(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आरसा (कथा)

    सलून मधला प्रसंग आहे …..मी सलून मध्ये बसलो असताना बहुधा तिथेच आजूबाजूला राहणारा एक ५-७ वर्षांचा लहान मुलगा आत शिरला … मागोमाग त्याची आई आली आणि सलून मध्ये काम करणाऱ्या माणसाला आणि आपल्या मुलाला आळीपाळीने सूचना देऊ लागली .. .. “अहो , याचे केस कापून झाले न की त्याला फक्त बाजूच्या बिल्डींग च्या गेट पर्यंत सोडा …

      February 4, 2026


  • अजब न्याय नियतीचा – भाग २९

    ज्या दिवशी नीलने राजला हॉस्पिटलमध्ये ओळखले त्यानंतर त्याच्यात ट्रिमेंडस बदल होत गेले. नील, तू सांग त्यावेळी काय झालं ते.

      October 21, 2019


  • ईश्वर नाम भाषेचे जनक – श्री संत राममारुती महाराज

    (लेखक – दिलीप प्रभाकर गडकरी) – युनोतर्फे २००५ साली केलेल्या पहाणीनुसार जगात ६९१२ भाषा बोलल्या जात होत्या. भाषा तज्ञांच्या मते दर पंधरा दिवसांनी जगातील एक भाषा कायमची नष्ट होते. अशीच एक ईश्वर नाम भाषा १८९३ साली निर्माण झाली आणि २८ सप्टेम्बर १९१८ रोजी नष्ट झाली. त्या भाषेचे वैशिष्ट्य म्हणजे ती एका व्यक्तीने निर्माण केली. पंचवीस वर्ष वापरली, ह्या पंचवीस वर्षात त्यांनी इतर कोणत्याही भाषेचा वापर केला नाही. जगात ती भाषा फक्त त्यांनीच वापरली व त्यांच्या निधनानंतर ती भाषा नष्ट झाली. ही सुध्दा ईश्वराचीच इच्छा दुसरे काय ?

      October 22, 2019


  • मॉर्निंग वॉक

    मॉर्निंग वॉक’ हा प्रकार भयंकर असतो हे तुमच्यावर जेव्हा तो ‘कंपल्सरी’ या प्रकारात येतो तेव्हाच कळते. तसे तरुणपणी आपण ‘बारीक’ असताना किंवा स्वतःची फिगर सांभाळण्यासाठी किंवा गंमत म्हणून जेव्हा आपण ‘मॉर्निंग वॉक’ साठी जात असतो तेव्हा आपण चार लोकांशी गप्पा मारताना काहीतरी विषय काढून आपण वॉकसाठी जात आहोत हे आवर्जून त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत असतो.

      November 27, 2025


  • निंदकाचे घर असावे शेजारी

    सोळाव्या शतकात रने देकार्त नावाचा एक थोर तत्त्वज्ञ फ्रान्समध्ये होऊन गेला. अतिशय बुद्धिमान असलेला देकार्त आपले तात्त्विक विचार त्याकाळी कोणालाही न भिता मांडत त्यामुळे काळातील असे. त्या कथासार धर्ममार्तंड व परंपरावादी मंडळी त्याच्यावर नेहमीच टीका करीत असत. कारण त्याचे आधुनिक विचार त्यांना पसंत नव्हते. देकॉर्नचे विचार जर लोकांना पटू लागले तर आपल्याला कोण विचारणार अशी भीती त्या मंडळींना सारखी वाटायची. त्यामुळे देकार्तवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नसत. पुढे पुढे तर त्यांच्या टीकेची जागा निंदेने घेतली. अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ते देकार्तची निंदा करू लागले. मात्र त्यांची ही निंदा ऐकूनही देकार्त शांत असे; त्याने त्याबाबत कधीही कोणाकडेही तक्रार केली नाही. एके दिवशी मात्र देकार्तच्या हितचिंतकाला त्यांची निंदा सहन झाली नाही म्हणून त्याने देकार्तलाच विचारले की, तुम्ही तुमच्या टीकाकारांना (निंदकांना) खरमरीत उत्तर का देत नाही? त्यावर देकार्त शांतपणे आपल्या त्या हितचिंतकाला म्हणाला, ' निंदकांनी माझी सतत निंदा केल्यामुळे माझ्यामध्ये आपोआपच सहनशीलता व क्षमाशीलता हे गुण निर्माण झाले आहेत. त्यामुळे माझी मानसिक व बौद्धिक पातळी आणखी उंचावली आहे. ती एवढी उंचावली आहे की मला त्यांची निंदा आता ऐकूही येईनासी झाली आहे. त्यांची निंदा ऐकून त्यांना उत्तर देण्याचे मी ठरविले तर मला खालच्या पातळीवर यावे लागेल आणि तसे केल्यास मी माझेच नुकसान केल्यासारखे नाही का होणार?' देकार्त यांचे ते उदात्त विचार ऐकून तो हितचिंतक भारावला व त्यांच्यापुढे नतमस्तक झाला.

    -श्रीकांत नारायण

      December 31, 2024


  • बहुरुप्याचे राजेपण

    गजानन महाराजांच्या पोथीची पारायण मी काहीवेळा केली आहेत . दररोज त्याचा एक तरी अध्याय वाचायचा असेही कितीतरी वेळा केले आहे . त्याची CD अखंडपणे ऐकत कितीतरी वेळा प्रवासही केला आहे . पण याआधी कधी झाले नाही असे आज़ झाले . मी आत्ता यातले काहीही करत नसतानाही अचानक माझ्या मनात आले की संतकवी श्री दासगणू महाराज क्रुत " श्री गजानन विजय " या पोथी मधल्या अनेक ओव्या शेअर - बाजारांच्या संदर्भात लागू पडतात .

    आता हेच बघा ना ! या पोथिच्या दहाव्या अध्यायाच्या १६१ व्या ओवीत एक ओळ आहे . . .

    " बहुरुप्याचे राजेपण ¦

    कोठून टिके बाजारी "

    ही ओळ आता अचानक आठवली आणि असं पटकन मनात आले की हे कोणत्याही काळातील , कोणत्याही स्थितितील , कोणत्याही देशातील शेअर - बाजाराचे हे किती चपखल वर्णन आहे . आजमितिला आपल्या शेअर - बाजाराचा निर्देशांक अशा पातळीवर आहे की त्याबाबत जरा नीट विचार करा असे कोणी कोणाला सांगायला गेले तर लगेचच त्याची संभावना " नतद्रष्ट " अशी केली जाईल . पण अशा बाजारात हौशी - नवशे - गवशे असे शेअर्स आणि गुंतवणूकदार असे दोघेही एकदम दिमाखात , तोर्यात मिरवत असतात . कारण अशा बाजारात इंद्राचा ऐरावत आणि श्यामभटाची तटानी या दोघांचेही भाव चढे असतात . त्यामुळे एखादा शेअर घेताना जरी चूक झाली तरी ती चूक अशा बाजारात निस्तरताना सुध्दा नफा पदरी पडतो . आणि म्हणूनच अशा बाजारात वावरताना याच पोथिच्या तिसऱ्या अध्यायातील ९९ व्या ओवितिल एक ओळ लक्षात ठेवणे आवश्यक आहे . ती ओळ अशी :

    " उगीच पाहून पिवळेपण

    सोने पितळेस मानू नका " .

    कारण उतरत्या बाजारात सोने आणि पितळ यातला फरक उघड होत राहतो . तेजिच्या बाजारात पितळ बहुरुप्यासारख सोने म्हणून कितीही वावरले तरी याच ओविचा पूर्वार्ध आठवावा लागतो . तो पूर्वार्ध असा :

    " म्हणून बहुरुप्या कारण

    जपण आहे अवश्य जाण " .

    अशी जाणीव आपल्याला होत राहण्यासाठी अनेकदा तद्न्य सल्लागारांची मदत घ्यावी असे सांगितले जाते . ते योग्यच आहे . पण असा सल्लागार निवडताना त्याबाबतचे निकष काय असावेत याचे विवेचन गजानन महाराजांच्या पोथिच्या तिसऱ्या अध्यायातील ८८ व्या ओवित फार छान पध्दतीने सांगितले आहे . ती ओवी अशी :

    " मात्र औषधी देणारा

    शास्त्रात असला पाहीजे पुरा

    औषधीचा पसारा

    आहे अवगत जयासी " .

    कदाचित अशा मदतीची या क्षेत्रातील माहिर माणसांना आवश्यकता वाटत नसेलही . कारण त्यांची अवस्था या पोथिच्या चौदाव्या अध्यायातील १४५ व्या ओविच्या

    " स्वानुभवाच्या ठायी जाणा

    वाव न तर्काकारणे "

    अशी तरी असते नाहीतर याच पोथिच्या एकोणिसाव्या अध्यायातील १०६ व्या ओविच्या

    " मुक्कामास गेल्यावर

    मार्गांचा न उरे विचार "

    अशी असते . पण " अर्थ " असो नाहीतर " परमार्थ " अशी चांगल्या अर्थाने " पोचलेली " माणसे कमीच असतात . बाकी सगळेच तुमच्या - माझ्यासारखे . रास्ता शोधणारे . त्यामुळे याच पोथीत एकोणिसाव्या अध्यायाच्या १२३ व्या ओवित म्हणले आहे तसे

    " जो मुक्कामास जाई

    त्याचे कौतुक करणे असे "

    अशीच भूमिका स्वीकारने योग्यच असते . पण हे कौतुक केवळ शाब्दिक असून पुरत नाहि . तसे प्रयत्न ही करावे लागतात .

    हे लिहीत असताना मला " यश हे प्रयत्नांती असते ; वाच्यान्ती नव्हे " या लोकमान्य टिळकांच्या विधानाची अतिशय आठवण होत आहे . नाहीतरी या पोथीच्या पंधराव्या अध्यायाचा जवळजवळ निम्मा भाग लोकमान्य टिळक यान्च्याविशयीच आहे ना ! एखाद्या आध्यात्मिक पोथीत असे स्थान मिळवणारा लोकमान्य टिळक सोडले तर दुसरा कोणताही भारतीय राजकीय नेता नसेल . असो .

    असे क्रुतिशील प्रयत्न न करणाऱ्या मंडळी विषयी ( अर्थात पोथी तील ओविला शेअर - बाजार अपेक्षित नाही ) या पोथीच्या पाचव्या अध्यायातील १०६ व्या श्लोकात एकदम झणझणते अंजन घालण्यात आले आहे . ती ओवी अशी :

    " तुझ्यासारखे निरुद्योगी

    जन्मले आमच्यात जागजागी

    म्हणून झालो अभागी

    आम्ही चहू खंडात " .

    त्यामुळे हे किटाळ टाळण्यासाठी काय मार्गाने जायचे याचा विचार करावा लागतो . मुक्कामाला पोचलेल्याला मार्गाचे महत्व नसले तरी इतरांना असतेच असते . या पोथीच्या एकोणिसाव्या अध्यायाच्या १०६ व्या ओवीत याचे वर्णन अशा शब्दांत केले आहे :

    " जो मार्गी चालतो नर

    महत्व त्याचे त्यास

    मार्ग असो कोणताही

    त्याचे मुळी महत्व नाही . "

    असा मार्ग कसा आणि काय असावा याचे अतिशय मार्मिक वर्णन या पोथीच्या अनेक ओव्यात जागोजागी येत राहते . याची काही उदाहरणे खालील - प्रमाणे :

    १ . " शक्याशक्य विचार ¦सुद्न्ये करावा निरंतर

    उगीच पूल सागरावर ¦ बांधवया जाऊ नये "

    ( अध्याय विसावा , ओवी १४९ . )

    २ . " कोल्हा न राही उपोशीत ¦ उसाचिया फडामधे

    वा पाहून बाटूकाला ¦ बैल नाही पुढे गेला "

    ३ . " हीरे गारा एक्या ठायी ¦ मिसळल्या असती जगा ठायी

    पारखी तो निवडूनी घेई ¦ गार टाकून हिर्याते " .

    (पहिला अध्याय , १०७ वी ओवी )

    ४ . " स्थान एक आहे म्हणुनी ¦ किंमत नाही समान

    तेज हिर्याचे हिर्यालागून ¦ भूषवी न गारेला "

    ( तिसरा अध्याय , ११३ वी ओवी ) .

    ५ . " मोगरा , निवडूनग आणि शेर ¦ ही जमिनीची लेकर

    परी किंमतीचा प्रकार ¦ निरनिराळ तो तिघांचा "

    (तिसरा अध्याय , १४५ वी ओवी ) .

    असो .

    हा झाला संकल्पनात्मक भाग .

    गुंतवणूक क्षेत्रात सहभागी होत असताना , कार्यरत राहताना बाळगायच्या " आचार - संहिता " ( Code of Conduct ) किंवा " क्रुति - आराखडा " ( Action Plan ) याचा विचार केला तर . . . .

    अर्थातच संतकवी श्री दासगनू महाराज यांच्या " श्री गजानन विजय " या पोथीच्या आधारे .

    असा विचार करत असताना आपण एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रात , त्यातही विशेषतः शेअर - बाजारात , सहभागी होत असताना या बाजारात तर राहायचे पण आपली वैचारिक तटस्थता सोडायची नाही हे पथ्थ्य न विसरता सांभाळत राहावे लागते . तरच या क्षेत्रात यशस्वी होता येते आणि यशस्वी राहताही येते . याबाबतचा अतिशय सुंदर द्रुश्तान्त या पोथीच्या सहाव्या अध्यायातील ६८ व्या ओवीत दिला आहे . ती ओवी अशी आहे :

    " गार पाण्यात राहते ¦ परी न पाणी शिरू देते

    तैसेचि वागते साचे ¦ या प्रपंच माझारी "

    ही ओवी इतकी स्वयं - प्रकाशित आहे की त्याचे आणखी विवरण करण्याची आवश्यकताच उरत नाही .

    हे जमवून आणणे सहज - सोप निश्चितच नाही . निदान आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी तर नाहीच नाही . कारण आपल्या सगळ्यांचीच अवस्था " आऊ गेली देवापाशी , चित्त तिचे चपलान्पाशी " अशीच असते . एकनाथ महाराजांच्या अनेक भारुडातही त्याच मोठ बोलके वर्णन वारंवार येत असते . पण हे जमणारच नाही असंही नसतं ना ! त्यासाठी सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न मात्र करत राहावं लागते . त्याचं पहिले पाऊल म्हणजे काम करत राहणे . हा पैलू या पोथीच्या सहाव्या अध्यायातील ११९ व्या ओवीत असा शब्दबद्ध होतो :

    " कर्ममार्ग सोडू नको ¦ विधि निरर्थक मानू नको

    मात्र त्यात होऊ नको ¦ लिप्त बाळा केंव्हाही . "

    यात असणारी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आपले स्वतचे मन . अगदी

    " मन सदा आशाळभूत ¦ ते ना कदा स्थिर होत

    नाना विकल्प मनात ¦ येऊ लागती वरच्यावरी . "

    ( अध्याय सातवा , सातवीं ओवी ) अशीच परिस्थिति .

    हे शेअर - बाजारात तर सततच होत असते . कारण तिथे गन्मतीने म्हणायचे तर लोकशाहीचा अतिरेक सुरू असतोच असतो . " नाना मति , नाना रीति " अशी सदा स्थिति . पण यावर आपले मत अभ्यासांती तयार करून त्यावर स्थिर राहावे असे सांगताना या पोथीची सातव्या अध्यायातील ५२ वी ओवी सहजच म्हणते की :

    " जन्बुकाच्या चेष्टला ¦ गजपती न मानी भला

    श्वानाचिया भुंकणयाला ¦ व्याघ्र न दे किंमत " .

    हे जमले नाही तर " दारिद्रयाचे मनीच्या मनी , जाती जिरोनि मनोरथ " हे विधिलिखितच !

    अर्थातच अशा ओव्या लिहिताना संतकवी श्री दासगनू महाराजांना गुंतवणूक क्षेत्र किंवा शेअर - बाजार अभिप्रेत नव्हता हे उघडच आहेत . पण वेळ ही गोष्ट , आणि त्यातही वेळ साधणे ही गोष्ट , आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आणि तेही प्रत्येक क्षेत्रात महत्वाची ठरते . " Time is essence of contract " हा गुंतवणूक क्षेत्राचा पायाभूत सिध्दांत आहे . त्याचं समर्पक वर्णन याच पोथीच्या चौथ्या अध्यायाच्या ११४ व्या आणि ११५ व्या ओवित अशा शब्दांत येते :

    " तरूणपणी ब्रम्हचारी ¦ म्हातारपनी करसी नारी

    अरे वेळ गेल्यावरी ¦ नाही उपयोग साधनाचा

    जे करणे ते वेळेवर ¦ करावे की साचार

    घर एकदा पेटल्यावर ¦ कूप खणण निरर्थक . "

    असे प्रयत्न करतांना वेळ जशी आणि जितकी महत्वाची आहे आणि असते , तेवढीच आणि तितकीच अपेक्षा वास्तव असण्याची नितांत गरज असते . हे संपूर्ण आयुष्याबाबतीत लागू पडनारे आहे . याला शब्दान्कीत करतांना या पोथीच्या २० व्या अध्यायातील १४९ वी ओवी सांगत राहाते :

    " शक्याशक्य विचार ¦ सुद्न्ये करावे निरंतर

    उगीच पूल सागरावर ¦ बांधावया जाऊ नये " .

    हे जमवायचे असले तर " अहो साजेल ते बोलावे , जे का पचेल तेच खावे ; उसने ना कधी आणावे , अवसान ते अंगात " ( अध्याय अकरावा , ओवी १५३ ) हे जसे खरे तसेच असे वास्तव अपेक्शान्चे अविरत प्रयत्न कुठे करायचे तेही ठरवणे महत्वाचे निश्चितच असते . कारण

    " बीज पेरता खडकावरी ¦ ते वाया जाते साचार

    त्यास कधी ना येणार ¦ मोड हे ध्यानी धरावे . "

    ( तेरावा अध्याय , चोविसावी ओवी . )

    अशा प्रयत्नातून मिळणाऱ्या यशाची अपेक्षा मोठी ठेवण्यास काहीच आडकाठी नाही हे सांगायला ना गुंतवणूक क्षेत्र विसरत ; ना ही पोथी . श्री गजानन विजय या संतकवी श्री दासगनू महाराज विरचित या पोथिची १५० वी ओवी निःसंदिग्ध पणे सांगते कि

    " कल्पवृक्षाच्या तळवटी ¦ बसून इच्चिली गारगोटी

    वा मागितली करवनटी ¦ कामधेनूपासून . " .

    सदा - सर्वकाळ , तिन्ही - त्रिकाल या कसोट्यांवर उतरतो तो राजा .

    बाकीचे सगळे बहुरूपी .

    बहुरूपी एखाद्या क्षणाला असं काही बेमालूम काम करून जातो कि तो त्या क्षणाला खरंच राजा वाटतो .

