नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
चार दिवसांची “दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत” किंवा “रथसप्तमीपर्यंत संक्रांत” साजरी करणारा “उत्सवप्रिय” असा मनुष्य प्राणी .. आणि या सणांच्या मंदियाळीतला बरेच दिवस म्हणजे साधारण दोन-अडीच महीने चालणारा सण म्हणजे “आंब्यांचा सण”. आंबे खाणं ही गोष्ट सुद्धा सोहळ्यासारखी साजरी करतो आपण .. म्हणून आंब्यांचा सुद्धा “सण” !!!……. हां ss .. आता त्याची सुरुवात ही प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार, आवडी-निवडी प्रमाणे वेगवेगळ्या वेळेस होते
May 24, 2021
परवा टी.व्ही. वर 'तानी' सिनेमा पहिला. त्यातील सायकल रिक्षा पाहून मला माझ्या परळीतीलवास्तव्याची आठवण झाली. चाळीस -पन्नास वर्षापूर्वीचा तो काळ होता. त्याकाळी 'पब्लिक ट्रांस्पोर्ट ' साठी देवांनी दिलेले दोन पाय किंवा सायकल रिक्षा असायची.फटफटी, जीप हि खूपच श्रीमंती वहन. सामान्यांसाठी विरळच!
या सायकलरिक्षा फक्त दोन आसनी असत. सामान, लहान पोर याना 'पॅसेंजर'च्या पायाशी जागा असे. रिक्षावाले आपापल्या रिक्षांना खूप सजवायचे. हॅण्डलला रंगीत ग्रीपर, त्या ग्रीपरला झिरमाळ्या, प्रत्यकचाकाला नायोलॉनचे गजरे, टपाल चमचमणाऱ्या टिकल्यांच्या माळा, काही विचारू नका! अश्या सजवलेल्या रिक्षात बसलेकी, आपण कोणी -राजे-महाराजे असल्या सारखे वाटायचे!
अब्दुल, असाच एका 'सजी-सवरी ' रिक्षाचा चालक. कळकट चौकटीघराची लुंगी, मळका पांढरासदरा, वेडी-वाकडी वाढलेली, विरळ काळ्या -पांढऱ्या केसांची टोकदार दाढी, बंडाच्या पायित्र्यातले करडे-वरडे डोईवर केस, त्यांना पाय बंध घालण्यासाठी कपाळा लाबांधलेलं लाल/हिरव फडकं! असलं पाच साडेपाच फुटी काटकुळ ध्यान! उन्हानं रापलेल्या चेहऱ्यावर गरिबी म्हणावे कि लाचारी असले भाव!
मी नुकताच बँकेत लागलो तेव्हा, त्याची 'ओळख' झाली. तसा मी परळीतच लहानाचा मोठा झालो. त्याला बरेचदा रिक्षा ओढताना पहिले होते.
" साब, एक रिक्षा लेनी है." एक दिवस तो बँकेत येऊन मलाम्हणाला.
"अभी एक है ना तेरे पास?"
" हां, है पर भाडे से चलता हू."
"फिर?"
" कर्जा, देवना! खुद् कि लुंगा! भाडा जाकु कुच्छीच नय बचता." त्याचा आवाज खूप लाचार अन दिन होता.
मी त्याला मॅनेजर समोर उभा केला. आर्थिक द्रुष्ट्या अति गरिबाना साठी DIR नामक योजने खाली आमच्या मॅनेजरने त्याला केवळ चार टक्के व्याजदराने रिक्षा मंजूरकेली. दोन दिवसांनी अजून दोन-चार भाऊबंद घेऊन आला!
"अब्दुल, ये क्या?"मॅनेजर भडकला.
"इंकू, भी रिक्षा देव ना!"
"क्यू, सारी परली मी रिक्षा बाटनी है क्या?"
"ये भी बहुत गरीब है! सच्ची! दुवा देंगे साब! भुक्को मारलेले है ये लोंगा! देव ना साब!" अजिजीचा तो कडेलोट होता. आमचा मॅनेजर 'रहेम दिलाचा'. सब को मंजुरी दे दि!
आठ - दहा दिवस हे पाच सहा जणांचं टोळकं गायब झालं. बहुदा रिक्षा प्रकरण सम्पले असावे. मी हि विसरून गेलो. पण कसले काय? एका सोमवारी हे टोळकं रिक्षाच्या कोटेशनसहहजर! कोटेशन पाहून मी हादरलोच. सारी कोटेशन्स हैदराबादची! परळीत रिक्षाचीचार दुकाने होती! मग हैद्राबाद का? काही काळे बरे तर नसेल? त्यांच्या हेतू बद्दल मनात शंका आलीच!
"ऐसा नय चलेगा! हैद्राबाद का कोटेशन क्यू? परलीमे दुकान है ना?"
"साब मेहरबानी करो, बडीमुश्किलसे ये कोटेशन मिले है, येच लेव ना. " तो पुन्हा पुन्हा लाचारीने विनवीत होता.
"मै तो ना करू! " मी हि हट्टाला पेटलो.
तो साहेबाकडे गेला. त्याने साहेबाला काय सांगितले, माहित नाही पण दहा मिनिटात केबिन बाहेर आला . मला ते कोटेशन दिले. 'pay by DD on Haydrabad " या कोटेशन वरील शेरा मी पहात राहिलो!
सारी कागद पत्रांची पूर्तता, लोन documents, सह्या, सगळे सोपस्कार करून दोन दिवसांत अब्दुल&कम्पनीला हैदराबादचे DD दिले. त्यानंतर आमचा साहेब आठवड्याभरा साठी रजेवर गेला.
पाच सहा दिवस झाले तरी अब्दुल्यागायबच! तडक हैद्राबाद शाखेला फोन लावला. सगळे DD पेड झाले होते! बोंबला! पंधराशे गुणिले पाच, साडेसात हजारांची बँकेला चुना लागला! (तेव्हा साडेसात हजार बरीच रक्कम होती!).गरीब लाचार तोंडाने अबदुल्याने गंडवले ! काय बनेल माणूस? असेलच काही काही विचार मनात घोंगावत राहिले. त्यात साहेब सुट्टीवर, काय करावे कळेना. आज मंगळवार बँक सुटल्यावर, अब्दुल्याच्या घरी जायचे ठरवले, तेव्हा मनाला कोठे चैन पडली. पण कामाच्या रगाड्यातजमले नाही.
बुधवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान मी बँकेत आलो. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. सकाळच्या कोवळ्या उन्हात, नव्या कोऱ्या पाच रिक्षा ओळीने उभ्या होत्या! व त्यांची हॅन्डल धरून मलूल चेहऱ्यांची त्यांची मालक हि उभे होते!
"अब्दुल पावत्या आणल्यास का?" मी विचारले
" हा, साब लाया हू."
मी खुर्चीत बस्ताना त्याच्या हातातून पावत्या घेतल्या. त्या घेताना त्याच्या हाताला हात लागला. चटकाचबसला! मानवी देह इतका तापू शकतो?!
"तेरे कु, तो तेज बुखार है !"
" हा, थोडा है, हम सबकुच है!"
"मतलब ?"
त्यानंतर त्याने सांगितलेली कथा (कि व्यथा ) अशी होती. हैद्राबादला रिक्षा दोनशे रुपयांनी स्वस्त मिळतात, म्हणून तेथून घेतल्या! रेल्वे खर्चा साठी, हि मंडळी चार दिवस हमाली करत होती! शिवाय जमेल तसे पै -पै जमवत होती! हैद्राबादला रिक्षा घेतल्या नंतर, तेथेच फिटिंग करून घेतली होती. आणि ..... आणि ... त्या तेथूनचालवत सुमारे चारशे कि. मी. परळी पर्यंत आणल्या होत्या! सहा दिवस लागले होते! शेवटच्या दोन दिवसात पैसे संपले! उपाशी पोटी उन्हात .... रिक्षाआणल्या! सहाजिकच देहाने या अत्याचारा विरुद्ध, तापाच्या रूपाने निषेध व्यक्त केला!
मला मेल्याहून मेल्या सारखे झाले! त्यांच्या बद्दल मी, इतका का शंकेखोर झालो? थोडा सुद्धा धीर धरला नाही. गुन्हेगार ठरवून मोकळा झालो होतो! त्यांच्या प्रामाणिक कष्टाचा, एक प्रकारे मी अपमानच केला होता!
आज पर्यंत मी अनेक दाहक प्रसंगांना सामोरे गेलो आहे. पण अब्दुलच्या ओझरत्या स्पर्शाने जो 'चटका' दिला त्याची दाहकता, अजूनही मनात जिवंत आहे. प्रमोशनने बदली झाली, परळीचे पाश तुटले, अब्दुल हि दुरावला. कधी कधी असे वाटते कि, असेच उठून परळीस जावे, रेल्वेतून उतरून, अब्दुलच्या 'सजी -सवरी ' रिक्षात बसून ', मंदिर चलो ' म्हणावे! पण क्षणात लक्षात येते कि, आज अब्दुल नसेल! त्याची ती रिक्षा हि नसेल! मग ...मग एकदम रिकामं, पोकळ वाटायला लागत! काहीतरी कायमच गमावल्या सारखं उदास वाटत रहात!
-- सु र कुलकर्णी
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .
August 4, 2019
आषाढी एकादशीच्या दिवशी शाळेतील लहान मुले. मुली आणि पालखी सोहळा केला गेला होता. दरवर्षीच करते ती. छोटेसेच विठ्ठल रखुमाई. आणि वारकरी होते. त्यांनी वारकऱ्यांचा पोषाख केला होता. मुलींनी डोक्यावर तुळशीचे वृंदावन आणि मुलांनी हातात पताके व गळ्यात टाळ घालून ठेक्यात वाजवत नाचत अगदी तल्लीन होऊन परिसरात मोकळे पणाने जात होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला माणसं उभी होती. लहान पालखीला व वारकऱ्यांच्या पाया पडत होते. त्यांना पाहून मला वाटले होते की या छोट्यांना ना प्रपंचाची चिंता ना देवाजवळ काही मागणे. खरी तर हीच वारी व हीच खरी भावभक्ती.
June 12, 2022
माझा मित्र म्हणाला होता- ” अरे, एकच प्याला जुनं झालं पण कोणी दारू पिणं सोडलं का?” सगळंच मेक बिलिव्ह !
May 22, 2021
दैनंदिन जीवन जगताना काही वेगळं काम केल्यास त्याचा बडेजाव सगळ्यांसमोर करून काही होत नाही.
August 30, 2021

अशा आजीबाई आणि आजोबा आज बऱ्याच घरात बंदिस्त आहेत. पूर्णवेळ नोकर मिळत नाहीत, ठेवता येत नाहीत, परवडत नाहीत, मग अशा वृद्धांना घरात ठेवून, कुलूप लावून घराबाहेर पडणारे महाभाग खूप आहेत.
June 16, 2022
एका सभागृहामध्ये सत्संगचा कार्यक्रम होता. मी त्याचा आस्वाद घेण्यसाठी गेलो होतो. हालके हालके श्रोते जमू लागले. प्रवेश दारावर मी आलो. अचानक माझी नजर एका छोट्या किड्यावर पडली. दाराच्या बाजूस तो पडला होता. त्याच्या हालचाली वरून त्याला दुखापत झालेली असावी असे वाटले. त्याची तगमग चालू असून तो उलटा पडलेला होता. त्याच्या अवस्थे विषयी भूतदया वाटली. क्षणात एक विचार आला की हा किडा दाराजवळ पडलेला आहे, लोकांची जा ये चालू आहे. दुर्दैवाने कुणाच्यातरी पायंदळी तो चिरडला जाईल. मी त्याला एका काडीवर उचलून बागेतल्या एका छोट्या झाडावर नेऊन ठेवले. मानसिक समाधान वाटले, की आपण त्याला त्यावेळी तरी मृत्यूपासून दूर नेले. पण केवळ कांही क्षणच गेले असतील, एक पक्षी तेथे झेपावून आला व त्याने त्या किड्याला अलगद उचलून नेले. एका जीवाचा अंत होताना दिसला. माझे मन खंतावले. माझा तर्काधीष्टीत हिशोब चूक वा बरोबर? समाधान हे देखील एक मानसिक शास्त्र असते. निर्माण झालेली परिस्थिती माणूस बदलू शकत नाही. परंतु त्याला वेगळा मार्ग देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या विचारांचे जे स्तर असतील