नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
मंचकरावांनी डाव्या हाताची पालथी मूठ आपल्या भरघोस मिशांवरून फिरवली . अशी मूठ फिरवली के ते विचारमग्न आहेत असे समजावे . ‘हे मंचकराव ‘कोण ? असा प्रश्न विचारणारा आमच्यागावात नवा असावा किंवा मंचकराव जेथे आहेत ते गावतरी नवीन असावे ! त्यांची आई ते जन्मल्यापासून त्यांना ‘मंचकराव ‘च म्हणत असे , म्हणून ते लहान पणापासूनच ‘राव ‘ झाले . तेव्हात्यांच्या ‘राव ‘ असण्यास ज्ञानाचा , अनुभवाचा , वा वयाचा काही एक संबंध नाही !
लहानपणी आमच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळले ते, बाबा होते म्हणून.. भालजी पेंढारकरांचे 'छत्रपती शिवाजी', 'पावनखिंड', 'नेताजी पालकर', 'मोहित्यांची मंजुळा', 'मराठा तितुका मेळवावा' हे चित्रपट आम्ही पाहिले. ते पाहून शिवाजी महाराजांविषयी मनात अपार आदर निर्माण झाला. अशा संस्कारमय ऐतिहासिक चित्रपटांसाठी बाबांना मानाचा त्रिवार मुजरा!!
१८९८ साली भालजींचा कोल्हापूर येथे जन्म झाला. शिक्षणात मन न रमलेल्या भालजींनी तरुण वयातच कोल्हापूर सोडले व पुणे गाठले. पुण्यातील 'केसरी'मध्ये त्यांनी काही काळ नोकरी केली. 'केसरी'चे जुने अंक व ग्रंथालयातील इतर अनेक पुस्तके, ग्रंथ वाचून त्यांच्यातल्या लेखकावर संस्कार झाले. या काळात त्यांच्यावर वि. दा. सावरकर व बाबाराव सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव पडला. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर ते कोल्हापूरला परतले.
त्यांनी देशप्रेमावर सहा नाटके लिहिली. नाटकात भूमिकाही केल्या. 'बकंभट' या व्यंगपटाचे लेखन दिग्दर्शन केल्यानंतर सरस्वती सिनेटोनच्या 'श्यामसुंदर' या पौराणिक बालचित्रपटाची दिग्दर्शन, पटकथा, संवाद, गीते ही आघाडी सांभाळली. या चित्रपटाने पहिला ऐतिहासिक रौप्यमहोत्सव होण्याचा मान मिळवला.
यानंतर भालजींनी कोल्हापूर सिनेटोन, श्याम सिनेटोन, शालिनी सिनेटोन, सरस्वती सिनेटोन, अरूण पिक्चर्स अशा अनेक चित्रसंस्थांच्या चित्रपटांची दिग्दर्शन अथवा पटकथा संवादाची जबाबदारी सांभाळली. भालजींच्या प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीलाच 'बहु असोत सुंदर ...' हे महाराष्ट्र गीत असायचेच. १९३४ च्या 'आकाशवाणी' पासून १९८६ च्या 'शाबास सूनबाई' पर्यंत भालजींनी ४० कृष्णधवल व २ रंगीत अशा ४२ चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन केले.
१९४५ साली कोल्हापूरच्या छत्रपतीं राजाराम महाराजांनी तेरा एकरचा जागा भारतींना दिली. तिथे स्टुडिओ उभारुन त्याचे 'जयप्रभा स्टुडिओ' असे नामकरण केले. १९४८ साली गांधी हत्येनंतरच्या जाळपोळीत स्टुडिओ जळाला. या आगीत 'मीठ भाकर' व 'मेरे लाल' या दोन चित्रपटांची राख झाली. भालजींनी सर्वांची देणी भागवून पुन्हा शून्यातून 'मीठ भाकर' चित्रपटाची निर्मिती केल्यावर या चित्रपटाने व्यवसायही चांगला केला.
भालजींनी ऐतिहासिक बरोबर सामाजिक विषयही चित्रपटासाठी हाताळले. 'साधी माणसं' हा चित्रपट लोहार व त्याच्या रणरागिणी पत्नीच्या सरळसाध्या जीवनावर बेतलेला होता. या चित्रपटाला महाराष्ट्र राज्य सरकारची अकरा पारितोषिके मिळाली. सूर्यकांत, चंद्रकांत हे मांढरे वंदू, जयश्री गडकर, सुलोचना, राजशेखर, अनुपमा व दादा कोंडके अशा अनेक नामवंत मराठी कलाकारांना त्यांनी घडविले.
