(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ८ वी ड – भाग २

    कालपरवाची गोष्ट आहे. रंगपंचमीच्या आदल्या दिवसाची ८ वी मधला मुलाला सांगितले, “अरे रंगीत पाण्याचे फुगे फोडू नको, पोलीस पकडतात.” तेव्हा तो म्हणाला काही पकडत नाहीत, अमुकतमुक आरोपी राजकीय नेता आहे त्याला उमारकैद झाली आहे तरी तो बाहेर आहे, काही होत नाही.

      April 3, 2021


  • मेडल सर

    १९५५-६० साली शाळेतल्या शिक्षकांच्या सांगण्यावरून त्यांनी क्रीडास्पर्धेत भाग घेतला .. तेव्हापासून आवड निर्माण झाली आणि त्यांचा अॅथ्लेटिक्सच्या क्षेत्रात प्रवेश झाला

      February 4, 2026


  • मी आणि माझे शब्दालय

    माणसाच्या घरात किती फर्निचर आहे , किती भारी सजावट आहे हे नेहमी बघितले जाते. माझे घर ज्यामध्ये मी राहतो तेथील सर्वात आवडती जागा कोणती असा प्रश्न कोणी मला विचारला तर माझे उत्तर माझे पुस्तकाचे कपाट म्हणण्यापेक्षा माझे ‘ शब्दालय ‘ असे उत्तर मिळेल.

      June 15, 2020


  • स्वर-मंच’ची जडणघडण

    या नंतरचा काही काळ मात्र मी स्वर-मंच म्युझिक अॅकॅडमीच्या जडणघडणीसाठी दिला. सुगम संगीताचे सर्व प्रकार मी शिकवत होतो. पण रागदारी संगीत, हार्मोनियम, तबला, गिटार अशी अनेक वाद्ये शिकण्यासाठी लोक चौकशी करायला लागले. माझ्या काही निपुण विद्यार्थ्यांनाच मी शिक्षक बनवले. अल्पावधीतच श्रीरंग टेंबे, सागर टेमघरे, प्रज्ञा टेंबे, मनिषा शहा, मनोज कांबळे, समीर टेमघरे, अमेय ठाकूरदेसाई, कुलकर्णी असे अनेक शिक्षक हे सर्व प्रकार शिकवायला लागले.

      July 23, 2022


  • मला देव दिसला – भाग १०

    मी याचे नामकरण केले नाही व करू इच्छीत नाही. कारण तो अभिमानाला, वासनेला जागे करील. पुन्हा विचारचक्र सुरू होतील. मला एका सत्यमय वातावरणामधून संसारीक अर्थात मिथ्या जगांत नेईल. हे होणारच कारण मला माझ्या अल्प क्षमतेचे व अल्प अशा वर्तमान काळाची जाणीव आहे. ईश्वर जो जसा असेल, त्याला जाणण्यासाठी मानवी इंद्रिये परीपूर्ण नाहीत. त्यांच्या मर्यादा, झेप,क्षमता ह्या अत्यंत अल्प आहेत. त्यामध्ये तो दिव्यपणा प्राप्त नाही की ज्यामुळे त्या परमात्म्याची, त्याच्या भव्यतेची जाणीव होवू शकेल. जर तो सर्व चराचरामध्ये जीव जंतूमध्ये मानवी देहामध्येही अंश रूपाने असेल तर त्याला आपल्याच अंत:करणात शोधणे वा समजणे योग्य होईल. हा प्रयत्न दिशाहीन खचितच नसेल. ह्याचसाठी “मी कोण आहे?” ह्याचे ज्ञान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या मी च्या शोधासाठी अंतरंगात शिरणे हे प्रथम व महत्वाचे पंचेद्रिय हे कोणत्याही गोष्टीबद्दल ज्ञान मिळवतात म्हणजे त्यातील गुणाविषयी समरस होतात, त्याचे रंग, रूप, स्पर्श, रस, गंध इत्यादी समजतात. मग ते भव्य दिव्य असोत वा सूक्ष्म स्थितीमध्ये असोत वस्तूची वा त्या दिव्यतेची जाण येणे हे शेवटी आपल्यावर कसा परिणाम करते ह्यावरच मुख्यता अवलंबून असेल.

    ईश्वर भेटला, दिसला वा जाणला गेला हे जर सत्य घडले तर तेव्हाच जेव्हा मनाच्या आनंदाची, शांततेची, समाधानाची अस्सीम बरसात तुमच्यावर होईल. ह्या संसारीक जगांत ज्या ज्या गोष्टीमुळे तुम्हास प्रसन्नता वाटते त्या त्या गोष्टीमध्ये ईश्वराचे अस्तित्व असतेच. त्या अस्तित्वाची जाणीव प्रखरतेने होते. म्हणजेच तुम्ही ईश्वराच्या सानिध्यात जात आहात असे होईल. तेच तुमचे लक्ष साध्य असावे.

    जे मिळाले त्याहून आणखी काही असेल का? हा प्रश्न तुमच्या मनी येत राहणे म्हणजेच अशांत, असमाधानी मनाला जागृत ठेवण्यासारखेच होईल. त्याला अंत असणार नाही. जर ईश्वर अनंत, अमर्याद असा असेल, तर तो मनाच्याही कल्पनेच्या बाहेर भव्यता पावलेला असेल. तुम्हास तुमच्या मनाच्या बुध्दीच्या विचाराने त्याला जाणणे शक्यच नाही. हा तुमच्या जाणीवेने त्याचे जे अवलोकन झाले असेल, ज्या नितांत अशा आनंदाचा (Extary of joy) अनुभव आला असेल, तोच समजा. सभोवतालच्या आणि संसारीक जीवनामधल्या सुखमय गोष्टींनी तुम्हास आनंद मिळाला असेल. तुम्ही समाधानी झाला असेल. ह्यापेक्षा जर जास्त आनंद तुम्हास त्या ईश्वरी जाणीवांमुळे झाला असेल तर तेच तुमचे ईश्वरी दर्शन समजा. वाचलेल्या, ऐकलेल्या आणि इतरांच्या त्यांच्या स्वत: अनुभवलेल्या ईश्वरी सगुण दर्शनाची कल्पना वा इच्छा तुम्हास पूर्णपणे सोडून घ्यावी लागेल. कारण ते तसे दर्शन म्हणजे तुमचे इच्छीत, अपेक्षीत दर्शन असेल. कदाचित त्यांनी आनंद व समाधान मिळेलही परंतू त्यात मनाची शांतता नसेल. पुन्हा पुन्हा तेच दर्शन मिळेल ह्याची आस असेल. तेथेच साशंकता निर्माण होईल. आत्मीक समाधान टिकणारे नसेल.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 26, 2016


  • आपणच असतो विठ्ठल आणि आपणच रुक्मिणी…!