त्याप्रमाणे तो योजना आखण्याचा विचार करतो. निसर्गाला मात्र तसेच अभिप्रेत असेल असे नाही. निसर्ग आपली चाल त्याच्याच पद्धतीने चालू ठेवतो. येथेच वैचरिक विविधता निर्माण होते. काळाच्या हाती एक दंडक (काठी) असतो असे म्हणतात . ज्याच्या एका टोकावर स्थळ व दुसऱ्या टोकावर वेळ ही कोरलेली असते. जेंव्हा एक टोक स्थळ निर्देश करते, त्याच वेळी दुसरे टोक वेळेची चाहूल टिपते. जीवनाच्या अंतिम मार्गावर स्थळ आणि वेळ यांची विधात्याने नोंद केलेली असते. म्हणूनच ते प्रत्येकाला अनिश्चित घटना परंतु निश्चत सत्याकडे नेते. काळाचा दंडक स्थळ व वेळ ह्याची जेथे गांठ पडेल तेथेच आघात करतो.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 5, 2020
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कार्यालयात घडणाऱ्या घटनांमुळे मी भयंकर तणावात होतो. कश्यात ही मन लागत नव्हते. प्रचंड उन्हाळ्यामुळे प्रकृती वर-खाली होत होती. निराशा मनात घर करू लागली होती. अचानक ती चिमुकली परी माझ्या आयुष्यात आली आणि सर्वच बदलले. गेल्या महिन्याचीच गोष्ट, संध्याकाळी घरी आलो. उन्हाळा असल्यामुळे सांयकाळी सात वाजता ही भरपूर उजेड होता. तसे म्हणाल तर परी आमच्या शेजारीच राहते. आपल्या आई सोबत ती पहिल्यांदाच घरी आली होती. मला पाहताच त्या चिमुकलीने दादा (आजोबा) म्हणून हाक मारली. का कुणास ठाऊक. कदाचित! गतजन्मीचे ऋणानुबंध असतील. गंमत म्हणून तिला विचारले, अपने दादा के पास आओगी. सहजा-सहजी कुणाकडे न जाणारी ती परी पटकन माझ्या कडेवर आली. तिच्या आईला ही आश्चर्य वाटले.
आजकाल दररोज संध्याकाळ सात- आठच्या सुमारास मी कधी ही घरी पोहचतो. मी घरी पोहचल्याच्या १५-२० मिनिटातच तिची दारावर थाप ऐकू येते. मला ही आश्चर्य वाटते, परीला कसे कळते मी घरी पोहचलो ते. दार उघडल्या बरोबर आपल्या लटपटत्या पायांनी दुडदुड धावत दादा-दादा म्हणत सरळ माझ्या अंगावर येऊन धड्कते. तिच्या पायातल्या पैजणांच्या रुणझुण आवाज ऐकल्यावर, माझ्या शरीरात ही एक चैतन्य संचारते. दिवसभराचा थकवा आणि तणाव क्षणात दूर होतो. माझा हात पकडून लटपटत जिने चढत मला गच्ची वर घेऊन जाते. एकदा गच्ची पोहचल्यावर आमचा चोर-शिपायाचा खेळ सुरु होतो. दमल्यावर पुन्हा आम्ही जोडी खाली येते. तिच्या साठी खास काजू आणून ठेवले आहे. ते काजू कुठल्या डब्ब्यात आहे. तिला पक्के ठाऊक झाले आहे. दादा खाऊ (तिच्या बरोबर मी मराठीतच बोलतो. आणि तिला कळते ही). डब्बा तिच्या जवळ दिल्यावर मोजून ४-५ काजू आपल्या हाताने काढून मला देते. नखरेल एवढी कि एक-एक करून काजू तिला भरवावा लागतो. तीही गुणी मुलासारखे शांतीने काजू खाते. पण शेवटचा काजू तिच्या तोंडात भरवताना न चुकता ती खट्याळ, शैतान आपल्या सळसळत्या दातांनी कडकडून चावा घेते. तिच्याकडे डोळे वटारून बघितल्यावर, आपले डोळे बंद करून, नाक मुरडीत नुकतेच निघालेले दात दाखवत इतक्या जोरात हसते. काय म्हणावे, तिला रागवताच येत नाही. आजकाल तर परीने माझ्या शरीरावरच कब्जा केला आहे असे म्हंटले तरी गैर नाही. कधी पोटावर बसून तबला वाजवते, तर कधी पाठीवर चढून जोरात केस ओढते. रागवल्या बरोबर तिचे खट्याळ मुली सारखे हसणे. संध्याकाळचा तासभराचा वेळ कसा निघून जातो कळतच नाही. (त्या मुळे आजकाल लिहायला ही वेळ मिळत नाही).
