(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तमसो मा ज्योतिर्गमय !

    आज खरोखरच कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अंधार दाटला आहे. आपले पुढे काय होईल आणि कधी व केव्हा सर्व पूर्ववत होईल अशाच अंधिकारमय विचारात सगळेच जण आहेत. दिवाळी अजून लांब आहे पण आता जर दिवाळी असती तरी या अवस्थेत आणि असेल त्या परिस्थितीत प्रत्येकाने घरासमोर दारासमोर किंवा देव्हाऱ्यात दिवा लावला नसता का??

      June 3, 2021


  • घास घास घेणे

    लहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, ती खाण्यामध्यें रेंगाळतात. लहान बालकांना जेवण भरविणे ही अत्यंत आवघड कला असते. सहनशिलता फक्त आईला समजलेली दिसते. मुल उपाशी राहू नये म्हणून ती सतत त्याच्या पाठीमागे राहून ते भरविते. आईच्या मुलाना जेवण खावू घालण्याच्या अनेक युक्त्या असतात. येनकेन प्रकारे घास भरवणे व त्याच्या पोटांत तो जाईल याचा तीचा प्रयत्न असतो.

    जेऊ घालताना गोष्टी सांगणे, कड्यावर घेवून घरभर, गच्चीवर वा अंगणात फिरत त्याला भरविणे, तुला जेवणानंतर चॉकलेट वा बिस्कीट देईन ही लालूच लावणे, खेळणी देणे, किंवा घाक दाखविणे, रागावणे, अशा अनेक प्रकारे निरनिराळ्या युक्या ती आयोजीत असते. मला येक युक्ती खुपच आवडली. आई मुलाला खिडकीबाहेर चिमणी, कावळा वा पक्षी दाखविते. ' तो बघ कावळा. किती उंच गेला. त्या झाडावर तो बसला ' मुल उत्सुकतेने व बारकाईने त्याचे निरीक्ष करते. मुलाचे लक्ष त्या पक्षाकडे लागते. हीच वेळ म्हणजे आपला मुलाचा लक्षवेध आई नेमका टीपते. ती तो क्षण साधत मुलाला घास भरवते. मुल देखील आपला हट्ट, लहरीपणा, रेंगाळू वृत्ती बाजूला ठेऊन, तोंडाचा आ करीत तोंड ऊघडते. घास भरविला जाऊन तो खाल्ला वा गिळला जातो. अर्थात ही क्रिया एक प्रकारे आपोआप होवून जाते. हालाच पुस्तकांत Distraction of Mind, method of feeding अर्थात लक्ष विचलीत करुन घास भरवीणे म्हणतात. येथे मात्र लक्ष्य विचलीत करण्यासाठी निरनिराळे पक्षी, प्राणी, वा पदार्थ ह्यांचा कल्पकतेने उपयोग करावा लागतो.

    आजकालचे वैद्यकिय बालविकास शास्त्र अशा पद्धतीना अयोग्य समजतात. परंतु ह्या गोष्टी कालांतरापासून चालत आलेल्या आहेत. घास भरविण्याच्या पद्धतीलाच विरोध केला गेला आहे. जेवणाचे ताट मुलाच्या समोर ठेवा. ते मुल आपल्या हाताने व मनानेच खाईल. ठराविक वेळ त्याच्या जेवण्यास द्या. मुलगा खेळतो, रेंगाळतो, जेवत नाही. खाणयाच्या पदार्थांची सांडलोंड करतो. तुम्ही तुमचे मन घट्ट करा. व ठरविलेली वेळ होताच त्याचे ताट उचलून ठेवा. लगेच त्यास देऊ नका. कोणतेही भाष्य करु नका. ठरलेल्या वेळीच पुन्हा त्याला जेवनाचे ताट द्या. कोणतेही मुल उपाशी रहात नसते. तुमच्या अशाच वागणूकीने त्याला जेवणाची जाणीव होईल. आणि मुल सहजतेने जेवण घेईल. जेवणाला एक नैसर्गिक प्रक्रिया समजा. तुम्ही त्याला जेवढे खाऊ घालण्याचे प्रयत्न कराल, आग्रही बनाल, मुल तेवढेच रेंगाळते. हट्टीपणा करते. ह्यालाच Attention Seeking Device म्हणतात. आपल्याकडे ह्यात मुले जींकतात व पालक हारतात.