    सकाळ उजाडली. विठ्ठल अजून झोपलाच होता. एकादशी आळसाच्या पांघरुणात गुरफटली होती. बाहेर पाऊस पडत होता मस्तंपैकी... आणि तेवढ्यात ढोल ताशांचा आवाज कानावर पडला. विठ्ठल ताडकन उठला. आजी बसलेली बाजूला... 'ढोल ताशे का वाजताहेत?', त्याने आजीस विचारले. आजी म्हणाली, 'आज आषाढी एकादशी नाही का... सकाळी शाळेतल्या मुली नव्वारी नेसून नटून थटून गेल्या इथून... आणि आमचा विठ्ठल अजून अंथरुणातच...
    'गप गं... सुट्टी टाकलीये आज तर झोपू दे ना जरा... '
    'मी कुठे उठवलंय... तूच उठलास ताडकन...'
    शेवटी विठोबा उठलाच... अचानक एकादशी जागी झाली त्याच्यातली... उठून दात घासून साबुदाण्याची खिचडी खाल्ली... चहाबरोबर बिस्कीटाचा डबा उघडला आणि जणू काही झाकणाच्या आवाजाचीच वाट बघत असणारी आज्जी बाहेरुन ओरडली, 'उपास आहे आज... बिस्कीटं खाऊ नका आजच्या दिवस'... 'चालतं गं आजी... आपणच विठ्ठल असतो' ... 'विठूला बिस्कीटं आवडतात पण त्याच्या आज्जीला आवडत नाहीत म्हणून विठू आज बिस्कीटं खाणार नाही...', स्वत:पाशीच पण आजीला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात त्याने जाहीर केलं...
    चहा-खिचडी खाऊन गेला आंघोळीला... स्वत:शीच बोलत... 'चला आज जरा माझ्यावर रचलेले अभंग ऐकूया अंघोळ करता करता..'
    आंघोळ करुन आजीला म्हणाला, 'आज्जी विठू-रुकू'च्या देऊळात जाऊन येतो जरा...'
    'अरे पण तूच विठ्ठल आहेस असं म्हणालास नं मगाशी?? मग आरश्यासमोर जाऊन नमस्कार कर की...'
    'अगं आजी, एकाच वेळेस कमरेवर हात ठेवून नमस्कार नाही करता येत... आणि अजून रुकूपण नाहीये माझ्याकडे... म्हणून चाललोय देवळात... चल बाय.'विठोबाची होणारी रुक्मिणी बाहेर येऊन बुलेटवर त्याची वाट बघत उभी होती... हा गेला धावत आणि बसला मागे... रुक्मिणी निघाली...
    'कुठे जायचं गं?'
    'आधी पेट्रोल भरु. मग तिथून विठू-रुकूला भेटायला... मग नदीवर जाऊन येऊ एकदा'
    'भेटलो ना एकमेकांना आता... देवळात जाण्याची काय गरज?'
    'दोघं एकमेकांना भेटलोय. स्वत:ला भेटायला जायचंय देवळात...', ती उत्तरली...
    'बरं चल...'
    विठ्ठल कमरेवर हात ठेवून बुलेटवर रुक्मिणीच्या मागे बसला होता...
    आजच्या दिवस त्याने मोबाईल घेतला नव्हता... हात कमरेवर ठेवायचे होते आणि लेंग्याला खिसाही नव्हता नेमका...
    पेट्रोल भरुन दोघं देवळात गेले... शहरातल्या प्रसिद्धं विठ्ठल मंदिरांपैकी ते नव्हतं. त्यामुळे तिथे हे दोघंच होते...
    देवळात गेले... दोन काळ्या मूर्ती समोर कमरेवर हात ठेवून उभ्या होत्या... कुणीतरी सकाळी सकाळीच येऊन त्यांना स्वछं पाण्याने न्हाऊ घातलं होतं बहुदा... पाण्याचा दमटपणा मूर्तिंत जाणवत होता अजून... दोघेंही उभे राहीले स्वत:समोर... पण आता दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जोडून छातीशी ठेवले होते. कमरेवरचे हातवाले समोर उभे होते कारण... डोळे मिटले दोघांनी... काही क्षण शांत उभे होते चौघेही... देवळाबाहेर सुसाट वारा सुटला होता... आणि पावसाचा कोसळणारा आवाज येत होता... पण तरीही वातावरण शांतच होतं... काही वेळाने दोघे बाहेर आले... पुन्हा बसले बुलेटवर... दोघेही नि:शब्दं... ठरल्याप्रमाणे नदीवर गेले... कुणीच कुणाशी बोलत नव्हतं...
    शांतपणे बसले दोघं नदीकाठी...
    तेवढ्यात पाण्यातून अचानक बुडबुडे आले वर... दोघांचही लक्षं एकाच ठिकाणी गेलं... आणि समोरच्या काठावरुन किंकाळी ऐकू आली... दोघांनीही पाण्यात उडी घेतली...
    काहीवेळ सगळ्या चित्रात फक्तं निसर्गच दिसत होता... आणि काही क्षणांनंतर पलीकडच्या किनार्यावर विठ्ठलाच्या मांडीत एक अल्लड मुल बेशुद्धावस्थेत पडलं होतं आणि रुक्मिणीच्या मिठीत त्या मुलाची माय रडत होती... यमाने कडेवर घेण्याआधी विठूने त्याला कडेवर घेतलं होतं...
    मुल शुद्धीवर आलं... विठूने त्याला त्याच्या जीवाच्या आईकडे सोपवलं.... त्या मातेने विठू आणि रुकूकडे बघून हात जोडले... दोघंही कमरेवर हात ठेवून उभे होते...
    नदीवरुन घरी येण्यास निघाले... रुक्मिणीने विठोबाला घरी सोडलं... घरी आजीने दार उघडलं... 'काय मग? भेटले का विठ्ठल रुक्मिणी?'
    'आजी, आपणंच असतो गं विठ्ठल... आणि आपणंच रुक्मिणी... कारण ते एकरुप झालेत अगं... आई मुलात... नवरा बायकोत... तुझ्या माझ्यातही अगदी... संपूर्ण स्रुष्टीत...विठ्ठल रुक्मिणी...'"रुक्मिणीलाही रस्त्यात सगळ्या काळ्या मुर्त्याच दिसत होत्या घरी जाताना....!"
    -- श्रुती आगाशे.