गेल्या रविवारी सकाळी भुरका-भुरका पाऊस सुरु होता. नेहमीप्रमाणे आमची जोडी गच्ची वर पोहचली. परी प्रथमच वादळाने भरलेले आकाश पाहत होती. आकाशाकडे आश्चर्याने पाहत, आपल्या इवल्याशा हातात पावसाच्या छोट्या-छोट्या थेम्बाना गोळा करत आनंदाने खिदळू लागली. माझ्या अवती-भवती पाय जमिनीवर आदळत परी नृत्य करू लागली. तिच्या पैंजणाचा रुणझुण आवाज, त्यात पावसाचा हलका मृदू स्वर. स्वर्गीय दृश्य होते. तिचे ते नृत्य पाहून मोराला ही लाज वाटली असती. खरंच! पाऊस आल्याबरोबर, सर्व सृष्टी आनंदित होते. सर्वत्र चैतन्याचा संचार होतो. परी ही त्याला अपवाद कशी ठरणार. पावसाचा जोर थोडा वाढला. मी परीला कडेवर उचलले, आणि म्हणालो परी चला खाली, जास्त वेळ पावसात भिजलो आणि तुला सर्दी पडसे झाले तर तुझी ममा मला मारेल. ममा मारेल, हे शब्द ऐकल्यावर, ती इतक्या जोरात हसली कि काय सांगू, कदाचित कल्पना करत असेल, ममा, दादाला मारणार, कसे दृश्य असेल ते.
कधी कधी मला वाटते, निराशाच्या गर्तेतून मला बाहेर काढण्यासाठीच तर देवाने परी बरोबर माझी भेट घडविली असेल. एखाद दिवस जर ती घरी आली नाही तर माझे मन बैचैन होऊन जाते. पण काही ही म्हणा, तिच्या संगतीत आजकाल माझा वेळ मस्त जातो.
June 27, 2015
सन सेट ‘पाहण्यासाठी साक्षी रिसोर्ट मधून निघाली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते . रिसॉर्ट पासून समुद्र किनारा फक्त दोन किलोमीटर होता . संध्याकाळच्या थंड वातावरणात बहुतेक पर्यटक पायीच समुद्रा पर्यंत जात . रिसॉर्ट समोरचा छोटासा रस्ता थेट समुद्राला जाऊन भिडत होता . मध्ये खूप झाडी होती पण रात्री सात -आठ पर्यंत माणसांची वर्दळ चालू असे . पाचव्या मजल्यावरून साक्षी ग्राउंड फ्लोअरला अली तेव्हा तिच्या लक्षात आले कि मोबाईल रूम मधेच विसरलाय . ती परत लिफ्ट कडे गेली तर लिफ्ट बंद होती . लाईट गुल झाले होते ! . आता पुन्हा पाच मजले चढायचे आणि उतरायचे तिच्या जीवावर आले .’ तासा दीड तासांचा तर प्रश्न होता . साडे सहाला जरी परत निघालोतरी सात सव्वासात पर्यंत रिसॉर्टला परतु . मग निवांत ग्यालरीत बसून कोल्डकॉफी एन्जॉय करू . इथली कॉफी मात्र भन्नाट असते !’ असा काहीसा विचार करत साक्षी झाडीच्या रस्त्याला लागली .
March 2, 2018
November 21, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti