(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मित्र व मैत्री

    मित्र अथवा मैत्री हा शब्द ऊच्चारताच आपल्या नजरेसमोर अनेक मित्र व त्यांची मैत्री ऊभी रहाते. मित्र किंवा मैत्री करताना कधीही ऊच्च निच, जात, धर्म स्त्री पुरुष असा विचार मनात येत नाही. किंबहूना मैत्री केली जाते म्हणण्यापेक्षा मैत्री होते असेच म्हणणे जास्त ऊचीत होईल.

      August 8, 2018


  • युरोपायण – पहिला दिवस

    मलेशिया, गेंटींग, थायलंड, पटाया, सींगापूर ही आम्हा मध्यमवार्गीयांच्या स्वप्नातील वारी २००७ मधे उरकली आणि अंतरराष्ट्रीय प्रवासाला चटावलो. शारजा-दुबई तर द्वीवार्षिक वहीवाटीनी आमचीच वाटायला लागलीत. मधेमधे भारतातले बरेचसे भाग पहात पहात जवळपासचे भूतान वगैरेही पादाक्रांत केल. नवीन एखाद्या डेस्टीनेशनचा विचार करता करता, अजुन खूप जग बघायच राह्यल असल तरी अचानक सिकंदर सारखा उगाचच जग जिंकण्याच्या ईर्षेनी पेटुन उठलो आणि पत्नीला सरप्राइज देण्यासाठी आता युरोपवर स्वारी करायची असा मनसुबा जाहीर केला.

      August 18, 2019


  • सायसाखर

    – एसटी थांबली . मी उतरलो . घरी निघालो . रात्र झाली होती . घाटी चढताना मी सहज घराकडे नजर टाकली . आई बॅटरी घेऊन पायरीवर बसली होती . सायसाखरेची वाटी माझी वाट बघत होती …

      November 1, 2021


  • पुस्तक मिटून ठेव

    पुण्याच्या बुधवारपेठेतील भिडे वाड्यात १८४८ मध्ये जोतिराव फुले यांनी मुलींची शाळा उघडली, स्वतंत्रपणे मुलींची शाळा काढणारे ते पहिले भारतीय, त्या काळात पुण्यातला एक एक सनातनी ब्राह्मण म्हणजे ‘आरडीक्स पेक्षा महाभयंकर होता. सनातनी खवळले.

      December 27, 2023


  • भयंकराच्या उंबरठ्यावर – १ : सावध ऐका, पुढल्या हाका !

    अखंड हिंदुस्थानच्या उंबरठ्यावर एक भयंकर संकट , विकराल हसत उभं होतं. महाराज पृथ्वीराज चौहान यांच्या पराक्रमाला , लोकप्रियतेला आणि प्रगतीला थोपविण्यासाठी जयचंदाने निमंत्रण धाडले होते महंमद घोरीला .

      September 1, 2021


  • प्रल्हाद!

    ‘ त्यात काय अवघड आहे?’ हे वाक्य कानावर पडलं आणि आठवणींच्या ढिगाऱ्यातली एक Pdf फाईल मनाच्या मॉनिटरवर अवतीर्ण झाली.

    गोष्ट जुनीच आहे. आमच्या परळीच्या (तेव्हा परळी ‘आमची’ नाही, तर माझी होती!) एका बँकेत मी ‘पासबुक रायटर’ म्हणून टेम्पररी (आमच्या शाम्या त्याला -टेम्परवारी म्हणायचा) लागलो होतो. बँकेचा क्लर्कच्या परीक्षा झाल्या होत्या, नवीन उमेदवार पोस्ट होईपर्यंत मला काम करता येणार होते. असेन तेव्हा वीस बावीस वर्षाचा. गाव छोटस होत, येथेच मी लहानाचा मोठा झालो होतो, शाळा कॉलेज इथलंच.

      February 13, 2026


  • शुर्पणखाची एक सुडकथा

    सौंदर्याचा अभिमान, प्रचंड अहंकार, हट्टीपणा, आणि आवडलेली कोणतीही गोष्ट हस्तगत करण्याची जीद्द हे तीच्या स्वभावांत होते. एक गमतीची गोष्ट म्हणजे तीची नखे पसरट सुपाप्रमाणे होती ( winnow- like nails ). ती तिक्ष्ण होती. म्हणून तीचे टोपण नांव शुर्पणखा

      April 10, 2012


  • शून्यत्व ……

    अनुभव आणि अनुभूती हे शब्द आपण नेहमी ऐकतो अर्थात अनुभूती म्हटले की त्याला अध्यात्मिक टच वगैरे आहे असे मी स्वतः कधीच समजत नाही अर्थात प्रत्येक अनुभव हा अनुभूती देतोच असे नाही कारण अनुभवाची अनुभूती होणे हहे व्यक्तीसापेक्ष आहे. आपण सतत अनेक गोष्टी बघत असतो त्याचा परिणाम आपल्यावर होतोच असा नाही.

      January 12, 2023


  • माझी स्वतःची खरी भूतकथा (संक्षिप्त रूपांतरीत कथा ६)

    यथावकाश मला माझं भुत किंवा भुतं भेटली. आतापर्यंत मी लेखक बेसंट यांना पाठींबा देत होतो पण आता विरोध करतो. आपण त्या बंगल्याला ‘खटमल’ बंगला म्हणू. ज्याची कातडी नरम आहे त्याला डाक बंगल्यात रहायचा अधिकार नाही. त्याने लग्न करावं. तो बंगला जुना, घाणेरडा, दुरूस्ती न केलेला होता. भिंती खराब होत्या, खिडक्या काळ्या पडलेल्या होत्या. तिथे आसपास बरेच कचेरीतले मामुली अधिकारी, अर्थखात्यापासून ते जंगल खात्यापर्यंतचे, रहात पण कुणी गोरा साहेब नव्हता. वयाच्या दुप्पट वांकलेल्या खानसाम्याने हे मला सांगितलं. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा वारा आणि पाऊस होता आणि बाहेरच्या पामच्या झाडांचा हाडे आपटावीत तसा आवाज येत होता. माझं आगमन खानसाम्याला आवडलं नसावं.

      March 27, 2022


  • पिशव्या बघायची खोड

    लंडनच्या बीबीसीत नसतील एवढया सनसनाटी बातम्या आडगेवाडीच्या देवानंद हेअर कटींग सलूनमध्ये चर्चेत असायच्या. गावातली कुठलीही खबर या ठिकाणी लागली नाही असे कधीच व्हायचे नाही. बारा तास इथे लोकांचा राबता असायचा. इलेक्शनची सभा, चावडीची मिटींग, बुडीत सोसायटीची चर्चा चार लोकांच्यात इथेच व्हायची. सलूनमध्ये येउुन बसायला कुणालाही मज्जाव नव्हता. उलट कोण आला की नारु हातातल्या धारदार शस्त्रासह नमस्कार घालून त्याचे स्वागतच करायचा. 

      July 17, 2018