतीसाठी लेखन करते असे ती नेहमी सांगायची. १९२६ मध्ये साहित्याचे नोबल पुरस्कार मिळाल्यानंतर दहा वर्षांनी ( १६ ऑगस्ट १९३६) तिचे निधन झाले.

      April 10, 2017


  • रेव्हनची गोष्ट

    सुरुवातीच्या काळात रात्रीच्या वेळी सूर्य, चंद्र आणि तारे नव्हते. रेव्हन हा सर्वशक्तिमान होता. त्याने सगळ्या प्राण्यांना, माशांना आणि माणसांना निर्माण केले होते. तरी ते सगळे प्राणी अंधारातच राहत होते. कारण त्याने अजून सूर्य तयार केला नव्हता.

      December 25, 2024