    तो राजा " वाटतो . " ; राजा " नसतो " .

    तो असतो फक्त बहुरूपी .

    शेअर - बाजार तर स्वतःच एक बहुरूपी आहे .

    " बहुरुप्याचे राजेपण ¦ कोठून टिके बाजारी " .

    चंद्रशेखर टिळक
    C - 402 . राज पार्क
    मढवि बंगल्या जवळ .
    राजाजी पथ .
    डोम्बिवलि ( पूर्व ) .
    पिन . . . ४२१२०१ .
    मोबाईल . . . . ९८२०२९२३७६ .
    E-mail : tilakc@nsdl.co.in

      November 7, 2016


  • जोजाची गोष्ट

    ‘जोजा ही एका राजाची मुलगी, पाय घसरून पडलेल्या एका म्हातारीला कुचेष्टेने हसली. तशी म्हातारीने चिडून शाप दिला: ‘तादेव’ नावाचा मृत राजपुत्र तुला पती मिळू दे अन् तुझे खूप हाल होऊ देत !’ बिचारी राजकन्या, तिने म्हातारीची विनवणी केली. तो मृत राजपुत्र कशाने उठेल म्हणून विचारले. तशी म्हातारीने सांगितले की, त्याच्या उशाशी थडग्यात एक मोठे चांदीचे पिंप ठेवलेले आहे, ते जी तरुणी तीन दिवसांत अश्रूंनी भरून टाकील तीच त्याला जीवदान देऊ शकेल व मग त्यांचे लग्न होईल.

      October 5, 2025


  • लॉकडाउन काळात आणि नंतर साहित्यात होणारे बदल

    लॉक डाउन मुळे प्रकाशन व्यवसायावर आणि प्रकाशित पुस्तका, काव्य संग्रह, कथासंग्रह वर चांगलाच परिणाम होणार आहे आणि झाला पण आहे. काहिं मासिकां च्या आवृत्या ज्या वर्षोपासुन नियमित निघायच्या त्यात खंड पडला. पण जे वेब मासिक निघत होते त्यांच्यावर असर झाला नाही.

      June 10, 2020


  • कोडी

    माणसाच्या आयुष्यात सतत, वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी कोडी येत असतात. त्यातली काही सोडविता

    येतात तर काही नाही. वृत्तपत्रातल्या कोड्यांचं तसं नसावं. एक तर ती सहजी सुटतात. आपल्यालाही कोडी सोडविता येतात, हा

    विश्वास बळावतो अन् मग तो पुन्हा नव्या कोड्याची प्रतीक्षा करीत राहतो. ही कोडी सोडविताना वास्तवातल्या कोड्यांचं काय, हा

    प्रश्न मनात अजूनही कायम आहे. पाहा, तुम्हाला उत्तर सापडतंय का?

      February 24, 2006


  • आनंद लुटणारे मन !

    आनंद लुटणारे मन ! सहयोग मंदिर ठाणे, येते नुकताच जुन्या गाण्यांचा, संगीताचा बहारदार कार्यक्रम झाला होता. सभागृह तुडुंब भरले होते. मी पण तो आस्वाद घेण्यासाठी गेलो होतो. सर्व श्रोत्यांना बसण्यासाठी भारतीय बैठक होती. माझ्यासमोर एक प्रौढ स्त्री बसलेली होती. तिच्या शेजारी दोघेजण होते. ती त्यांच्याशी अधून मधून संवाद करीत होती. सर्वजण त्या अतिशय मधुर संगीताचा आनंद लुटीत होते. परंतु माझासमोर बसलेल्या त्या बाई थोड्याश्या जास्तच उत्साही वाटत होत्या. त्यांच्या सतत हालचाली चालू होत्या. सहकाऱ्याबरोबर त्या प्रत्येक गाण्यावर टिप्पणी करीत होत्या. मान डोलावाने, टाळ्या वाजवणे, वाहवा !

      July 6, 2012