दादा कोंडके 'विच्छा माझी पुरी करा'च्या प्रचंड यशानंतर एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करणार होते, बाबांनी त्यांना 'सोंगाड्या'च्या निर्मितीस प्रोत्साहन दिले...आणि दादांनी स्वतःच्या अनेक सलग रौप्यमहोत्सवी चित्रपटांचे युग निर्माण केले.
बाबा असेपर्यंत 'जयप्रभा स्टुडिओ'तून अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती होत होती. काही कारणाने बाबांनी घेतलेले कर्ज फेडू न शकल्यामुळे स्टुडिओची मालकी लता मंगेशकरकडे गेली. जिने बाबांच्या चित्रपटांतून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकले, तिनेच बाबांना क्लेश दिले.
भालजींना ९६ वर्षांच्या आयुष्यात चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल १९९२ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. १९६६ च्या 'साधी माणसं' व १९७० च्या 'तांबडी माती' या दोन चित्रपटांना सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
आज भालजींची १२५वी जयंती. शेकडो वर्षांतून एखादी अशी युगप्रवर्तक व्यक्ती जन्माला येते. जसे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण राहिलो तसेच... बाबा, होते म्हणून आपल्याला चित्रपटांतून छत्रपती शिवाजी महाराज समजले...
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!!
- सुरेश नावडकर २-५-२३
मोबाईल ९७३००३४२८४
या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.
वामन भोसले यांनी उत्कृष्ट संकलन केलेल्या.. दो रास्ते, मेरा गाव मेरा देश, दोस्ताना, गुलाम, अग्निपथ, परिचय, आँधी, कर्ज, कालिचरण, साहेब, रामलखन, खलनायक, इत्यादी सुपरहिट चित्रपटांना चित्ररसिक कधीही विसरू शकणार नाहीत…
दरवाजात दस्तुरखुद्द रत्नाकर मतकरीच उभे होते. हाफ पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचे टी शर्ट त्यांनी घातले होते आणि हसतमुख नजरेने माझ्याकडे बघत मला म्हणाले सौरभ महाडिक ना? मी म्हंटले हो, तर म्हणाले मी आणि गणेश तुझीच वाट बघत होतो. घर व्यवस्थित मिळाले ना? मी म्हंटले हो अगदी व्यवस्थित मिळाले. फक्त तुमच्या घराचे वर्णन खूप जणांकडून ऐकल्यामुळे तुमचे राधा निवास हे बाहेरून तसेच आहे हे अनुभवण्यासाठी जरा तुमच्या बिल्डिंगमध्ये मी आजूबाजूला भटकलो हे सांगताच मतकरी काका मोकळेपणाने हसले..
आपलं म्हणणारे पोषक नसून शोषक आहेत हे नंतर कळले तर त्या जमिनीची रान उगवायचीही योग्यता टिकणार नाही हे खरे. मग नुसतेच वृक्षारोपण होत राहील वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी.
शाळेचा पहिला दिवस व्हता.मी चौथीतून पाचवीत गेलो .बापानं कशीतरी पदरमोडं करून वह्या पुस्तकं आणले व्हते. या सालापासून मव्हा भाऊबी शाळंत येणारं होता. मनून मंग बाच्या सांगण्यावरूनं मी त्यालं घेऊन शाळतं निघालो.
वीक एन्ड आला. एक शॉर्ट ट्रिप करण्याचे ठरले. सॅन अँटोनियो.
"किती लांब आहे?" मी विचारले.
"काही नाही, तीन साडेतीन तासाच्या ड्राइव्हवर आहे." मुलगा म्हणाला. या अमेरिकेत प्रवासाचे अंतर मैल किंवा किलोमीटरवर कधीच मोजत नाहीत. किती वेळ लागेल यावर मोजतात!
हल्लीची मुलं खूप छान ट्रिप मॅनेज करतात, याचे प्रत्यंतर या वेळेसही आले.
मुलाने प्रवासासाठी सात सीटर दांडगी गाडी भाड्याने घेतली होती. पेट्रोल टाकी फुल! गाडी परत करताना टाकी फुल करून द्यावी लागती म्हणे.

दुपारी निघालो.अपेक्षे पेक्षा उशीर झाला होता. ऑन लाईन, दुपारच्या जेवण्यासाठी, वाटेतील एका रेस्टोरेंट मध्ये ऑर्डर देऊन ठेवली होती. दीड तासाच्या अंतरावर ते हॉटेल होते. त्या हॉटेलच्या डिलेव्हरी विंडोतून आमच्या खाण्याचे पार्सल, गाडीतून न उतरता घेतले. येथे हि सोय आहे. आम्हाला अश्या गोष्टी नवीनच! आमच्या हॉटेलात लंच टाईमला दिलेली ऑर्डर डिनरला सर्व्ह होते!
