(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गंगेच्या उगमपाशी गोमुख – भाग २

    म्हणजे गंगा नावाचा द्रवरूप प्रवाह म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. महापातकीचाही उद्धार करण्यासाठी स्वयं कृपाळू परमेश्वराने पुण्यजलाच्या रूपात पृथ्वीवर अवतार धारण केला आहे, अशा शब्दात गंगेची महती सांगितली आहे.

      August 24, 2022


  • सफर लंडनची

    माझ्या ७५०व्या कार्यक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. अनेक मोठ्या वर्तमानपत्रांनी या कार्यक्रमाची दखल घेतली. डॉ. आशा मंडपे यांनी टाईम्स ऑफ इंडियामध्ये ‘कोहिनूर ऑफ थाने’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला. त्या स्वतः उत्तम व्हायोलिन वादक असल्याने त्यांना गाण्याची उत्तम जाण आहे. अशा व्यक्तीने पाठ थोपटल्यास विशेष आनंद होतो.

      August 7, 2022


  • मांजरीच्या गळ्यात घंटी/एक अयशस्वी प्रयत्न

    मांजरीच्या गळ्यात घंटी बांधण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अयशस्वी झाला होता. सहज लक्ष गेल त्या घंटीवर ‘लोकपाल’ असे शब्द कोरलेले होते. एक अयशस्वी प्रयत्न

      January 26, 2012


  • एक सांगीतिक प्रवास

    “मुक्काम पोस्ट १०००”  या माझ्या – ‘स्वर’ प्रवासाच्या निमित्ताने माझी पत्नी सौ प्रियांका जोशी यांनी लिहिलेली ही कविता… हे तिचं मनोगतच…

      July 3, 2022


  • जन्म-मृत्युचे चक्र

    खेळाच्या एका मैदानावर कोपऱ्यात बसलो होतो. समोर काहीं मुलांचे खेळ चालू होते. ते बघण्यात मी स्वतःची करमणूक करीत होतो. अचानक माझे लक्ष्य शेजारी गेले. बऱ्याच मुंग्यांची तेथे जा ये चालू होती. कदाचित् जवळपास कांहीतरी त्यांचे खाद्य पदार्थ पडलेले असतील. म्हणून ती मुंग्यांची वर्दळ असावी.
    माझ्या विचारांना एकदम खंड पडली, ती एका मुंगीने माझ्या हाताला कडकडून चावा घेतल्यामुळे. वेदना झाल्या व मी दुसऱ्या हाताने तीला मारले. मेलेली मुंगी मी झटकून टाकली. मी त्या मेलेल्या मुंगीकडे बघत होतो. तीच्याजवळ एक दुसरी मुंगी आली. नंतर तीसरी. बघता बघता बऱ्यांच मुंग्या निरनीराळ्या मार्गाने तेथे जमल्या. सर्वजणींची हलचाल त्या मेलेल्या मुंगीभोवती होत होती. मुंग्यांचा आपसातील संवाद, मृतमुंगीला स्पर्ष करणे, कदाचित् हूंगणे, तिच्या अवयवाचा लचका तोडणे, तीला तेथून हलविण्याचा प्रयत्न करणे. अशा अनेक लहानसहान गोष्टी होत होत्या. सर्वांचा अर्थ वा उद्देश समजणे, ह्याचे अकलन होत नव्हते. यामागची निसर्ग योजना, काय असावी हे कळले नाही.

    हां एक मात्र लक्षात आले. ज्या मुंगीला मारले व टाकले होते, ती मृत होता क्षणीच कोणती तरी प्रक्रिया सुरु झाली. कदाचित् एखादी गंध निर्मीती असेल, की ज्याच्या पसरण्याने संबंधीत जीवजंतूना त्याचे चटकन आकलन व्हावे. तो सजीव प्राणी मृत झाला, ह्याची सुचना मिळावी. त्या मृत देहावर निसर्ग प्रेरीत, वा योजीत सोपस्कार व्हावे. ह्याच साऱ्यांचा उद्देश फक्त एकच वाटला. आणि तो म्हणजे मृत झालेल्या देहाचे विश्लेषन Analysis होऊन त्याच्यामधल्या घटक पदार्थाचे पुनरुजीवन Recycling process व्हावी. कुणीही नाशवंत नाही. तो फक्त आपला आकार बदलत जातो. हे मनाला पटू लागते.

    जीवन जशी एक चक्रमय क्रिया असते, तशीच मृत्यु ही देखील चक्रमय क्रिया असते. म्हणूनच म्हणतात जन्म-मृत्युचे चक्र.

    -- डॉ. भगवान नागापूरकर

      January 4, 2015


  • काळजी नसावी

    या एका दोन शब्दी वाक्याचा प्रत्येकाने वापर केला तर किती मानसिक आधार मिळतो. हे ज्याला खरंच मानसिक आधार हवा आहे, त्या व्यक्तीपेक्षा कोण चांगलं समजू शकेल?

      January 10, 2019


  • चतुर बिरबल

    अकबर बादशहाच्या पदरी अनेक सरदार होते. एका सरदाराला उंची दागिने घालण्याचा शौक होता. त्याच्या अंगावर नेहमी हिया-मोत्यांच्या माळा झगमगत असत.

      December 15, 2023


  • गंध’ पुण्याचा गेला सांगून

    जर एखाद्या अस्सल पुणेकराचे डोळे व कान बंद करुन पुण्याची सफर घडवली तर तो त्याला नाकाने जाणवणाऱ्या त्या त्या परिचित गंधावरुन ते ते ठिकाण हमखास सांगू शकतो. मी हा प्रयोग एकदा केला. एका अस्सल पुणेकर मित्राचे डोळे व कानावरुन काळी पट्टी लावून त्याला पुण्यातून अनेक ठिकाणी उलटे सुलटे गाडीवरुन फिरविले. मी जिथे जिथे त्याला घेऊन गेलो, त्यानं मला पोपटासारखी ‘अचूक उत्तरं’ दिली.

      June 19, 2021


  • ना. नी. गबाळे

    अशातच ना.नी गबाळे मास्तर त्याच्या बदलीसाठी प्रयत्न करू लागला.ना.नी. गबाळे म्हणजे नारायण निवृत्ती गबाळे…! पण सगळेजण तेह्यलं नानी नावानचं वळखायचे.

      February 4, 2026


  • गुंतता

    लहान असेंन मी त्यावेळी आठवी नववीत जेव्हा त्यांचे लग्न झाले तो गावाकडचा पण शहरात स्थायिक झालेला, चांगली नोकरी होती परंतु लगेचं करत नव्हता. एकदाचे त्याने उशीरा का होईना लग्न केले. ती पण जरा जास्त वयाची होती, थोडी रखडलेली होती. कमी शिकलेली , मॅट्रिकपर्यंत घरात गावी सगळी कामे करत असे.

      July 26, 2023