शेवान – प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द

शेवान - एक प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द.....

आज बागेत जात असतांना सहज कापणी झालेल्या भाताच्या शेतात लक्ष गेलं, गाडी तिथेच थांबऊन गेलो तिथे, भाताचे 4. 5 आवे वाफ्याच्या मधोमध ऊभे करून एकत्र बांधलेले.....म्हणजेच शेवान..... कापणी संपल्याची निशाणी.... कापणी संपताना किड मुंग्यांची, पाखरांची काळजी करणारा माझा गरीब शेतकरी...

मला अजूनही आठवतय, आजोबा भात शेती करायचे... 7. 8 गडी माणसे असायची कापणीला....
पण गावातील काही बलुतेदार लोकं ...... नाव नाही घेत..... यायची अगदी कापणीचा शेवटचा दिवस कधी आहे त्याची चौकशी करून.... आणि हक्काने एक एक कवळी कापलेले भात ... आजोबा त्यांना द्यायचे... त्यांचा हक्क म्हणून.... आता देणारे पण नाहीत.... अन् घेणारे पण नाहीत....

मी तेव्हा विचारलेले... आजोबा का देताय यांना हे धान्य ते पण न मळता?

आजही आठवतय त्यांच उत्तर..

बाऴा आपण जरी पिकवलं तरी सगळ्यांचा वाटा काढायचा... भात त्याला दिलं तरी त्याची गाय उपाशी राहील म्हणून गवतासकट.... कवळी..... देतो...

तेव्हा प्रत्तेकाची काळजी होती ... पिकवणार्याला.... अगदी किडमुंगी

पशुपक्षी सगळ्यांची काळजी होती त्यांना...

आणि त्यांच्यासाठी चार आवे शिल्लक ठेवतो... तेकाच शेवान म्हणतात

बापूर्झा

डॉ बापू भोगटे
9422632456



शेवान – एक प्रचंड ताकद असलेला मालवणी शब्द…..

आज बागेत जात असतांना सहज कापणी झालेल्या भाताच्या शेतात लक्ष गेलं, गाडी तिथेच थांबऊन गेलो तिथे, भाताचे 4. 5 आवे वाफ्याच्या मधोमध ऊभे करून एकत्र बांधलेले…..म्हणजेच शेवान….. कापणी संपल्याची निशाणी…. कापणी संपताना किड मुंग्यांची, पाखरांची काळजी करणारा माझा गरीब शेतकरी…

मला अजूनही आठवतय, आजोबा भात शेती करायचे… 7. 8 गडी माणसे असायची कापणीला….
पण गावातील काही बलुतेदार लोकं …… नाव नाही घेत….. यायची अगदी कापणीचा शेवटचा दिवस कधी आहे त्याची चौकशी करून…. आणि हक्काने एक एक कवळी कापलेले भात … आजोबा त्यांना द्यायचे… त्यांचा हक्क म्हणून…. आता देणारे पण नाहीत…. अन् घेणारे पण नाहीत….

मी तेव्हा विचारलेले… आजोबा का देताय यांना हे धान्य ते पण न मळता?

आजही आठवतय त्यांच उत्तर..

बाऴा आपण जरी पिकवलं तरी सगळ्यांचा वाटा काढायचा… भात त्याला दिलं तरी त्याची गाय उपाशी राहील म्हणून गवतासकट…. कवळी….. देतो…

तेव्हा प्रत्तेकाची काळजी होती … पिकवणार्याला…. अगदी किडमुंगी

पशुपक्षी सगळ्यांची काळजी होती त्यांना…

आणि त्यांच्यासाठी चार आवे शिल्लक ठेवतो… तेकाच शेवान म्हणतात

बापूर्झा

डॉ बापू भोगटे
9422632456

Author