(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माणुसकीचा झरा

    मला 24 नोव्हेंबर, 1990ची ती उत्तररात्र आजही आठवतेय. रात्रीचा सव्वादोन-अडीचचा सुमार असेल. माझ्या पत्नीला दुसऱयांदा दिवस गेले होते. प्रसृतीची तारीख 30 नोव्हेंबर होती. एक पाच वर्षांचा मुलगा आधी होता. आता तो 21 वर्षांचा आहे.
    माझ्या पत्नीला सहा दिवस अगोदरच प्रसृतीवेदना होत होत्या. मी माझ्या आईला व पत्नीला तयार राहण्यास सांगितले. एखाद्या वाहनाची व्यवस्था होते काय, हे बघण्यास घराबाहेर पडलो. तेव्हा आम्ही मुलुंड (पू.) मध्ये रहायचो. आम्ही नाव नोंदविलेले प्रसृतीगृह मुलुंड (प.) ला होते. मला रस्त्यावर एकही रिक्षा-टॅक्सी मिळाली नाही. शेवटी आसपासच्या दोन-तीन रिक्षावाल्यांच्या घरी गेलो; पण त्यातील दोघे जण गावाला गेले होते. तिसरा म्हणाला, की त्याची रिक्षा नादुरुस्त आहे. मला खूपच दडपण आले. शेवटी मी पूर्व महामार्गावर उभा राहिलो. दिसेल त्या वाहनाला थांबण्याची विनंती करीत होतो; पण कोणीही आपले वाहन थांबविण्यास तयार नव्हता. त्यात त्यांची तरी काय चूक होती म्हणा! त्या उत्तररात्री वाहन थांबविण्याचा धोका कोण पत्करेल? इकडे माझ्या पत्नीचा व आईचा काळजीयुक्त, वेदनायुक्त चेहरा दिसत होता. इतक्यात मुलुंड चेक नाक्यावरून एक मारुती मोटर आली. मी तिला हात केला. आश्चर्य म्हणजे ती थांबली. मी त्यांना माझी असहाय्य व अगतिक परिस्थिती विशद केली. ते गाडी घेऊन माझ्या घरी आले.

    घरी आई व पत्नी डोळ्यांत प्राण आणून माझीच वाट पाहात होत्या. मी त्यांच्यासह गाडीने प्रसृतीगृह गाठले. तिथले प्रवेशाचे सोपस्कार पार पडले. खाली येऊन गाडीवाल्याचे आभार मानले व किती पैसे द्यायचे अशी विचारणा केली; पण तो भला मनुष्य होता. तो म्हणाला, ``मी माझ्या बहिणीला दवाखान्यात दाखल केलं असं समजतो. तेव्हा त्याचे कसले पैसे? उलट काही गरज भासली, तर मला

    केव्हाही हाक मारा.'' माझ्या स्वतवर विश्वासच

    बसला नाही. सध्याच्या काळात माणुसकीचा गहिवर असणारी अशीही माणसे असतात. बोलण्याच्या ओघात त्याने मला सांगितले, की त्याचे नाव शेट्टी असून, चेकनाक्यावर त्याचे हॉटेल आहे. ते बंद करून घरी जात असताना माझी भेट झाली. तो म्हणाला, ``करायचं असेल तर एकच करा. जेव्हा तुमची पत्नी बाळंत होईल, तेव्हा मला हॉटेलमध्ये येऊन पेढे द्या.'' दुसर्‍याच दिवशी, म्हणजे 25 नोव्हेंबर 1990 ला मला सकाळी आठ वाजता कन्यारत्न झाले. मी लगेच त्याला मिठाई नेऊन दिली.

    मनात विचार केला, की तो जर देवरूपाने मला भेटला नसता, तर आमची काय अवस्था झाली असती? तेव्हाच मी ठरविले, की आपल्याला संधी मिळाली तर आपणही दुसऱयांच्या अडचणीच्या वेळी, संकटाच्या वेळी निरपेक्षपणे मदत करून सात्विक समाधान प्राप्त करून घ्यायचे.

    -- किशोर कुलकर्णी

      May 19, 2006


  • ओळख नर्मदेची – भाग आठवा

    अमरकंटकच्या आधी “घुघवा“ गांव लागते तिथे थांबुन “जिवाश्म राष्ट्रीय उद्यान“ बघितला. इथे भुगर्भ विभागातर्फे भुखननानंतर आढळलेले दगड, त्यावर दिसणारी पुरातन काळातील चिन्ह, कोरीव भाग, खुणा इ. स्पष्ट दिसतात. अशा गोष्टी पुरातत्व विभागातर्फे संग्रहित करुन ठेवल्या आहेत. वेगवेगळ्या पध्दतींनी अशा गोष्टींच्या आयुष्याचा अंदाज बांधता येतो.

      October 13, 2020


  • गावाकडची गोष्ट – हिरा मावशी

    मी शाळेत शिकायला असताना अनेक गोष्टी मी पाहिल्या आहेत. खरंतर मराठी शाळेमध्ये शिकायला मला फार आनंद वाटत असे. वर्गामध्ये भिताडवर रंगीबिरंगी लावलेले सुरेख अक्षरातील तकते वेगवेगळी काढलेली सुरेख चित्रे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सुरेख देखावा पुन्हा पुन्हा पहावा व या चित्रावर ती काहीतरी लिहावे असे माझ्या मनाला नेहमी वाटत होते. त्यातील काही म्हणी अजून आठवतात खत देऊन जाते,गोत देऊन जाते, हातच्या काकणाला आरसा कशाला, अशा अनेक म्हणी प्रत्येक वर्गाच्या भिताडावर सुरेख अक्षरांमध्ये लिहिलेल्या दिसत होत्या. वर्गातील शिक्षक मुले व मुली शिस्तीचे पालन करीत होते खाकी हाफ शर्ट पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट व डोकीला पांढरीशुभ्र टोपी. काखेत अडकवलेलं शाळेचे दप्तर घेऊन मी शेतातून चिखल तुडवित शाळेला रोज जात असे. मराठी शाळा म्हणजे एक ज्ञान मंदिर याच ज्ञान मंदिरात ज्ञानाची पूजा केली जात होती. पूर्वीचे मास्तर विद्यार्थ्याला कळेपर्यंत शिकवत होते एखाद्यावेळी प्रश्नाचे उत्तर नाही आले तर छडीने मारत होते.

      September 28, 2022


  • न्यायदान (3) / वकील

    न्यायालयात गेल्या वर – न्याय मिळो न मिळो खिसा मात्र रिकामा होतो

      July 7, 2010


  • रुद्रा – कादंबरी – भाग १७

    मनोहरच्या घरात राघवला काहीच क्लू लागला नव्हता. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच्या सोबत त्याचा मोबाईलही चाकाखाली चिरडला गेला होता. त्या मोबाईलच्या कॉल हिस्ट्रीत खुन्याच्या पाऊल खुणा असण्याची शक्यता होती. खरेतर खून झाल्या दिवशी राघव ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी आजही होता. प्रगती म्हणावी तर शून्य!

      April 2, 2019


  • भारतमातेच्या वीरांगना – ५६ – नेली सेनगुप्ता

    १९३३ सालच्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अधक्ष्या होत्या. ब्रिटिश त्यावेळी एकही अधिवेशन पूर्णत्वास जाऊ नये असे बघत असे, जे अध्यक्ष नियुक्त होतील त्यांना अटक करणे, जी जागा निश्चित होईल तिथे निर्बंध लावणे, त्यातच श्रीमती नेली ह्यांच्याकडे कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षता आली कारण पूर्व नियोजित अध्यक्ष श्री मदन मोहन मालवीय ह्यांना अटक करण्यात आली. श्रीमती नेलीं च्या अध्यक्षीय भाषणा नंतर त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. ह्या अटक सत्राला त्या घाबरल्या नाहीत तर प्रत्येकवेळी तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी आपले सामाजिक जीवन तसेच चालू ठेवले.

      August 18, 2022


  • पोस्टमन

    एका पोस्टमनने एका घराचे दार ठोठावले आणि हाक दिली, "पत्र घ्या."

    आतून एका लहान मुलीचा आवाज आला, 'येते येते.'

    पण तीन -चार मिनीटे झाली तरी आतून कुणीही आले नाही.

    त्यामुळे पुन्हा एकदा पोस्टमनने आवाज दिला, 'अरे दादा,घरात कुणी असेल तर येऊन चिठ्ठी घ्या.'

    पुन्हा एकदा त्याच लहान मुलीचा आवाज आला. 'पोस्टमन काका, दरवाज्या खालून चिठ्ठी आत टाका, मी येतेच आहे.'

    पोस्टमनने रागातच चिडून म्हटले, 'नाही.मी इथे उभा आहे. पत्र रजिस्टर आहे. पावतीवर तुम्हाला सही करायची आहे.'

    जवळ जवळ सहा- सात मिनीटांनंतर दरवाजा उघडला.

    पोस्टमनला आतापर्यंत उशीर झाल्यामुळे बराच राग आला होता आणि कधी एकदा दरवाजा उघडतो आणि आपण त्या मुलीला ओरडतो असे त्याला झाले होते.पण दरवाजा उघडताच तो आश्चर्यचकित झाला. कारण त्याच्या समोर एक लहान मुलगी उभी होती, पण तिला दोन्ही पाय नव्हते. ती कुबड्यां च्या आधारे उभी होती.

    पोस्टमन गुपचुप पत्र देऊन व तिची सही घेऊन निघून गेले.

    आठवडा -दोन आठवड्यांनी जेव्हा कधी त्या मुलीला पत्र येत असे, पोस्टमन एक आवाज देऊन ती मुलगी येईपर्यंत दरवाजा बाहेर तिची वाट पाहत असे.

    एक दिवस जेव्हा त्या मुलीने पाहीले की, पोस्टमन काका चप्पल न घालताच सगळ्यांची पत्रे वाटतात, तेव्हा तिला फार वाईट वाटले. दिवाळी जवळ आली होती. त्यामुळे पोस्टमनकाकांना दिवाळीची भेट काय द्यायची याचा विचार ती मुलगी बऱ्याच दिवसा पासून करत होती.

    एके दिवशी तिने काकांकडून चिठ्ठी घेतली. ते जाताच त्या मातीवरील त्यांच्या पायांचे ठसे एका कागदावर पेनाच्या साहाय्याने काढून घेतले. दुसऱ्या दिवशी तिच्याकडे काम करणाऱ्या बाईने बाजारातून तिला त्या मापाच्या चपला आणून दिल्या.

    दिवाळी आली आणि पोस्टमन काका गल्लीतील सगळ्यांकडून दिवाळीचे बक्षीस मागत होते. त्यांनी विचार केला की, या लहान मुलीकडून आपण काहीही घ्यायचे नाही, पण तिला भेटून दिवाळीच्या शुभेच्छा नक्की देऊन जाऊ या !

    त्यांनी त्या मुलीचा दरवाजा ठोठावला, आतून आवाज आला, 'कोण आहे..?'

    'पोस्टमन' उत्तर मिळाले.

    लगेचच ती मुलगी हातात एक गिफ्ट पँक घेऊन आली आणि तिने पोस्टमन काकांना ते दिले व म्हटले, ' काका दिवाळीच्या शुभेच्छा ! आणि हो हे पाकीट घरी जाऊन उघडायचे.

    'घरी जाऊन जेव्हा त्यांनी ते पाकीट उघडले, तेव्हा ते फार भावुक झाले. कारण त्यात त्यांच्या करीता एक जोडी चपला होत्या. ते पाहून त्यांचे डोळे भरून आले.

    पुढच्या दिवशी पोस्टमन ऑफिसमध्ये जाताच त्यांनी पोस्ट मास्तरांना सांगीतले की, मला बदली हवी आहे.

    पोस्ट मास्तरांनी कारण विचारले असता त्यांनी भरल्या डोळ्यांनी सर्व सांगीतले. 'आजनंतर मी परत कधी त्या गल्लीत जाणार नाही. कारण त्या मुलीने स्वतःला पाय नसूनही माझ्या पायांची गरज ओळखली, तिने मला चपला दिल्या, पण मी तिला कधीही तिचे पाय परत मिळवून देऊ शकत नाही.

    'संवेदनशीलता' ही जीवनात खूप महत्वाची आहे. कारण दुसऱ्यांचे दुःख समजणे खूप गरजेचे आहे. अनुभव करणे आणि त्याच्या दुःखात सहभागी होणे खूप गरजेचे आहे.

    हा एक असा मानवी गुण आहे, ज्याच्याशिवाय माणूस अपूर्ण आहे.

    (व्हॉटसऍपवरुन व्हायरल झालेली ही गोष्ट)

      May 9, 2016


  • लगन गंधार !

    पुण्याहून येताना त्यादिवशी असंच वातावरण होतं. किंबहुना जास्तच . पुढचं काही दिसत नव्हतं . अशा परिस्थितीत गाडी थांबवण्याशिवाय पर्याय नव्हता . त्या अंधुक गूढ वातावरणात लगन गंधारचा बोर्ड दिसला आणि गाडी थांबवली . पळतच हॉटेलात घुसलो . त्या गारठ्यात गरम चहाची तल्लफ आली होती . पण ऑर्डरचे शब्द तोंडात येण्यापूर्वी कानात कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनाचे स्वर घुमू लागले .

      September 26, 2019


  • शरयू नदीच्या भावना….

    अयोध्येत आपल्या श्रध्दास्थानाचं , श्रीराम मंदिराचं निर्माणकार्य लवकरच सुरू होईल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलाच आहे, पण ज्या शरयू नदीच्या तीरावर हे मंदिर होणार आहे, तिच्या भावना आपल्याला माहिती आहेत का ? तिनं किती , काय सोसलय , काय काय पाहिलंय , महित्येय का ?

      December 30, 2019


  • माणुसकी जपणाऱ्या एका गुरूची पुनर्भेट

    दादरच्या बालमोहन विद्यामंदिरचा मी बालवर्गापासूनचा विद्यार्थी. शाळेचा प्रचंड आभिमान बाळगणारा. 1971 मध्ये (म्हणजे सहावी इयत्ता पास झाल्यावर) दादर सारखं मध्यवर्ती ठिकाण सोडून ठाण्याला राहायला आल्यावर सर्वप्रथम वडिलांनी माझ्या शाळा प्रवेशाचं काम पूर्ण केलं, आणि ठाण्याच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये मला प्रवेश मिळाला.

      December 18, 2021