नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
तीन बैलजोड्या होत्या त्यातील एक एक जोडी कमी होत गेली. शेवटी शेवटी तर एकच बैल उरला होता. एक बैल काहीच कामाचा नसल्याने त्याला विकण्या शिवाय पर्याय नव्हता असे असूनही त्याला विकायची ईच्छा होत नव्हती. एकाच बैलाला काही वर्षे संभाळल्यावर बाबांच्या एका मित्राने त्याला विकत नेण्याची तयारी दर्शवली.
July 29, 2021
वाणी तिच्याकडे नखशिखांत पहातो. ती बाई तशी फाटकीच दिसत असते. हिचा नवरा लवकर बरा नाही झाला किंवा आजारपणातच दगावला तर माझे पैसे परत मिळण्याची काहीच शक्यता नाही असा विचार करुन तो त्या बाईला फटकारतो. “माझ्या दुकानाच्या बाहेर हो. तुला मी काही देणार नाही. तू माझे पैसे परत करु शकशील असे मला वाटत नाही.”
June 24, 2024
शेवान - एक प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द.....
आज बागेत जात असतांना सहज कापणी झालेल्या भाताच्या शेतात लक्ष गेलं, गाडी तिथेच थांबऊन गेलो तिथे, भाताचे 4. 5 आवे वाफ्याच्या मधोमध ऊभे करून एकत्र बांधलेले.....म्हणजेच शेवान..... कापणी संपल्याची निशाणी.... कापणी संपताना किड मुंग्यांची, पाखरांची काळजी करणारा माझा गरीब शेतकरी...
मला अजूनही आठवतय, आजोबा भात शेती करायचे... 7. 8 गडी माणसे असायची कापणीला....
पण गावातील काही बलुतेदार लोकं ...... नाव नाही घेत..... यायची अगदी कापणीचा शेवटचा दिवस कधी आहे त्याची चौकशी करून.... आणि हक्काने एक एक कवळी कापलेले भात ... आजोबा त्यांना द्यायचे... त्यांचा हक्क म्हणून.... आता देणारे पण नाहीत.... अन् घेणारे पण नाहीत....
मी तेव्हा विचारलेले... आजोबा का देताय यांना हे धान्य ते पण न मळता?
आजही आठवतय त्यांच उत्तर..
बाऴा आपण जरी पिकवलं तरी सगळ्यांचा वाटा काढायचा... भात त्याला दिलं तरी त्याची गाय उपाशी राहील म्हणून गवतासकट.... कवळी..... देतो...
तेव्हा प्रत्तेकाची काळजी होती ... पिकवणार्याला.... अगदी किडमुंगी
पशुपक्षी सगळ्यांची काळजी होती त्यांना...
आणि त्यांच्यासाठी चार आवे शिल्लक ठेवतो... तेकाच शेवान म्हणतात
बापूर्झा
डॉ बापू भोगटे
9422632456
March 13, 2017
मी रस्त्याच्या कडेला एका दगडावर बसून होतो. एक एक क्षण मला युगासारखा वाटत होता. असं वाटायचं, घड्याळ बंद पडलं की काय. रात्र आहे तिथंच थांबून आहे. मी उठून बॅटरीच्या प्रकाशात प्रेत पहात होतो.
January 14, 2025
असं काय माहित ऐन टाईमला मला टाय बांधता येणार नाही अन् तसं माहित असतं तर तो मी बस्त्यात घेतलाच नसता. मी सुटा बुटातले कपडे नेसून बराच वेळ झाला तयार होतो पण ती गळ्यातली लांब दोरी कधी आयुष्यात बांधण्याचा प्रसंग आलाच नव्हता म्हणून बराच सावळा गोंधळ उडाला!
January 21, 2024
लेखाचे शीर्षक विचित्र वाटेल पण, एडी चापमन विषयी जाणून घेण्याआधी आपण डबल एजंट म्हणजे काय हे जाणून घेऊ. डबल एजंट म्हणजे एका देशाच्या गुप्तहेर एजन्सीचा गुप्तहेर शत्रुराष्ट्राकडे पाठवला जातो. तो शत्रूराष्ट्राला भासवतो कि तो त्यांच्यासाठी काम करतो. पण तो प्रत्यक्षात आपल्या देशासाठी काम करतो व शत्रूराष्ट्राला याचा सुगावा लागू देत नाही. हे काम अत्यंत जोखमीचे असते. कारण शत्रूराष्ट्राला सुगावा लागला कि त्याचे मरण ठरलेले.
October 18, 2021
आधुनिक जपानी संस्कृतीवर निश्चितच ‘हिरोशिमा-नागासाकी’चा परिणाम झाला असणारच, आणि तो काव्यात उमटलेला असणारच. त्यामुळे, हल्लीच्या जपानी काव्यात मृत्यूचा उल्लेख येणें अटळ आहे. जपानीत मृत्यूकाव्याला ‘जिसेई’ ( Jisei ) म्हणतात, व अशा काव्याच्या बर्याच anthologies जपानीत आहेत.
July 24, 2017
आपल्या जगण्यात खरी चव निर्माण झाली पाहिजे. थोडक्यात काय नाना मनसोक्त जगता आलं पाहिजे. अर्धं आयुष्य प्रपंच उभा करण्यात घालवलं. अरे इतके जवळचे आपण मित्र; पण सहज म्हणून कधी भेटू शकलो नाही.
April 8, 2023
ल्युसर्नला लायन मॉन्युमेंट पाह्यला आणि त्याच भागात बुखरर आणि कासाग्रँडे या भव्य दालनांमधे मनमुराद (विंडो) शॉपिंग केले. काहींनी स्विसमेक घड्याळ आणि देण्याघेण्यातली सॉव्हेनीर्सही घेतली. या नंतर ल्युसर्नची बोट राईड, वाईन, स्विस फोक म्युझिक आणि डिनर असा दीड तासाचा मौज मस्तीचा कार्यक्रम पार पडला. धमाल आली. #वीणा वल्ड# च संघटन कौशल्य या कार्यक्रमात दिसुन आल. सर्व अबालवृध्द मनमोकळेपणे नाचले, बागडले.
October 16, 2019
नागपुरात आमच्या घरीही बाबांना भेटायला खूप लोक येत असत. बहुतेक माणसे साधीसुधीच असायची. बरेचदा नावाजलेली माणसेही यायची. बाबांच्या खोलीत मग गप्पांची, हास्यविनोदाची सत्रं चालायची. चहाच्या खेपा व्हायच्या आणि आई थकून जायची. विशेषतः हिवाळी अधिवेशनाच्या काळात अनेक मंत्रीमंत्री आणि आमदारही बाबांना खास भेटायला येत असत. उल्हास पवार, सुशीलकुमार शिंदे तर नेहमीचेच.
June 30, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti