नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
हळदीला आर्केस्ट्रा ठेवलेला, पहाटे साडे तीन वाजेपर्यंत आर्केस्ट्रा चालू होता. साडे अकरा बारा वाजेपर्यंत घरातली लहान पोरं आणि स्त्रिया नाचून नाचून दमले आणि एका मागोमाग एक कमी कमी होत गेले.
June 24, 2021
१९५५-६० साली शाळेतल्या शिक्षकांच्या सांगण्यावरून त्यांनी क्रीडास्पर्धेत भाग घेतला .. तेव्हापासून आवड निर्माण झाली आणि त्यांचा अॅथ्लेटिक्सच्या क्षेत्रात प्रवेश झाला
February 4, 2026
जीवनाच्या विविध पैलूच्या भावना समर्थपणे व्यक्त करणारा काव्यसंग्रह बालपणीच्या पहिल्या हुंकारापासून माणसाचं व्यक्त होणं सुरू होतं आणि आयुष्यात घडणार्या चांगल्या वाईट प्रसंगात प्रत्येक माणूस व्यक्तीपरत्वे व्यक्त होत असतो. नव्हे आयुष्यभर व्यक्त होण्याचा त्याला ध्यास लागलेला असतो. त्यामुळेच व्यक्त होणं हे माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण समजले जातं. मिलींद वि. देशपांडे व्यक्त मी अव्यक्त मी : प्रा. सुनील जोशी भ्र.: 9273807046 पाने : ११२, किंमत : १०० रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130
September 29, 2012
बाभनाची राधा काकी मंजे गावातील एक गुढ व्यक्तीमत्वाची बाई ! गावाच्या मंधोमंध बुरुजाखाली तिचा जुन्या काळातला ढवळ्या मातीनं बांधलेला टोलेजंग वाडा व्हता !!!
October 20, 2023
खासदार म्हणून दिल्लीत आल्यानंतर लोकप्रतिनिधीपदाच्या वाढत्या जबाबदारीचे ओझे जाणवत होतेच, शिवाय या नवख्या वातावरणात तसेच अनेक अनुभवी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधींचा सहवास लाभणार याची हरहूरही होती. तशी इथली जीवनशैली बरीच वेगळी आहे. त्याच्याशी जुळवून घ्यावे लागणार होते.
April 22, 2024
असे म्हणतात की स्वतः दत्तगुरूंनीदेखील २४ गुरू केले होते. त्यांनी निसर्गातील पक्षी प्राण्यांकडून आपले ज्ञान प्राप्त करून घेतले, त्याचप्रमाणे मलादेखील शाळेत जाण्यापूर्वी आणि आयुष्यात एक गुरू लाभला तो गुरू म्हणजे माझी ” आई “.
November 11, 2021
आईच्या आठवणीही त्याच्या गांठी नव्हत्या.मग त्या तिन्ही लहान मुलांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला.निदान त्यांनी तसे सांगितले.इतरांनी त्यांची स्वतःची गरज न सांगताच ओळखली.ती वयाने त्यांच्यापेक्षा बरीच लहान होती.मग त्यांचा नवा संसार सुरू झाला.
August 4, 2022
मोहनच्या वडिलांचं, मनोहर (अण्णा) कुलकर्णी यांचं विजय थिएटरच्या तळघरात ‘मनोरंजन पब्लिसिटी’चं आॅफिस होतं. मनोहर कुलकर्णी, डॅडी लोणकर व नाना रायरीकर या तिघांनी मिळून ‘मनोरंजन’ची स्थापना केली. नाटकांसाठी थिएटर बुकींग, नेपथ्य, जाहिरात, लायसन्स अशा सर्व प्रकारच्या सेवा पुरवणारं पुण्यातील हे एकमेव ठिकाण होतं.
July 7, 2021
पहिल्या पावसाची सरी धर्तीवर पडावी अन् सबंध आसमंत मातीच्या कस्तुरी गंधात न्हाऊन जावा.पावसाची वाट पाहणाऱ्या चातकाची तुष्णा शांत व्हावी ,उन्हाच्या तापाने सोकलेली झाले पावसाची सरी येताच टवटवीत झालेली ,असा संजीवनी देणारा पाऊस प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा .असा हा बहुरंगी पाऊस सृष्टीला फुलवणारा, लपून बसतो मनाच्या गाभाऱ्यात
July 2, 2019
शेख अमर (शाहीर अमर शेख) ते सह्याद्रि (नोंदशीर्षकांतील तत्सम शब्द संस्कृतप्रमाणेच) एवढ्या नोंदींचा या खंडात समावेश आहे. ‘शेतकामाची अवजारे व यंत्रे’ ही प्रस्तुत खंडातील पहिली विस्तृत नोंद असून ‘संस्कृत साहित्य’ ही या खंडातील सर्वाधिक विस्तृत नोंद ठरते. रामदेवबाबा व रविशंकर यांच्यावरील नोंदी तितक्याशा तटस्थ व विश्वकोशीय प्रकृतीला मानवणाऱ्या गंभीर प्रकृतीच्या वाटत नाहीत. रामदेवबाबांच्या नोंदीतील गुगल या संकेतस्थळावर त्यांचा कार्यक्रम व यौगिक साधना यांना १७,५०० पृष्ठे दिलेली आहेत हे वाक्य या नोंदीचा दर्जा दाखविण्यास पुरेसे आहे. (पृष्ठ १९७).
September 10, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti