नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सकाळी उठल की लोक देवाच्या पाया पडतात आणि मी व्हॉटस्ॲपवर कुणाचा संदेश आला, ग्रुप वर काय चाललय, फेसबुकवर किती जणांनी माझ्या फोटोला लाईक दिले, काय आणि किती कंमेट आल्या हे बघतो. रात्री मोबाईल कितीही वेळ वाया घालवीन पण दिवसभर काम करुन थकलेली आई बोलली बाळा पाय दुखतायत दाबतोस का तर मला झोप येते. आईने छोट काम सांगितल की मला कंटाळा येतो. मला माझ्या अपयशाच खर कारण कळल होत. माझ कंटाळा करण, माझा आळशीपणा, माझ फेसबुक, व्हॉटस्ॲप, युटुब्यच व्यसन, आयुष्यतल्या वेळेचा अपमान, अतिहुशारी, अर्थ नसलेली बडबड. खरच मी आता स्वतःच्या नजरेत एका झटक्यात पडालो, माझी गरजच नाही कशाला जन्माला आलो हाच प्रश्न पडला. खरच घरात बसून असलेल्या मला खरतर घरातून बाहेर हकलल पाहिजे. तर आई बाबांच निस्वार्थ प्रेम मिळतय. कर्जाच्या बोझाखाली वाकलेले आणि लवकरच नोकरीपासून निवृत्त होणारे बाबा कधीच काय बोलले नाही. नको आपला भार आई वडलांना मरुया आपण हाच विचार डोक्यात फिरु लागला.
March 14, 2018

त्याने स्वतःपेक्षा अधिक प्रेम कधीच कोणावर केले नाही अगदी अनामिकावरही नाही… त्याने तिच्या आयुष्यातही कधी ढवळाढवळ केली नाही. तिलाही त्याच्या आयुष्यात कधी ढवळाढवळ करून दिली नाही. यापूर्वी त्याचे जिच्या जिच्यावर प्रेम होते तिच्या आयुष्यातही त्याने कधी ढवळाढवळ केलेली नव्हती. त्याच्या मनात त्याच्याबद्दल यकिंचितही तिरस्कार नव्हता कारण त्याने तेच केले होते जे त्याला हवे होते.
August 27, 2022
गाडीत चढून बसले आणि गाडी सुरू झाली. अजूनही मला विमानात असल्यासारखंच वाटत होतं. कारण आवाज तसाच होता. क्षणभरात त्या गाडीने काय स्पीड घेतला! गाडीची दारे बंद होती आणि एसी चालू होता.
January 6, 2022

रवींद्र ने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ताईच्या डोक्यात खोलवर गाडल्या गेलेल्या गोष्टींना चिथावणी देत होती. पुष्करणी, पाणी, भैरोबा, लहानसा जीव या गोष्टींनी तर तिला आतून पूर्णपणे हादरवून टाकले होते. तिच्या डोळ्यांसमोर एकदम ५० वर्षांपूर्वी च्या घडामोडी जशाच्या तश्या धावू लागल्या.
October 28, 2021
गोमुने किती प्रकारची काम केली, याचं कांही रेकॉर्ड ठेवलं नाही.
असं रेकॉर्ड ठेवलं असतं तर गोमुचं नांव गिनेस बुकमध्ये टाकावं लागलं असतं.
कधी कधी तात्पुरतं यश मिळालं म्हणा किंवा थोडे पैसे हातात आले पण त्याच्या मनासारखं काम अजून झालंच नव्हतं.
गोमुला स्वत:चा कांही बिझिनेस करायचा होता.
April 7, 2022
आज तो माझ्या समोर स्टेशनवर असताना उभा राहिला, कुठे निघालास मी विचारले तेव्हा त्याच्याबरोबरचा भाऊ त्याला म्हणाला ह्याला मुंबई दाखवतो.
April 16, 2021
अठ्ठावन्न वर्षांपूर्वी राज कपूरने ‘संगम’ चित्रपटाची निर्मिती केली.. प्रेमाच्या त्रिकोनाची कहाणी, आपल्या खास शैलीत सादर केली. चित्रपटात स्वित्झर्लंड येथे राज कपूर व वैजयंती माला यांच्यावर एका इंग्लिश गाण्याचे चित्रीकरण केलेलं आहे. हा चित्रपट सुरुवातीला तीन तासांचा होता. त्याला दोन मध्यंतरं होती. यातील सर्वच गाणी अप्रतिम, त्यामुळे हा चित्रपट एकदा पाहून कुणाचंही समाधान होत नाही.. प्रेक्षकांनी अक्षरशः या चित्रपटाची पारायणं केली.. चित्रपट यशस्वी झाला व राज कपूरने, त्या पैशातून पुण्यामध्ये लोणीजवळ, राजबाग खरेदी केली.
July 1, 2022

सर्वांची उधार देण्याची मर्यादा संपली की गोमु एखादी तात्पुरती नोकरी शोधी. पैसे हातात आले की बरीचशी उधारी फेडून टाकी आणि परत उधार घ्यायला मोकळा होई. उधारी करणे हे आपण मराठी माणसे कमीपणाच कां मानतो कुणास ठाऊक! तसं तर म्हणतात की मानव अथवा त्याचा आत्मा हे शरीर निसर्गाकडून उधारच घेतो आणि जातांना परत निसर्गांतच सोडून जातो.
March 8, 2022
जीवनाच्या प्रत्येक टप्प्या टप्प्यावर. गुरूंचाच प्रभाव असतो आपल्याराहण्या आणि वागण्या – बोलण्यावर.
गुरूच दूर करीत असतात जळमटेजमलेली आपल्या बुध्दीवर.
July 12, 2014

महाकवी कालिदास प्रतिष्ठान ही संस्था स्थापन झाली . त्याप्रसंगी सर्वश्री ख्यातनाम व ज्येष्ठ साहित्यिक ,समीक्षक , रंगकर्मी अशी अनेक मंडळी कै. डॉ. द.भी. कुलकर्णी , डॉ. न.म. जोशी , कै. म.श्री. दीक्षित , कै. डॉ. वि.भा. देशपांडे , कै .डॉ. आनंद यादव , डॉ. अशोक कामत , प्रा.सु.ह.जोशी सर , प्रा. द.ता. भोसले सर , प्राचार्य नवलगुंदकर सर , डॉ. सदानंद मोरे , डॉ. रामचंद्र देखणे अशी अनेक ज्येष्ठ साहित्यिक मंडळी तसेच या धायरी , वडगाव पुणे परिसरातील अनेक ज्येष्ठ मंडळी ,सर्व सामाजिक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते .
May 30, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti