नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
शाळेजवळच्या एका कोपर्यावर विक्रेत्यांची गर्दी असे. त्यात लहान मुलांना मधल्या सुटीत खाता येतील, अशा गोष्टी विकणारे बरेच असत. त्यात एकविक्रेता रोज चणे-फुटाणे व इतर काही पदार्थ घेऊन बसत असे. मधल्या सुटीत शाळेतील मुले आली की त्यांना तो पैसे घेऊन चणे-फुटाणे देत असे. मात्र हा विक्रेता लबाड होता. मुलांच्या निरागसतेचा फायदा घेऊन तो त्याच्याजवळच्या छोट्या मापाने चणे-फुटाणे देताना नेहमीच फसवणूक करीत असे. छोटे माप पूर्ण भरल्यासारखे तो दाखवायचा, मात्र देताना त्या मापातील बरेचसे चणे-फुटाणे आपल्या टोपलीत पुन्हा सांडायचा. त्यामुळे पैसे देऊनही कमीत कमी चणे-फुटाणे मुलांच्या वाट्याला यायचे. कोण्या मुलाने तक्रार केली की तो त्याला म्हणायचा,'अरे, तुझा हात लहान आहे. मग त्या हातात मावतील एवढेच चणे-फुटाणे घेतलेले बरे. नाही तर खाली रस्त्यावर सांडून ते वाया जाणार नाहीत का?'
त्याच्या या युक्तिवादावर मुले फारशी बोलत नसत. छोट्या गोपाळला त्या विक्रेत्याची ही लबाडी लक्षात आली होती. त्याने एकदा त्याची खोड जिरवायची ठरविले. एक त्याने दहा-दहा पैशाची सुटी नाणी कोठून तरी गोळा केली व मधल्या सुटीत त्या विक्रेत्याकडे जाऊन दोन रुपयाचे चणे-
फुटाणे मागितले. विक्रेत्याने नेहमीप्रमाणे त्याला कमीत कमी चणे-फुटाणे दिले. गोपाळने दोन रुपयाचे एवढेच चणे-फुटाणे कसे? असे विचारल्यावर त्याने नेहमीप्रमाणेच, ' तुझ्या छोट्या हातात जास्त मावणार नाहीत ', असे उत्तर दिले. त्यानंतर त्याला पैसे देताना गोपाळने दोन रुपयाऐवजी एका रुपयाचीच दहा पैशाची सर्व सुटी नाणी त्याच्या हातावर ठेवली. विक्रेता ते मोजेपर्यंत गोपाळ शाळेकडे निघाला होता.
ती दहा पैशाची सुटी नाणी म्हणजे एकच रुपया आहे असे विक्रेत्याच्या लक्षात आल्यावर तो गोपाळकडे पाहून ओरडला, ' अरे तू मला पैसे कमी दिले आहेस. ' त्यावर गोपाळ ओरडूनच त्याला म्हणाला ' अरे, तुला पैसे मोजायला अधिक त्रास नको म्हणूनच तुला मी कमी पैसे दिले.
गोपाळचे हे 'जशास तसे' उत्तर ऐकून विक्रेता गप्प बसला. त्याची खोड जिरली होती.
July 23, 2016
मुंबईतील रेल्वे मार्गावर अनेक छोटे मोठे पूल आहेत.
दहा फूट ते पंधरा फूट लांबीचे रूळ पुलावरून जातात.
लोकल भराभर एकामागे एक अशा येत असल्यामुळे कधी कधी दोन गाड्या बाजूबाजूच्या रूळावरून जात येत असतात.
भारतात वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळे गट घातपात करायचा प्रयत्न करतात.
कोणी धर्मावरून, कोणी सामाजिक क्रांती घडविण्यासाठी तर कोणी फक्त गोंधळ वाढवून सत्तारूढ सरकारला आव्हान म्हणूनही घातपात करण्याकडे वळतात.
सामान्य जनता म्हणते की ह्यांत बळी जातात सामान्यांचेच तर हे असं कां करतात ?
एकदा कां एक मार्ग स्वीकारला की अनेकांच्या अंगात तो अभिनिवेश भिनतो.
January 20, 2026
प्रेमाच्या दिनी
गुलाब भेट दिली.
प्रेमाची ‘राजधानी’
हृदयी धडधडली.??????
February 18, 2012
देशसेवेच व्रत सावरकरांनी वयाच्या १६व्या वर्षीच शपथेवर घेतले. त्यांची मीमांसा करताना ते सांगतात. ”चापेकरांचे कार्य पुढे कोणीतरी चालवायला हवे मग ते मी का चालवू नये? इतरानाही ते कार्य करावेसे वाटत असे पण काही कारणास्तव ते करू शकत नव्हते मग मीच ते का करू नये?” देशाचा झेंडा पुढे नेता यावा म्हणून क्रांतिकारकांच्या मार्गातील काटे साफ करायला कुणी तरी सेपार्स एंड मायानर्स हवे असतात ते कार्य आपलेच समजून आम्ही पुढे सरसावलो”
September 25, 2022

तोंगशे एकटेच ऑफीस मध्ये मौशूच्या जीवनात घडलेल्या प्रचंड उलथा पालथीच्या घटनांचा मेळ लावण्याचा प्रयत्न करत होते. तिच्या आयुष्याची झालेली राखरांगोळी पाहून त्यांचे मन हेलावून गेले होते.
January 10, 2022
काळ्या लक्ष्मीची आराधना करणारे हे राक्षसी उपासक आपल्या घरातील लक्ष्मी चोरतात व बाहेरची ड्रग व आतंकवाद रुपी पीडा घरात आणतात. काळ्या लक्ष्मीच्या बळावर रात्रीच्या अंधारात कृष्णकृत्य करून कधी- कधी सत्ता ही प्राप्त करतात.
June 8, 2011
रात्रीचे किती वाजलेत माहित नाही. पण सर्वत्र निजानीज झाली होती. रात्रीची भयाण शांतता आणि गारवा जाणवत होता. मी अंधारातच अंथरुणावर पडल्या पडल्या डोळे किलकिले करून पहिले आणि कोनोसा घेतला. मधेच जाग कशाने आली? लक्षात येत नव्हते. कसलीतरी खाडखूड ऐकू आली. बहुदा अशाच आवाजाने झोपमोड झाली असावी. पुन्हा तोच खड्खुडीचा आवाज.
December 2, 2018

‘पांडुरंग पांडुरंगऽ’ ध्वनि निनादला
नामपावसात मेळा चिंब जाहला ।।
‘पांडुरंग’, तुणतुणें भजनात गुणगुणे
‘पांडुरंग’, झांज आणिक टाळ खणखणे
‘पांडुरंग’-तालावरती वाजत चिपळ्या ।।
‘पांडुरंग पांडुरंगऽ’ गाइ एकतारी
‘पांडुरंग’, ढोलकीची कडकडे तयारी
‘पांडुरंग’, दुमदुमता-मृदंग बोलला ।।
‘पांडुरंग पांडुरंगऽ’, पाय थिरकती
टाळ्यांतुन शतहातांची वाढते गती
धुंदित भगवा पताका-संच डोलला ।।
‘पांडुरंग पांड़ुरंगऽ’, घोष भूवरी
‘पांडुरंग पांडुरंगऽ’, मेघ अंबरीं
‘पांडुरंगगान’ शिकवी वायु सृष्टिला ।।
‘पांडुरंग पांडुरंगऽ’ गर्जना मुखीं
‘पांडुरंग’-नादब्रह्म भक्तमस्तकीं
वारकरीवृंद वैकुंठास पोचला ।।
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
July 3, 2016

ब्रॅम स्टोकर ह्या लेखकाची ‘ड्रॅक्युला’ ही कादंबरी खूप गाजली. तीही त्याच्या मृत्यूनंतर. त्याच्या इतरही भूतांवरच्या कादंब-या आहेत. ड्रॅक्युला जेव्हां चित्रपट रूपात लोकांच्या समोर आली त्यानंतर जास्तच लोकप्रिय झाली. प्रस्तुत कथा त्याच्या पत्नीने त्याच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी प्रकाशित केली. ही कथा म्हणजे ड्रॅक्युला ह्या कादंबरीचं पहिलं प्रकरण आहे, असं अनेकांच म्हणणं आहे. ड्रॅक्युला जेव्हां प्रसिध्दीसाठी पाठवली तेव्हां पुस्तकाची लांबी कमी करण्यासाठी हे पहिलंच प्रकरण गाळण्याचे प्रकाशकांनी ठरवले व लेखकाने ते मान्य केले. पुढे त्यांत थोड्या सुधारणा करून ती कथा म्हणून प्रसिध्द केली गेली.
ड्रॅक्युलाचा अर्थ ड्रॅक्युल ह्या उमरावाचा मुलगा तो ड्रॅक्युला असा आहे. पंधराव्या शतकांत ट्रान्सिल्व्हानियामधे ड्रॅक्युला राजा होता. त्याचे राज्य दोन मोठ्या राज्यांच्या मधे सांपडल्यामुळे दोघांच्या युध्दात तें भरडले जाई. १४४८ ते १४७६ पर्यंत तो तिथला राजा होता. आतां हा भाग रोमानियामधे येतो. दोनदां त्याचे सिंहासन गेले व त्याला झगडून परत मिळवावे लागले. तो अतिशय क्रूर प्रकारे शिक्षा देत असे व त्याने हजारो बळी घेतल्याचा उल्लेख आहे. परंतु ख्रिश्चॅनिटीचा तो पुरस्कार करीत असे. त्यामुळे व्हॅटीकन त्याच्याविरूध्द बोलत नसे. तो युध्दातच मारला गेला. त्याचे शव जिथे पुरले होते तिथून नाहीसे झाले. नंतर त्याचे अवशेष दुसरीकडे सांपडले ते म्युझियममध्ये ठेवण्यांत आले होते पण तेंही नाहीसे झाले (बहुदा चोरले गेले). ब्रॅम स्टोकरने कादंबरीत ड्रॅक्युला हा एकोणीसाव्या शतकांतला उमरावाच्या रूपांतील भूत म्हणून सादर केला आहे. प्रस्तुत गोष्टीत मात्र तो कथा सांगणा-याची मर्जी सांभाळण्यासाठी सुरूवातीला त्याला मदत करतांना दाखवला आहे. कथेत ड्रॅक्युलाचा तीनदा उल्लेख येतो. प्रथम तो एक उंच किडकिडीत माणसाच्या रूपांत दिसतो व नाहीसा होतो. दुस-यांदा तो काउंटेसच्या कबरीवर वीज पडते तेव्हां लेखकाला तिथून उचलून वाचवतो आणि लांडग्याच्या रूपांत थंडीत त्याचे रक्षण करतो. तिसरा उल्लेख नांवानिशी पत्रांत येतो. गूढ निर्माण करण्यासाठी प्रत्यक्ष उल्लेख मात्र केलेला नाही.
May 11, 2022
नोकरीत असताना त्याची दिनचर्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्रमवार चालू असायची. सकाळी साडेनऊ वाजता तो घराबाहेर पडायचा. वेळेवर ऑफिसला पोहोचून, आपल्या टेबलवरचं काम शिस्तीनं उरकायचा.
September 6, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti