(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • माझे शिक्षक – भाग १ (आठवणींची मिसळ १५ )

    शिक्षक म्हणजे गुरू.दत्तात्रेयांनी २४ गुरू केले असे म्हणतात.अनेक सुप्रसिध्द गायकांनी दोन-तीन गुरू केल्याचे सांगितले आहे.जो जो आपल्याला कांही शिकवतो, तो आपला गुरू, अशी व्याख्या केली तर आई-वडिलांपासून सुरूवात करून ह्या वयातही आपल्यात सुधारणा व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणाऱ्या आपल्या पत्नीपर्यंत असंख्य गुरू आपल्याला आठवतील.अगदी लोकलच्या प्रवासांत चपळाईने चौथी सीट कशी मिळवावी हे शिकवणाऱ्या गुरूचीही आठवण होईल.पण शाळा कॉलेजमधे जे आपल्याला शिकवतात, तेंच आपले अधिकृत गुरू, म्हणजेच शिक्षक.अगदी बिग्रीपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंत खूप शिक्षक आपल्याला भेटतात.कांही कायम लक्षात रहातात.कांहीना विसरावसं वाटत पण विसरतां येत नाही.आपल्याला घडवण्यात आपल्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो.

      August 20, 2022


  • मैत्रीण आणि प्रेम (कथा)

    ओंकार साधारण पस्तीशीच्या आतला तरूण. एका प्रतिथयश साॅफ्टवेअर कंपनीत कामाला. नुकताच प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून बढती मिळालेला. राधा चोवीस वर्षांची तरुण उत्साही मुलगी. त्याच्या टीममधील एक लीडर. काॅलेज संपून तीन-चार वर्ष झाली असतील. अत्यंत हुशार, कामाला सदैव तयार आणि खास करून टीमचे अंतर्गत प्रश्न सोडवायला एक पाऊल पुढे.

      July 1, 2020


  • चारोळ्या

    मोहोळ

    आठवणींचे मोहोळ

    तरंग होऊन विरतात !

    त्यातच तुझे असणे

    क्षण सुखाऊन जातात !!


    चेहरा

    जगताना उघडे व्रण

    मरणांनंतर उघडेपण !

    संकृतीच्या मुखवट्यात

    चेहरा जगतो क्षण !!

    कवडसा

    सू मारल्यानंतर डोहाचा तळ ळू लागतो

    काळाची पाने झडल्यानंतर अर्थ कळू लागतो !!

    नवग्रहांच्या छायेतील स्व एक कवडसा

    कळता कळता प्रवास हळूसंपून जातो !!

    ब्रम्हांडाच्या हृदयात चिरत जाती

    जसे धुमकेतूचे शेपटीचे व्रण

    विदीर्ण मनास सतत डसती

    बाजार बुणग्यांचे कोडगे मन !

    कोरड्या मातीला येण्या गर्भारपण

    धरण उंचावून उखडावे गावपण

    दूर रानात उन्हात रडावे कुपोषण

    संगींनीच्या हाती झुले न्यायपण !

    कटोरा हाती खरडून जमीन

    रडे बालपण फुलण्या आयुष्य !

    शिट्टी धुराची सांगे वेळ

    रिझविण्या नजरा आयुष्याचा खेळ !

    नाळ तोडून ईर्षा स्वप्नांची सुरू होते

    श्वासांच्या उलघालीवर नाती विसरते !

    पंखातील बळ हळू ओसरल्यावर

    नात्यांची ओढ वाढत पैलतीर पाहू लागते !!

    आयुक्त बदलताच “ बार “ वर

    अचानक धाड टाकली जाते !

    “ मायेचा “ हात सदैव असावा

    सूचना फक्त दिली जाते !!

    पायरी पायरी वर चढताना ध्यास

    प्रमेय “मी” भोवती परिघाची आस !

    बिंदूतून त्रिज्या रेघ शोधत बीज

    वर्तुळ उतरणीला म्हणते पुरे आता श्वास !!

    मी वेडा वेचीत होतो शिंपले

    शिंपल्यात तुझे रूप लपलेले !

    वाळूत ओल्या उमटले ठसे

    ते घाव होते नाकारलेले !!

    पेटवली मी वात जरी न कळले

    आता ज्वाळ जाळू लागला मला !

    माझ्याच सांजवेळी माझीच भुते

    वटवाघूळ होऊन डसू लागली मला !!

    बंद डोळे बंद मूठ घेऊन

    पहिला प्रवास सुरु होतो !

    लपविण्यात श्वास खर्ची घातले

    तरी उघड्यावरच प्रवास संपतो !!