    मला अचानक माझ्या बालपणीची गोष्ट आठवली. एकत्र कुटूंब पद्धत होती. काका मामा यांची सर्व मुले एकत्र जेवण्यासाठी बसत होतो. जेवताना एक खेळ खेळत असू. प्रत्येकाने आपल्या ताटांत एका बाजूला एक घास काढून ठेवायचा. जेवण करता करता इतरांकडे लक्ष ठेवायचे. कुणाचे लक्ष नाही हे बघून तो बाजूस ठेवलेला घास चटकन खाऊन टाकायचा. इतरांचे लक्ष चुकवून आपला बाजूस ठेवलेला घास खाण्यात जो सफल होईल तो जींकला. ह्यात तुम्ही जिंकण्याच्या प्रयत्यांत तुमचे जेवण चालू ठेवता. कारण तुम्ही सरळ

    जेवत आहांत हे इतराना भासविणे, त्याना फसवणे, व आपला घास त्याच जेवणांच्या प्रक्रियेत खावून टाकणे ही कला ठरते. खेळ छोटासा, परंतु मनाला एक वेगळीच दिशा देत जेवण पू्र्ण केले जायचे. हा खेळ म्हणजे जेवण्यामधील Distraction Method च नव्हे कां ? आम्ही त्याला ' घास घास घेणे ' म्हणत असू.

    --डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 25, 2016


  • युगांतर – भाग ६

    सुमंत जयंत परचुरे. 

    सकाळचे ७ वाजले तरी रवींद्र अजून उठला नाही हे पाहून ताईने खोलीत जाऊन हाक मारली, तशी “उठतो ग” असे उत्तर तिला ऐकायला आले. आई ला जाऊन ३ दिवस झाले होते. ताई आणि तिचे मिस्टर दिवस कार्य होई पर्यंत तिथेच राहणार होते. दोन्ही काका परत मुंबई ला गेले होते ते दहाव्याला येतो असे सांगूनच. मावसभाऊ बाजूच्या गावातच असल्याने त्याने २ दिवस चक्कर मारली होती. पूर्वी गावात दिवस कार्य असले की तेराव्या दिवशी गाव जेवायचे, पण आता तसे राहिले नव्हते, परिस्थिती बदलली होती. वरची पाखाडी, खालची पाखाडी आता विभागली गेली होती आणि त्यात सुद्धा गावात शिल्लक अशी किती लोकं होती. अर्ध्याहून जास्त शहरात शिकायला, नोकरीला स्थायिक, काही म्हातारी माणसं आणि जी काही तरुण शिल्लक होती त्यातली अर्धी पर्यटनाच्या नादाला लागून दारूच्या नशेत गाडली गेली होती. त्यामुळे आईच्या दिवस कार्याला काही गाव जेवणार नाही हे रवींद्र ला ठाऊक होते.

      October 27, 2021


  • जादुई नगरीत (माझी लंडनवारी – 15)

    तेजस्वी कोहिनूर आणि मोहक थेम्स ह्यांच्या आठवणीतच प्रसन्न सकाळ उजाडली. फ्रेश होवून निलेशच्या रूम मध्ये आले. उमेशसुद्धा माझ्या फ्लॅटवरून तोपर्यंत आला होता. चहा नाश्ता करताना पुढचं प्लॅनिंग सुरू झालं.

      January 13, 2022


  • बांड मस… (बोलीभाषेतील लघु कथा)

    सोमवारी रातीच्यान जरा गडबड होती घरात. मोठ्या म्हशीला डब्बल भरडा घाल, उरल्या सुरल्या शिळ्या भाकरी मोडून घाल अशी धावपळ गंवडीमामा करत होता. शेलका चारा फक्त त्या मोठ्या म्हशीला घातला व उरलेल्या खंडोरभर 8 जनावरांसनी नुसतं पिंजरावर बसविलं.. ह्या सर्व धावपळीच्या मागच गम्य मला त्या रातीला उमगलचं नाही. त्यानंतर असच सहज फेरी मारून येवूया म्हणून दोन दिवसांनंतर शशीदाच्या घरी गेलो. जरा घरी निराशमय वातावरण होतं. काय भानगड काय समजत नव्हती.

    मग फांगसूनच जरा शशीदाच्या आईला मी विचारलं ‘काय झालं आज घर जरा शांतच दिसतयं’..

      June 18, 2019


  • सावज

    सन सेट ‘पाहण्यासाठी साक्षी रिसोर्ट मधून निघाली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते . रिसॉर्ट पासून समुद्र किनारा फक्त दोन किलोमीटर होता . संध्याकाळच्या थंड वातावरणात बहुतेक पर्यटक पायीच समुद्रा पर्यंत जात . रिसॉर्ट समोरचा छोटासा रस्ता थेट समुद्राला जाऊन भिडत होता . मध्ये खूप झाडी होती पण रात्री सात -आठ पर्यंत माणसांची वर्दळ चालू असे . पाचव्या मजल्यावरून साक्षी ग्राउंड फ्लोअरला अली तेव्हा तिच्या लक्षात आले कि मोबाईल रूम मधेच विसरलाय . ती परत लिफ्ट कडे गेली तर लिफ्ट बंद होती . लाईट गुल झाले होते ! . आता पुन्हा पाच मजले चढायचे आणि उतरायचे तिच्या जीवावर आले .’ तासा दीड तासांचा तर प्रश्न होता . साडे सहाला जरी परत निघालोतरी सात सव्वासात पर्यंत रिसॉर्टला परतु . मग निवांत ग्यालरीत बसून कोल्डकॉफी एन्जॉय करू . इथली कॉफी मात्र भन्नाट असते !’ असा काहीसा विचार करत साक्षी झाडीच्या रस्त्याला लागली .

      March 2, 2018


  • भातुकलीच्या खेळामधली

    भानूचं खरं काम पहायचं असेल तर ‘श्री ४२०’, ‘प्यासा’, ‘चौदहवी का चांद’, ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘आम्रपाली’ हे चित्रपट पहावे लागतील. ‘आम्रपाली’ मधील वैजयंतीमालाला दिलेली पौराणिक वेशभूषा कालातीत आहे.

      December 18, 2021


  • छंद

    बरेच नानाविध छंद अनेकजण जोपासतात अन् त्याच छंदांना आपल्या जगण्याचं , उत्पन्नाचं साधन बनवतात. जो छंद आपण जोपासतोय त्याच क्षेत्रात काहीतरी करायला मिळणं याहून सुंदर अनुभव, समाधान आणि आनंद दुसरा कुठलाच नाही.

      May 15, 2019


  • भिंतीवरचा तिचा फोटो 

    कालची रात्र प्रचंड अस्वस्थतेत गेलेली .
    मन सुन्न आणि मेंदू बधीर अवस्थेत गेलेला .
    डिलीट केल्यानंतरसुद्धा अजूनही
    व्हिडिओतले ते दृश्य डोळ्यांसमोर सारखं उभं राहतंय .
    भयभीत करणारं .
    हृदयाचे ठोके थांबवणारं .
    नजरेत अंगार निर्माण करणारं.

      December 18, 2022


  • प्रारब्ध – भाग 1

    खंडाळ्यासारख्या प्रसिद्ध हिलस्टेशनमध्ये एका अत्यंत सुंदर जागी, उंच डोंगरमाथ्यावर, एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूस राजमाचीचा उंच डोंगर, समोर हिरवीगार दरी आणि चार-पाच एकरांचा विस्तीर्ण परिसर आणि त्यात एक आलिशान बंगला, अशी ही सगळी मालमत्ता कधी स्वप्नातही माझी होईल असे मला कधी वाटले नाही. कसे वाटणार? हे कसे घडले? त्याचीच तर ही गोष्ट आहे.

    मी एक साधा मध्यमवर्गीय निवृत्तीनाथ! म्हणजे एक निवृत्त बँक कर्मचारी, आमच्या बँकेत निवृत्त होणाऱ्यांना निवृत्तीनाथ म्हणावयाची पद्धत. अशा आजपर्यंत निवृत्त झालेल्यात माझा नंबर होता १०८ म्हणून मला सगळे म्हणतात श्री श्री १०८ निवृत्तीनाथ! जसे जैन साधू असतात ना, श्री श्री १००८ स्वामी अमुकतमुक वगैरे, तसे. म्हणजे मी काही तसा कोणी साधू बिधू नाही बरं का.

      July 5, 2022