      August 24, 2015


  • मी कात टाकली

    अनघा राग आणि अपमानाच्या ज्वालांनी भडकून उठली होती. रात्रीचा काळोख आणि निर्जन रस्त्यावर उंच उंच इमारतींसमोरुन तिला लवकरात लवकर चालत पुढे जायचे होते. “आता पुरे झाले आणि हे सर्व सहन करण्याच्या पलिकडे आहे. आज सर्वकाही मी स्वत: संपविते!” असे विचार विजेच्या वेगाने तिच्या मनात तरळत होते.

      May 22, 2023


  • शहाणं बाळ

    शहरीकरणानंतर घरातल्या दोघांनी काम करणं आवश्यक झालं, मग त्यातून शहरातल्या लहान जागेमुळे आजी आजोबा गावी आणि मुलं शहरात. कुटुंब लहान होत गेली, त्यातून मुलांवर संस्कार करणारी पिढीच नामशेष होऊ लागली. त्यामुळे मुलंही त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा अर्थ वेगळाच घेऊ लागली आणि नको त्या संगतीत रमू लागली तेव्हा कुठेतरी सहिष्णुतेचे गणित बिघडू लागलं आणि मग अरेरावी, मुर्दाडपणा, फक्त मी आणि मी ही भावना वाढू लागली.

      August 19, 2023


  • बंड्या आणि शिक्षणमंत्री

    “शाळेचा शोध कुणी लावला?” हा प्रश्न माझ्या सहावीत जाणार्‍या बंड्याला सिनीयर केजीत गेल्यापासून भेडसावतो आहे. खेळणी, कार्टुन आणि छोट्या भीमच्या जगात सुखी असता असता इवल्याशा लहान जीवाच्या मागे हा शाळा नावाचा प्रकार कशासाठी असतो हा त्याचा रास्त प्रश्न आहे.

      December 2, 2018


  • नितळ (कथा)

    एका “नितळ” मनानी दुसऱ्या अशाच एका “नितळ” मनाशी संवाद साधला .. त्याला अनुसरून केलेली ती तितकीच “नितळ” प्रतिक्षिप्त क्रिया .. समोरून दिलेला तितकाच “नितळ” प्रतिसाद .. इतकं साधं आणि सोपं आयुष्याचं गणित होतं ते !..

      February 5, 2026