    पहाट भिजल्या पानावर

    दव चढवी लाज सुंदर !

    ऋतु घाली न्हाहू हळू

    जागवी पालवी हुरहूर !!

    रन्ध्रांचे स्पंदन

    एकरूप व्हावे !

    तुझे श्वासांचे सूर

    एकच गाणे व्हावे !!

    ----------

    लय ठेका

    तरंग व्हावा !

    एकच साद

    समेवर यावा !!

    जाणिवेतून सुरू झालेली स्पर्धा

    कळत नकळत मैत्री नात्यात होते !

    धावणे कशा-कुणासाठी पोट ठरवते

    पंख गळल्यावर सुटकेसाठी धडपडते !!

    जाणीव नेणीव हे प्रवासातील धोंडे

    ठेच लागल्याशिवाय “आई” “मी” !

    नात्याचे मोल रक्ताशिवाय कळत नाही

    जगण्यासाठी हाव पाठ सोडत नाही !!

    उदंड झाली देवळे

    नुरले कुठे देवत्व !

    लक्ष्मीच्या तालावर नाचे

    सरस्वतीचे कवित्व !!

    वेदनेचे तरंग शब्दातून

    करती नर्तन ओठावरती !

    सत्कारात भिजताना न पाहे

    पोटी आग प्रेते जळती !!

    वर्षानुवर्षे चाले सोहळा

    किर्तनाचा रंग वेगळा !

    दिंडी ग्रंथांची निघे रंगात

    कच्चे मडके रडे कुंभार मनात !!

    अश्रुंचे नभ बरसले खांद्यावर

    अनेकांचे झाले मोकळे आकाश !

    चंद्र त्यांनी पाहिला कलश ठेवून

    कोठ शोधू माझेच हरवलेले आकाश !!

    ज्योतीनेच आपल्या तेजाने प्रकाशित केले

    प्रकाशने मात्र ज्योतीलाच व्यापले !

    डोक्यावर अंधार तसाच मूर्तिने पाहून

    डोळे मिटून कपाळावरच्या रेघांनी भाग्य म्हटले !!

    बरसली तेव्हा ती रोडावलीच होती

    भेगा पडल्या डोळ्यांना सुखावत होती

    करपले हात ओंजळीत साठवत होते

    कुशीत सुखावल्या पाकळीला चुंबत होते !!

    परतीचा ग पाऊस
    छळतो येड्यावाणी
    पुन्हा भेटेल ना भेटेल
    प्रेमाच्या वर्षावात आणी डोळा पाणी !!

    म्हणे घे पदरात आता
    ठेव साठवून जपून
    आगळीक तुला वाटेल
    आलो तुझी ओढ पाहून !!

    मरणारे मेले
    भोगणारे भोगतात
    कावळे मात्र " विधी" व्रत
    चोच मारुन फडफड करतात !

    काळ बदलला विश्वरुप कधीच न कळले

    " राम " हरवलेले " हराम" माजू लागले !

    चोच मारल्या कलेवराचे पुजेच्या बाजारात

    जीवंतपणी मरण देणारे " मोल " ठरवू लागले !

    आईची कूस नासवून

    घाव घालून हिरवे पदर फाडले

    जिने घडविले वाढविले तिलाच

    विद्रूपतेचे दर्शन घडविले

    पोटचा गोळा गिधाड बनले

    कण कण आजवर वेचत फुललो

    सावली घेरल्या क्षणी देत चाललो

    असहायतेने नकळत रमल्या नात्यास

    संवेदनेने अर्थ देत माझे म्हणालो !!

    सारेच मुके प्रेमाने जवळ येतात

    न दिसता ही स्पर्श अर्थ सांगतात

    आपलेच दुरावलेले हाताच्या स्पर्शात

    पापण्या भरल्या डोळ्याने आकाश बघतात !!

    मंद झुळूक क्षण सांजेला साद घाले

    मिटले पंख आकाश कवेत घेउ लागले

    पंचारती गात्र गात्र फुलवून सजले

    दूर फांदीवर चमकून बिंब दवात न्हाले !!

    सर्वस्व माझे घेतले तरी

    तृष्णा ना कधी क्षमे

    ना थांबे तो घाव अघोरी

    ठेच लागे हाय आई म्हणे !

    शब्दच फक्त रडती

    हात मात्र थरथरती

    विवस्त्र झाले तरी

    कल्पनेचे खेळ करती !

    तुझ्या देठावरील दवाचा चंद्र

    माझ्या ओठांच्या क्षितिजावर आला !

    सागर उचंबळून नर्तन करीत

    लाटांच्या हातांनी किनार्‍यास बिलगला !!

    श्वासांची रिमझिम रिमझिम

    हृदयातील निशब्द धडधड !

    मोकळ्या केसांत चांदण्यांच्या

    झुले दोन जीवांचे झुंबर !!

    तुझ्या डोळ्यातील पाऊस
    मी ओंजळीत हळूवार धरला !
    हुंदक्याला पालवी फुटलेली पाहून
    निवडूंग ही गहिवरून बहरला !!

    शेवाळ दूर होता
    दिसे डोहाचा तळ !
    भीती दूर करता
    फुले आत्म बळ !!

    बिल्वदलात नेत्रांच्या नटून

    मोहरे गंध प्रकाश रूप !

    उघडून कवाडे उडे पाखरू

    वारा मंद होई चांदणे रूप !!

    अरविंद बुधकर

      October 6, 2018


  • ठाण्यातील स्त्रियांच्या चळवळी

    ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला नितल वढावकर यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.

      March 27, 2022


  • करपलेल्या बालपणाचा व्याकुळपट – अरसड

    या कादंबरीतील काही पात्राच्या माध्यमातून उदाहरणार्थ चक्रम, यादव, गंगा,सूर्याजी,मारुती ही पात्रे व्यंकटेश सोळंके आपल्यासमोर व्यक्तीचित्रणाची फळी उभी करतात.अनेक नातेसंबंध हे दिखाऊ असतात त्यातलं पोकळ असणं काय असतं हे आपल्याला अस्वस्थ करून जातं. श्रद्धा, अंधश्रद्धा याबाबत समाजात असलेली धारणा, पूर्वपार चालत आलेल्या प्रथा, परंपरा, विविध चालीरीतीतून साकारलेलं समाजमन सर्वसामान्या

      November 21, 2025


  • आईच्या बांगड्या

    क्रांतीच्या वेळी आई मुलाला म्हणाली वाणाचं सामान आणायचे आहे पैसे देतोस का मुलानी काही रुपये काढून दिले. अरे आणखीन थोडे देतोस का बांगड्या भरायच्या आहेत मला. बांगड्या आहेत ना हातात. आई मान खाली घालून गप्प. आणि तसेही बांगड्या घातल्या शिवाय सण साजरा होत नाही का? आई मुकाट्याने बाहेर गेली. तोच चला मी तयार आहे मला साडी घ्यायची आहे सणासाठी. आणि आई थोड्याच दिवसा नतंर बांगड्या न भरताच या जगातून निघून गेली.

      July 2, 2022


  • रुद्रा – कादंबरी – भाग १५

    राघवला जेम तेम तीन तासाची झोप मिळाली होती. तो सकाळी आठच्या सुमारास तयार झाला होता. आज बरीच कामे होती. त्याने मोबाईल ऑन केला. जाधवकाकाचे दोन मिस्ड कॉल दिसत होते. तसाही तो त्यांना फोन करणारच होता.
    “हॅलो,जाधवकाका तुमचे दोन मिस्ड कॉल दिसतायत!”
    “सर, सकाळीच शकीलशी बोलणे झाले. काल रात्री तुम्ही धम्माल केलीत म्हणे. ”
    “धम्माल कसली काका? नुसतीच धावपळ झाली. दोन्ही पक्षी भुर्र उडाले. हाती कोणीच आलं नाही! त्यात तो मनोहराचा अपघात!”
    “हो, सांगितलं शकीलने.”

      March 26, 2019


  • अधीर मना (सुमंत उवाच – २७)

    सुमंत जयंत परचुरे. 

    संयम ठेवावा लागतो जेव्हा कठीण समय येतो, संयम असावा मनी जेव्हा काळ चालून येतो वगैरे गोष्टी शिकायच्या म्हणजे अधीरता मनातून निघून गेली पाहिजे.

      September 18, 2021


  • गहिवर (कथा)

    दिवाळी जवळ आली रे आली की रामजी शेठजींचा मूड एकदम बिघडायचा. एक माणूस म्हणून ते चांगले होते पण पदरचा पैसा गेला की त्यांचा जीव कासावीस होत असे. गणपती उत्सवाला शेकड्यांनी वर्गणी द्यायला लागायची.

      May 15, 2022


  • भ्रष्टाचार / काचेचे घर

    आपल्याला भ्रष्टाचाराचा साधा आणि सरळ अर्थ कळला पहिजे. “मोबदला दिल्या बिना कुठला ही फायदा घेणे म्हणजे भ्रष्टाचार”

      November 21, 2010