एका भव्य इमारती जवळ मुलाने गाडी उभी केली, तेव्हा संध्याकाळचे साडेपाच झाले होते.
"म्युझियम आहे का?" मी त्या इमारती कडे पहात विचारले.
मुलाने फक्त माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. माझा प्रश्न बावळट्पणाचा होता, मला जाणवले.
काही क्षणात हे सिद्धहि झाले! ते हॉटेल होते, आणि आमचा आजचा मुक्काम तेथेच होता.
आम्ही चार मोठे, अधिक दोन लहान असे एकंदर सहा जण, एक रूम पुरणार नव्हती, दोन घेतल्यात का? उगाच डोक्यात किडा वळवळत होता. सामनासगट आम्ही जेव्हा आमच्या रूम मध्ये आलो त्यावेळेस मला दुसरा धक्का बसला. ती 'रूम' म्हणजे, टू बी.यच.के.चा वेल फ़र्निशश्ड फ्लॅट होता! हो किचन पण होत! गॅस, ओव्हन,फ्रीझ आणि भांड्या सगट! जेवण बाहेर करा किंवा घरात शिजवून खा!

आणि संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही 'रिव्हर वॉक' साठी बाहेर पडलो. डिसेम्बरचा महिना होता. भन्नाट लाईटिंगने गाव सजल होत. ख्रिसमस ओसंडून वहात होता. येथल्या लाईटिंगची एक गोष्ट मला खूप भावली, ती म्हणजे हि लाइटिंग झगझगाटाची नव्हती, नेत्रसुखद होती!
या गावात एक नदी वाहते. तिच्या दोन्ही तीरावर छान शॉपिंग दुकान आणि खूप हॉटेल्स आहेत. नदीत बोटिंगची सोय आहे. बोटीत एक राऊंड नदीतून मारून आणतात. बोटीत बसून तीरावरल्या हॉटेलातील 'रंगीत लोकांची' गर्दी पहाताना माणूस (किमान मी तरी) त्यात हरवून जातो. पट्टेरी छत्री खाली बसून वाईन आणि सॅन्डविचचे आस्वाद घेणारे वृद्ध जोडपे, जग विसरून निग्रो तरुणाच्या खांद्यावर डोके ठेवून विसावलेली गोरी परी, आणि असं खूप सार, त्रयस्थपणे पहात होतो.
येथे 'लघुशंकेची' खुलेआम कोठेच सोय नाही. मॉल किंवा हॉलटेलात ती असते. बोटिंग फिटिंग एन्जॉय करून झाले होते. मी मुलाला माझी करंगळीवाली अडचण सांगितली. आता जेवायला जाऊ तेथे करा!(मराठी भाषा म्हणजे कठीण!) म्हणाला. एका रेस्तोरा मध्ये आमच्या कुटूंबाची वरात घुसली.
"बाबा तुम्हाला काय घ्यायचंय?" आमचे चिरंजीव, माझी गोची करण्यात पटाईत आहेत. इतर सगळे गुण सोडून, दोन्ही पोरांनी हा 'गोची' गुण आईकडून बरोबबर उचललाय. आता मला त्या रेस्ताराच्या शोकेस मधले सगळे पदार्थ नावाने आणि चवीने अगम्य, अन त्यात मी काय सिलेक्ट करणार? डोम्बल! पण चार चौघात बोलायची सोय नसते. मला माहित असलेला एकमेव पदार्थ- चिकोट्ले -दिला सांगून. चिकोटले म्हणजे एक डाव भात,(या पुढे एक डाव कॉमन!) काळे बीन्स, दही. परतलेले कांद्याचे काप, टमाटो, अन वर फ्रेश क्रीम! अजूनही बरच काही काही घालतात पण मला जेव्हड ओळखीचं होत तेव्हडाच सांगितलं. झाले चेकोटलें! माझी आवड सांगून मी 'ती' जागा शोधू लागलो. एका कोपऱ्यात 'बाथरूम' दिसले. मागचा पुढचा विचारन करता दाराच्या हॅण्डलला हात घातला. उघडेना! मी समोरच्या इंडिकेटरकडे पहिले. 'व्ह्याकन्ट' दाखवत होते. मी हँडलकडे नजर टाकली अन उलघडा झाला! त्या दाराला डिजिटल लॉक होते! आणि खाली सूचना होती 'या लॉकचा कोड तुमच्या रिसिटच्या मागे आहे!' फुकट्यांचा वापर टाळण्यासाठी केलेली हि आयडिया मला भन्नाट आवडली. चतुर लोक, फक्त पुण्यातच आहेत असे नाही!
आम्ही बोटिंगची तिकिटे काढली, तेव्हा जेष्टांसाठी असलेला डिस्काउंट घेतला. येथे बरेच ठिकाणी जेष्ठ व्यक्तींसाठी सवलती आहेत. काही कॉफी शॉपमध्ये दहा टक्के, पिझ्झावर पंधरा ते वीस टक्के, असेच फुटकळ डिस्काउंट पहायला मिळाले. पण कोठेही, कोणीही वयाचा दाखला मागितला नाही. आपल्याकडेहि सूट देतात, वयाचा पुरावा देऊनहि संशयानेच पहातात. 'मी जेष्ठ आहे.' हे एकदा जाहीर केल्यावर तेथे विश्वास ठेवला जातो. आपल्याकडे ती सोय नाही! अस्तु.
(क्रमशः)
सु र कुलकर्णी.
आर. माधवन आणि विजय सेथुपथी या दोन अभिनेत्यांचा अभिनय, अंडरवर्ल्डचे विदारक आणि वास्तवपूर्ण चित्रण, पोलिसदलातील अंतर्गत राजकारण, अंडरवर्ल्ड मधील जीवघेणं राजकारण यासाठी ही मुव्ही पाहायलाच हवी.
नाईलाजाने ड्यूटी ऑफिसर त्या मॅडमची चोरीची फिर्याद लिहून घ्यायला सुरुवात करतो. त्याच वेळी डीटेक्शन स्टाफचे एक हवालदार आणि महीला पोलिस यांना जीपने मॅडमच्या सोसायटी कडे त्या कामवाल्या बाईना आणण्यासाठी रवाना करतो. ज्या घरात त्या बाई काम करत असतात त्या घराकडे सिक्युरीटी वॉचमन पोलिसांना घेऊन जातो.
क्षमाशील वृत्तीमुळे वाईटातल्या वाईट माणसाचेही हृदयपरिवर्तन घडू शकते. यासंदर्भात समर्थ रामदास स्वामींची एक कथा खूपच अंतर्मुख करणारी आहे. समर्थ रामदास रोज भिक्षा मागून त्यावर आपला उदरनिर्वाह करीत असत. एकदा ते असेच भिक्षा मागण्यासाठी एका घरात गेले. त्या घरातील एक बाई शेणाने आपले अंगण सारवत होती. घरात काहीतरी कुरबूर झाल्याने ती बाई आधीच चिडली होती. त्यातच समर्थांनी तेथे येऊन भिक्षा मागितली. त्वामुळे ती बाई त्यांच्यावरच भडकली व त्यांना उद्देशून म्हणाली, हे गोसावड्या, भिक्षा मागायला तुला लाज कशी नाही वाटत, असे म्हणत तिने आपल्या हातातील शेणाचे पोतेरे समर्थांच्या अंगावर फेकले. त्यामुळे समर्थांचे अंग खराब झाले. मात्र ते त्या बाईवर मुळीच रागावले नाहीत. उलट ते तिला म्हणाले, माई हीच भिक्षा समजून मी ती आनंदाने स्वीकारेन. असे म्हणून ते पोतेरे घेऊन नदीवर गेले आणि नदीच्या खडकावर ते पोतेरे त्यानी स्वच्छ धुवायला सुरुवात केली. जसजसे ते पोतेरे स्वच्छ होऊ लागले. तसतसे इकडे त्या बाईच्या मनाची घालमेल सुरू झाली. कारण तिला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होऊ लागला होता. म्हणून ती स्वतःच समर्थांची माफी मागण्यासाठी बाहेर पडली. समर्थांना शोधत शोधत ती नदीवर गेली. तोपर्यंत समर्थांनी ते पोतेरे -स्वच्छ धुऊन वाळत घाललेले होते व वाळल्यानंतर त्यांनी त्या कापडाच्या वाती करायला सुरुवात केली होती. समर्थांना पाहताच त्या बाईने त्यांच्या पायावर डोके ठेवले व आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली. मात्र समर्थांनी तिला केव्हाच माफ केले होते. ते तिला म्हणाले तुझी 'भिक्षा' खरोखरच मोठी होती, कारण त्याच वातीने श्रीराम व मारुतीरायाची मूर्ती उजळणार आहे. समर्थांचे बोल ऐकून ती बाई धन्य झाली.
Copyright © 2025 | Marathisrushti